महायुतीचा महामोर्चा 9 जून 2011 रोजी मुंबईत संप झाला. यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर चालू झाला आणि 9 जून रोजी दुपारपासून संततधार धरली होती. अशाही पावसात आझाद मैदानावर शिवसेना-भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाचे हजारो कार्यकर्ते जमले होते. धो धो पडणाऱ्या पावसात घराबाहेर पडणे आणि तेही मोर्चासाठी, महाकठिण असते. तरीही लोक पावसाची आणि मैदानतील चिखलाची पर्वा न करता मोर्चात सहभागी झाले. असे कर्मठ कार्यकर्ते हीच पक्षांची सर्वात मोठी शक्तीअसते. मोर्चात सहभागी झालेल्या सामान्य कार्यकर्त्यांची भाषणे होत नाहीत. भाषणे नेत्यांची होतात. परंतु सहभागी झालेला कार्यकर्ता आपल्या कृतीने दाखवून देत असतो की तो परिवर्तनासाठी सिद्ध झाला आहे. परिवर्तनाचा त्यांच्या मनातील आवेश धो धो पडणारा पाऊस थांबवू शकत नाही.
जेव्हापासून शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून कॉंग"ेस-राष्ट्रवादी कॉंगे"स आणि त्यांच्या मित्र पक्षाचे धाबे दणाणले आहे. रिपब्लिकन पक्ष गेली अनेक वर्षं कॉंग"ेसबरोबर आहे. तर कधी राष्ट्रवादी कॉंग"ेसबरोबर आहे. महाराष्ट्रात दलित समाज हा राजकीयदृष्ट्या सर्वाधिक जागरूक समाज आहे. बाबासाहेबांनी त्यांना संदेश दिला आहे की, "सत्ताधारी जमात बना. सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घ्या. सत्तेच्या माध्यमातूनच तुमची दैनावस्था संपेल.' कॉंग"ेस आपल्याला सत्तेत सहभागी करून घेईल अशी सर्व रिपब्लिकन जनतेची अपेक्षा होती. तथापि तसे काही घडले नाही. दलित ही आपली हक्कांची मतबॅंक आहे आणि त्यांनी आपल्याला मते दिली पाहिजेत आणि त्या बदल्यात आम्ही जे देऊ त्यात समाधान मानून राहिले पाहिजे, अशी कॉंग"ेसची अपेक्षा होती. सत्तेची मोक्याची पदे कॉंग"ेसने नेहमीच आपल्या ताब्यात ठेवली. आपला वापर किती काळ कॉंग"ेसला करू द्यायचा, आणखी किती काळ कॉंग"ेसबरोबर घरोबा ठेवायचा असा प्रश्न जनतेला पडला. रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा धाडसी निर्णय घेतला आणि शक्ती प्रदर्शनाचा कार्यक"म 9 जून रोजी केला.
ही युती होऊ नये म्हणून कॉंग"ेस आणि राष्ट्रवादी कॉंग"ेसने जिवापाड प्रयत्न चालू केलेआहेत. या प्रयत्नांचा पहिला भाग बौद्धिक गोंधळ निर्माण करण्याचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नामांतराला विरोध होता. रिडल्स्च्या विरोधात त्यानी मोर्चा काढला. वरळीत दंगल केली. अशी भूतकाळातील भूते उकरून काढण्यात आली आहेत. प्रवाही राजकारण भूतकाळावर चालत नाही. राजकीय परिस्थिती सतत बदलत राहते. अशावेळी नवीन भूमिका घ्यावी लागते. नवीन समीकरणे बांधावी लागतात. डॉ. आंबेडकरांच्या जीवनातही आपण पाहातो की, अनेकवेळा त्यांनी भूमिका बदलल्या आहेत. परंतु अस्पृश्य बांधवांच्या सार्वत्रिक कल्याणाचा विचार त्यांनी कधी सोडला नाही. महाराष्ट्राच्या सार्वत्रिक कल्याणाचा विचार शिवसेना-भाजपाचा कणा आहे. त्या सार्वत्रिक हितासाठी आज शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे काळाची गरज झाली आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती युती होऊ नये म्हणून कॉंग"ेस आणि राष्ट्रवादी कॉंग"ेसने काही भावनिक प्रश्न उकरून काढले आहेत. दादरचे चैत्यभूमी असे नामांतर करावे हा त्यातीलच एक विषय आहे. आंबेडकरी जनतेच्या भावना चेतवून त्यावर मताचा तवा ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा यामागचा उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित जनतेचे दैवत आहे. या दैवताचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करणे ही घाणेरडी पुरोगामी बडवेगिरी आहे, म्हणून दलित जनतेने खूप सावध राहिले पाहिजे.
पोटात एक आणि ओठावर दुसरे ही दुटप्पी चाल समजून घ्यावी आणि कोणत्याही प्रकारच्या भावनिक विषयात अडकवून घेऊ नये. दादर स्थानकाच्या नामांतरापेक्षा महाराष्ट्राच्या सत्तातरांचा विषय लाखमोलाचा आहे. जोगवा मागून जगण्याचे दिवस संपवले पाहिजेत आणि स्वतचि जोगवा देण्याच्या स्थितीला पोहोचले पाहिजे. सत्तांतर घडल्यानंतर असले सर्व भावनिक प्रश्न स्वसामर्थ्यावर सोडवता येतात.
बुद्धीभेद करण्याचा तिसरा प्रकार हिंदुत्व विचारधारेचा आहे. सेना-भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहेत. कॉंग"ेस आणि राष्ट्रवादी कॉंग"ेसने सातत्याने हिंदुत्वविरोधी प्रचार केलेला आहे. आंबेडकरी विचार आणि हिंदुत्व परस्परविरोधी आहेत असे सातत्याने मांडले आहे. या अपप्रचाराला बळी पडता कामा नये. पू. बाबासाहेबांचा सर्व लढा हिंदू समाज परिवर्तनाचा लढा आहे. अस्पृश्यता हिंदू समाजात आहे. अस्पृश्यतेची समर्थन करणारी धर्मशास्त्रे हिंदूंची आहेत. हिंदू समाजाने जातिभेद गाडून टाकले पाहिजेत. जातीअंत झाला पाहिजे. यांच्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष केला. आम्ही जर असे म्हटले की बाबासाहेबांचा लढा हा हिंदुत्वाला सामाजिक आशय देण्याचा होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्व त्रयीसाठी होता. तर ते वावगे ठरू नये. भगवान गौतमबुद्धांनी त्यांच्या काळच्या वैदिक धर्मात आणि समाजरचनेत हेच मूलगामी बदल करण्याचा प्रयत्न केला. हा वारसा डॉ. बाबासाहेबांनी पुढे नेला आणि हा वारसा त्यांच्या अनुयायांनीसुद्धा पुढे नेला पाहिजे असे आमचे नम" निवेदन आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती ही युती महाराष्ट्रात परिवर्तनाची शक्ती आहे. पण त्यासाठी एक पूर्वअट आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी पक्षांतर्गत अभेद्य एकजूटीचे दर्शन घडवले पाहिजे. अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणता कामा नयेत. जनतेला युती हवी आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे. जनतेला सामाजिक न्यायाचे राज्य हवे आहे. जनता जनार्दन हेच एकमेव दैवत आहे. त्यांची इच्छा प्रमाण मानून शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या सर्व नेत्यांनी वागले पाहिजे. अभेद्य एकजूटच परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे.
|