खान्देशावर पावसाची मेहेरबानी

 विवेक मराठी  26-Jul-2016

या महिनाभराच्या काळातच जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील काही तालुक्यांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्याची पावसाची सरासरी 650 मिलिमीटर इतकी आहे. हा पाऊस पावसाळयाच्या चार महिन्यांत पडतो. मात्र धरणगाव, जळगाव व एरंडोल तालुक्यांत तर या महिन्याभरातच 390 मि.मी. पाऊस झाला आहे.  दुष्काळ विसरायला लावणारा पाऊस सध्या सर्ंपूण खान्देशात कोसळतो आहे. जिकडे तिकडे हिरवेगार श्ािवार दिसू लागले आहे. नर्िसगाने भरभरून दिल्याने गावोगावच्या पाणी समस्येसोबत मुक्या जनावरांच्या चाऱ्याची भीषण समस्याही दूर झाली आहे.


दुष्काळ विसरायला लावणारा पाऊस सध्या सर्ंपूण खान्देशात कोसळतो आहे. कुठे नंदुरबार जिल्ह्यात ढगफुटी, तर कुठे चोपडा तालुक्यात अतिवृष्टी असे रूप यंदा पावसाने दाखवले असून जिकडे तिकडे हिरवेगार श्ािवार दिसू लागले आहे. नर्िसगाने भरभरून दिल्याने गावोगावच्या पाणी समस्येसोबत मुक्या जनावरांच्या चाऱ्याची भीषण समस्याही दूर झाली आहे.

अलीकडे काही वर्षांपासून हुलकावणी देणाऱ्या नर्िसगाची यंदा खान्देशाला बऱ्यापैकी साथ असल्याचे चित्र आहे. नर्िसगाने ऐन आषाढात श्रावण महिन्याचे रूप घेतले आहे. 'क्षणात येते सरसर श्ािरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे'ची अनुभूती येऊ लागली आहे. दिवसातून अनेकदा पावसाच्या सरी येतात. अलीकडे पावसाचे येणे खात्रीलायक नसल्याने हा पाऊस सगळयांना हवाहवासा वाटतो आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून पावसाळा संपूनही हिरवाईला पारखे होणारा पाटणादेवीच्या डोंगररांगांमध्ये यंदा मात्र लहान-मोठे धबधबे कोसळतानाचे दृश्य दिसू लागले आहे. पद्मालयचे डोंगर, मनुदेवी परिसर, अजिंठयाचे डोंगर, तोरणमाळ परिसरानेही हिरवा शालू पांघरला आहे. असे असले, तरी अद्याप या तिन्ही जिल्ह्यांमधील लहान-मोठया धरणांमध्ये पाहिजे तेवढा पाणीसाठा झालेला नाही. कारण जोरदार पाऊस ठरावीक भागातच कोसळत आहे. इतर भागात मात्र दररोज अगर दिवसाआड पाऊस सुरू आहे. श्ािवाय खान्देशातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दि. 10 ते 13 हे सलग चार दिवस पावसाने झडीच लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात उरलीसुरली पेरणी करून टाकली.

या 30 दिवसांच्या काळात हा पाऊस बऱ्यापैकी कोसळल्याने जुलैच्या पहिल्या आठवडयातच तापी नदीवरील हतनूरचे सगळेच्या सगळे दरवाजे उघडण्याची वेळ आली होती. हे धरण पावसाळयात अनेकदा भरून वाहते. आता जरी त्याच्यात 45 दलघमी इतका व धरण क्षमतेच्या निम्मादेखील जलसाठा नसला, तरी त्याचे चार दरवाजे सध्या उघडेच ठेवण्यात आले आहेत.

अर्ध्या जळगाव जिल्ह्यातील, धुळे तालुक्यातील काही गावांची व मालेगावची पाणी समस्या दूर करणाऱ्या ग्ािरणा धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे. मृत साठयाच्याही खाली गेलेल्या या धरणात आता सोळा दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. कळवण तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने ठेंगोळा धरण भरून वाहू लागले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरणबारी, चणकापूर, नागासाक्या ही धरणे भरली की ग्ािरणा धरण झपाटयाने भरू लागते. मात्र त्यासाठी कळवण, मालेगाव या तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस व्हावा लागतो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र त्या भागात बरा पाऊस होत असल्याने या वर्षी ग्ािरणा धरणात चांगला पाणीसाठा होऊ शकेल असे दिसते.

