अमेरिकेमधे हेडलीची साक्ष सुरू झाल्यानंतर जी माहिती बाहेर येत आहे त्यात नवे तपशील असले तरी ती सर्वांना माहिती असलेल्याच कहाणीचा नवा अध्याय आहे. पाकिस्तानच्या निर्मितीला हिंंदूंचा द्वेष हाच एकमेव नकारात्मक आधार होता. हा आधार पाकिस्तान व बांगला देश यांची एकात्मता टिकवू शकला नाही. त्यामुळे बांगला देशच्या निर्मितीनंतर पाकिस्तानसमोर नव्या फाळणीचे संकट निर्माण व्हायला नको म्हणून जन. झिया यांनी इस्लाम ही पाकिस्तानची ओळख आहे हे निश्चित करून पाकिस्तानच्या इस्लामीकरणाचे धोरण राबविले. त्यामुळे हिंदूंच्या व पर्यायाने भारताच्या द्वेषासोबतच पाकिस्तानचे वाढते इस्लामीकरण हे त्या देशाचे धोरण बनले व त्या धोरणाला अनुकूल अशी पाकिस्तानच्या लष्कराची मनोभूमिका तयार झाली. आज पाक सरकार पुरस्कृत दहशतवाद आयएसआयच्या खात्यावर जमा होत असला तरी आयएसआय ही निर्णय घेणारी संस्था नसून फक्त अंमलबजावणी करणारा घटक आहे. आता हळू हळू आयएसआयची स्वत:ची कार्यसूची तयार होत असली तरी जर पाक लष्कराचा तिला विरोध असेल तर त्याची अंमलबजावणी करणे हे आयएसआयला शक्य नाही. त्यामुळे जोवर पाकिस्तानची ही द्वेषमूलक भूमिका बदलत नाही तोवर कितीही कि"केट डिप्लोमसी करा की अमेरिका वा अन्य देशाची मध्यस्थी घ्या, परिस्थितीत कोणताच फरक पडणार नाही.
फाळणीआधीच्या मुस्लिम लीगच्या व फाळणीनंतरच्या पाकिस्तानच्या द्वेषमूलक भूमिकेमुळे पाकिस्तानचा काही फायदा झाला आहे असेही नाही. या भूमिकेमुळे मुस्लीम लीगला व पाकिस्तानच्या धोरणाला द्वेषाचा टोकदारपणा आला असला तरी त्यामुळे त्यांनी स्वत:भोवती द्वेषाचा व त्यातून येणाऱ्या नैराश्याचा काळोख उभा केला आहे. या द्वेषाच्या विखारातून त्यांनी अशा भस्मासुराला जन्म दिला आहे की त्यामुळे आज पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परवा कराचीच्या विमानतळावर तालिबान्यांनी केलेला हल्ला पाकिस्तान किती अराजकाच्या पातळीवर पोचला आहे याचे निदर्शक आहे. या हल्ल्यानंतर चीननेही पाकिस्तानमधे तिथल्या बंदरात जी गुंतवणूक करायचे ठरविले आहे त्याबद्दल फेरविचार सुरू केला आहे अशी बातमी आहे. या अराजकसदृश वातावरणात पाकिस्तानची अण्वस्त्रे किती सुरक्षित आहेत यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या आणखी फाळणीसंदर्भात आम्ही एक लेख प्रकाशित केला होता. त्या शक्यतांची चर्चा आता अधिक मोठ्या स्वरूपात सुरू झाली असून जे टाळण्यासाठी झियांनी पाकिस्तानच्या इस्लामीकरणाची प्रकि"या सुरू केली नेमकी तीच परिस्थिती पाकिस्तानवर ओढवली आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भारताशी अधूनमधून कडक भाषा बोलण्यापलिकडे व नंतर शांततेचा जप करण्यापलिकडे कोणतीच भूमिका नाही.
