माणसाला यश मिळायचे असेल तर त्याला दैव आणि कर्म या दोन्हीची जोड असावी लागते. माणसापाशी कितीही मोठे शौर्य आणि कर्तृत्व असेल परंतु त्याला दैवाची साथ नसेल तर त्या कर्तृत्वाचा व्यवहारात प्रत्यय येत नाही. तेरा वर्षे वनवासात असताना जयद्रथाकडून विटंबना झाल्यानंतर, "जगाला एकाचाही हेवा वाटेल असे पाच कर्तृत्ववान पती मला मिळालेले असताना माझी विटंबना का व्हावी?' असा भेदक प्रश्न द्रौपदीने कृष्णाला विचारला होता. त्यावेळी कृष्णाने द्रौपदीला दैवाचे महत्त्व सांगून दैव अनुकूल नसेल तर कर्तृृृत्वही शून्यवत होते असा उपदेश केला होता. दैव अनुकूल असणे वा नसणे ही माणसाच्या हातची बाब नसते, परंतु दैव अनुकूल असतानाही माणूस जेव्हा आपल्या कर्माने त्याचा लाभ घेण्याच्या स्थितीत नसेल तर तेव्हा त्याला काय म्हणणार?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राजकीय क्षेत्रात कॉंग"ेस, कम्युनिस्ट, समाजवादी व जनसंघ या चार विचारसरणी एकमेकांशी स्पर्धा करण्यास उभ्या होत्या. त्यात कॉंग"ेसला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्र्वभूमी होती व अनेक दिग्गज नेते त्या पक्षाकडे होते, कम्युनिस्टांच्या मागे एक विश्वविजयाची आकांक्षा बाळगणारे तत्त्वज्ञान व रशिया, चीनसार"या महासत्तांचा पाठिंबा होता, समाजवाद्यांकडे तर स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी व क"ांतीचा उत्साह होता. याउलट जनसंघाला मात्र गांधी हत्येचा आरोप, मध्ययुगीन दृष्टिकोनाबद्दलची टीका आणि कोणताही करिष्मा नसलेले आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांनी उपेक्षा केलेले नेतृत्व याचे धनी व्हावे लागले. परंतु काळाच्या ओघात कॉंग"ेसची पुण्याई संपली, डाव्यांचे क"ांतिकारकत्व अस्तंगत होऊ लागले, समाजवादी तर वाटेतून केव्हाच गायब झाले ते कळलेही नाही. या पार्श्र्वभूमीवर, हळूहळू जनसंघाचा व भाजपचा वाढीचा आलेख मात्र वाढता राहिला. उपेक्षेची पर्वा न करता, टीकेला दाद न देता, एक पर्यायी पक्ष म्हणून जनसंघाने व नंतर भारतीय जनता पक्षाने आपली अखिल भारतीय पर्यायी पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण केली. यशापयशाचे अनेक धक्के पचवत आज सहा महत्त्वांच्या राज्यात राज्यकर्ता व दोन राज्यात आघाडीतील पक्ष म्हणून भाजप सत्तेत आहे.
आज इतिहासात कधीही नसेल एवढे राज्यकर्त्या पक्षाचे धाबे दणाणले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर किंवा रामदेवबाबा यांच्या उपोषणाला टाळण्याकरिता सत्ताधारी पक्षाची जी धावपळ सुरू आहे, हे त्याचेच निदर्शक आहे. दयानिधी मारन यांनी आपल्या काळात 323 टेलिफोनचे एक एक्चेंजच आपल्या घरी कसे नेले व त्याचा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग केला याची जी बातमी प्रकाशित झाली आहे ती पहाता कॉंग"ेसच्या काळात वेगवेगळ्या मंत्र्यांना देशाची लूट करताना कोणताही धरबंध कसा राहिला नव्हता व पंतप्रधानांचे आपल्या मंत्र्यांवर कोणतेही नियंत्रण कसे राहिले नव्हते हेच पुुन्हापुन्हा सिद्ध होत आहे. त्यामुळे ही धावपळ. डाव्या पक्षांनी भाजपचा आयुष्यभर द्वेष केला परंतु आता त्यांच्यासमोरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. ही सर्वच स्थिती भाजपला अनुकूल व केंद्रस्थानी सत्तेवर येण्यास अत्यंत अनुकूल आहे. नरेंद्र मोदी, शिवराजसिंग चौहान, डॉ. रमणसिंग यांनी आपल्या कारभाराने आपापल्या राज्यावर छापही पाडली आहे व त्याची दखलही घेतली जात आहे. असे असूनही एक पक्ष म्हणून भाजपमधे सामूहिक उत्साह का निर्माण होत नाही हा त्याच्या समर्थकांना पडलेला प्रश्न आहे.
