कर्तव्यदक्ष मीराताई भागवत

 विवेक मराठी  07-Nov-2017

 

**** मंगला शेंबेकर****

कांचनगौरी महिला सहकारी पतपेढीच्या पहिल्या अध्यक्ष मीराताई भागवत यांचे 10 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले. पतपेढीच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे वैयक्तिक जीवन  समाजासाठी आदर्शवत होते. त्यांच्या मासिक श्रध्दानिमित्त त्यांच्या काही आठवणींना उजाळा देणारा लेख...

आपले जीवन खूप क्षणभंगुर आहे, जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडून जावेच लागते, परमेश्वरेच्छेपुढे कुणाचेच काही चालत नाही ही वाक्ये आपण नेहमी ऐकतो, बोलतो. पण आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रत्यक्ष अशी घटना घडली की ते दु:ख पचवायला खूप वेळ लागतो. आपल्या सर्वांना प्रिय असणाऱ्या मीराताईंचे मंगळवार दि.10 ऑक्टोबर 2017 रोजी दु:खद निधन होऊन त्या आपल्या सर्वांना सोडून गेल्या.

मनुष्य हे जग सोडून गेला की पुन्हा त्याचेर् दशन होत नाही. तो दिसेनासाच होतो. पण स्मृतिरूपाने आपल्या अंत:करणातील त्याचे स्थान मात्र कायम असते. अढळ असते. मीराताईंच्या सहवासातील अनेक क्षण, अनेक प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे डोळयासमोर उभे आहेत. मनातील भावना उचंबळून आलेल्या आहेत. या माझ्या भावना शब्दबध्द करून या शब्दरूपी सुमनांनी त्यांना भार्वपूण आदरांजली वाहण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

पूर्वाश्रमीच्या मीरा पाध्ये लग्न होऊन मीरा भागवत म्हणून डोंबिवलीत आल्यापासून त्यांचा व माझा परिचय आहे. त्यांचे पती मधुकरराव व माझे पती दोघे जीवश्चकंठश्च मित्र! त्यामुळे दोन्ही परिवारांचे एकमेकांशी अगदी प्रेमाचे संबंध होते व आहेत. मीराताईंचे लग्न झाले, तेव्हा त्या रेल्वेत नोकरीला होत्या. लग्नानंतर काही दिवस त्यांनी नोकरी केली. पण नंतर घरातील एकत्र कुटुंब, घरातील सर्वात मोठी सून म्हणून त्यांच्याविषयी असणाऱ्या सर्वांच्या अपेक्षा, कडक श्ािस्तीचे सासरे, आतेसासूबाई याश्ािवाय स्वत:ची जबाबदारी, कर्तव्य या गोष्टींचा विचार करून त्यांनी नोकरी सोडली. नोकरीपेक्षा त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. त्या काळी घरातील वडीलधाऱ्या माणसांचा खूप दरारा व धाक असायचा. त्या सांगायच्या, ''एखाद्या वेळी जरी ऑफिसमधून घरी येण्यास उशीर झाला, तरी बाबा दारात वाट बघत उभे असायचे. मला घरात श्ािरताना भीती वाटायची की आता हे नक्की चिडणार.'' अर्थात ही आदरयुक्त भीती होती.

