दिवाळी अंक २०१७

अतूट बंधन!

  ***जयश्री देसाई**** यंदा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 75वी पुण्यतिथी आणि त्यांच्या अलौकिक  कन्येच्या, लतादीदींच्या गान कारकिर्दीची पंचाहत्तरी असा दुर्लभ योग जुळून आला आहे. आजच्या पिढीने दीनानाथांना पाहिलेलं नाही. मात्र केवळ गेली 75 वर्षं अ..

महावस्त्र

  आपण जीवनाला महावस्त्र समजतो, ही चूक आहे. ती एक ठिगळांची वाकळ आहे. ती पुरेशी नसतेच. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांनी त्या तथाकथित महावस्त्राचा त्याग केला. मोठी माणसं होती ती. आपण लहान माणसं आहोत. त्या वाकळीची एक चिंधीही आपल्याला..

चूकभूल... फक्त घेणे...

  'भाभीं'चा नवरा बँकेच्या नोकरीत नडियादच्या शाखेत कामाला होते. तिथे सगळया गुजराथी अडोसपडोसमध्ये भाभींचं 'भाभी' हे नाव पडलं. पुढे महाराष्ट्रात राहायला आल्यावर 'भाभी' हे नाव त्यांच्या घरादाराला, राहणीसाहणीला शोभत नाही, असं अनेकांना वाटायचं. अगदी स्वत:..

अधल्यामधल्या करडया छटा

  पूर्वग्रहांमुळे आपण आसपासच्या जगाचं चित्रण काळं किंवा पांढरं या दोन रंगांमध्येच करू पाहतो. प्रत्यक्षात अशी काटेकोर विभागणी करणं अन्यायकारक असतं. कारण कोणतीही बाब किंवा कोणतीही विचारधारा संपूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. संपूर्णपणे विधायक किंवा वि..

सिग्नल

वाहत्या रस्त्याच्या फुटपाथवर झाडांच्या, कंपाउंड वॉलच्या आधाराने काही तात्पुरते पाल उभे आहेत. ती त्या मुलांची वस्ती. कुठल्याही क्षणी कुणीही येतं अन् त्यांना तिथून हाकलून लावतं. ती वस्ती मग तिथून उठते अन् दुसरीकडे जाऊन बसते. हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांची ती..

थॉमस पेन आणि महात्मा फुले

  जोतिरावांना असलेली सामाजिक प्रश्नांविषयीची जाण, त्याविषयीचे त्यांचे आकलन, त्यांच्या मांडणीतील स्पष्टवक्तेपणा व आक्रमकता पाहिली, म्हणजे पेन आणि जोतिराव यांच्या भाषेतील व लेखनशैलीतील सारखेपणा सहज नजरेत भरतो. या लेखातील पूर्वार्धात आपण थॉमस पेन यांचे..

प्रत्यक्षातील अद्भुत दुनिया

  वाढत्या वयाबरोबर मैत्री झालेल्या कीबोर्डवाल्या ई गॅजेट्सनी जाणवून दिलेलं सत्य म्हणजे, बालपणीची ती चित्रविचित्र दुनिया झूट असून त्या साध्या बालमनास रमवणाऱ्या उत्तम कल्पना होत्या. बालपणीचा हा सुखाचा काळ संपल्यावर करियर म्हणून निसर्गात काम करताना जाण..

दांडेलीची रानगोष्ट

  ***डॉ. मिलिंद पराडकर**** वसंताचे घर, चैतन्याचे दार, सुखा अंत:पार, तेथे नाही... दांडेलीच्या त्या अवाढव्य रानात निवांत मनाने अन् शरीराने भटकताना हे असे नाना परींचे विचार डोक्यात गर्दी करीत होते. हे रान अफाट आहे. कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक जो..

कहाणी एका अलक्षित क्रांतिकारकाची

सनातनी, मध्यमवर्गीय आणि उगीचच कोणाच्या मध्यात न पडणाऱ्या अशा नाशिकच्या लोकांमध्ये ही स्वातंत्र्याबद्दलची जनजागृती आणि कृतिशीलता येण्याचे कारण म्हणजे 'अभिनव भारत' ही क्रांतिकारक संघटना आणि अभिनव भारत म्हटले की आपल्या डोळयासमोर येतात ते बाबाराव आणि तात्या..

ऋतुसंहारम्  'आला ग्रीष्म माझिया दारी'

  ऋतुसंहार हे खंडकाव्य तर निसर्गाचा एक सौंदर्यपटच उलगडून सांगणारे आहे. सहा ऋतूंचे सहा सर्ग, प्रत्येक सर्गात सोळापासून अठ्ठावीसपर्यंत श्लोक आहेत. कालिदासाच्या प्रतिभेचे एक विशेष वेगळेपण ऋतुसंहारमध्ये लक्षात येते, ते म्हणजे या काव्यात नायक, नायिका नाह..

