.... आणि वाहते झाले नदी - नाले

 विवेक मराठी  15-Nov-2016

समाजसेवी संस्थांच्या जोडीला भोणकरांच्या लोकसहभागामुळे खोलीकरणाचे अतिशय चांगले काम होऊ शकले. खोलीकरणातील माती व मुरुम नदीच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आले. आता बंधाऱ्यांमध्ये पाटया टाकूनही आजूबाजूच्या शेतांना धोका नाही. पावसाळयाचे सर्ंपूण 4 महिने बंधारे तुडुंब भरून वाहत होते. दोन ते अडीच मीटर इतका पाण्याचा दाब सतत राहिल्याने मोठया प्रमाणात खोलीकरण करण्यात आलेल्या भागात पाणी मुरले आहे. त्यामुळे दसरा उलटल्यावर कोरडी होणारी कयनी नदी नोव्हेंबर महिन्यातही वाहताना दिसत आहे. पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील ओढेनाले कोरडे होऊ लागले आहेत. परंतु आजही भोणे, लोणे श्ािवारातून वाहणारी कयनी झुळुझुळु वाहताना दिसते. शेकडो विहिरींना याचा फायदा झाला असून परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.


पा
ण्याच्या एका थेंबाची किंमत मागच्या वर्षीच्या दुष्काळाने अवघ्या महाराष्ट्राला समजली. यातूनच धडा घेत यंदाच्या पावसाळयात पावसाचा पडणारा थेंब न थेंब जमिनीत मुरविण्याच्या इराद्याने अनेक गावे कामाला लागली. त्या अनेक गावांपैकीच जळगाव जिल्ह्यातील भोणे, जुनोने आणि शेळावे ही गावे.

जुनोने

दर वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्याच्या सुमारास अंमळनेर तालुक्यातील जुनोने या गावात कापसाच्या वेचणीची लगीनघाई सुरू असते. सकाळी उठून शेतकऱ्यांची आणि मजुरांची कामावर जाण्यासाठी घाई-गडबड सुरू असते. गावातल्या वेचणीसोबतच 10-10 कि.मी. अंतरावर कापूस वेचायला इथले मजूर जातात. दसऱ्यापासून सुरू होणारी वेचणी गुढीपाडवा होईस्तोवर सरत नाही. त्यामुळे मजुरांना आजवर कामाची कमतरता कधीच भासली नव्हती. परंतु 2015च्या डिसेंबर महिन्यात जुनोन्यात सामसूमच होती. कारण त्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पिकांच्याच काय, पिण्याच्या पाण्याचेही वांधे होऊन बसले होते. त्यामुळे हळूहळू कामाच्या शोधासाठी गाव सोडून जाण्याची तयारी काहींनी सुरू केली होती. हे धक्कादायक होते. जानेवारी 2016मध्ये गावाच्या महादेव मंदिराच्या आवारात झालेल्या सभेत गावातील काही तरुणांनी याबाबतची चिंता व्यक्त केली. या सभेला र्मार्गदशन करण्यासाठी सेवावर्धिनीचे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे व रा.स्व. संघाचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. जुनोन्यात ग्रामविकासाचे कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक सतीश पाटील याने आज आलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर गावकऱ्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी काम करण्याचा निश्चय केला. नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झालेल्या त्याच्या बालमित्राने त्याच्या या र्निणयाला मदतीचा हात पुढे केला आणि मग येथून सुरू झाली जुनोन्यातल्या जलसंधारण कामाच्या पायाभरणीला.

गावाच्या शेतश्ािवारातून वाहणाऱ्या हडाया, खडक्या व नदी-नाल्यांचे खोलीकरण करून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्याचे काम करता येण्याजोगे आहे, हे त्यानंतरच्या वेळोवेळी झालेल्या ग्रामसभांमध्ये अधोरेखित होत गेले. तसेच जुनोने श्ािवारात पाणी अडवून जिरविण्यासाठी बांधण्यात आलेल्या, परंतु फुटून गेलेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा व तेथला गाळ काढण्याचा र्निणय घेण्यात आला.