पाकिस्तानचा हा खेळ अमेरिका, चीन, तालिबान व पाक लष्कर यांच्यात खेळला जात असून एक हताश प्रेक्षक म्हणून तो पहाण्यापलिकडे भारताच्या हाती काहीही राहिलेले नाही. भारतद्वेष ही पाकिस्तानच्या धोरणाची दिशा आहे त्याप्रमाणे आपल्या धोरणाला कोणतीही दिशा नसणे हेच भारताचे धोरण आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने परराष्ट्रसंबंधात तटस्थतेचे धोरण स्वीकारले ते आज संदर्भहीन झाले आहे. श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात अमेरिकेच्या विरोधात जाऊनही भारताने स्थानिक महासत्ता बनण्याचे धोरण अवलंबिले होते. परंतु तसा विचार करण्याचीही आजच्या राज्यकर्त्यांची कुवत नाही. त्यामुळे एका बाजूला आपल्या द्वेषपूर्ण धोरणाने पाकिस्तान भारताच्या संदर्भात अतिकार्यक्षम झाले आहे व भारताला त्याचे परिणाम कारगिल व मुंबई हल्ल्याच्या रूपाने भोगावे लागले आहेत. पाकिस्तानचा प्रवास आत्मघाताच्या दिशेने चालला असला तरी त्यात भारताने आनंद मानण्याचे कारण नाही, कारण निराश झालेली व्यक्ती ही अधिकाधिक बेजबाबदार होत जाते व त्यामुळे अधिक विघातक कृत्ये करू लागते. याउलट भारताच्या धोरणाला कोणताही सैध्दांतिक आधार नसल्याने त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याला कोणतीही दिशा व उत्साह नाही. त्यामुळे भारतीय गुप्तचर संस्थांमधे जी अकार्यक्षमता दिसते त्याचा उगम या हेतूशून्यतेत आहे. दाऊद किंवा पाकिस्तानातील अतिरेकी भारतात आणायचे आहेत ही गोष्ट करण्याची नसून अधूनमधून फक्त बोलत रहाण्याची आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने आपल्या हातातील यादी पूर्ण आहे की नाही, तिच्यातील अतिरेकी पाकिस्तानातच आहेत याची खात्री करून घेणे याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही. भारत सरकारच ही यादी गांभीर्याने घेणार नाही व त्यामुळे जगातील कोणताही देश ती गांभीर्याने घेणार नाही याची त्यांना खात्री असल्याने ही यादी कोणी तपासून पाहील अशी शक्यताच ज्यांनी ही यादी तयार केली त्यांना वाटली नसावी. परंतु प्रसारमाध्यमांनी त्यांचा अंदाज चुकविला. अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खरोखरच सूड घ्यायचा असल्याने दहा वर्षेे ते त्याच्यावर नजर ठेवून होते. या सरकारला फक्त हिंदू दहशतवादी आहेत हे सिध्द करण्यात रस असल्याने भारताच्या गुप्तचर यंत्रणांचे सर्व लक्ष इंद्रेशजींना दहशतवादाच्या खटल्यात गुंतवून राज्यकर्त्यांना कसे खूश करता येईल याकडे लागले आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय जगतात प्रभाव टाकणारा देश म्हणून जगायचे आहे असा सुस्पष्ट दृष्टिकोन असलेले राज्यकर्ते जोवर राज्यावर येत नाहीत तोवर या परिस्थितीत बदल होणार नाही. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादी कृत्ये करण्याचे थांबविणार नाही व तसा प्रसंग घडल्यावर पुन्हा एकवार अशी यादी पकिस्तानला पाठवून त्यांना भारताच्या हवाली करण्याची मागणी करणे व त्या दरम्यान कि"केटसार"या वेगवेगळ्या नावाने "डिप्लोमस्या' करत रहाणे हा आपला वेळ जाण्याचा उद्योग करत राहू. प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या या नव्या कटकटीमुळे या यादीतले लोक जिवंत आहेत ना व भारतात व जगात अन्यत्र कुठे पकडले गेले नाहीत ना हे पाहणे हे एक नवे काम मात्र त्यांच्या बोकांडी बसले आहे.
|