स्वप्नाहून सुंदर.. हिरवाईतलं घर

 विवेक मराठी  10-Mar-2018

***अमृता खाकुर्डीकर***

डोंगराच्या कुशीत हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी स्वतःच घर असावं, असं स्वप्न प्रत्येक माणसाने कधी ना कधी पाहिलेलं असतं. पण घर घेणं इतकं कटकटीचं असतं की माणूस वैतागून म्हणतो, कुणीतरी आपल्याला तयार घर दिलं तर.. अगदी मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्येदेखील बसू शकेल अशी ही अत्याधुनिक खेडयाची नियोजित वसाहत म्हणजे 'सिनर्जी हॉलिडे व्हिलेज होम'. एखाद्या संकल्पनेच्या मागे असलेली माणसं आणि त्यांची जीवनदृष्टी अनाहूतपणे समोर येते. हेच सिनर्जी हॉलिडे व्हिलेजच्या  स्कीमचे प्रवर्तक राजेंद्र आवटे आणि मंदार देवगावकर यांना भेटल्यावर जाणवते.

दूर डोंगरकुशीत लपलेलं

असावं एक हिरवं गाव..

तिथे असावं टुमदार घर

ज्यावर कोरलंय माझं नाव...

आपलं नाव ज्यावर कोरलंय असं घर शहरी गोंगाटापासून दूर, डोंगराच्या कुशीत हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी असावं, असं स्वप्न प्रत्येक माणसाने कधी ना कधी पाहिलेलं असतं. पण पक्षी जसा एक झाड निवडून त्यावर सहजी घरटं बांधतो, मजेत फांदीवर झुलत झुलत पिलांना वाढवतो.. तसं माणसाचं नाही ना..

त्याला जागा शोधावी लागते, प्लॉट मिळाला तर एन. ए. केलेला आहे का, टायटल क्लिअर आहे की नाही, याची खातरजमा करावी लागते. पुढे बंगला बांधताना वाढत जाणारं बजेट, कर्ज प्रकरणासाठी बँकेत खेपा घालणं हे सगळं इतकं कटकटीचं असतं की माणूस वैतागून म्हणतो, कुणीतरी आपल्याला तयार घर दिलं तर...

..तर असं तयार घर मिळणार आहे, आणि वरीलपैकी कुठलीही खटपट ग्राहकाला करावी लागणार नाही, शिवाय डोळे उघडे ठेवून पूर्ण विश्वासही टाकता येईल, अगदी मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्येदेखील बसू शकेल अशी ही अत्याधुनिक खेडयाची नियोजित वसाहत म्हणजे 'सिनर्जी हॉलिडे व्हिलेज होम'.

या योजनेच्या 35 ते 45 लाख किमतीच्या बंगल्यांची स्कीम सादर करण्यात आली असून हवा तर स्वतंत्र बंगला किवा संयुक्त मालकीतला बंगला ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यातही खानदानी श्रीमंतीची आठवण देणारा दगडी बंगला, पर्यावरणाशी नातं सांगणारा सौंदर्यपूर्ण वीट बंगला आणि अतिशय मनमोहक असं बांबू हाउस, असे तीन पर्याय समोर आहेत.

याशिवाय जरा आगळीवेगळी आवडनिवड असणाऱ्यांसाठी 15 लाख किमतीपासून सुरू होणारे स्वीस टेन्ट कॉटेज हाउस आणि स्टायलिश जीवनशैली हवी असणाऱ्यांसाठी आधुनिक असं अप्रतिम कंटेनर हाउस असे बहुविध पर्याय जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहेत. याशिवाय पिकनिक किंवा आउटिंगसाठी रिसॉर्टच्या धरतीवर सूट्ससुध्दा उपलब्ध आहेत. भोवताली खेडं, तरीही आतील सर्व सुविधा मात्र आधुनिक आणि आरामदायी असणार आहेत. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मजबूत रस्ते हवेत, तर तेही आहेत.

