भारत हा एकविसाव्या शतकातील महासत्ता होण्याची स्वप्नेे पहात आहे. परंतु महासत्ता ही केवळ आर्थिक वा तंत्रज्ञानातील प्रगतीतून येत नाही तर ती एक मानसिकता असते. दहा वर्षे प्रयत्न करून अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला अखेर पाकिस्तानातून शोधून काढले व त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. या शिक्षेसंदर्भात रिपब्लिकन बुश असोत की डेमॉक"ॅटिक ओबामा, यांच्यात मतभेद नव्हते. "ओसामाने अमेरिकेवर हल्ला करून तिचा अपमान केला आहे व कोणतीही किंमत मोजून या अपमानाचा प्रतिशोध घेणे, हे अमेरिकन राष्ट्र या नात्याने आपले कर्तव्य आहे', याबाबत त्यांच्या मनात संदिग्धता नव्हती. परंतु याबाबत भारताची स्थिती कोणती आहे?
1993 साली मुंबईत बॉंबस्फोट झाले व या बॉंबस्फोटात दाऊद इब"ाहिमचा हात असल्याचे न्यायालयातही सिद्ध झाले आहे. दाऊद कराचीला राहत आहे. आखाती देशात असताना हिंदी चित्रपटातील ज्या नट, नट्या तिथे जात त्यांना तो मेजवान्या देत असेे, तेथे होणाऱ्या कि"केट सामन्यांना हजेरी लावत असे, जावेद मियॉंदादच्या मुलाशी त्याच्या मुलीचे लग्न झाले, या सर्व गोष्टी गुप्ततेत नव्हे तर प्रसारमाध्यमांना साक्षी ठेवून झाल्या आहेत. अमेरिकेने ज्या कष्टपूर्वक ओसामाचा ठावठिकाणा शोधून काढला त्याच्या शतांश प्रयत्नांचीही यासाठी भारताला आवश्यकता नव्हती. परंतु दाऊदला किंवा पाकिस्तानात असलेल्या 26/11 च्या गुन्हेगारांना भारतात आणणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असे आपणाला कधी वाटलेच नाही. जिहादी दहशतवादाचा धोका अमेरिकेच्या खालोखाल भारताला असूनही व या दहशतवादाला पाकिस्तानचा सक"ीय पाठिंबा असतानाही या संबंधात भारतीय सरकार निर्धारपूर्वक काहीही पावले उचलत नाही, म्हणून नैराश्याने काही ठिकाणी प्रतिकि"यात्मक हिंसक कृत्ये घडली; तर केवळ त्या कृत्यांचेच भांडवल करून हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला गेला व त्याला प्रसारमाध्यमांनीही भरभरून साथ दिली.
त्यामुळे भारतीय सेक्युलरवाद्यांच्या दृष्टीने, दाऊद किंवा त्याला आश्रय देणारा पाकिस्तान हे खरे शत्रूनसून, नरेंद्र मोदी हे खरे शत्रू आहेत. ज्या पाकिस्तानला अविश्र्वासार्ह देश म्हणून ओसामाविरूद्धच्या कारवाईत अमेरिकेने सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांना व संकेतांना पायदळी तुडवून त्याची त्याला जागा दाखवून दिली, त्या पाकिस्तानबद्दल भारतात कोणी गौरवोद्गार काढले किंवा राजदीप सरदेसाईसार"या पत्रकारांनी दाऊदच्या राष्ट्रभक्तीचे(?)े कौतुक केले तरी आपल्या सेक्युलॅरिस्टांना राग येत नाही. परंतु अण्णा हजारे यांनी मोदींच्या विकासकामांचे-जी सर्वज्ञात आहेत त्यांचे-कौतुक केले तरी तो फार मोठा गुन्हा बनतो. काश्मीरमधल्या दंगलखोरांशी वाटाघाटी करायला मध्यस्थांची नेमणूक केली जाते. मात्र,जम्मू किंवा लडाखमधल्या नागरिकांना काय वाटते याची फिकीर त्यांना नसते. कारण त्यांना या देशापासून फुटून जायचे नाही. त्यामुळे आपल्या देशात राजकीय नेत्यांचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल व त्यांची सहानुभूती मिळवायची असेल तर राष्ट्रविरोधी कृत्ये करणे आवश्यक आहे. त्यांनी कितीही गुन्हेगारी, हिंसक कृत्ये केली, अशा कारवायांना पाठिंबा दिला तरी ते मानवतावादी कृत्य असते व त्याच्याविरोधात कृती करण्याचा आग"ह धरला तर मात्र ते जातीयवादी कृत्य बनते.
