शरद पवार यांना अलीकडे काय झाले हे कळेनासे झाले आहे. शरद पवार यांना महाराष्ट्रातील त्यांची चाहती मंडळी "जाणता राजा' म्हणत असली तरी गेल्या काही दिवसातील त्यांचे वर्तन पाहता हा कसला "जाणता राजा', असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडावा. केंद्र सरकारमध्ये कृषी खाते सांभाळत असलेल्या शरदरावांना, राजकारणात इतकी वर्षेे घालविल्यानंतरही, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समजू नये, वा त्यांनी तो समजून घेण्याचा प्रयत्न करू नये याचे आश्र्चर्य वाटते. शेवटी, सडत चाललेले धान्य गरिबांना वाटून टाकण्याचा आपण आदेशच दिला होता, असे सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा स्पष्ट करावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या सणसणीत चपराकीमुळे या "जाणत्या राजा'स "बॅकफूट'वर जावे लागले. कोणत्याही न्यायालयाचा आदेश आम्ही पाळू, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. देशातील विविध गोदामे भरली असल्याने धान्याची साठवण करणे कठीण असल्याने असे धान्य सडून वाया घालविण्याऐवजी ते गरीब जनतेला वाटावे, असे सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑगस्ट 2010 या दिवशी दिलेल्या आदेशात म्हटले होते. पण न्यायालयाने केवळ सूचना केली आहे, असे पवार यांच्या मंत्रालयाला वाटले. शेवटी न्यायालयाने या संदर्भात स्पष्टीकरण केल्यानंतर "न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला जाईल,' असे कृषीमंत्री पवार यांना संसदेत सांगावे लागले. देशातील विविध भागात गोदामांचा अभाव असल्याने धान्यसाठा उघड्यावर राहिल्याने तो सडत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीने तर यासंदर्भात सखोल अभ्यास करून एक विस्तृत अहवालच तयार केला आहे. गोदामांमध्ये सडत चाललेल्या धान्यसाठ्यांसंदर्भात संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी व्हायला हवी, अशीही मागणी करण्यात आली आहे. स्वतलिा शेती विषयातील तज्ज्ञ म्हणविणारे शरद पवार आज देशाचे कृषी मंत्रालय सांभाळत आहेत. पण "आयपीएल', कि"केटमध्ये जास्त रस घेतल्याने त्यांना या गोष्टींचा विसर पडला असावा. "ज्या मंत्र्यांना कि"केट आणि "आयपीएल'मध्ये अधिक रस आहे, असे मंत्री "बीपीएल'वाल्यांचा विचार कसा करणार, असा जो सवाल भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांनी केला आहे तो चुकीचा आहे असे कसे म्हणणार!
सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची अशी खरडपट्टी केली असतानाच, या "जाणत्या राजा'ने महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर कारण नसताना तोंडसुख घेतले आहे. पवार यांच्यासारखा मुरलेला राजकारणी जेव्हा जाहीरपणे तोडपाण्याची भाषा बोलायला लागतो तेव्हा पवार यांचे काही बिनसले तर नाही ना, अशी शंका कोणालाही यावी. शरद पवार यांनी "ब्लॅकमेलिंग', "तोडपाणी' अशी भाषा वापरून आपण दिल्लीतील परिपक्व राजकारणी नसून गल्लीतील पुढारी असल्याचेच दाखवून दिले आहे. पवार यांनी नाथाभाऊ खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांचे नाथाभाऊंनी खंडन तर केलेच, एवढेच नव्हे तर पवार यांनी जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करून दाखवा, असे आव्हानही पवार यांना दिले आहे. ""आपला कोणताही लवासा प्रकल्प नाही, कन्स्ट्रक्शन नाही, उलटपक्षी पवारांना जमीन, बिल्डर यांच्याबद्दल आपुलकी आहे व ते जगजाहीर आहे,'' असे एकनाथ खडसे यांनी आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले आहे. खडसे यांनी पवार यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा विचारही या निमित्ताने बोलून दाखविला आहे. सध्या माध्यमांमधून "लवासा'ची जोरात चर्चा चालू आहे. या चर्चेच्या निमित्ताने या प्रकल्पासंदर्भात पवार यांचा संबंध जोडला जात आहे. शरद पवार यांच्या "कृपादृष्टी'शिवाय "लवासा'सारखा प्रकल्प पुणे जिल्ह्यात उभा राहणे अशक्य आहे हे शेंबडे पोरदेखील छातीठोकपणे सांगेल. त्यामुळे "लवासा'पासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियांनी केला तरी "लवासा' त्यांचा पिच्छा सोडणार नाही, हे उघड आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे "लवासा' प्रकरणी पवार कुटुंबियांना "क्लीन चीट' देत असतील तर याचाच अर्थ पवारांचा "लवासा'त हमखास सहभाग आहे, असे जे वक्तव्य भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे, ते पाहता पवार यांची विश्वासार्हता किती ढासळली आहे हे लक्षात येते. राष्ट्रवादी कॉंग"ेसचे खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही काही काळापूर्वी पवार कुटुंबियांचा "जमीन-प्रेमा'बद्दल एका कार्यक"मात जाहीर उल्लेख केला होता. उदयनराजे यांनी त्यांना चक्क घरचा आहेरच दिला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आपण अत्यंत सोवळे असून अन्य पक्षातील नेतेमंडळी ही "तोडपाणी' करणारी आहेत, बिल्डरांशी संंधान बांधणारी आहेत, ब्लॅकमेलिंग करणारी आहेत, अशी भाषा वापरण्याचे कारण नाही. कि"केटमध्ये जसा हा "जाणता राजा' मुरलेला आहे, तसाच तो मुरलेला राजकारणी असल्याने, करून सवरून नामानिराळे राहण्यात ते "माहीर' आहेत. पण शरद पवार यांचे खरे रूप कसे आहे, हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.
देशात वाढत चाललेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे चढे दर, सडत चाललेले लाखो टन धान्य याची चिंता करण्याऐवजी शरद पवार हे एकदम महाराष्ट्रातील विरोधकांवर घसरले. पवार यांच्या वक्तव्याचा भाजपा-शिवसेनेने जोरदार शब्दांत समाचार घेतला. पवार आपल्या वक्तव्यावर खूष असतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सणसणीत चपराक दिल्याने पवार यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. देशातील कोट्यवधी जनता दारिद्र्यरेषेखाली जगत असताना त्या जनतेला पुरेसे अधान्य कसे देता येईल, याचा विचार न करणारा कसा काय "जाणता राजा' ठरू शकतो? बरे, या "जाणत्या राजा'ला आपल्या कर्तव्याबाबत समजत नसेल, असे गृहित धरले तरी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेशही त्यांच्या लक्षात कसा आला नाही? त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यामुळे पवारांची आणि मनमोहनसिंग यांच्या सरकारची पुरती बेअब"ू झाली. आता पवार या संदर्भात काहीही खुलासे करोत, पण या सर्व प्रकरणात ते पूर्णपणे उघडे पडले आहेत. दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांवर उठसूठ तोंडसुख घेण्यापेक्षा आणि "तोडपाणी', "ब्लॅकमेलिंग'सारखे खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा या "जाणत्या राजा'ने आपल्या खात्याचा कारभार स्वच्छ ठेवल्यास लोक नक्कीच दुवा देतील. पण पवार ज्या प्रकारचे राजकारण करीत आले आहेत, ते पाहता त्यांना आपल्यात परिवर्तन करणे आता जमेल असे वाटत नाही?
|