.
 
चालू अंक
पानिपत रणसंग्राम महाराष्ट्राची शौर्यगाथा
१२ डिसेंबर २०१०

संपादकीय
शिवाजी व महाराष्ट्राचे राष्ट्रीय कर्तव्य

पानिपत युद्धाला 14 जानेवारी 2011 रोजी दोनशे पास वर्षे पूर्ण होत आहेत. पानिपतचे युद्धतंत्र व आजची लढाई यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तरीही या युद्धाचे स्मरण का करायचे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची तीन उत्तरे आहेत.
आज महाराष्ट्रात समाजकारण वा राजकारण करायचे असेल तर शिवाजी महाराजांचे नाव घेणे अपरिहार्य बनले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने चालणाऱ्या जातवादी राजकारणाचा तर आपण नित्य अनुभव घेत आहोत. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीय अस्मितेचे राजकारण केले नाही किंवा जातीय अस्मितेचे राजकारण केले नाही तर महाराष्ट्राला आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून दिली. वस्तुत: शिवाजी महाराजांचे त्यांच्या आयुष्यकाळात साकारलेले राज्य अगदी छोटे होते. परंतु या राज्याची वैचारिक क्षमता औरंगजेबाला सलत असल्याने त्याला ते स्वत:च्या हाताने नष्ट करायचे होते. शिवराज्याचे उद्दिष्ट केवळ काही प्रांतांचे राज्य स्थापन करायचे एवढे मर्यादित नसून संपूर्ण भारत मोगली वर्चस्वापासून मुक्त करण्याची आकांक्षा त्यामधे आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे ते राज्य मुळापासून उखडून टाकण्यासाठी तो महाराष्ट्रात आला. महाराजांच्या या अखिल भारतीय दृष्टिकोनाचा परिणाम एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकारणावरही झाला. रानडे, फुले, टिळक, गोखले, डांगे, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांनी राजकारण किंवा समाजकारण केले ते अखिल भारतीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून. वैचारिक भिता असलेल्या परंतु अखिल भारतीय दृष्टिकोन असलेल्या अनेक अखिल भारतीय चळवळी महाराष्ट्रात जन्मल्या. परंतु त्यानंतर महाराष्ट्राची अखिल भारतीय नेतृत्वाची परंपरा संपली, पुन्हा एकदा शिवकालपूर्व जातीपातींच्या क्षुद्र राजकारणाच्या वावटळीत महाराष्ट्र सापडला आहे. आपली अखिल भारतीय राजकारण करण्याची भावनिक, मानसिक व बौद्धिक उमेद महाराष्ट्राने गमावली आहे. ती परत मिळविल्याशिवाय महाराष्ट्राला शिवाजीचा वारसा सांगता येणार नाही.
महाराष्ट्राच्या या अखिल भारतीय वारशामुळे देशाच्या फाळणीचे महाराष्ट्राला झालेले दु:ख सर्वाधिक होते. पानिपतच्या लढाईआधी अब्दालीने सदाशिवराव भाऊंसमोर पंजाब ही अफगाणिस्तान व भारत यामधली सरहद्द मानावी असा प्रस्ताव दिला होता, परंतु तो फेटाळून अटक हीच भारत व अफगाणिस्तानमधील सरहद्द असेल हे भाऊंनी स्पष्ट केले. 16 सप्टेंबर 1759 ला धोंडोबा पुरंदरेंना भाऊ लिहितात, ""शूजा व नजीबखान यांच्या विचारे सलुखाचा पैगाम घातला. त्यांच्या मते सरहिंदची हद्द अब्दालीची करून द्यावी..... आमच्या मते अटकची हद्द, पातशाही बंदोबस्त सर्वांचे पूर्वमतप्रमाणे राखून चालवावे. या प्रमाणे सलुख काही आमचे झाल्याशिवाय होत नाही.'' त्यामुळे या सरहद्दीच्याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारायला भाऊ तयार नव्हते हे स्पष्ट आहे. वस्तुत: पंजाब काय किंवा अटक काय महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेले हे प्रदेश. पण भारताच्या सीमा कोणत्या याबाबत भाऊंच्या मनात संभ"म नव्हता. संपूर्ण भारताची परकीय आक"मणापासून मुक्तता करणे, सर्व तीर्थक्षेत्रांवरची आक"मणाची निशाणी पुसून टाकणे हे मराठ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य मानले. जर पानिपतला मराठ्यांचा विजय झाला असता तर भारताचा इतिहास वेगळाच घडला असता. तिथल्या पराभवामुळे ही सर्वच कामे अपुरी राहिली. इंग"जांमुळे या देशात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही उदाहरणे आहेत. ज्यांना या वारशाचे भान नव्हते त्यांनी भारताची सरहद्द पंजाबपाशी आणून ठेवली.
याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजी महाराजांनी राष्ट्रीयत्वाच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप दिले. शिवाजी महाराजांपूर्वी राजा पडला की त्याचे राज्य संपत असे. विजयनगरचे एवढे मोठे साम"ाज्य, पण राक्षसतागडीच्या लढाईनंतर ते संपले. परंतु ते जसे संभाजीच्या मृत्यूनंतर संपले नाही तसेच पानिपतच्या पराभवानंतरही खचले नाही. आपला अखिल भारतीय राजकारण करण्याचा वसा त्याने सोडला नाही.
त्यामुळे या अंकाच्या निमित्ताने शिवरायांच्या या वारशाचे महाराष्ट्राला स्मरण करून देणे हा उद्देश आहे. महाराष्ट्रावर ऐतिहासिक परिणाम करणाऱ्या या घटनेला बहुतेक प्रसारमाध्यमांनी अनुल्लेखाने मारले आहे. गेल्या काही वर्षांत इतिहासाचे जातीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे व त्याला सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. त्या पार्श्र्वभूमीवर या अंकातील सर्वच लेख आत्मचिंतन करायला भाग पाडतील असे आहेत. इतिहास वर्तमानाला आकार देत असतो व त्यातून भवितव्य साकारत असते. एखाद्या समाजाची सामूहिक मानसिकता बनण्यात त्या समाजाचा इतिहासविषयक दृष्टिकोन कोणता आहे याचा सहभाग महत्त्वाचा असतो. आपण कोणाविरुद्ध लढत आहोत याविषयी नजीबखान व अब्दाली यांच्या मनात संभ"म नव्हता, मात्र तो राजपूत, जाट आदींच्या मनात होता व मराठ्यांपाशीही शिवाजी महाराजांच्या विशाल दृष्टिकोनाचे स्मरण असले तरी तो इतर प्रांतीयांवर बिंबविण्यात त्यांना अपयश आले. त्याचीच आजची परंपरा म्हणजे पाकिस्तानात कोणीही राज्यकर्ता आला तरी त्याच्यापाशी भारत विरोधाची स्पष्टता असते व आपण मात्र कोणता राज्यकर्ता असेल तर पाकिस्तानशी मैत्री होऊ शकते असे कल्पनेचे इमले बांधण्यात मग्न असतो. शिवाजीच्या वेळची युध्दातील व्यावसायिकता विसरून जेव्हा सैन्याला तीर्थक्षेत्राला जाण्याच्या मेळाव्याचे स्वरूप आले तेव्हा असा पराभव होणे स्वाभाविकच असते. अशाही परिस्थितीत मराठे जे लढले तेही स्मरणीय आहे, प्रेरक आहे, आजही आपणाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. त्यामुळे याचे स्मरण करून देणे ही विवेकने आपली विशेष जबाबदारी मानली व त्या जबाबदारीच्या भावनेतून हा अंक आम्ही प्रकाशित करीत आहोत.