कॉंग"ेसचा प्रभाव झपाट्याने कमी आहे व राहूल गांधींनी कितीही बालिश प्रयत्न केले तरी त्यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही. राज्य स्तरावरील वाढत्या प्रादेशिक पक्षांच्या प्रभावामुळे आणि त्या पक्षाच्या नेत्यांच्या आत्मकेंद्रित स्वभावामुळे जर या पक्षांवर नियंत्रण ठेवू शकेल अशा सामर्थ्याचा अखिल भारतीय पक्ष असणे ही राष्ट्रीय गरज आहे. असा पक्ष राहिला नाही तर केंद्र सरकारमधे अखिल भारतीय दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यापेक्षा स्थानिक अभिनिवेशातून किंवा नेत्यांच्या स्वार्थातून निर्णय घेण्याचे प्रमाण वाढेल. पंतप्रधान कॉंग"ेसचे असूनही पक्षाच्या दुबळेपणामुळे ते काहीही करण्यास असमर्थ आहेत असा जो अनुभव येत आहे तीच अवस्था जर पुढच्या निवडणुकीत सत्ताबदल होऊन भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आले तर त्याची होईल. त्यामुळे भाजप सामर्थ्यवान होणे ही आजची राष्ट्रीय आवश्यकता बनली आहे.
परंतु राष्ट्रीय आवश्यकतेचे हे गांभीर्य या पक्षाच्या विविध पातळीवरील नेत्यांना जाणवत आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा बातम्या काही दिवस येत असल्याने भाजपचे समर्थक व सहानुभूतीदारांना दु:ख व्हावे हे स्वाभाविक आहे. राजकीय पक्षातील नेत्यामधे महत्त्वाकांक्षेतून निर्माण होणारी स्पर्धा असणे ही नैसर्गिक बाब असली तरी त्याचा निर्णय पक्षांतर्गत होणे हे आवश्यक आहे. कर्नाटकासार"या राज्यात पक्षाची झपाट्याने वाढ झाल्याने पक्षीय संस्कृतीचा परिचय नसलेल्या लोकांमुळे काही प्रश्न निर्माण झाले तर ते एकवेळ समजू शकते परंतु अशा गोष्टी जेव्हा अखिल भारतीय पातळीवर व महाराष्ट्रासार"या जुन्या परंपरा टिकविण्याची अपेक्षा असलेल्या राज्यात घडतात तेव्हा या परिस्थितीतूनही पक्ष मार्ग काढेल या विश्वासालाच तडा जातो. आपल्याला पक्ष म्हणून सामूहिकरित्या या देशात काही घडवायचे आहे असे स्वप्न जेव्हा डोळ्यांसमोर नसते तेव्हा व्यक्तिगत महत्वाकांक्षा पक्षहितावर मात करतात. या पक्षाच्या बांधणीसाठी व वाढीसाठी या पक्षापासून काडीच्याही फायद्याची अपेक्षा नसणाऱ्या असं"यांनी आपले योगदान दिले आहे. आजच्या बिकट परिस्थितीत या पक्षाने देशहिताचा विचार करून देशाला योग्य राजकीय नेतृत्व द्यावे एवढीच त्यांची इच्छा आहे. हा वर्ग हाच भाजपचा मोठा आधारही आहे. त्यामुळे जेव्हा दैव व परिस्थिती अनुकूल आहे तेव्हा आपल्या चुकीच्या कर्माने आपल्या हातचे यश न गमावण्याचे शहाणपण तरी या पक्षाला यायला हवे एवढीही त्यांनी अपेक्षा करू नये काय?
|