घरवापसी पवित्र राष्ट्रीय कार्य

 विवेक मराठी  09-Apr-2015


पुस्तकाचे नाव : घरवापसी पवित्र राष्ट्रीय कार्य

किमत : ४० 

आपले धर्म कर्तव्य

इतिहासाचे हे धडे आपल्याला विसरता येत नाहीत. आपली सेक्युलर गाढवे आपल्याला ते विसरायला सांगतात,म्हणून आपण गाढव बनण्याचे कारण नाही. या सर्वांना परत आपल्या मूळ धर्मात आणणे म्हणजे आपल्या घरी आणणे,म्हणजे पवित्र राष्ट्रीय कर्तव्य आहे. शंभर अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षाही किंवा पुण्यप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्मांपेक्षाही हे कर्म अतिशय पवित्र आहे. त्याचे पावित्र्य कशात आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे.

*घरवापसी याचा अर्थ आपल्या पूर्वजांच्या घरी परत येणे होय. आपले घर ते आपले घर असते,परक्यांचे घर जरी राजवाडा असला तरी तो आपला नसतो. आपल्याला आपल्याच घरी सुखाची झोप लागते.

*आपल्या घरात चोरी करून,फसवून जर कोणी आपले धन नेले तर ते नेणाऱ्याचे होत नाही. ते धन परत मिळविणे हे आपले नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य असते.

*जमीन-जुमला,सोने-नाणे,पैसा ही जशी संपत्ती आहे,तशी मनुष्यबळ हीदेखील संपत्ती आहे. या संपत्ताची लूट परधर्मीयांनी केली आहे. त्या लुटीवर त्यांचा अधिकार नाही,त्यावर आपला अधिकार आहे. ही गोष्ट नैतिकदृष्टया जशी खरी आहे,तशीच कायदेशीरदृष्टयाही खरी आहे.

*जे अभारतीय धर्मात जातात,त्यांच्यावर6प्रकारची गुलामी लादली जाते.1)सांस्कृतिक गुलामी2)धार्मिक गुलामी3)भाषिक गुलामी4)आहार गुलामी5)वेष गुलामी6)अभारतीय जीवनमूल्यांची गुलामी असे गुलामीचे प्रकार येतात. या प्रत्येक प्रकारावर विस्ताराने लिहिता येईल. परंतु जागेच्या मर्यादेचे भान ठेवावे लागते.

*गुलामाला गुलामीतून मुक्त करणे याहून पवित्र कार्य जगात असू शकत नाही. मनुष्याची याहून श्रेष्ठ सेवा अधिक नाही.

*मनुष्याला त्याच्या रुचीच्या धर्मातून प्रलोभनाने अथवा बळजबरीने परधर्मात नेण्यासारखे महापाप नाही. हे महापाप धुवून काढण्याचा पवित्र यज्ञ म्हणजे घरवापसी हा आहे.

*सगळे भारतीय धर्म तत्त्वज्ञानाने आणि वृत्तीने वैश्विक असतात. परमेश्वर एक असून त्याच्या उपासनेचे मार्ग वेगवेगळे आहेत असे सगळे भारतीय धर्म सांगतात. सगळे भारतीय धर्म नुसतेच सहिष्णू असतात असे नाही,तर ते दुसऱ्याच्या उपासना धर्माचा मनापासून आदर करणारे असतात. आज जगाला याच मनोवृत्तीची गरज आहे. हे काम भारतालाच करायचे आहे. घरवापसी हा विश्व शांततेचा,वैश्विक सहिष्णुतेचा पुण्यमार्ग आहे. या मार्गाने जे लोक निघाले आहेत,त्यांच्या मागे सर्व ताकदीनिशी उभे राहणे हे आपले पवित्र राष्ट्रीय कर्तव्य आहे.