ऑॅस्ट्रेलियात ख्रिश्चन धर्म सोडण्याची त्सुनामी

 विवेक मराठी  19-Sep-2016

युरोपातील आणि अमेरिकेमधील बऱ्याच मोठया क्षेत्राबरोबर आता ऑॅस्ट्रेलियातही ख्रिश्चन अल्पसंख्य झाल्याचा एक अहवाल नुकताच आला आहे. तेथे तर युरोप-अमेरिकेपेक्षा स्थिती गंभीर आहे. या तिन्ही खंडांत आक्रमक निधर्मीवाद - म्हणजे ऍग्रेसिव्ह सेक्युलॅरिझम वाढीला लागला आहे. एकेकाळी ख्रिश्चन धर्मात आक्रमक दहशतवाद निर्माण करून युरोपीयांनी जगावर वर्चस्व मिळवले, त्यांच्या विस्कटण्यालाच आरंभ झाला आहे. दुसऱ्या बाजूला तशीच धर्मतत्त्वे असलेला जेहादी दहशतवाद मात्र संघटित व आक्रमक होताना दिसत आहे. ख्रिश्चनांतील धर्म सोडण्याची त्सुनामी अणि जेहाद्यांतील दहशतवाद स्वीकारण्याची त्सुनामी हे सध्या युरोप, अमेरिका आणि ऑॅस्ट्रेलिया खंडांत प्रसारमाध्यमांच्या ऐरणीवरचे झाले आहेत.


युरोपातील आणि अमेरिकेमधील बऱ्याच मोठया क्षेत्राबरोबर आता ऑॅस्ट्रेलियातही ख्रिश्चन अल्पसंख्य झाल्याचा एक अहवाल नुकताच आला आहे. तेथे तर युरोप-अमेरिकेपेक्षा स्थिती गंभीर आहे. या तिन्ही खंडांत आक्रमक निधर्मीवाद - म्हणजे ऍग्रेसिव्ह सेक्युलॅरिझम वाढीला लागला आहे. एकेकाळी ख्रिश्चन धर्मात आक्रमक दहशतवाद निर्माण करून युरोपीयांनी जगावर वर्चस्व मिळवले, त्यांच्या विस्कटण्यालाच आरंभ झाला आहे. दुसऱ्या बाजूला तशीच धर्मतत्त्वे असलेला जेहादी दहशतवाद मात्र संघटित व आक्रमक होताना दिसत आहे. ख्रिश्चनांतील धर्म सोडण्याची त्सुनामी अणि जेहाद्यांतील दहशतवाद स्वीकारण्याची त्सुनामी हे सध्या युरोप, अमेरिका आणि ऑॅस्ट्रेलिया खंडांत प्रसारमाध्यमांच्या ऐरणीवरचे झाले आहेत. ख्रिश्चन धर्म सोडण्याच्या प्रक्रियेला इ.सन 2010पर्यंत झालेली सुरुवात कमी नव्हती. पण गेल्या पाच-सहा वर्षांत सगळीकडेच त्याने फारच मोठा वेग घेतला आहे. ब्रिटनमध्ये एका मोठया पाहणीत ख्रिश्चन अल्पसंख्य झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी स्पष्ट झाले. पाठोपाठ जर्मनी वगैरे तीन-चार देशांत तसेच चित्र असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेतील 19 राज्यांत हीच स्थिती असल्याचा नकाशाच प्रकाशित झाला. युरोप व अमेरिका या पाश्चात्त्य महासत्तांच्या मुख्य ठिकाणी ख्रिश्चन अल्पसंख्य झाल्याचे वृत्त येत असतानाच दुसऱ्या बाजूला ती तूट भरून काढण्यासाठी चीन व आफ्रिका या क्षेत्रांत ख्रिश्चन संख्या वाढण्याच्या मोहिमा कशी हाती घेतल्या जात आहेत, हेही पुढे आले होते. त्या मोहिमा जुन्या असल्या, तरी त्यातील बारकावे सध्या पार्श्वभूमीवर महत्वाचे ठरत आहेत.

