सांस्कृतिक महोत्सवाला नवसंजीवनी

 विवेक मराठी  19-Sep-2016

मराठवाडयातील प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा मकबरा, सोनेरी महल, अजिंठा, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला ही जागतिक स्तरावरील ठिकाणे औरंगाबाद शहर आणि परिसरात आहेत. ही स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दर वर्षी हजारोंच्या संख्येने येत असली, तरी त्यात आणखी वाढ व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वी वेरूळ महोत्सव सुरू  करण्यात आला होता. सुरुवातीला हा महोत्सव वेरूळ येथे, तर कालांतराने औरंगाबादेत घेण्यास सुरुवात झाली. पण गेल्या चार वर्षांपासून या महोत्सवाच्या आयोजनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिले. यंदा हा महोत्सव घेण्याचे प्रशासनाने ठरविले असून त्याची तयारी सुरू केली आहे.


राठवाडयातील प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा मकबरा, सोनेरी महल, अजिंठा, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला ही जागतिक स्तरावरील ठिकाणे औरंगाबाद शहर आणि परिसरात आहेत. ही स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दर वर्षी हजारोंच्या संख्येने येत असले, तरी त्यात आणखी वाढ व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वी वेरूळ महोत्सव सुरू  करण्यात आला होता. सुरुवातीला हा महोत्सव वेरूळ येथे, तर कालांतराने औरंगाबादेत घेण्यास सुरुवात झाली.

पण गेल्या चार वर्षांपासून या महोत्सवाच्या आयोजनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिले. यंदा हा महोत्सव घेण्याचे प्रशासनाने ठरविले असून त्याची तयारी सुरू केली आहे.

अनेक दिग्गजांची हजेरी

 पर्यटन महामंडळ, महसूल, प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जात असे. या महोत्सवात आतापर्यंत प्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी, आरती अंकलीकर, रोणू मुजुमदार, कैलास खेर आदी बडया कलावंतांनी हजेरी लावली होती. 1986पासून या महोत्सवाला वेरुळात सुरुवात झाली. तेथे मिळणारा अल्प प्रतिसाद आणि औरंगाबादहून जाणाऱ्या पर्यटकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी औरंगाबादेत महोत्सव प्रारंभ झाला. मुंबई बाँबस्फोट, स्वाईन फ्ल्यू या कारणांमुळे महोत्सवात अधूनमधून खंड पडला. 2012मध्ये विद्यापीठ परिसरात असलेल्या सोनेरी महल या ऐतिहासिक वास्तूमध्ये दहा हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा महोत्सव शेवटचाच ठरला. त्यानंतर महोत्सवाबाबत राहिलेली उदासीनता या ना त्या कारणाने कायमच राहिली. परिणामी पर्यटकांचे आकर्षण असणारा हा महोत्सव झाला नाही. यंदा विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी व अन्य अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यामुळे महोत्सव होण्याची चिन्हे आहेत.

पर्यटन जिल्ह्याचा दर्जा

औरंगाबाद जिल्ह्यात असणाऱ्या पर्यटन स्थळांची संख्या पाहून शासनाने औरंगाबादला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. सिंधर्ुदुगनंतर हा दर्जा मिळणारा औरंगाबाद हा पहिला जिल्हा असून

नव्याने घोषित झालेल्या पर्यटन धोरणात याबाबतचा ऊहापोह केला आहे. औरंगाबाद शहर हे मकबरा, पाणचक्की, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय यासाठी ओळखले

जाते. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परीर्सस्पशाने पुनित झालेला नागसेनवन परिसर या शहरात आहे. पैठणचे संत एकनाथ मंदिर, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ, वेरूळ लेणी, औरंगाबाद आणि जळगाव यांच्या सीमेवरील अजिंठा लेणी अशी अनेक स्थळे औरंगाबादजवळ आहेत. कन्नड तालुक्यात असणाऱ्या गौताळा अभयारण्याने नर्िसग पर्यटनाचे नवे द्वार खुले झाले आहे. श्ािर्डीला रेल्वे आणि रस्ते र्मागाने येणाऱ्या भाविकांना औरंगाबादेतूनच जावे लागते. त्यामुळे या शहरात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ पाहून महोत्सवाची संकल्पना पुढे आली. विदेशी पर्यटक डिसेंबर-जानेवारी महिन्यात येत असतात. या पर्यटकांना औरंगाबादचीही भुरळ पडावी, असा या महोत्सवाचा आणखी एक हेतू.

विश्वस्त संकल्पना राबविणार

या महोत्सवासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असे. या वेळी मात्र ही समिती बरखास्त करण्यात आली असून, जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली समिती विश्वस्त संस्थेच्या रूपाने कार्यरत झाली आहे. कोणत्याही अडचणी आल्या तरी विश्वस्तांनी प्रशासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता महोत्सव चालूच ठेवावा, अशी या संकल्पनेमागील भूमिका आहे. एमटीडीसीचे प्रादेश्ािक व्यवस्थापक हे समितीचे सचिव राहणार असून औरंगाबादेतील उद्योग, कला, माध्यम जगतातील प्रतिनिधी संस्थेवर घेण्यात येणार आहेत. यंदा ट्रस्ट स्थापन करणे शक्य होणार नसले, तरी ट्रस्टमधील अपेक्षित सदस्यांचे महोत्सवावर नियंत्रण राहील. मात्र ट्रस्ट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन यापुढे मात्र ट्रस्टवर महोत्सवाचा सर्ंपूण कार्यभार राहणार आहे. या वर्षी होणाऱ्या महोत्सवाचे स्वरूप बदलले असून, अंदाजे सव्वा कोटीच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी साठ लाख रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत.

यार् वषी महोत्सवाचे नाव बदलण्यात आले आहे. 'वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव' असे नवे नाव देण्यात आले असून, ऑक्टोबर महिन्यात महोत्सव घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विभागीय आयुक्त दांगट यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या बैठकीत 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान महोत्सव घेण्याचा विचार आहे. महोत्सवाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांचा होकार मिळेल अशी संयोजकांची अपेक्षा आहे. या परिषदेच्या अनुषंगाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडयात आश्ािया खंडातील आठ देशांची सार्क परिषद घेण्यात येणार असून पाकिस्तान, बांगला देश, भूतान, नेपाळ, मालदीव, अफगाण्ािस्तान व श्रीलंका या देशांना त्याचे प्राथमिक निमंत्रणही देण्यात आले आहे.

हरिप्रसाद चौरासियांचे बासरी वादन

या महोत्सवाचे वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने येत्या एक ऑक्टोबरला महोत्सवाचा पूर्वरंग कार्यक्रम घेण्यात येईल. त्यासाठी प्रसिध्द बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याश्ािवाय अदनान सामी, कनिका कपूर, सानिया पाटणकर, उध्दव आपेगावकर, बेल्जियमचे कलावंत बर्ड कॉनिर्लिस यांची जुगलबंदी हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. याश्ािवाय अभिनेत्री ग्रेसी सिंगचे नृत्य हा महोत्सवाचा आकर्षणबिंदू राहील.

एकूणच येणारा ऑक्टोबर महिना हा औरंगाबादकरांसाठी सांस्कृतिक पर्वणीचा ठरणार आहे. या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद मिळावा, म्हणून पुढील पाच वर्षांच्या तारखा एमटीडीसी जाहीर करणार आहे. त्यामुळे एका अर्थाने मराठवाडयातील कलेचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आपोआपच वाढेल.

0240-2473102