जुनोन्याचे श्ािवार लाल मुरमाड मातीचे व उताराचे. त्यामुळे पावसाळयात कितीही पाऊस झाला, तरी तो वाहून जातो. मग जुनोन्याच्या तरुणांनी वाहून जाणारे हे पाणी थांबवून जमिनीचे पोट तुडुंब भरून घ्यायचा संकल्प केला. त्यासाठी लोकसहभागासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली. एप्रिल-मे महिन्यात या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

जुनोन्याच्या कामासाठी संघाच्या ग्रामविकास विभागाच्या कार्यकत्यांनी सगळी रचना लावली होती. जोडीला सेवावर्धिनीचे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे प्रश्ािक्षण होतेच. लोकसहभागातून गोळा झालेल्या 50 हजार रुपयांच्या निधीला डॉ. हेमंत पाटील यांच्या व केशव स्मृती प्रतिष्ठानच्या देणगीची जोड मिळाली. यातूनच मे महिन्यात जुनोन्यातील हडाया नाल्याचे व लेंडी नाल्याचे 2300 मीटर लांब, 5 मीटर रुंद व 2 मीटर खोल असे खोलीकरण करण्यात आले. श्ािवारातील तीन पाझर तलाव अनेक वर्षांपासून नावालाच होते. शासकीय कामातील ढिसाळपणामुळे या बंधाऱ्यांकडे कधीच लक्ष देण्यात आले नव्हते. गाळाने तर ते भरलेच होते व फुटलेलेही होते. त्यामुळे ते असले काय नि नसले काय.. सारखेच होते. यापैकी 3 बंधाऱ्यांमधून 700 ट्रॉल्या गाळ काढण्यात आला. गाळ काढल्यामुळे जमीन पुन्हा सच्छिद्र तर झालीच, त्याचबरोबर सुमारे 50 एकर शेतीही सुपीक होण्यास मदत झाली.

या कामासाठी 10 कार्यकर्ते 15-20 दिवस राबत होते. 2 पोकलँड व 8 ट्रॅक्टर यांच्या मदतीने हे कामर् पूणत्वास आले. खोलीकरणाचे काम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. गावकऱ्यांची इच्छा असूनही पावसामुळे पुढचे काम थांबविण्यात आले. जूनच्या अखेरीस या भागात जोरदार पाऊस झाला नि खोलीकरण करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये तुडुंब पाणी भरले. पावसाळयातील चारही महिने हे नाले भरून वाहत होते. खोलीकरण करण्यात आलेल्या नाल्यांच्या आवतीभोवतीच्या 50 विहिरी - ज्या कोरडया पडल्या होत्या, त्यांना पाणी आले. पावसाळयाचे 4 महिने संपले की कोरडे पडणारे हे नाले यंदा अजूनही वाहत आहेत. डिसेंबर संपेपर्यंत ते वाहत राहतील, असा अंदाज आहे. यामुळे आता पावसाळयानंतरही शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाण्याचे सिंचन करणे शक्य होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्याही बऱ्यापैकी दूर झाली आहे.

 शेतीतला कमी कमी होत जाणारा रोजगार हा पाण्याच्या टंचाईतूनच निर्माण होतो, हे मागच्या दुष्काळी वर्षाने सिध्द केले आहे. पाण्याची उपलब्धता हेच त्यावर एकमेव उत्तर आहे. ते ओळखून जुनोने येथील गावकऱ्यांनी खोलीकरणाचे काम केले. या वर्षी तर त्यांना फायदा दिसून आलाच आहे. येत्या 3-4 वर्षांत तो अधिक दिसेल असा जलतज्ज्ञांचा अंदाज आहे.


भोणे

धरणगाव तालुक्यातील भोणे गावाला लागूनच कयनी नदी आहे. पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण, राजवडच्या श्ािवारातून उगम पावणाऱ्या या नदीला पावसाळयात अनेकदा मोठे पूर येतात. हे पुराचे पाणी अडविण्यासाठी या नदीवर सिमेंट बांधही घातलेत. परंतु बंधाऱ्यांमध्ये लोखंडी पाटया टाकल्यास शेतांमध्ये पाणी श्ािरून शेती व पिके खराब होतात, म्हणून पावसाळा संपेपर्यंत या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जात नव्हते. त्यामुळे बंधारे बांधूनही काही उपयोग नव्हता. परंतु, पाणी अडविल्याने पावसाळा संपल्यानंतर आजूबाजूच्या विहिरींनी फायदा होतो, हा शेतकऱ्यांचा अनुभव होता.

 2015-16च्या दुष्काळामुळे पाण्याच्या टंचाईचे चटके भोण्याच्या गावकऱ्यांना जाणवू लागले होते. जलयुक्त श्ािवार या योजनेत आपले गाव येईल नि खोलीकरण होईल, अशी गावाला आशा होती. परंतु तसे काही झाले नाही. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने थोडया प्रमाणात गाळ काढण्याचे काम केले. परंतु त्यातून अधिक काम करणे गरजेचे होते. गावाला खेटून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे गावातील अनेकांना नेहमी वाटायचे. परंतु र्माग काही दिसेना.