एक महत्त्वाचा विषय म्हणून ऑॅस्ट्रेलियातील माहिती तेथील प्रसारमाध्यमांत गेले वर्षभर पुढे येत आहेच. तेथील रॅशनॅलिस्ट सोसायटी ऑॅफ ऑॅस्ट्रेलिया यांनी घेतलेल्या एक पाहणी अहवालात यातील काही आकडेवारी पुढे आली. रॅशनॅलिस्ट संस्थेचा अहवाल गेल्या दीड महिन्यांपूर्वीचा आहे. पण गेली तीन-चार वर्षे अशा आकडेवारीचे टप्पे दाखवणारे अहवाल येत होतेच. असे त्या त्या काळी तयार केलेले अहवाल प्रातिनिधिक असतात. अर्थातच त्या त्या संस्थांचे यापूर्वीचे किती अहवाल खरे आहेत, याच्या आधारे त्याची विश्वासार्हता बघायची असते. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत जे अहवाल आले, ते त्या त्या वेळची परिस्थिती बघता बरोबर आहेत, असे आज स्पष्ट दिसत आहेत. त्यानुसार त्या देशातील 45 टक्क्यांनी आपण कोणताही धर्म मानत असल्याचे स्पष्ट केले आहे. ते प्रामुख्याने ख्रिश्चन आहेत. रॅशनॅलिस्ट सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. मेरेडिथ डोग यांनी या पाहणीच्या निमित्ताने स्पष्ट केले की, सहा-सात वर्षांपूर्वीच ही स्थिती निर्माण झाली होती, पण त्या वेळच्या राष्ट्रीय जनगणनेत त्या पध्दतीने प्रश्नांची रचनाच केली नसल्याने ही बाब स्पष्ट झाली नाही, पण आता ते प्रत्यक्षात दिसू लागले आहे. त्या जनगणनेत त्या त्या व्यक्तीचा जन्मजात धर्म कोणता, याची तपासणी होत 


होती; पण ती व्यक्ती सध्या धर्म मानते का, याबाबत मौन पाळण्यात आले होते. त्या संस्थेने घेतलेल्या पाहणीत असे स्पष्ट झाले आहे की, त्या देशातील 52 टक्के लोकांनी 'नो रिलीजन' असे स्पष्ट केले आहे आणि 45 टक्के लोकांनी ते 'ख्रिश्चन' असल्याचे म्हटले आहे. त्यातील आणखी 13.4 टक्के लोकांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यात असे म्हटले आहे की, ते आध्यात्मिक आहेत, पण कोणताही धर्म पाळत नाहीत. या देशाची एक माध्यम टप्प्याची जनगणना पुढील महिन्यातच सुरू होते आहे, त्यात हे चित्र स्पष्ट दिसणार आहे. गेल्या वेळी 'नो रिलीजन' ही संख्या बावीस टक्के होती. या वेळी ती किमान 44 टक्के झाल्याचे स्पष्ट होईल, असे अहवाल 'पोल' घेणाऱ्या महत्त्वाच्या पाच संस्थांनी दिला आहे. त्यामुळे ख्रिश्चन हे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट होईल व त्यातून ते अल्पसंख्य असल्याचे स्पष्ट होईल. पंधरा वर्षांपूर्वी हे प्रमाण 15 टक्के होते. पाच वर्षांपूर्वी ते 22 टक्के होते. त्यानंतर साऱ्या युरोप-अमेरिकेत वेगाने ते प्रमाण वाढले आहे. त्याच वेळी स्वत: ख्रिश्चन असल्याचे प्रमाण मात्र इ.सन 1986मध्ये 73 टक्के होते. इ.सन 2011मध्ये 61 झाले आणि त्या संस्थेच्या अहवालात ते 45 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात त्यांनी ब्रिटन, वेल्स आणि न्यूझीलंडमधीलही आकडेवारी दिली आहे. ब्रिटनमध्ये इ.सन 2011मध्ये 25 टक्के लोकांनी 'नो रिलीजन' म्हटले होते आणि इ.सन 2014मध्ये ती संख्या 48.5 टक्के होती. ऑॅस्ट्रेलियाचा शेजारी असलेल्या न्यूझीलंडमध्ये इ.स.2013च्या जनगणनेत 42 टक्के लोकंानी 'नो रिलीजन'वर खूण केली होती. त्याच वेळी तेथे ख्रिश्चन 48 टक्के असल्याचे स्पष्ट झाले होते.