पाकिस्तान काहीही करो, पाकिस्तानाशी मैत्री हा आपल्या पंतप्रधानांच्या व सेक्युलॅरिस्ट लोकांच्या तोंडचा परवलीचा शब्द बनला आहे. खरे तर पाकिस्तान नावाचा देशच आज अस्तित्वात नाही असे गृहित धरून, त्याच्याशी व्यवहार करण्याचे धाडस जोपर्यंत आपल्या देशात येत नाही तोपर्यंत आपली फसवणूक होतच रहाणार आहे. अमेरिकेला कोणत्यातरी एका मुस्लीम देशात भक्कमपणे पाय रोवून उभे रहायचे आहे. पाकिस्तानशिवाय अन्य कोणताही देश अशी परवानगी देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेची कितीही फसवणूक केली तरी अमेरिका पाकिस्तानला आपल्या हातातून जाऊ देणार नाही. चीनलाही आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानचा उपयोग करून घ्यायचा आहे. एकतर भारतविरूद्धचा देश म्हणून चीनला त्याचे महत्त्व आहे, तसेच पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या अन्य प्रदेशावरही चीनला आपला प्रभाव निर्माण करायचा आहे. मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांना पाकिस्तान हा आपला अड्डा बनवायचा आहे. तिथे कोणतेही स्थिर सरकार नाही ही त्यांच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे आज ना उद्या पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरही आपण ताबा मिळवू शकतो असा त्यांना विश्र्वास आहे. पाकिस्तानच्या लष्कराला आपल्या स्वार्थासाठी व अस्तित्वासाठी पाकिस्तान हवे आहे. पाकिस्तानमधल्या राजकारण्यांना आपल्या भ"ष्टाचारासाठी पाकिस्तान हवे आहे. त्यामुळे पाकिस्तनाच्या जनतेला शांतता हवी आहे असा प्रचार आपल्याकडे नेहमी सुरू असतो. ही जनता नेमकी कुठली आहे? ती कुठे राहते? तिचा प्रतिनिधी कोण? याचा पत्ता नसताना तिच्या नावाने हा शांततेचा धंदा भारतात जोरात सुरू आहे. कारण यात करायचे काहीच नसते. फक्त त्या शांततेच्या नावाने काही भारतीयांनी पाकिस्तानचा व काही पाकिस्तानी लोकांनी भारताचा दौरा काढून भाषणे द्यायची असतात.
जर खरोखर भारताला चीन आणि पाकिस्तानच्या अशुभ युतीला तोंड द्यायचे असेल तर भारतातल्या राष्ट्रभक्त शक्तींच्या आधारावरच ते करता येईल. जरी पक्ष वेगळे असले तरी राष्ट्रहिताच्या दृष्टीने कारवाई करण्याचा निर्धार एकच असला पाहिजे, असा बाणा जोवर आपण अंगी बाणवत नाही तोवर महासत्तेची स्वप्नेे पहाण्यात अर्थ नसतो. राष्ट्रभक्तांच्या आधारावर समर्थ राष्ट्र उभे राहते, त्यांचा तिरस्कार किंवा दुस्वास करून नव्हे!
|