संसद, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे चार प्रमुख आधारस्तंभ असे आपण वर्षानुवर्षं मानत आलो आहोत. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या भरभक्कम आधारावरच लोकशाहीचा डोलारा तोलला गेला होता. या स्तंभांच्या कर्तृत्वाविषयी, लोकशाहीसाठीच्या त्यांच्या योगदानाविषयी लिहिताना आज "भूतकाळा'चा वापर करण्याची वेळ आपल्यावर आली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. म्हटलं तर, धोक्याची घंटा आहे.
एकमेकांवर अंकुश राखत लोकशाही बळकट ठेवण्याची जबाबदारी या चारही खांबांची. संसदेतील लोकप्रतिनिधींना, वेगवेगळी "खाती' सांभाळणाऱ्या मंत्र्यांना लागलेली भ"ष्टाचाराची कीड, न्यायाधीशांच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भात सुरू असलेली लाजिरवाणी चर्चा, लाचार प्रशासन हे चित्र दिसत असताना आपण मात्र धुतल्या तांदळासारखे आहोत असा प्रसारमाध्यमांचा दावा होता... आणि लोकही या भ"ामक विश्र्वासात होते. त्यांचं व्यापक जाळं "जागल्याची' भूमिका पार पाडेल अशा भ"मात असणाऱ्यांना एका बातमीने मुळापासून हादरवून सोडलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात ए. राजाला पुन्हा दूरसंचार खात्याचं मंत्रिपद मिळावं यासाठी कॉंग"ेस श्रेष्ठींना समजावण्यात जी मंडळी आघाडीवर होती, त्या टोळक्यात एनडीटीव्हीची बरखा दत्त आणि "हिंदुस्तान टाइम्स'च्या वीर संघवी या "हाय प्रोफाईल' पत्रकारांचा समावेश आहे. राजाला पुन्हा दूरसंचार खात्याच्या मंत्रीपदी बसविण्याची खटपट करणाऱ्या वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स या पी.आर. फर्मला त्यांचा हेतू साध्य करण्यात मदत करण्याची इच्छा या पत्रकारांनी व्यक्त केली होती. या संदर्भात या कंपनीच्या नीरा रादिया या महिलेशी मोबाईलवरून झालेलं संभाषणाचं ध्वनिमुद्रण हा भरभक्कम पुरावा उपलब्ध आहे. केंद्रातली मंत्रीपदं कशी वाटली जातात, त्यांचे भयानक सौदे कसे होतात याची एखाद्या हिंदी चित्रपटालाही मागे टाकील अशी चित्तचक्षुचमत्कारिक कथा या निमित्ताने बाहेर आली. कॉर्पोरेट सेक्टरची, राजकारण आणि प्रसारमाध्यमांवर असलेली पोलादी पकड यानिमित्ताने सगळ्या जगासमोर आली आहे. 2जी स्पेक्ट्रमचा महाघोटाळा करणारा ए. राजा याच्याच हातात पुन्हा दूरसंचार खात्याची सूत्रं जाण्यात किती जणांचे हितसंबंध गुंतलेले होते, याविषयी नीरा रादियाचे टाटा, अंबानींबरोबर झालेले संवाद आपल्या ज्ञानात भर घालतात. राजकारणातले श्रेष्ठी आणि कॉर्पोरेट सेक्टरमधले दादा लोक यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं, अर्थात "लॉबिंग' करणं हे नीरा रादियाचं जॉब प्रोफाईल. करुणानिधींशी खातेवाटपाबाबत चर्चा करणारी "लॉबिस्ट' नीरा आणि कॉंग"ेस "हाय कमांड'शी बोलणारी बरखा यांचं संभाषण ऐकलं तर आपल्याला या प्रकरणाचा अंदाज येऊ शकतो. "लॉबिंग' ही गोष्ट चुकीची असली तरी अपरिहार्य आहे, अशी त्याची वकिली करणारे म्हणतीलही. पण "जागल्या'ची भूमिका निभावणाऱ्या पत्रकारांनी या चुकीतला एक भागीदार असावं का, हा प्रश्न त्यांना विचारण्याची वेळ आली आहे.