रॅशनॅलिस्ट सोसायटीचा हा अहवाल याच महिन्यात जगातील अनेक प्रसारमाध्यमांनी दिला आहे, कारण तो दीड महिन्यापूर्वीच पुढे आला आहे. रॉय मॉर्गन या संस्थेच्या अभ्यासानुसार गेली तीन वर्षे हे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. इ.सन 2014मध्ये प्रथम या संदर्भात मोठेमोठे आकडे पुढे यायला लागले. त्या वर्षी प्रथम आठ लोकांनी 'नो रिलिजन' यावर सह्या केल्या. वास्तविक इ.सन 2011मध्ये या 'नो रिलिजन'वाल्यांची संख्या वाढली होती, तरीही ख्रिश्चनांच्या संख्येच्या तुलनेत ती मर्यादित होती. म्हणजे दोन ख्रिश्चन धर्मीय असले, तर एक 'नो रिलिजन' असायचा. त्या वेळी जी पाहणी घेण्यात आली, तेव्हा 60.9 टक्के - एक कोटी चौदा लाख - लोकंानी आपला धर्म 'खिश्चन' असल्याचे म्हटले आणि 29.2 टक्के लोकांनी आपण ख्रिश्चन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पण इ.सन 2013मध्ये यात मोठा फरक पडला. त्या वेळच्या पाहणी अहवालात या संदर्भात तेथील द डेली न्यूज या वृत्तपत्राने दि. 19 ऑॅक्टोबर 2015मध्ये श्रीमती ख्रिस्तिना जोन्स यांनी दिलेल्या एक अभ्यास अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की, ऑॅस्ट्रेलियात इ.सन 2010च्या जनगणनेनुसार तेथे 67 टक्के लोक ख्रिश्चन आहेत, पण हे प्रमाण दररोज बदलताना दिसत आहे. अमेरिकेतील 'पिऊ' या संघटनेने जगातील ख्रिश्चन लोकसंख्या इ.सन 2050मध्ये त्यांचे बहुसंख्य असणे गमावून बसेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. पण युरोप, अमेरिका आणि ऑॅस्ट्रेलिया यांचा विचार केला, तर तेथे आत्ताच ख्रिश्चन म्हणून ते अल्पसंख्य झाले आहेत. पिऊ संघटनेने जी शक्यता व्यक्त केली होती, ती मात्र वरील शक्यतेपेक्षा फारच निराळी होती. ती म्हणजे त्यांच्या पाहणी अहवालानुसार मुसलमान हे जगात इ.सन 2050मध्ये ख्रिश्चनांपेक्षा अधिक होतील. सध्या मुसलमानांची संख्या 160 कोटी आहे आणि ख्रिश्चनांची संख्या 220 कोटी आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की, जगात लोकसंख्येच्या आधारे महासत्ता होण्याच्या या खेळात कोणकोणते घटक काय काय करत आहेत, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

जगात आजमितीला महासत्ता असलेल्या पाश्चात्त्य देशांची स्थिती किती गंभीर झाली आहे, हे आता दररोज नव्या नव्या पुराव्यांनी स्पष्ट होत आहे. त्यातील त्यांच्या दररोज भूमिती श्रेणीने मी होणाऱ्या ख्रिश्चनांच्या संख्येचा संदर्भ देण्याचे कारण म्हणजे त्या ख्रिश्चन असण्याच्या जोरावरच त्यांनी जग जिंकले होते. सध्या युरोप आणि ऑॅस्ट्रेलिया या भागात एकच आशेचा किरण दिसत आहे, तो म्हणजे सध्या इसिसच्या दहशतवादामुळे पश्चिम युरोपातील लोक मोठया प्रमाणावर युरोपमध्ये व ऑॅस्ट्रेलियामध्येही जात आहेत. त्यांचे मोठया प्रमाणावर धर्मांतर करणे सुरू आहे. युरोपातील जाणकारांच्या मते तो प्रकार हा दात कोरून पोट भरण्याचा प्रकार आहे. या संदर्भातील ऑॅस्ट्रेलियातील एक विचारवंत ग्रेग शेरिडन यांची भूमिका साऱ्या जगभर गाजत आहे. त्यांचे म्हणणे असे की, जगात युरोप-अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स आणि ऑॅस्ट्रेलिया ही अशी क्षेत्रे आहेत की, जेथे धर्मांचे अस्तित्वच वेगाने संपत 