धुळे जिल्ह्यापेक्षा जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी अधिक पाऊस होताना दिसतो. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात 28 जूनला चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, एरंडोल, श्ािरपूर व 10 जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. 28 जूनच्या पावसाने चोपडा तालुक्यातील चहार्डी, हातेड, लासूर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते; 10-11 जुलैच्या ढगफुटीने नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी गावातील चार जणांना मृत्यूने कवटाळले, तर अनेक जण जखमी झाले. आष्टे गाव परिसरात झालेल्या या ढगफुटीमुळे शेतातील मातीदेखील वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांग्ाितले. या गावाजवळचा रेल्वे रुळाखालच्या अर्धा किलोमीटरचा भराव वाहून गेल्याने या र्मागावरून जाणाऱ्या नंदुरबार-सुरत पॅसेंजरचे काही डबे घसरले होते. मात्र त्यात जीवितहानी झाली नव्हती. तसेच पाचोराबारी या गावातील अनेक घरे वाहून गेली, इतका हा पाऊस जोरदार होता. रात्री 11 वाजता सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुमारे 390 मिलिमीटर इतका कोसळला. पाचोराबारी गावात अजूनही या अतिवृष्टीची भीती दिसून येते.

एकीकडे मागील वर्षाचे दुष्काळाचे चटके पाहता हा पाऊस हवाहवासा वाटत असला, तरी सततचा हा पाऊस पिकांना उपयोगीच असतो असे नाही. काही भागातील शेतकरी चार-पाच दिवसाची उघडीप मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. उघडीप मिळाल्यास आंतर मशागतीची कामे होऊ शकतील व अतिपावसामुळे पिकांच्या मुळांना हवा न मिळू शकल्याने धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळू शकेल.

सर्ंपूण खान्देशात पाऊस चांगला झाल्याने 100 टक्के पेरणी, लावणी झाली. मात्र काही तालुक्यांमध्ये पिके उगवून आली, त्या दिवसापासून सतत पाऊस पडतच आहे. पिकांच्या गरजेपेक्षा जादा पाऊस झाल्याने कापूस, तूर, मका, ज्वारी, सोयाबीन व कडधान्य पिके धोक्यात आली आहेत. वरीलपैकी बीटी कॉटन अधिक संवेदनशील असल्याने कापसाचे कोंब उगवल्यापासून कुठे जोरदार तर कुठे सुरू असलेला भिज पाऊस या पिकाला घातक ठरू लागला आहे. अतिपाण्यामुळे लहान लहान रोपटी लाल पडून कोमेजू लागली आहेत. हा पाऊस दररोज येत असल्याने ढगाळ वातावरणाचाही पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम झाला आहे.

खान्देशातील धुळे, श्ािंदखेडा भडगाव, पारोळा या तालुक्यांमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. त्या ठिकाणी अतिपावसामुळे पिके धोक्यात येण्याचे संकट नाही. त्यामुळेच इतर तालुक्यांत नदी-नाल्यांना लहान-मोठे पूर आले, पण काही तालुक्यांमध्ये नदी-नाले कोरडे दिसतात.

खोलीकरणांमध्ये जलसाठा

शासनाच्या जलयुक्त श्ािवाराच्या व विविध सामाजिक संस्थांनी खान्देशात केलेल्या नदी-नाले खोलीकरणाच्या कामांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये लगेच पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. रा.स्व. संघाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील पारोळा, धरणगाव व अंमळनेर तालुक्यांमध्ये झालेल्या नदी खोलीकरणातही चांगला पाणीसाठा झाला आहे.

पावसाळयाला सुरुवात होऊन आताशा महिना होत आला आहे. या महिनाभराच्या काळातच जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील काही तालुक्यांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्याची पावसाची सरासरी 650 मिलिमीटर इतकी आहे. हा पाऊस पावसाळयाच्या चार महिन्यांत पडतो. मात्र धरणगाव, जळगाव व एरंडोल तालुक्यांत तर या महिन्याभरातच 390 मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाळयाच्या आगामी तीन महिन्यांत असाच पाऊस होत राहिल्यास या तिन्ही तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ पडू शकतो.

8805221372