यवनखंडित भारतीय  शिल्पवैभव

बौध्द, मुस्लीम व ख्रिस्ती लोकांनी भारतीयांना खूप छळले. त्यांच्या शिल्पवैभवाचा मनसोक्त विध्वंस केला. माणसे मारली. पण या सर्वात जास्त अन्याय मुसलमानांनी केला. यावनी आक्रमणाच्या तडाख्यात जी सापडली, जी शिल्लक राहिली ती मंदिर शिल्पे आजही साश्रू नयनांनी आपल्य..

वज्रकुसुम

भगिनी निवेदितांच्या कार्यमग्न व निरलस जीवनावरून प्रेरणा घेऊन 'भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, सांगली' या नावाने एक अखिल भारतीय महिला संस्था सुरू झाली. या संस्थेची वेगळी ओळख निर्माण झाली ती संस्थेने केलेल्या देवदासी पुनर्वसन व एड्सग्रस्त महिला व बालके यांचा स..

श्रीविठ्ठल एक सनातन कोडेमाधव भांडारी

विठ्ठल हे दैवत व त्याच्या भक्तांचा संप्रदाय या दोहोंचा इतिहास किमान 2000 वर्षांचा असावा, असे दिसते.  'श्रीविठ्ठल' हे आजही जगभरातील संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने एक 'महाकूट' आहे. संस्कृतीच्या संशोधक अभ्यासकांसमोर, कंबरेवर हात ठेवून उभे असलेले हे एक ..

जग संपूर्ण गुरु दिसे.....!!

  ***गिरीश प्रभुणे**** ''आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारावर सर्वांना शिक्षण द्यायला हवं आणि ते सर्वांना समान जसं असेल, तसंच ते त्याच्या त्याच्या चितीच्या - प्रज्ञा, मन आणि बुध्दी यांच्या पूर्ण ज्ञानावर आधारित हवं. प्रत्येकाचा पिंड वेगळा, प्..

प्रश्नांना भिडणारी संघभावनारवींद्र गोळे

समाज हा बहुपेडी असतो. त्यामुळे समाजाअंतर्गत अनेक समस्या, प्रश्न विद्यमान असतात, निर्माण होत असतात. या समस्यांचे, प्रश्नांचे निराकरण समाजानेच केले पाहिजे अशी धारणा असणारे आपल्या देशात आहेत. त्यापैकी डॉ. दादा आचार्य आणि त्यांचे 'केशवस्मृती सेवा प्रतिष्ठान..

हरवलेला सुवर्णाक्षरी चित्रपट - रामशास्त्री! 

***समीर गायकवाड   ****  नि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्यायनिष्ठुरता व नि:पक्षपातीपणा या गुणांचा समुच्चय ज्या एका अधिकारी व्यक्तीमध्ये एकवटला होता, अशी एक व्यक्ती पेशवाईत होऊन गेली. या व्यक्तीने आपल्या कर्तव्यात मोठा आणि लहान, आपला व पर..

आठवणीतली गाणी साठवताना

***अलका विभास*** पूर्वीच्या काळात मराठी फाँट्स इंटरनेटवर उपलब्ध नव्हते, फारसे प्रचलित नव्हते. तो प्रयोग करून पाहावा, म्हणून लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या गाण्यांची एक जुनी वही शोधली. सुमारे 350 गाणी असतील. अगदी नेहमीची. आपल्या सगळयांच्या हृदयाजवळची. ती संगण..

गांधी समजून घेताना...रमेश पतंगे

गांधीविचार आणि संघविचार यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? देशातील बहुतेक सर्व गांधीवाद्यांनी संघाला गांधीजींचा शत्रू ठरवून टाकले आहे. माझ्यासारखा संघात वाढलेला स्वयंसेवक दीर्घकाळ गांधीविचारांपासून स्वतःला दूर ठेवतो. परंतु गांधी हा दूर ठेवण्याचा विषय न..

नीरक्षीर विवेकाची आवश्यकतादिलीप करंबेळकर

  हिंदू समाजाने नवभारताचे व नवहिंदूसमाज निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन कार्यरत होण्याचे आव्हान हिंदू धर्मपीठांनी स्वीकारले पाहिजे, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत, स्किल इंडिया यासारख्या कितीही चांगल्या कल्पना असल्या, तरी समाज त्या..

बंदा रुपया...

****जयंत विद्वांस****  त्याच्यासारखं यश, प्रेम परत कुणाला मिळालं नाही. तुलना करूच नये. आकडयांवर सिध्द होणारा माणूस तो नव्हे. काळ काय, झरझर सरला. तो पंचाहत्तर वर्षांचा झाला. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे. पुढली अनेक शतकं थेटरात अंधार हो..