घर... दोन अक्षरी शब्द पण या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या संकल्पनेत माणसाचं सौ"य सामावलं आहे. चरि ळी र ीलिळरश्र रळिारश्र असं म्हणतात. त्याच्या सामाजिकीकरणाची सुरुवात घरापासून होते. या घरातून मिळणारी मायेची उब आणि संस्कारांची शिदोरी त्याला समाजातील एक सुसंस्कृत व्यक्ती बनवते. मनुष्य"प्राण्या'पासून एक संवेदनशील व्यक्ती होण्याच्या प्रवासाची सुरुवात येथून होते. म्हणूनच तर ते समाजाचा मूलाधार समजलं जातं.
तर असं हे घर... हक्काचं विसाव्याचं ठिकाण! या घराची मनासारखी सजावट करणं हा बहुतेकांचा छंद असतो... हौस असते आणि हौसेला मोल नसतं याचं प्रत्यंतर आपल्या आजूबाजूला दिसणारी सजलेली घरं पाहताना येतो. 20/25 वर्षांपूर्वीपर्यंत गृहसजावट ही श्रीमंत लोकांच्या खिशाला परवडणारी चैन होती. आता ते दिवस गेले. उच्च शिक्षणामुळे मध्यमवर्गाची आर्थिक पत सुधारली आणि उबदार झालेल्या खिशाने ते घर सजविण्याची स्वप्नं पाहू लागले. त्यातच दूरचित्रवाहिन्यांवरून दिसणाऱ्या अतिदेखण्या घरांनी सर्वसामान्यांना आकर्षून घेतलं. आपलंही घर असं देखणं असावं असं त्यांना वाटू लागलं. स्वच्छ, साध्या पण नीटनेटक्या घरापासून ते सुंदर, अतिसुंदर घरापर्यंत घराच्या बाह्यरूपाची संकल्पना बदलत गेली. आज घर म्हटलं की ते किमान अद्ययावत सुखसोयींनी सजवलेलं असणारच हे गृहित असतं. साधंसुधं घर हे आता कोणाच्या कल्पनेतही येत नाही.
घराचं रूप बदलण्याचा हा जो काळ आहे त्या काळातच आणखी काही महत्त्वपूर्ण बदल या संकल्पनेतही होत होते. मोठ्या, एकत्रित कुटुंबापासून ते चौकोनी कुटुंबापर्यंत कुटुुंबांचा आणि पर्यायाने घरांचा संकोच झाला. एकत्र कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याची होणारी गळचेपी हे कुटुंब लहान होण्याचं एक प्रमुख कारण होतं. अशा छोट्या कुटुंबांनी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून दिली आणि बहुतेकांनी त्याचा लाभ करून घेतला. कुटुंबाच्या संकोचाने व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं खरं पण छोट्या कुटुंबात वावरताना व्यक्ती संकुचित विचारांची होऊ लागली. छोट्या घराबरोबरच मनेही छोटी होत गेली. त्यामुळे "वसुधैव कुटुंबकम्' हा फक्त पुस्तकातला सुविचार राहिला आणि घरातल्या मोजक्या चार माणसांभोवती प्रत्येकाची दुनिया सीमित झाली. ज्या परोपकाराचे, परस्पर सहकार्याचे धडे मोठ्या कुटुंबातून सहजपणे मिळत होते ते आता शालेय शिक्षणाचा भाग झाले आणि ते मूल्यसंस्कारांच्या तासाला मुलांना शिकविण्याचा करुण विनोद सुरू झाला.
घराचं घरपण हे त्या घरांत राहणाऱ्या माणसांच्या परस्परसंबंधावर अवलंबून असतं याचा विसर पडला. छोट्या कुटुंबामुळे प्रत्येकाला स्वत:चा अवकाश मिळाला खरा पण त्यात त्याला भवतालचा, नातेसंबंधांचा विसर पडला. सुंदर सजविलेल्या घरांत, एकमेकांपासून मनाने शेकडो योजने दूर गेलेली माणसं राहू लागली. घराच्या बाह्यरूपाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व आलं, त्यामुळे साहजिकच घराची सजावट ही प्राथमिकता झाली आणि मनाची - मनुष्यत्वाची मशागत दुय्यम ठरू लागली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सुंदर, देखण्या आणि सुखसोयींनी परिपूर्ण घरातली माणसं मात्र अतृप्त दिसू लागली. संपर्काची अद्ययावत साधनं हाताशी असतानाही संवादासाठी तळमळू लागली. "व्हर्च्युअल फ"ेंडशिप'सारखी सर्व नाती "व्हर्च्युअल' राखण्यातच समाधान मानू लागली.
अर्थात याला आजच्या जीवनशैलीतील वाढती आत्मकेंद्रितता व जीवनावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रामु"याने कारणीभूत आहेत. आपण आज ज्या स्तरावर जीवन जगतो ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी जे जे कारणीभूत ठरले त्यांचे आपल्यावर ऋण आहेत आणि त्यासाठी आपण आपल्या कुटुंबाला, समाजाला, देशाला उत्तरदायी आहोत ही भावनाच नष्ट झाली. जगासाठी आपण नसून, आपल्यासाठी हे जग आहे अशी भावना वाढीला लागली. त्यातच इंटरनेट, दूरचित्रवाणी, मोबाईल्स यांनी प्रत्येकाच्या घरात व मनात स्वत:चे असे प्रभावक्षेत्र निर्माण केले. त्या प्रभावक्षेत्रातून बाहेर यायला वेळ झाला तरच घरच्या माणसांशी संवाद शक्य होतो हे आजचे वास्तव आहे. नव्या संपर्क तंत्रज्ञानामुळे माणसाचे भावविश्व वैश्र्विक झाले असेल, परंतु त्याची त्याच्या कुटुंबातील, परिसरातील मुळे मात्र उद्ध्वस्त होत आहेत. त्याचं प्रत्यंतर वाढत्या न्यायालयीन कौटुंबिक खटल्यातून येत आहे.
सजलेल्या घराइतकेच त्यात निर्माण झालेले भावबंधही महत्त्वाचे असतात. त्यामुळेच या अंकाचा विषय जरी "घराची अंतर्गत सजावट' असा असला तरी नातेसंबंधाविषयीच्या मु"य लेखाचा अंतर्भाव केला आहे. स्वत:चं घर सजवावंसं वाटणं यात वावगं असं काहीच नाही. सौंदर्याची आवड मनुष्याला उपजतच असते. त्याची ती सहज प्रेरणा आहे. समाजात वावरताना जसा तो स्वत:चं व्यक्तिमत्त्व खुलवणारा पोशाख करतो त्याप्रमाणे तो आपलं घर सुंदर दिसावं, छाप पाडणारं असावं म्हणूनही विशेष मेहनत घेतो. पण अशा या सुंदर घरातले नातेसंबंधच जर मोडकळीला आले असतील तर या बाह्य सजावटीला काय अर्थ उरेल? ही सजलेली घरं लक्ष तेव्हाच वेधून घेतील जेव्हा नातेसंबंध जपणारी माणसं त्यात राहात असतील. त्या सौंदर्यात प्राण फुंकायची जबाबदारी असते आतल्या माणसांची... ती आपण कशी निभवायची हा खरा प्रश्न आहे आणि आजच्या काळाची ती सर्वात मोठी गरज आहे
|