असं हे बहुपर्यायी आणि परीपूर्ण हॉलिडे व्हिलेज आहे तरी कुठे, अशी उत्सुकता वाटणं साहजिकच आहे. पुण्यापासून 60-70 कि.मी. अंतरावर कात्रज घाट ओलांडून भोर गावाजवळ हे नवं हिरवं खेडं भाटघर धरण परिसरात वसतं आहे. या परिसराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. काठोकाठ पाण्याने भरलेलं भाटघर धरण आणि त्याचं बॅकवॉटर राजगड-रायरेश्वर गडकिल्ल्यांची शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, शेतीभातीने बहरलेली जमीन अणि अतिशय अनवट जीवविविधतेने नटलेल्या या नितांतसुंदर पार्श्वभूमीवर 50 बंगल्यांची ही स्कीम म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि स्वप्नात येऊन आपल्याला सतत हाक मारणारं स्वप्नाहून सुंदर.. हिरवाईतलं घर!

इतकं वर्णन केलेली ही घरं हे फक्त स्वप्न नाही, तर प्रत्यक्षात उतरणारं सत्य आहे, याची साक्ष म्हणून 'सॅम्पल होम' तयार आहेत. गुंतवणूकदारांना बघण्यासाठी आणि हौशी पर्यटकांना पिकनिकसाठीही. एवढंच नव्हे, तर सध्या तिथे पर्यटकांची वर्दळही सुरू झाली आहे. शाळा-कॉलेज तसेच अनेक लोक गटाने येऊन सहलीचा आनंद घेत आहेत. हे आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघू शकतो, किमान त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ  शकतो. हे घर जर इतकं छान आणि सर्व सुविधांनी युक्त आहे तर ते महागडं असणार, मग सर्वांना ते कसं परवडणार.. असा विचार मनात येणारच.. तर त्याचं उत्तर म्हणजे, 

थोडं तुमचं बळ..

थोडी आमची ताकद

बाकी कसलीही नाही सक्ती

मिळून दोघांची करू एकत्र शक्ती ..

अशा सूत्रावर आधारीत सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ही संकल्पना मध्यमवर्ग-सर्वसामान्य माणसाला नक्कीच परवडणार आहे. नुसतीच परवडणारी नाही, तर अनेक बाजूंनी फायदेशीरही ठरणार आहे.

सामान्य माणूस कोटीच्या कोटी किमतीत असणाऱ्या फार्म हाउसची साधी कल्पनाही करू शकत नाही. परंतु सुट्टीच्या काळात एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जातो, भोवतीच्या प्रसिध्द ठिकाणांना भेटी देतो. महागडया हॉटेलांमध्ये कुटुंबासह राहतो, फिरणं-खाणं-पिणं हा सारा खर्च पेलू शकतो. पण एका अर्थाने, पाण्यात जाणारा हा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवण्याची आणि गुंतवल्यावर त्यावर काही परतावा मिळण्याची संधी या प्रकल्पाने समोर आणून ठेवली आहे. शिवाय पर्यटनाची हौस तर मनमुराद पूर्ण होणार आहेच.


ही योजना नीट समजून घ्यायची, तर किमान प्रत्येकी 35 ते 45 लाख किमतीची ही घरं शक्य असेल तर आपण स्वतंत्रपणे घेऊच शकतो; पण ज्यांना शक्य नाही, त्यांनी आपला 7 ते 8 जणांचा ग्रूप बनवून प्रत्येकी पाच लाख असे जमवून ही घरं संयुक्त मालकीची म्हणूनही खरेदी करू शकतो. वर्षातले 30 दिवस हे घर खरेदीदाराला राहण्यासाठी/सुट्टी घालवण्यासाठी मुक्त उपलब्ध असेल. वीकेण्ड मजेत घालवा किंवा इयरएंड साजरा करा. मात्र उर्वरीत वर्षभर इतर लोकांसाठी पिकनिक स्पॉट किंवा निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून त्याचा वापर होईल. अर्थात 'आपलं' हे घर इतरांना भाडेतत्त्वावर राहायला दिलं जाणार. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ठरावीक वाटा गुंतवणूकदाराला मिळत राहाणार. यात किमान 6 लाखाची गुंतवणूक सामान्यांना नक्कीच परवडणारी.