निर्भीड पत्रकार असल्याचा बुरखा पांघरलेली, स्वत:ला भारताची "ओप्रा विन्फ"े' समजणारी बरखा कोणत्या पातळीला पोहोचू शकते हे या प्रकरणामुळे लक्षात येतं. "हा आमच्या दैनंदिन कामाचा एक भाग आहे, त्यात वावगं काही नाही', असं स्वत:चं निर्लज्ज समर्थन करणारी बरखा आणि तिला पोसणारी एनडीटीव्ही ही कंपनी म्हणजे पत्रकारितेला लागलेला काळीमा आहे. 24 तास बातम्यांचा रतीब घालण्याच्या नादात आणि त्यासाठी एकमेकांशी गळेकापू स्पर्धा करण्याच्या नादात प्रसारमाध्यमं कोणत्या आवर्तात फिरत आहेत आणि हे वादळ त्यांच्यासह या देशाची काय दशा करणार आहे याचा तर्क आपण करू शकतो. न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राजकीय क्षेत्राची लक्तरं वेशीवर टांगत असतानाच प्रसारमाध्यमंच भ"ष्ट व्यवस्थेचा एक भाग बनून गेली आहेत. या देशाचा कारभार नक्की कोण करतं? लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी की स्वत:च्या पास पिढ्या बसून खातील इतकी माया जमविण्यासाठी सभ्यासभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे कॉर्पोरेट क्षेत्रातले दिग्गज? मूठभर लोक पूर्ण देश वेठीला धरू शकतात? प्रसारमाध्यमांना स्वत:चा धर्म विसरायला लावू शकतात? दुर्दैवाने आजतरी या सर्व प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत.
आपल्यापर्यंत पोचणारी बातमी किती खरी आहे की तिच्याआडून काही निराळाच खेळ चालू आहे याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात संभ"म निर्माण करण्याचं काम या घटनेने केले आहे. आता यापुढे "ब"ेकिंग न्यूज', "स्टिंग ऑपरेशन'वर कोणता शहाणा माणूस विश्र्वास ठेवेल? प्रसारमाध्यमांची विश्र्वासार्हता अशा प्रकारे धुळीला मिळणं ही साधीसुधी गोष्ट नाही. आम जनतेचा उडालेला विश्र्वास परत मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतील."मॅच फिक्सिंग'च्या धक्कादायक प्रकरणानंतर सर्वसामान्य माणसाचा समोर दिसणाऱ्या खेळावरचा विश्र्वासच उडाला, हा अलीकडचा इतिहास आहे. आपल्यासमोर खेळला जाणारा सामना हा खराखुरा आहे की नाटक आहे याबद्दलचा संभ"म आजही त्याच्या मनात ठाण मांडून आहे. "मॅच फिक्सिंग' प्रकरणानंतर कित्येकांना या खेळातून निर्भेळ आनंद घेता आलेला नाही. तेच भोग प्रसारमाध्यमांच्या वाट्याला येणार आहेत.
पक्ष चालविण्यासाठी, निवडणुकीचा महाखर्चिक सोपस्कार पार पाडण्यासाठी "कॉर्पोरेट क्षेत्रा'तील धनदांडग्यांपुढे बिनशर्त लोटांगण घालणारे राजकारणी आणि जाहिरातींद्वारे मिळणाऱ्या भरमसाट पैशाच्या लोभापायी "स्वधर्म' विसरलेली प्रसारमाध्यमं, या दोघांच्या लाचारीची जातकुळी एकच आहे. विविध जाती-धर्माच्या, पंथोपपंथांच्या या देशात लोकशाहीचा विलक्षण प्रयोग सुरू झाला तो या चार घटकांच्या भरवशावर. लोकशाहीचा डोलारा तोलण्यासाठी उभारलेले हे खांबच आतून भ"ष्टाचाराच्या वाळवीने पोखरलेले आहेत. त्यांना पुन्हा संधी देऊन आपण स्वस्थ बसणार आहोत की मनावरची मरगळ झटकून,बुद्धीला आलेली बधीरता दूर करून, ही कीड दूर करण्यासाठी आपण स्वच्छता मोहीम हाती घेणार आहोत? धोक्याच्या घंटा जोरजोरात वाजत आहेत... आपण कानावरचे पडदे दूर केले आहेत का? "हे राज्य आपल्यासाठी आहे' याची जाणीव आपल्याला आहे का?
|