.
 
चालू अंक
अधर्म सहिष्णूतेचे बाळकडू
२ जानेवारी २०११

संपादकीय
इतिहासाचे प्रेम की जातीद्वेषाचा विखार

गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या समाजकारणात कमी होऊ पहाणाऱ्या जातवादाच्या व जातद्वेषाच्या विखाराला नव्याने खतपाणी घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. दादोजी कोंडदेवांच्या गुरुत्वासंबंधातील वाद हा त्याचेच निदर्शक आहे. ठाण्याला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने या वादाची नव्याने ठिणगी टाकण्यात आली. वस्तुत: या साहित्य संमेलनाचा स्टेडियमच्या नावाशी कोणताही संबंध नाही. ते स्टेडियम ठाणे महानगरपालिकेचे आहे. परंतु कोणतेही साहित्य संमेलन वादाविना होऊ न देण्याच्या परंपरेनुसार हा वाद निर्माण करण्यात आला. जर या साहित्य संमेलनात दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलाचा ठराव येऊ शकतो तर त्या न्यायाने श्रीरामजन्मभूमीवर श्रीराम मंदिर बांधण्याचा ठरावही पारित करणे हे अधिक औचित्यपूर्ण ठरेल. कारण रामायण या महाकाव्याचे कवी वाल्मिकी हे आद्यकवी. कोळी जातीत जन्मलेल्या व दरवडेखोरीचा व्यवसाय करणाऱ्या वाल्मिकींनी केलेल्या रामायणाचा परिणाम भारतीय जनमानसावर हजारो वर्षे राहिला आहे व रामाच्या भक्तांना व सीता त्याग व शंबुकाच्या कथेवरून रामावर टीका करणाऱ्या साहित्यिक व विचारवंतांनाही आधुनिक काळातही रामायणाने भरपूर साहित्यिक व वैचारिक प्रेरणा दिली आहे. त्यामुळे रामायण या महाकाव्याचा नायक असलेल्या रामाच्या जन्मस्थानावरचे न्यायालयात सिद्ध झालेले आक"मण दूर करण्याचा ठराव या संमेलनात झाला पाहिजे, ही मागणी साहित्य संमेलनाच्या कार्यक्षेत्रात येणारी आहे.
ठाणे साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने या संदर्भातील चर्चा घडत असताना पुणे महानगरपालिकेने लाल महालाच्या प्रवेशद्वारातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याचा ठराव संमत केला आहे. ठाण्याच्या संमेलनासंदर्भात स्टेडियमच्या नामबदलाची चर्चा सुरू असतानाच हा ठराव व्हावा हा योगायोग नव्हे. गेले काही दिवस संभाजी बि"गेडला मिळणारा पाठिंबा झपाट्याने उतरणीला लागला आहे. विवेक व्यासपीठाच्यावतीने झालेल्या पानिपतच्या काही कार्यक"मांना संभाजी बि"गेडने विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु या कार्यक"मांना मिळणारा पाठिंबा पाहून तो मावळला. केवळ पानिपतचेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शहरातील वेगवेगळ्या कार्यक"मांत संभाजी बि"गेडने दिलेल्या धमक्यांना न जुमानता जिथे कार्यक"म झाले तिथे ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. त्यामुळे ठाणे येथील संभंजी बि"गेडच्या आंदोलनाला आवश्यक तो लोकांचा पाठिंबा मिळणार नाही हे लक्षात आल्यावर हा ठराव करून राजकीय दबाव उत्प करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना स्वराष्ट्र निर्मितीची प्रेरणा दिली, हा दावा अर्थहीन असला तरी दादोजींनी प्रशासनाची घडी बसविताना त्यांच्यावर जे संस्कार केले त्यांचे स्मरण