आहे. हा भाग सोडून जगाच्या अन्य भागांत अन्य धर्म तर फुलत आहेतच, पण त्या भागात ख्रिश्चन धर्मही फुलत आहे. एकेकाळच्या महासत्ता असलेल्या क्षेत्रात मात्र मोठया प्रमाणावर खिश्चन धर्म आता संदर्भरहित झाला आहे. त्यांच्या मते तेथील 'परमेश्वरच मरण पावला आहे.' याचा परिणाम जरी गेल्या तीन-चार वर्षांत प्रचंड दिसत असला, तरी ही प्रक्रिया गेली एकशे वीस वर्षे सुरू आहे. धर्मांच्या अधिकाऱ्यांना ते लक्षात आले नव्हते असे नाही, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या काळात जगभरच्या चर्च नेतृत्वाला सुखासीनतेची चटक लागली हे त्याचे खरे कारण आहे. सध्या जगातील त्या अडीच खंडाच्या क्षेत्रात लोकांची मानसिकता काय आहे यापासून चर्च नेतृत्व शेकडो कोस दूर आहे. कुटुंबनियोजन नियम, घटस्फोट नियम, गर्भपातनियम, ईशनिंदा कायदा (म्हणजे ब्लास्फेमी), संडे ट्रेडिंग, समलिंगी विवाह आणि त्यांनी दत्तक घेतलेली मुले याबाबत एकविसाव्या शकतात जी सामाजिक वस्तुस्थिती निर्माण झाली आहे, ते प्रश्नच चर्चला समजणारे नाहीत. गेल्या एकशे वीस वर्षांत, म्हणजे ही मंडळी जेव्हा जगात एकमेवाद्वितीय यशाच्या शिखरावर होती, तेव्हाच बदलत्या वाऱ्याची दिशा त्यांच्या लक्षात यायला हवी होती. गेल्या साठ वर्षांत त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत. इ.सन 1954मध्ये ऑॅस्ट्रेलियामध्ये 74 टक्के लोक रविवारी चर्च प्रार्थनेला येत होते. सध्या ती संख्या दहा टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. गेल्या एकशे वीस वर्षांत ज्यांना जाग आली नाही, त्यांना आता जाग येईल, अशी अपेक्षा करणे योग्य आहे का, हे आता लोकंानीच ठरवावे.' ग्रेग यांच्या या लेखावर जगात हजारोंनी प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.

सध्या हे आकडे कोटींच्या आकडयातील असले, तरी त्यांचे महत्त्वाचे टप्पे 'अब्ज'च्या घरातील आहेत. भारताने यावर विचार का करावा, हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. ख्रिश्चन धर्मच खरा हे सांगून त्यांनी नरसंहार आणि लूट यातून जगातील शंभराहून अधिक देशांना नागवले आहे. तीन-चार शतकांचा अत्याचार सहन केलेल्यांनी त्यांच्या देशांच्या हिताच्या दृष्टीने त्यानी विचार करणे आवश्यक आहे. जगात ख्रिश्चनीकरण झाले ते मिशनऱ्यांच्या लोकसेवेतून झाले, असा चर्च संघटनांचा दावा असला, तरीही जगातील मोठया नरसंहाराचा समावेश असलेल्या इन्क्विझिशनचा जो इतिहास आहे, तो पुरेसा बोलका आहे. प्रत्यक्ष ऑॅस्ट्रेलियातही इ.सन 1901च्या कायद्यानुसार तेथे कोणत्याही ख्रिश्चन धर्मांतराला परवानगी नाही. पण आज तेथे केवळ 61 टक्के ख्रिश्चन आहेत असे नाही, तर तेथील प्रजा वंशाच्या संकरप्रकारातून वाढली आहे. ख्रिश्चनांची संख्या कमी होण्याकडे व वाढण्याकडे लक्ष देण्याचे कारण असे की, युरोपीय आक्रमकांनी तीन शतकांपर्यंत या ख्रिश्चन दहशतवाद्यांच्या मदतीनेच तीन चतुर्थांश जगाचा ताबा घेतला. आजही जगातील अनेक देशांतील अंतर्गत हस्तक्षेप या चर्च संघटनांच्या मदतीनेच चालत आहे. भारतातही तिन्ही दहशतवाद्यांची मोट या मिशनरीज संघटनेच्या वतीनेच बांधण्यात आली आहे. जगात त्या त्या देशातील काही बेसावध प्रसंगाचा उपयोग करून तेथील ताबा घेणे, या लांब पल्ल्याच्या उद्देशानेच ते हे सारे करत आहेत. त्यामुळे आज त्यांच्या देशात त्यांची काय स्थिती आहे, हे कळणे आवश्यक आहे.

9881717855