मधुकरराव अतिशय विद्वान, विविध क्षेत्रांचे सखोल ज्ञान असणारे, अतिशय शांत व संयमी स्वभावाचे होते. डोंबिवलीत एक प्रतिष्ठित व आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांना मान होता. ते शहराचे संघचालक होते. त्यामुळे घरात सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता असायचा. मीराताईं सगळयांची अगत्याने विचारपूस करायच्या. चहाचे भांडे घरात बहुधा कायम उकळत ठेवावे लागत असेल. काही वेळा परगावाहून येणारे कार्यकतर्े त्यांच्याकडे मुक्कामाला असत. त्या वेळी त्यांची राहण्याची, जेवण-खाण्याची व्यवस्था गृहिणी या नात्याने त्यांना करावी लागत असे. त्यांनी अतिथिधर्माचेर् पूणपणे पालन केले. येणाऱ्या व्यक्तीला म्हणायच्या, ''संकोच करू नका. तुम्ही लांबून थकून आला आहात. व्यवस्थित जेवा'' असे म्हणून त्या आग्रहाने, प्रेमाने जेवायला वाढायच्या. त्या साक्षात अन्र्नपूणा होत्या. त्यांच्या या द्रौपदीसारख्या असणाऱ्या थाळीतून कितीतरी लोक तृप्त होऊन गेले असतील. या त्यांच्या स्वभाववैश्ािष्टयामुळे त्या सर्वांच्या प्रिय मीरावहिनी बनल्या. खरे म्हणजे त्यांच्या माहेरी संघाचे वातावरण नव्हते. पण येथे आल्यानंतर येथील वातावरणाशीर् पूणपणे समरस होऊन सहधर्मचारिणी या नात्याने आपल्या पतीच्या कार्यात सहभाग दिला. प्रत्येक यशस्वी व कर्तबगार पुरुषाच्या कार्यामध्ये एका स्त्रीचाही सक्रिय सहभाग असतो, हे सत्य आहे.

एक प्रसंग आठवतो. अणीबाणीच्या वेळी मधुकररावांना अटक करायला पोलीस घरी आले, तेव्हा घाबरून न जाता त्यांनी जो संयम दाखविला, तो कौतुकास्पद आहे.  पोलिसांनी अटक केल्यानंतर घराची सर्व जबाबदारीर् पूणपणे त्यांच्यावर होती, ती त्यांनी व्यवस्थित सांभाळली.

1981मध्ये डोंबिवलीला महिलांनी महिलांसाठी एक पतपेढी काढावी, असा विचार सहकार भारतीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यानुसार डोंबिवलीच्या वेगवेगळया भागांतील महिलांना एकत्र करून रामनवमीच्या शुभमुहूर्तावर एक बैठक घेण्यात आली. कामाची रूपरेषा ठरली व त्वरित इंदूताई बापट यांच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणी व भागभांडवल गोळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली. वेगवेगळया भागांत बैठक घेत असताना अनेक वेळा प्रश्न विचारण्यात येई की, शहरात इतक्या बँका असताना महिलांच्या वेगळया पतपेढीची काय आवश्यकता आहे? महिलांना बचतीची सवय लागावी, त्यांना स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करता यावे आण्ाि मुख्य म्हणजे तळागाळातील निरक्षर महिला मोठया बँकेत जायला घाबरतात, कारण तेथील वातावरण! आपल्याला कुणी समजावून सांगेल की नाही, ही भीती! महिला महिलांचे प्रश्न, कथा, व्यथा समजू शकतात, त्यासाठी महिला पतपेढीची आवश्यकता आहे. सर्व स्तरांतील महिलांकडून या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला. काम इतक्या वेगाने झाले की केवळ 8-9 महिन्यांमध्ये 9 मार्च 1982 रोजी संस्था नोंदणीकृत होऊन 2 मे 1982 रोजी संस्थेचा उद्घाटन समारंभ मीराताईंच्या घराच्या पटांगणात झाला व 'कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी' या नावाने कामकाजास सुरुवात झाली.

