उपोषणाच्या यशस्वी सांगतेनंतर अण्णा विजयाच्या जयघोषात महाराष्ट्रात परतले खरे परंतु या विजयाच्या पुष्पवृष्टीत कोणते सापनाथ व नागनाथ दडून बसले आहेत याची हळूहळू अण्णांना कल्पना येत जाईल असा जो अंदाज होता तो अपेक्षेपेक्षा अधिक लवकर खरा ठरत आहे. अण्णांच्या उपोषणामागे जी गर्दी जमली होती त्यात प्रत्येकाचे स्वत:चे असे हिशेब होते व असे लोक अपवादात्मक असतील की ज्यांना खरोखरच भारत भ"ष्टाचारमुक्त करण्याची इच्छा आहे. मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश हे असे लोक आहेत की ज्याप्रमाणे प्रकाशाकडे रातकीडे आकर्षिले जातात तसे जिथे मिडियाचा चमचमाट असेल तिथे स्वामी अग्निवेश, मेधा पाटकर आदी मंडळी आपोआप आकर्षिली जातात. त्याचबरोबर सिव्हिल सोसायटीच्या नावे लढा उभारणे हा गेल्या काही वर्षातला मोठा व्यवसाय झालेला आहे. माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी निगडी येथील वसंत व्या"यानमालेतील भाषणात जी वस्तुस्थिती सांगितली आहे ती चिंताजनक आहे. माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागितली जाते, त्यापैकी केवळ पाच टक्के माहितीच जनहितार्थ असते व उर्वरित माहितीमागे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा व दबाव आणि उत्पाचे साधन यासारखे हेतू दडलेले असतात, असा त्यांनी आपला अनुभव सांगितला. जर असाच या कायद्याचा गैरवापर होत राहिला तर त्यात समाजाचा व देशाचा तोटा आहे, असेही त्यांचे प्रतिपादन होते. अण्णंानी मिळवून दिलेला माहितीचा अधिकार हे पारदर्शी लोकशाहीच्या दृष्टीने पडलेले पुढचे पाऊल आहे, हे विधान करण्यापूर्वी विचार करायला लावणारे कुवळेकरांचे भाषण आहे. समाजाचा स्तर न उंचावता केवळ कायद्याच्या माध्यमातून जे सामाजिक सुधारणा करायला पहातात ते प्रत्यक्षात सुधारणा करतात की भ"ष्टाचाराचा नवा मार्ग लोकांना दाखवितात यावर आत्मचिंतन करायला लावणारी ती माहिती आहे. अर्थात हे आत्मचिंतन लोकांनी करायचे आहे, अण्णांना त्याची काळजी नसल्याने माहिती कायद्याचा कसा उपयोग होतो आहे याची पर्वा न करता त्यांनी लोकपाल विधेयकाच्या नव्या मुद्याला हात घातला व सर्वोच्च न्यायालयाच्या रोजच्या तडा"याने नीतीधैर्य गमावलेल्या सरकारने लढाईआधीच शरणागती पत्करली. परंतु महाराष्ट्रापेक्षा दिल्लीचे पाणी वेगळे आहे, हे कळायला अण्णांना काही तासही जावे लागले नाहीत. अण्णांनी लोकहिताचे काम केल्याबद्दल मोदींना प्रशस्तीपत्र दिले व ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. परंतु त्यानंतर शांतीभूषण व प्रशांतभूषण यांच्यावरील आरोपांच्या रूपाने जे चक"ीवादळ आले त्याने अण्णांनाही चक"ावून टाकले आहे.