घराची सुरक्षितता, मेंटेनन्स, फर्निचर, सजावट आणि सुशोभीकरण, राहण्या-जेवण्याच्या सुविधांसाठी लागणाऱ्या वस्तू, त्यांची देखभाल व स्वच्छता या सर्वांची जबाबदारी सिनर्जी हॉलिडे व्हिलेज घेणार असल्याने त्यापोटी त्यांचा होणारा खर्च वगळता उर्वरित रक्कम घरमालकाला मिळणार असल्याने ही गुंतवणूक नक्कीच फायदेशीर आणि सुरक्षित ठरणार, यात शंका नाही.

शंका घेण्यासारख्या कित्येक गोष्टी सामान्य ग्राहकाला खरं तर, आकर्षक गृहप्रकल्प योजनेत हमखास जाणवतात. भुलवणाऱ्या जाहिराती करून सर्वसामान्य माणसाला लुबाडणाच्या अनेक घटना या क्षेत्रात आजवर घडल्या आहेत. त्यामुळे शंकित मन ताकही फुंकर घालून पितं. म्हणूनच आपल्या शंकानिरसन करून घेतल्याशिवाय यात कुणी गुंतवणूक का करेल, याची पूर्ण जाणीव सिनर्जी कंपनीला असल्याने त्यांनी याबाबत ग्राहकांबरोबर सर्व पारदर्शकता राखली आहे.

विविध ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनामध्ये, प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये कंपनीची जाहिरात झळकली आहे. याशिवाय संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून यू टयूबर अपलोड व्हिडिओमध्ये आपण या सुंदर घरांचं साक्षात दर्शन तर घेऊ  शकताच, तसंच मुख्य म्हणजे सगळी विश्वासार्हता तपासून पाहू शकता.

ही विश्वासार्हता हेच या योजनेचं मुख्य वैशिष्टय आहे. यातील प्लॉटचं भूसंपादन करताना सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत आणि नियमानुसार आहेत.

आर्थिक बाबींसह अनेक गोष्टींची जोखीम पत्करून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पावर विश्वास बसल्यानंतर यातून मिळणाऱ्या सोयीसुविधा, राहणं, जेवण आणि इथला निवास सुखकर होण्यासाठी काय नियोजन आहे, या संदर्भात ग्राहकाचं पुढील आकर्षण लक्षात घेऊनच योजना आखल्या आहेत. समोरच्या शेतातून ताज्या सेंद्रिय भाज्या, शेतीतल्या विषमुक्त अन्नधान्याची भाकरी-पोळी खेडयातील माउली हाताने रांधून आपुलकीने वाढेल, अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण स्वयंपाकघर बचत गटाच्या महिला चालवणार असल्याने उत्तम सुग्रास भोजनाची हमी इथे निश्चित समजावी. कारण गावाकडच्या महिलेच्या रुचकर जेवणाची चव अन्य कुठेही मिळणं शक्य नाही. याशिवाय बाकी सर्व सेवा विनम्र ग्रामीण युवकांच्या टीमच्या माध्यमातून अगत्याने पुरवल्या जातील.

गावातलाच तरुण इथे व्यवस्थापक, साहाय्यक, टूर मॅनेजर, याशिवाय परिसराची सफर घडवणारा निसर्ग मार्गदर्शक अशा विविध भूमिकेत काम करणार आहे. त्यामुळे आपोआपच ग्रामीण भागातील महिला, तरुण व प्रौढ सर्वांच्याच हाताला काम मिळणार आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार असल्याने उत्पन्न वाढून त्यांचा जीवनस्तर उंचावायला मदत होणार आहे. आणि या मदतीस आपलाही हातभार लागणार आहे.