आता मुख्य प्रश्न होता जागेचा! आपल्या बंगल्यातील समोरची खोली विनामूल्य देऊन मीराताईंनी तो प्रश्न सोडविला. कामकाजासाठी एक खोली दिली असली, तरी आमचा वावर त्यांच्या सर्ंपूण घरात असायचा. त्यांना किंवा त्यांच्या मुलींना साफसफाई करावी लागे, पण त्याबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही. आमचे 11 जणींचे संचालक मंडळ होते. मीराताई अध्यक्ष होत्या. मी उपाध्यक्ष होते. कांचनगौरीमुळे रोजचा सहवास घडत गेला. त्यामुळे आधीपासून असणारे संबंध अधिक दृढ झाले. आपण पतपेढीचे मालक नसून विश्वस्त आहोत, या ठिकाणी वैयक्तिक स्वार्थ, हित न बघता संस्थेचे हित, सभासदांचे हित लक्षात घेऊन त्याप्रमाणे र्निणय घ्यावे, हे पथ्य सुरुवातीपासून पाळण्यात आले. मला वाटते, पतपेढीची आज जी प्रगती आण्ाि विस्तार झाला आहे, तो या पेरलेल्या बीमुळे! कुठलाही र्निणय एकटीने न घेता सर्वांनुमते घ्यावा, हा पायंडा सुरुवातीपासून पाडण्यात आला. काही वेळा वेगवेगळया मतांमुळे वाद होण्याचे प्रसंग येतात. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' याप्रमाणे हे स्वाभाविक आहे. मतभेद असले, तरी मनभेद नव्हते. एखाद्या परिवाराप्रमाणे वातावरण असायचे. सर्वांना सांभाळून घेणे ही अध्यक्ष या नात्याने मीराताईंवर मोठी जबाबदारी होती. त्या फणसाप्रमाणे वरपांगी खूप तापट व कडक वाटत असल्या, तरी मनातून प्रेमळ होत्या. त्या श्ािस्तप्रिय व आर्थिक व्यवहार अतिशय चोख व स्पष्ट असावेत या विचाराच्या होत्या. मला आठवते, पतपेढीची कामकाजाची वेळ संपल्यानंतर रोख रक्कम मोजताना एखाद्या रुपायाचा जरी फरक आढळला, तरी तो शोधल्याश्ािवाय आम्ही घरी जात नव्हतो. त्यांनी कामकाजाला श्ािस्त लावली. त्यांच्या घरात पतपेढी असल्यामुळे त्यांच्यावर खूप जबाबदारी होती. 'हातात हात गरजवंतांना साथ' - जे जे गरजू आहेत, त्यांना मदत झाली पाहिजे, ही प्रामाण्ािक भूमिका घेऊनच कामाला सुरुवात झाली होती. सभासदांची गरज, त्यांची निकड बघून त्यांना पुन्हा पुन्हा हेलपाटे घालावे न लागता नियमांच्या अधीन राहून ताबडतोब कर्ज मंजूर करावे, असा त्यांचा आग्रह असायचा. एकदा एका महिलेच्या पतीला अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. पैशाची व्यवस्था होत नव्हती. काही बँकामध्ये जाऊन कर्ज मिळू शकेल का, याबाबत तिने चौकशी केली, पण (तिचे पती काही बँकांचे सभासद होते) तेथील दिरंगाई बघून ती पतपेढीत आली. ती पतपेढीची सभासद होती. तातडीने कर्ज मिळू शकेल का? म्हणून विनंती केली. त्या केसचे गांभीर्य बघून तिच्याकडून कर्जाचा अर्ज भरून घेतला, डॉक्टरांचे सर्टिफिकेट जोडायला सांग्ाितले व संचालक मंडळाची तातडीने बैठक घेऊन तिला कर्जाच्या रकमेचा चेक दिला. ऑपरेशननंतर काही दिवसांनी दोघांनी - पतिपत्नीने पतपेढीत येऊन अगदी गहिवरून आपली कृतज्ञता व्यक्त केली. असे अनेक प्रसंग आहेत. आजारपण, श्ािक्षण, व्यवसाय, लग्नकार्य इ. प्रसंगी वेळेवर कर्ज मिळत असल्यामुळे पतपेढी अडचणीच्या वेळी हात देणारी आहे असा दिलासा, विश्वास सभासदांच्या मनात उत्पन्न झाला. पतपेढीची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. अनंतराव कुर्ळकणी, मधुकरराव भागवत व हरिभाऊ  बापट यांना या प्रगतीचे बरेचसे श्रेय आहे. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून, तसेच नंतरही वेळोवेळी जे र्मार्गदशन केले, ते कधीही विसरता येणे शक्य नाही.

