स्वच्छ पर्यावरणासाठी कायम पुढाकार

 विवेक मराठी  11-Jun-2019

 आम्ही 100% कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच ऊर्जा निर्मितीसाठी वचनबध्द आहोत. आमच्या मॉल आवारात तयार होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी आम्ही असाधारण अशी पध्दत वापरली आहे. खालील काही मुद्दे आहेत, ज्या प्रकारे आम्ही काम करतो.

1) कचरा व्यवस्थापन : कचऱ्याचे वर्गीकरण अत्यंत आवश्यक आहे. नुसता ओला व सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा आम्ही साध्या व सोप्या पध्दतीने कचऱ्याचे तीन प्रकारे वर्गीकरण करतो.

1) कुजणारा कचरा (ओला कचरा) 2) न कुजणारा कचरा (सुका कचरा) 3) विक्री होणारा कचरा (भंगार)

अ) कुजणारा कचरा (ओला कचरा) :  आम्ही मॉलच्या आवारामध्ये एक खोल खड्डा केला आहे, ज्यामध्ये कुजणारा कचरा (ओला कचरा) टाकला जातो. म्हणजेच भाजीपाल्याचे देठ, पालापाचोळा, शेण इत्यादी. शेजारी असणाऱ्या आमच्या बायोगॅस प्रकल्पासाठी त्याचा वापर होतो. त्यातून तयार होणाऱ्या गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करण्यात येतो, तसेच उर्वरित कुजलेल्या कचऱ्याचा खच म्हणून वापर होतो. सदर खत मॉल आवारातील वृक्ष, फुल झाडे व नर्सरीमध्ये केला जातो. सदर सेंद्रिय खतास शेतीसाठी शेतकऱ्याकडून भरपूर मागणी आहे.

ब) न कुजणारा कचरा (सुका कचरा) : मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड असल्याने येथे मोठया प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा तयार होतो. मुख्यत: चॉकलेटची, आइसक्रीमची तसेच इतर खाद्यपदार्थाची प्लास्टिक आवरणे.

अभिरुची मॉल ऍंड मल्टीप्लेक्समध्ये आमचा स्वत:चा Poly-Fuel प्रकल्प आहे, ज्यामध्ये वरील प्लास्टिकचा न कुजणारा कचरा इंधन बनवण्यासाठी वापरला जातो. भट्टी पेटवण्यासाठी, तसेच बांधकाम यंत्रसामग्री चालवण्यासाठी हे इंधन वापरले जाते. सदर इंधनावर 35 HPचे कटिंग मशीन (Shredder) उत्तमरीत्या चालते.

क) विक्री होणारा कचरा (भंगार) : मॉलमध्ये रिकाम्या पाण्याच्या व शीतपेयाच्या बाटल्या, रिकामे तेलडबे, प्लास्टिक डबे इत्यादी मोठया प्रमाणात कचऱ्यात आढळते, जे वेगळे करून भंगार व्यापाऱ्याला विकले जाते.

2) पाणी व्यवस्थापन : पाणी बचत ही काळाची गरज ओळखून आम्ही मॉलमधील सर्व नळांना Water Saver Nozzle बसवले आहे. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून आम्ही त्याचा पुनर्वापर करतो. आवारामध्ये एक सेप्टिक टाकी आहे, ज्यामध्ये बिल्ंडिगमधील सांडपाणी साठवले जाते व त्यावर Non-Conventional Sewege Treatment प्लांटद्वारे प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया SIBF तंत्रज्ञानाने विकसित आहे. या प्रक्रियेतून मिळालेले पाणी प्रसाधनगृहासाठी, तसेच झाडे व बगिचासाठी वापरले जाते.

3) सौर ऊर्जा : अभिरुची मॉल मल्टीप्लेक्सचे टेरेसवर 40 हजार चौ. फुटामध्ये 500 kwचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. यामुळे मोठया प्रमाणावर सौर ऊर्जा निर्माण होते व कार्बन फूटप्रिंट्स कमी होण्यास मदत होते. सदर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज (ऊर्जा) अभिरुची मॉलसाठी वापरली जाते.

या सर्व पध्दती अभिरुची मॉल ऍंड मल्टीप्लेक्समध्ये आम्ही वापरतो.
आम्ही स्वच्छ भारत अभियानमध्ये सहभागी आहोत या उपक्रमाद्वारे आम्ही तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे स्वच्छता अभियान राबवतो.

अभिरुची मॉल ऍंड मल्टीप्लेक्स स्वच्छ व चांगल्या पर्यावरणासाठी बांधिल आहे.

अभिरुची मॉल ऍंड मल्टीप्लेक्स

संचालक : सुनील मोहनराव भिडे

8956014849/50