हा र्माग निघाला तो संघाच्या जलविषयक कार्य करणाऱ्या एका समितीच्या बैठकीच्या माध्यमातून. जळगाव येथे डॉ. हेमंत पाटील, संघाच्या सेवाविभागाचे योगेश्वरर् गगे, सागर धनाड, केशव स्मृतीचे प्रमोद मोघे, भोणे येथून मी आदी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात पाण्याबाबत काम करण्याविषयी चर्चा केली. भोणे आणि जुनोने येथे असे काम करता येईल असे ठरले.

वर्षानुवर्षे गाळ साचत गेल्याने भोण्याजवळ कयनी नदीचे पात्र मोठे असूनही नदी उथळ झाली होती व गाळामुळे पाणी मुरणे थांबले होते. परिणामी नदी दुथडी वाहूनही फायदा होत नसे. भोणे येथील रा.स्व. संघाच्या ग़्रामसमितीच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीत कयनी नदीचे खोलीकरण करण्याचा निश्चय केला. याच बैठकीत लोकसहभागातून सुमारे 75 हजार रुपये इतका निधी गोळा करण्यात आला. त्यानंतर 1 जेसीबी, 1 पोकलँड यांच्या माध्यमातून नदी खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. 11 दिवसात सुमारे 500 मीटर लांब, 18 मीटर रुंद व 2 मीटर खोल असे काम करण्यात आले. यासाठी डॉ. हेडगेवार सेवा निधी (महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून) द्वारा 1 लाख 50 हजार, डॉ. हेमंत पाटील मित्र मंडळाने (केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून) 1 लाख रुपये व दिगंबरशेठ नारखेडे प्रतिष्ठानने 30 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला.

समाजसेवी संस्थांच्या जोडीला भोणकरांच्या लोकसहभागामुळे खोलीकरणाचे अतिशय चांगले काम होऊ शकले. खोलीकरणातील माती व मुरुम नदीच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आले. आता बंधाऱ्यांमध्ये पाटया टाकूनही आजूबाजूच्या शेतांना धोका नाही. पावसाळयाचे सर्ंपूण 4 महिने बंधारे तुडुंब भरून वाहत होते. दोन ते अडीच मीटर इतका पाण्याचा दाब सतत राहिल्याने खोलीकरण करण्यात आलेल्या भागात मोठया प्रमाणात पाणी मुरले आहे. त्यामुळे दसरा उलटल्यावर कोरडी होणारी कयनी नदी नोव्हेंबर महिन्यातही वाहताना दिसत आहे. पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील ओढेनाले कोरडे होऊ लागले आहेत. परंतु आजही भोणे, लोणे श्ािवारातून वाहणारी कयनी झुळुझुळु वाहताना दिसते. शेकडो विहिरींना याचा फायदा झाला असून परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

शेळावे, ता. पारोळा

भोणे येथील खोलीकरणाचे काम सुरू असताना शेळावे येथील काही तरुण हे काम पाहायला आले होते. आपल्याला असेच काम करता येईल म्हणून त्यांनी गावकऱ्यांचे एकत्रीकरण केले. श्ािवारातील नाल्याच्या खोलीकरणाचा र्निणय झाला. येथेही संघाच्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या निधीतून कामाला सुरुवात झाली, स्थानिक आमदारांनीही जेसीबीसारखी यंत्रणा उपलब्ध करून दिली. सुमारे 300 मीटर लांब इतके नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. खोलीकरण झालेल्या नाल्यात यंदाच्या पावसाळयात सुमारे 75 लाख लीटर इतका पाणीसाठा अनेक दिवस होता. अनेक विहिरींना जिवंत करण्यात हा जलसाठा उपयोगी ठरला आहे.

या तिन्ही ठिकाणी लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याच्या बाबतीत इतर गावांच्या तुलनेत आज उठून दिसत आहेत. कारण जळगावहून धरणगाव टाकरखेडेर्मागे अंमळनेर, धुळयाकडे निघालात तर भोणे, जनोन्याकडून येणारे हे नालेच तेवढे वाहताना दिसतात. खोलीकरणामुळे किमान आठ महिने तरी हे नाले वाहत राहतील, असे वाटते.

 8805221372