मीराताई 6 वर्षे पतपेढीत होत्या. नंतर घरातील काही अडचणींमुळे त्या निवृत्त झाल्या. त्यांची उणीव आम्हाला सतत जाणवत असे. त्या पतपेढीच्या आधारस्तंभ होत्या. सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या संसारातील जबाबदारीकडे कधी दुर्लक्ष केले नाही. नातेसंबंध जपले. प्रेमळ पती, कर्तव्यतत्पर मुलगा, सदैव हसतमुख, आनंदी असणारी, घराचा वारसा पुढे चालू ठेवणारी सून, कर्तबगार जावई, मुली, नातवंडे अशा या परिवारात मीराताई सुखी होत्या. पण नियतीला हे सुख बघवले नाही. त्या सुखाला दृष्ट लागली. हृदयविकाराने मधुकररावांचे अचानक निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा फार मोठा आघात झाला.

कालांतराने त्यांनी हे दु:ख पचवले व त्या अध्यात्मर्मागाकडे वळल्या. रोज सकाळी नियमित फिरायला जाणे, दुपारी मंदिरात कथा-कीर्तन श्रवण करणे असा त्यांचा दिनक्रम होता. गीतेचा अभ्यास करून त्यांनी गीतेची परीक्षा दिली व 'गीताव्रती' म्हणून पदवी मिळविली. बागकामाची आवड होती. देवासाठी फुलांचे हार खूप छान करायच्या. गाण्याची आवड होती. त्यांचा आवाज खूप छान होता. स्वत:चे ब्लाउज श्ािवायच्या. क्रोशाचे विणकाम सतत करायच्या व रुमाल विणून घरी येणाऱ्यांना भेट म्हणून द्यायच्या. आपले उतारवय कसे सुसह्य करायचे, हे बहुतांशी आपल्यावरच अवलंबून असते. हा शेवटचा टप्पा सुंदर करण्याचा मूलमंत्र आपणच शोधायचा असतो. त्याप्रमाणे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींत त्या आपले मन रमवत असायच्या. मिहीरचे लग्न होऊन नातसून घरात आली. तीन पिढया आनंदाने एकत्र नांदत होत्या. आजकालच्या विभक्त कुटुंबपध्दतीमध्ये दुर्मीळ दिसणारे असे हे चित्र आहे. पणतू झाला. पणजी होण्याचा बहुमान मिळाला. त्याला खेळविण्यात, त्याच्या बाललीला बघण्यात खूप खूश असायच्या. त्यांनी जीवनात सुखाचे अनेक प्रसंग उपभोगले, दु:खाचे प्रसंग पचविले, भले-बुरे, कडू-गोड, सर्व प्रकारचे अनुभव घेत घेत त्यांचे जीवन समृध्द बनलेले होते. अनुभवांनी समृध्द तो वृध्द असे म्हणतात ते खरे आहे. समृध्द व कृतार्थ जीवन त्या जगत होत्या.

त्यांना बऱ्याच वर्षांपासून मधुमेहाचा विकार होता. काही वेळा विकार बळावला की हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागत असे. सुधीर, छाया त्यांची खूप काळजी घेत होते. त्यांना जपत होते. या वेळी मात्र हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. स्मृतिभ्रंश झाला. कुणाला ओळखत नव्हत्या. झाडावर परिपक्व झालेले एखादे फळ आता आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता संपली असे वाटून झाडावरून अलगद गळून पडावे, तद्वतच आपला अखेरचा श्वास घेऊन, सर्वांचा अखेरचा निरोप घेऊन त्यांनी शांतपणे आपली जीवनयात्रा संपविली.

त्यांच्या स्मृतीचा नंदादीप आमच्या सर्वांच्या मनात सतत तेवत राहो, ही परमेश्वराजवळ प्रार्थना!

कांचनगौरी परिवार व आमच्या कुटुंबातर्फे त्यांना भार्वपूण श्रध्दांजली!

9833305768