"आयपीएल'वरून झालेले वाद संपत नाहीत तोपर्यंत राष्ट्रकुल स्पर्धांच्या भारतातील आयोजनामधील भष्ट्राचाराबाबतची धुळवड सुरू झाली आहे. "आयपीएल'च्या निमित्त ललित मोदी व पर्यायाने भारताचे कृषीमंत्री शरद पवार यांना जे भोगावे लागले, त्यापासून कलमाडींनी बोध घ्यायला हवा होता. परंतु राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल ही "आयपीएल'इतकी नसली तरी दुर्लक्ष करण्याइतकी नक्कीच नव्हती. "आयपीएल' हा महाघोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. आपल्या देशातील अन्य घोटाळ्यांप्रमाणेच या घोटाळ्याचे चर्वण चालूच आहे. शशी थरूर यांना आपले मंत्रीपद यामुळे गमवावे लागले; तर पवारांची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावर मलीन झाली. गेली कित्येक वर्षे सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुखपदी राहिले आहेत. आपल्याच मंडळींची एक टोळी कलमाडींनी या सर्व संघटनांमध्ये केली आहे. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असल्याने राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजकपद कलमाडींनाच मिळेल हे नक्की होते आणि तसेच घडले. आपल्या आयोजकपदाच्या अधिकारात त्यांनी जी मंडळी निवडली ती यापूर्वीच खेळाच्या क्षेत्रातील राजकारणात कलमाडींची माणसे म्हणून ओळखली जात होती.
भ्रष्ट्राचाराचे आरोप झाल्यानंतरसुद्धा क्रीडामंत्री एम. एस. गिल बराच काळ गप्पच होते. प्रसारमाध्यमांचा रेटा वाढल्यानंतर मात्र क्रीडा मंत्रालयाच्या आदेशाने आयोजन समितीचे सहमहासंचालक टी. एस. दरबारी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष संजय महेन्द्रू आणि विशेष अधिकारी एम. जयचंदन यांना निलंबित करण्यात आले आहे. समितीचे खजिनदार अनिल खा यांनी राजीनामा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धा दिल्लीत होणार आहेत. आयोजनाकरिता केवळ दोन महिने उरलेले असताना भ"ष्टाचाराचा हा सावळागोंधळ सुरू झाला आहे. या साऱ्या दबावापोटी कलमाडींनीच आपली एक समिती स्थापन करून झालेल्या भ"ष्टाचाराची माहिती आपल्या अहवालात दिली आहे. बॅटन रिलेच्याबाबत झालेला भ"ष्टाचार इतका मोठा आहे की, दीड हजार लोक काम करीत असल्याने कोणी काय केले हे सांगता येणार नाही, असे समितीचे सरचिटणीस भानोत यांनी म्हटले आहे. उपकरणांची खरेदी, कार्यक"म आयोजन करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आलेली कंत्राटे, समिती सदस्यांच्या नातेवाईकांनाच देण्यात आलेली कामे यामुळे राष्ट्रकुल स्पर्धांमधील भ्रष्ट्राचाराचे पितळ उघडे पडले आहे. आपण कुठल्याही न्यायालयीन चौकशीसाठी तयार आहोत, असे कलमाडी म्हणत असले तरी या साऱ्या भ"ष्टाचाराला मग कोण जबाबदार आहे, हे त्यांना देशाला सांगावे लागेल.
कलमाडींना जाब विचारायचा झाला तर मग दोन वर्षांपूर्वी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धांचाही जाब कलमाडींना विचारावा लागेल. युवा राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनासाठी राज्य सरकारने संयोजन समितीला 25 कोटी 50 लाख रुपये देऊ केले होते. या संयोजन समितीत अनेक मंडळी असली तरी त्यांची मुख्य सूत्रे कलमाडींच्या हातात होती, हे वेगळे सांगायला नको. खेळांची आयोजन समिती आता विसर्जित झाली आहे. त्यांचे पुण्यातील कार्यालयही गुंडाळण्यात आले आहे. या 25 कोटी 50 लाख रुपयांचा हिशोब मात्र आजतागायत देण्यात आलेला नाही. सुशोभीकरण, कार्यकम आयोजित करणे, टेबल-खुर्च्या खरेदी करणे अशा विविध कामांवर हे पैसे खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा हिशेब मात्र राज्य सरकारला अद्याप देण्यात आलेला नाही. कलमाडी यावर कुठेही काहीही बोलायला तयार नाहीत.
राष्ट्रकुल स्पर्धांवर केंद्र सरकारच्या विविध मंत्र्यांनी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा जगाच्या दृष्टीने भारताची शान वाढविणाऱ्या ठरतील, अशा आशयाचे विधान मात्र कुणीही केलेले नाही. किंबहुना तसे घडण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारला वाटतच नाही.
जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले खेळाडू काय पराक"म गाजवितात हे जगजाहीर आहे. एखाद दुसरे सुवर्णपदक, थोडीफार कांस्य वगैरे पदके मिळाली तरी आपल्याला अभिमान वाटतो. यात दोष खेळाडूंचा नाही. लोकप्रिय इव्हेंट ठरू शकतील असे सर्वच खेळ आपल्या राजकारण्यांनी वाटून घेतले आहेत. खेळाचा इव्हेंट कसा यशस्वी करायचा यामागेच सगळे आयोजक लागलेले असतात. या खेळात कोण जिंकतो? देशाच्या खात्यावर किती पदके जमा होतात, याचा विचार करायला कुणालाच वेळ नसतो. "आयपीएल' हे त्याचेच उत्तम उदाहरण होते. कधी काळी भारतीय कि"केट संघ म्हणून ओळखला जाणारा आपला संघ आता नक्की कोणाचा हे देखील सांगता येत नाही. आधी खेळ आणि आता खेळाडूही राजकारण्यांनी वाटून घेतले आहेत. दोन वर्षांपूर्वी बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकचे सर्वोत्कृष्ट आयोजन करून चीनने साऱ्या जगाचे डोळे दीपविले होते. केवळ आयोजनच नव्हे तर चिनी खेळाडूंनी विविध खेळांमध्ये आपले प्रावीण्य दाखवून मोठ्या प्रमाणावर पदकेही जिंकली होती. राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने आपल्या भष्ट्राचाराचे आणि बजबजपुरीचे जे नागडे प्रदर्शन जगापुढे मांडले जात आहे त्यामुळे खेळाच्याआधीच आपल्या अब"ूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली आहेत. राजकारण्यांनी राजकारणाचा खेळखंडोबा केला आहे. आता खेळात चालू असलेले हे राजकारण देशाची शान वाढविणार की जगात आपल्या प्रतिमेला काळीमा फासणार हे येणारा काळच ठरवेल.
|