.
 
चालू अंक
सुपारी पत्रकारिता : जबाबदारी कोणाची?
१ आँगस्ट २०१०
संपादकीय - बुद्धिवादाचे मार्केटिंग

मराठीतील एक अभ्यासू स्तंभलेखक व ‘कालनिर्णय’ वार्षिकाचे संपादक जयराज साळगावकर यांनी ‘लोकसत्ते’त दि. 23 जुलैच्या अंकात चमत्काराच्या मार्केटिंगच्या निमित्ताने आपल्या बुद्धिवादाचे मार्केटिंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भारतातील बुद्धिवादाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यात जगाला ज्ञानाचे डोस पाजताना आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करणे हे महत्त्वाचे लक्षण आहे. (त्यांच्या पत्राचा आवश्यक अंश याच अंकात पान क‘. 35 वर प्रकाशित केला आहे.) आपल्या पत्रात, खिडकीतून सावरकरांनी उडी मारणे अशक्य असल्याचे सिद्ध करण्याकरिता त्यांनी ‘विवेक’मधल्या लेखाचा हवाला दिला आहे. सावरकरांनी ज्या खिडकीतून समुद‘ात उडी घेतली तिचा व्यास 12 इंच होता, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.

सावरकरांच्या मानेचा व्यास 14 इंच व छातीचा आकार 32 ते 34 इंच असताना ते 12 इंचाच्या होलमधून पार होणे अशक्यप्राय आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यांचे हे विधान वाचून जयराज साळगावकर यांना ज्या शिक्षकांनी भूमिती शिकविली असेल ते जिवंत असतील तर पृथ्वीवर व स्वर्गात असतील तर तेथे किती तळमळले असतील याची कल्पनाही करवत नाही. व्यासाच्या तिपटीपेक्षा जास्त परीघ असतो व त्यामुळे 12 इंचाच्या व्यासाचा परीघ 38 इंच असतो. त्यामुळे मानेचा परीघ 14 इंच असू शकतो, व्यास नाही व ज्यांनी 12 इंच व्यासापेक्षा छोट्या रिंगेमधून आपले शरीर पार करतानाचा डोंबार्‍याचा खेळ पाहिला आहे त्यांना, या परिघातून 32 वा 34 इंचाची छाती पार होणे अवघड असले (म्हण्ाून सावरकरांचे महत्त्व) तरी अशक्य नाही हे कळणे अवघड नाही. परंतु आपल्या अज्ञानाचे महान तत्त्वज्ञानात रूपांतर करणार्‍या बुद्धिमंतांचे काय सांगावे?

सागराइतक्या आपल्या अथांग ज्ञानाची जाणीव वाचकांना करून देताना विमानाच्या व जहाजांच्या खिडक्यांची तुलना करताना त्यांना काचा असणे किती आवश्यक असते यासंबंधीही त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. परंतु विमानाच्या खिडक्यांना काचा असाव्याच लागतात. कारण विमान वर गेल्यावर बाहेरच्या हवेचा दाब एवढा विरळ झालेला असतो की जर त्या खिडक्या नसतील तर प्रवाशांना श्वासोच्छवासही करणे अवघड होईल. जहाजात तशी स्थिती नसते. याउलट केबिनमध्ये हवा येण्यासाठी मोकळ्या खिडक्या असणे आवश्यक असते अशी आम्हासार‘या सामान्यजनांची समजूत आहे. सदैव काचा बंद करून बसलेल्या बुद्धिमंतांना उघड्या खिडक्याही असू शकतात याची कल्पना करणे अवघड जाऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे.

परंतु जयराज साळगावकरांनी खिडकीची व सावरकरांच्या शरीराची जी मापे दिली आहेत ती ‘विवेक’चीही नाहीत की साळगावकरांचीही नाहीत. सावरकरांंच्या उडीनंतर थोड्या दिवसांनी म्हणजे 26 जुलै 1910 रोजी ‘पायोनियर’ पत्राने विश्वसनीय मार्गाने मिळालेली माहिती म्हण्ाून जी बातमी प्रसिद्ध केली त्यातील ही माहिती आहे. त्या बातमीचा सारांश असा, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सावरकरांनी प्रातर्विधीला जाण्याची इच्छा व्यक्त केली... सावरकरांनी दरवाजा लावून घेतला... दरवाज्याच्या फटीतून पहारेकरी पाहू लागला तेव्हा पोर्टहोलमधून सावरकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्याला दिसले, त्याने दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी न होता त्याची काचेची तावदाने फुटली, सावरकरांच्या छातीचा परीघ तीन फूट आहे, एक फूट व्यासाच्या पोर्टहोलमधून यशस्वीपणे बाहेर पडताना त्यांचे शरीर चांगलेच सोलून निघाले. (शि.ल. करंदीकर लिखित सावरकर चरित्र) त्यामुळे सावरकरांच्या मार्सेलिस येथील उडीची चमत्कार कथा (त्यातील खिडकी व सावरकरांच्या छातीच्या मोजमापासकट) कोणा सावरकरभक्ताने निर्माण केली नसून त्यावेळी प्रकाशित होेणार्‍या ‘इंग्लिशमन’, ‘अॅडव्होकेट ऑफ इंडिया’, ‘पायोनिअर’, ‘डेली न्यूज’ व विविध फ‘ेंच वृत्तपत्रे यांनी मिळून तयार केली आहे असे म्हणावे लागेल व अशी त्यांनी तयार केली असे गृहित धरले तर तोही एक चमत्कारच मानावा लागेल.

यातील खरा मुद्दा सावरकरांच्या मार्सेलिस उडीचा चमत्कार खरा की खोटा हा नसून आजच्या कृतिश्ाून्य बुद्धिवाद्यांना सावरकरांची मार्सेलिस उडी किती बोचते याचा आहे. सावरकरांची प्रत्येक कृती हाच एक चमत्कार होता, त्याची चर्चा करणे त्यांना अस्वस्थ करून टाकते. या ऐवजी सायंकाळच्या सुरापानाच्या वेळी गाय ही उपयुक्त पश्ाू की माता, त्यांची विज्ञाननिष्ठा या मुद्द्यांवर चर्चा करणे किती चांगले? काही करण्याची भानगड नाही, सावरकरभक्तांना शिव्या घालायला ते सोयीचे. त्यामुळे चैतन्याने मुसमुसलेल्या सावरकरांच्या कर्तृत्वाला चमत्कार म्हण्ाून हिणकस ठरविण्यात आपला बुद्धिवाद खर्ची टाकण्यातच आपल्या बुद्धिवादाचे मार्केटिंग आहे अशी त्यांची समजूत आहे. जयराज साळगावकरांनीही या मार्केटमध्ये या पत्राच्या निमित्ताने आपले दुकान टाकले आहे व इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाने दिलेल्या उत्कृष्ट पत्रकारितेच्या पुरस्काराच्या बातमीच्या दिवशीच हे पत्र प्रकाशित करून ‘लोकसत्ते’नेही आपल्या उत्कृष्ट? पत्रकारितेचे प्रदर्शन केले आहे !