महाराजांना होते, हे नंतरच्या महाराजांच्या अनेक पत्रांवरून सिद्ध होते. लालमहालासमोर दादोजी कोंडदेवांचा पुतळा असण्याचे औचित्यही प्रशासकीयच आहे. गाढवाचे नांगर फिरवून अदिलशाहीने पुण्याची अवस्था स्मशानवत केलीहोती. पुण्याचा परिसर साप, विंचू, जंगली श्र्वापदांनी व्यापला होता. तिथे वस्ती करण्याचे धैर्यही लोकांना होत नव्हते. या परिस्थितीत जेव्हा या परिसराची प्रशासकीय जबाबदारी शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवांवर सोपविली तेव्हा लोकांत प्रशासनाविषयी विश्र्वास निर्माण करण्यासाठी दादोजींनी सोन्याच्या फाळाने तेथील जमीन नांगरली. शिवरायांची गणना एक कुशल प्रशासक म्हणून केलीजाते व या प्रशासनाचे जे बाळकडू त्यांना दादोजींच्या प्रत्यक्ष प्रशासनाच्या अनुभवातून मिळाले व त्याचा आदरपूर्ण उल्लेख महाराजांनी आपल्या पत्रातून केला. त्यातून इतिहासकारांनी दादोजींकडे गुरुत्वाच्या भावनेने पाहिले. दादोजींना गुरुत्वाचा मान द्या वा न द्या, पण त्यांची प्रशासकीय कुशलता व प्रामाणिकता आजच्या वातावरणात संस्कार घडविणारी व अनुकरणीय नाही काय? की अशा कार्यक्षम, प्रामाणिक व सचोटीच्या प्रशासकांची उदाहरणेही संभाजी बि"गेडला नकोशी झाली आहेत? त्यामुळे ती नष्ट करण्यात आदर्शपासून राष्ट्रकुल स्पर्धा व कांद्यांच्या भानगडीत सापडलेल्या कॉंग"ेस व राष्ट्रवादी कॉंग"ेसजनांना त्यांचे स्मरणही नको झाले आहे?
अफजलखान वध ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील क"ांतिकारी घटना. या वधामुळेच शिवरायांच्या स्वराज्याबद्दलचा विश्र्वास जनमानसात निर्माण झाला. या घटनेची आठवण पुसून टाकण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून सुरू आहे. परंतु या संबंधात संभाजी बि"गेडने कोणतेही आंदोलन केलेले नाही. संभाजी बि"गेडने आपलेे नाव ज्या संभाजी महाराजांवरून घेतले आहे त्यांचा अत्यंत क"ूरपणे वध औरंगजेबाने केला. नव्या दिल्लीत औरंगजेबाच्या नावे एक रस्ता आहे. त्या रस्त्याचे नाव बदलून त्याला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अशीही कधी संभाजी बि"गेडने मागणी केलेली नाही. याचे कारण स्पष्ट आहे की ज्या व्यक्ती व संस्था संभाजी बि"गेड चालवित आहेत त्यांना या दोघांचेही सोयर-सुतक नाही. त्यांना हिंदू समाजात जातवादाचा व जातीद्वेषाचा विखार निर्माण करून हिंदू समाजाला दुबळे बनवायचे आहे. जिथे राहुल गांधीनाच पाकिस्तानपेक्षा हिंदू दहशतवाद्यांचा धोका अधिक वाटतो तिथे इतर कॉंग"ेसजनांबाबत काय म्हणणार?
एकेकाळी शिवधर्माच्या नावाने सुरू झालेल्या चळवळीचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर त्या चळवळीचा पाठिंबा झपाट्याने ओसरत गेला. त्यामागे असलेल्या अनेक विचारवंतांचाही भ"मनिरास झाला. त्याचे सामर्थ्य आता केवळ वृत्तपत्रातून धमक्या देण्यापुरते उरलेले असताना पुणे महानगरपालिकेने हा ठराव करून त्या चळवळीला नवे जीवदान दिले आहे. सामाजिक विद्वेष वाढण्यात याची परिणती होणार असून याची किंमत समाजाला तर भोगावी लागेलच, पण या दोन्ही पक्षांनाही ती चुकवावी लागेल.