गेली काही वर्षे न्यायालयीन लढ्याच्या मार्गाने भूषण पितापुत्रांनी अनेक प्रकरणे धसास लावली आहेत. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली असली तरी एका विशिष्ट वर्तुळात त्यांच्याविषयी मत्सरही निर्माण झाला आहे. प्रशांतभूषण यांच्या न्यायालयीन अवमानाच्या खटल्यात युक्तिवाद करताना शांतीभूषण यांनी काही सरन्यायाधीश भ"ष्ट होते असाही नावे न घेता आरोप केलाहोता. असा निनावी आरोप केल्यामुळे आपण सर्वच सरन्यायाधीशांच्या प्रतिष्ठेला धक्का लावतो आहोत याचे भानही त्यांनी बाळगले नाही. अण्णांच्या आंदोलनात ते अण्णांच्या जवळ होते व लोकपाल विधेयक बनविण्यासाठी अण्णांच्या वतीने जी नावे दिली गेली त्यात या पिता-पुत्राचेही नाव होते. त्याच वेळी यावर टीका झाली. परंतु हे विधेयक तयार करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी हवीत म्हणून ती टीका खोडून काढण्यात आली. परंतु संपूर्ण देशात आणखी कोणते तज्ज्ञ नाव मिळू शकत नाही काय किंवा एखाद्याला केवळ समितीत राहूनच विधेयक तयार करण्यास मदत करता येऊ शकते काय या प्रश्नाला उत्तर देण्याची तसदी कोणी घेतली नाही. त्यामुळे अण्णांच्या समितीवर असलेल्या या पितापुत्रांवर हल्ला करून अण्णांच्या सदस्यांची विश्र्वासार्हता समाप्त केलीकी सरकारी सदस्यांचे काम सोपे होईल या विचाराने आज कॉंग"ेसजवळ जाण्यास उत्सुक असलेल्या अमरसिंग यांच्या खांद्यावरून तोफ डागण्यात आली व या तोफेच्या आवाजानेच अण्णांच्यासकट सगळे गोंधळून गेले आहेत व भुईसपाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भूषण पितापुत्रांवर दोन आरोप करण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेश सरकारविरोधात न्यायालयीन लढाई लढत असताना भूषण पितापुत्रांना नोईडा येथे अत्यंत सवलतीच्या दरात फार्म हाऊससाठी जे प्लॉट मिळाले, हे प्लॉट दिले जात असताना त्यात भ"ष्टाचारही झालेला असू शकतो असे शांती भूषण यांचे म्हणणे आहे. या प्लॉटस्करिता आलेल्या अनेक अर्जांतून यांनाच ते का मिळाले, याचे समाधानकारक उत्तर अजूनही मिळालेले नाही. त्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यासंबंधी अमरसिंग, मुलायमसिंग व शांतीभूषण यांच्यात झालेल्या संभाषणाची जी सीडी बाहेर आली आहे ती तर माहितीच्या अधिकारामुळे कोणते रोग समाजाच्या शरीरात शिरले आहेत, त्याची कुवळेकरांनी जी कारणमीमांसा केली आहे, त्याच्याशी पूर्णत: सुसंगत आहे. कारण पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, दबाव, उत्पाचे साधन या सर्व गोष्टींचा प्रत्यय या सीडीमधून येतो. आपण मुलायमसिंग यांना ओळखत नाही, असे सांगून शांतीभूषण यांनी आपली विश्वासार्हताच प्रश्नांकित केलीआहे. समाजवादी पक्षाच्या वतीने न्यायालयात वकीलपत्र घेऊन, आपण मुलायमसिंग यांना ओळखतही नाही असा दावा करणे हास्यास्पद आहे. एवढेही त्यांच्यासार"या बुजुर्गाला भान राहू नये, यावरून बसलेला धक्का किती मोठा आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे या लोकपालांच्या विधेयकामागे खरोखरच भ"ष्टाचार निर्मूलनाचा हेतू आहे की भूषण पितापुत्रांसार"यांना नव्या उत्पाचे दालन खुले करून हवे आहे असा प्रश्न निर्माण होतो. प्रशांतभूषण यांनी स्वत:च चौकशी करून त्याचे प्रमाणपत्र घेणे अर्थशून्य आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाची विश्र्वासार्हताही पणाला लागली आहे.
आम्ही मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे भ"ष्टाचाराचा आजचा प्रश्न जटील असून तो आजच्या जीवनशैलीशी निगडीत आहे. एखाद्या कायद्याने तो नियंत्रित करता येईल असा दावा करणारे एकतर भोळे किंवा संधीसाधू आहेत. त्यापैकी अण्णांचा रस त्यांच्या प्रेषितपणाच्या प्रसिद्धीपुरताच मर्यादित आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण बाकीच्यांचे काय?
|