.
 
चालू अंक
फक्त मुस्लीम मतांसाठी...
२९ ऑगस्ट २०१०

संपादकीय
धमक्या देणा-यांचीगय नको!

काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. "आझादी'चे नारे देऊन या फुटीर शक्ती देशविघातक कारवाया करण्यात मग्न आहेत. हिंसाचारग"स्त काश्मीरमधील जनजीवन सध्या पूर्णपणे विस्कळीत आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अनेकांनी काश्मीर समस्येची दखल घेतली असली तरी तेथील आंदोलक मात्र केंद्र सरकारच्या आवाहनास धूप घालण्याच्या अवस्थेत नाहीत. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, काश्मीर समस्येवर चर्चेद्वारेच तोडगा निघू शकतो, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील जनतेच्या विशेषत: तेथील तरुणांच्या मनातील क्रोध आणि वेदनांचे निराकरण व्हायला हवे, असे वक्तव्य सोनिया गांधी यांनी केले आहे. काश्मीरमध्ये सध्या गोंधळ घालत असलेले तरुण हे फुटीर तत्त्वांचा चिथावणीवरूनच हैदोस घालत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांच्या कसल्या आल्या आहेत वेदना? भारत सरकारचा कोणताच आदेश जुमानायचा नाही हे लक्षात ठेवूनच तेथील आंदोलन चालू आहे. आतापर्यंत काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा काय कमी वेळा झाली? पण चर्चा नकोच असेल तर अशी आवाहने करण्यात तरी काय अर्थ आहे?
सोनिया गांधी काश्मीरमधील आंदोलकांसंदर्भात अशी विधाने करीत असताना दुसरीकडे तेथील फुटीर तत्त्वे त्या राज्यातील मुस्लिमेतर जनतेशी कसा व्यवहार करीत आहेत हे एका ताज्या घटनेवरून आढळून येत आहे. काश्मीरमध्ये जवळजवळ 60 हजार शीख नागरिक राहतात. या समाजाच्या धुरिणांकडे काही निनावी पत्रे अलीकडेच आली आहेत. या पत्रांमधून शीख समाजापुढे काश्मीरमध्ये राहण्यासाठी दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे येथे राहायचे असल्यास इस्लाम धर्माचा स्वीकार करा. दुसरा पर्याय म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारायचा नसेल तर काश्मीरमधून निघून जा! शीख समाजातील धुरिणांकडे कोणत्या संघटनेने अशी पत्रे पाठविली हे अद्याप समजू शकले नसले तरी हा सर्वच प्रकार भयानक मानायला हवा. काश्मीरमधील हिंदूंना तेथील धर्मांध मंडळींनी देशोधडीस लावले आहे. आपली मायभूमी सोडून काश्मीरमधील हिंदूंना देशाच्या अन्य भागात आसरा घ्यावा लागला आहे. काश्मिरी हिंदूंनी अलीकडे काश्मीर खोऱ्यातील काही मंदिरात यज्ञयाग केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून ठळकपणे प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या बातम्यांवरून काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारत असल्याचे भासत असतानाच कित्येक दिवसांपासून त्या खोऱ्यात फुटीर शक्तींनी माजविलेला हिंसाचार आणि आता इस्लामचा स्वीकार करण्याची, शीख समाजास दिलेली धमकी पाहता काश्मीरचा गुंता सुटण्याऐवजी वाढतच चालला असल्याचे म्हणता येईल.
जम्मू-काश्मीर राज्यात राहणाऱ्या मुस्लीम समाजाला केवळ हिंसाचार घडविण्यातच अधिक स्वारस्य आहे. अगदी अलीकडे त्या राज्याचाच एक भाग असलेल्या लडाखला ढगफुटीमुळे महापुराचा जबरदस्त तडाखा बसला. लडाखमधील काही भागाची, होत्याचे नव्हते अशी अवस्था झाली! पण लडाखमधील आपत्तीच्या वेळी काश्मीर खोऱ्यातील "वेदनेने' तळमळणारी तरुणाई तिकडे धावून गेल्याचे अजिबात आढळून आले नाही. काश्मीरमधील आंदोलकांना लडाखमधील नैसर्गिक आपत्तीचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. इकडे सोनिया गांधी म्हणतात, अशा आंदोलकांच्या क"ोध आणि वेदनेची दखल घ्यायला हवी! सोनिया यांना अजूनही चर्चेद्वारे काश्मीर खोऱ्यात शांतता नांदू शकते असे वाटते की काय? शीख समाजाने काश्मीरमध्ये राहायचे असेल तर त्या समाजास धर्मांतर करायची धमकी देणाऱ्यांसोबत चर्चा कसली करायची? शीख समाजाच्या नेत्यांना आलेल्या पत्रांमध्ये, तुम्ही काश्मीरमध्ये सर्व सुखे उपभोगत आहात, मग  इथल्या जनतेच्या दु:खात का सहभागी होत नाही, असा सवाल करण्यात आला आहे. ""तुम्ही गोळ्यांना घाबरता हे आम्हाला चांगले माहीत आहे. तुम्ही गुरुद्वारांमध्ये निदर्शने करा किंवा काश्मीर सोडून चालते व्हा,'' अशा धमक्या शीख समाजास देण्यात आल्या आहेत, पण काश्मीर खोऱ्यातील शीख समाजाने, असल्या धमक्यांना न घाबरता, अशा लोकांचे मनसुबे धुळीस मिळविण्याचा निर्धार केला आहे. काश्मीरमधील फुटीर गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी, शीख समाजाने अशा बोगस पत्रांची दखल घेण्याचे कारण नाही, असे म्हटले असले तरी धर्मांतर करण्याच्या धमक्या देणारी पत्रे पाठवून अल्पसं"य समाजाच्या मनात भीती निर्माण करण्याचाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल. काश्मीर खोरे आज अशांत आहे. काश्मिरी पंडितांना आधीच तेथून पळवून लावण्यात आले आहे. आता शीख समाजाकडे मोर्चा वळविण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकीकडे धर्मांतराविरोधी कायदा असला पाहिजे, असा आग"ह धरला जात असताना काश्मीर खोऱ्यातील तथाकथित धर्मांध नेते वा त्यांचे पित्ते, अल्पसं"य समाजाने काश्मीर सोडून जावे म्हणून धमकावत आहेत. काश्मीरमध्ये घडत असलेल्या अशा घटनांची सरकारने गंभीर दखल घ्यायला हवी. डॉ. फारुख अब्दुल्ला असोत वा ओमर अब्दुल्ला, ही सर्वच नेतेमंडळी फुटीर शक्तींच्याविरुद्ध ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. काश्मीर खोऱ्यात कायमस्वरूपी शांतता नांदण्यासाठी, या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच केंद्र सरकारने पावले टाकायला हवीत. पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा खदखदत ठेवण्यातच रस आहे. या देशाचे अभि अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात फुटीर शक्तींनी कित्येक वर्षांपासून डोके वर काढले आहे. या फुटीर शक्तींना ठेचून काढण्याची गरज आहे. नुसती चर्चेची तयारी दर्शवून काही साधणार नाही!