या भागातलं निसर्गवैभव ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. इथल्या पाणथळ आणि दलदलीच्या जागांवरच्या वैशिष्टयपूर्ण वनस्पतींवर रंगीबेरंगी फूलपाखरांचा हंगाम असतो. त्या वेळी फूलपाखरू महोत्सव आयोजित करण्यात येतो. हा भाग मधमाश्यांच्या पोळयांसाठी प्रसिध्द आहे. शुध्द मधाचा हा ठेवा सर्वांना लाभावा म्हणून मधमाशी महोत्सव घेण्यात येतो. यात उंच झाडावर इथला तरबेज तरुण तुरुतुरु चढून लोकांसमोर मधपोळं पकडण्याचं प्रात्यक्षिक दाखवतो. गर्द झाडी आणि दाट झुडपांच्या या भागात ठरावीक मोसमात खूप मोठया प्रमाणात काजवे चमकायला लागतात. काजव्यांच्या या प्रकाशाचाही इथे काजवा महोत्सव साजरा केला जातो. शिवरायांचे गडकिल्ले पालथे घालताना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे स्वत: माहिती सांगण्यासाठी येतात. पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे वनस्पती-पक्ष्यांची माहिती सांगतात. इतकं अफलातून आणि अनवट निसर्गदर्शन पर्यटकांना अन्य एखाद्या प्रकल्पात घडेल की नाही, सांगता येणार नाही. बाकी अन्य कृषिपर्यटन ठिकाणी असणाऱ्या हुरडा पार्टी वगैरे अधिकचं काही तर इथे भरपूर आहेच.

 या लेखांमधील चौकटींमध्ये नमूद केलेले मुद्दे पाहिले, तर एखाद्या व्यावसायिक प्रकल्पात कोण कशाला इतका सखोल विचार करेल, असं वाटतंय ना..? पण असे सुखद धक्के कधीतरी माणसाला बसू शकतात, जेव्हा एखाद्या संकल्पनेच्या मागे असलेली माणसं आणि त्यांची जीवनदृष्टी अनाहूतपणे समोर येते. सिनर्जी हॉलिडे व्हिलेजच्या पुण्यातल्या कॉर्पोरेट ऑॅफिसमध्ये जाऊन या स्कीमचे प्रवर्तक राजेंद्र आवटे आणि मंदार देवगावकर यांची भेट घेतली, तेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला.

ज्ञानप्रबोधिनी या प्रसिध्द संस्थेचे संस्कार घेऊन आणि जीवनात काही उदात्त हेतू ठेवून चालणाऱ्या ध्येयवादी लोकांचा हा काफीला आहे. एका वेगळयाच जीवनशैलीशी स्वत:ला जोडू पाहणारी ही माणसं म्हणजे 'आम्ही 'बी' घडलो... तुम्ही 'बी' घडाना' या चालीवरची.. जे त्यांच्यासोबत जातील, तेही अशाच एका चांगल्या हेतूने प्रेरित होऊन आपले आयुष्य उजळून टाकतील. मग मंडळी, काय विचार आहे? व्हायचं का सिनर्जी हॉलिडे व्हिलेजचे रहिवासी?   

  • l सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम क्षेत्रातला महत्त्वपूर्ण 'रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्प नोंदवले आहेत. (रेरा रजिस्ट्रेशन)

  • l बांधकाम प्लॉट एन.ए. (नॉन ऍग्रिकल्चरल) केलेले आहेत.

  • l खरेदी व्यवहारात कायदेशीररित्या जागामालकाचं नाव सात बारा उतारावर नोंद होईल.

  • l वैयक्तिक खरेदीदाराला सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट मिळेल.

  • l जमीन खरेदी करताना बांधकाम मिळकतीवर कुणाचाही पूर्वहक्क अथवा वा वहिवाट नाही, याची संपूर्ण खात्री करून घेतली आहे. (लीगली क्लिअर टायटल)

  • l बँक कर्ज प्रकरणासाठी संपूर्ण मदत केली जाईल. त्या वेळी सर्व कागदपत्राची पडताळणी होईल.

  • l महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व बाबतीत प्लॉटची जी सद्य:स्थिती असेल, त्याबद्दल स्पष्ट कल्पना दिली जाईल. कोणत्याही बाबतीत अंधारात ठेवलं जाणार नाही.

  • l बांधिलकी हेच विकसनाचे सूत्र खात्रीपूर्वक राबवले जाईल. त्यात रस्ते, नळ कनेक्शन, वीजपुरवठा इ. अधिकृत मंजुरींची पूर्तता असेल.

  • l या प्रकल्पाची सर्व माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

  •  ही सर्व हमी घेऊन यातील जोखीम बांधकाम कंपनीची असेल, हे स्पष्ट होत आहे.

          

9860998753