.
 
चालू अंक
इथे क्लिक करा.
 

विवेक व्यासपीठाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या विविध यात्रा आणि त्यांची वैशिष्ट्ये


गो-यात्रा
" कालावधी -५ ते ९ एप्रिल २०११

  • ठळक वैशिष्ट्ये
    भारताची कृषिप्रधान अर्थव्यवस्था ही प्रामु"याने गोवंशावर आधारित आहे. त्यामुळेच येथील समाजात गायीविषयी पवित्र आणि श्रद्धायुक्त भावना आहे. गायीच्या महात्म्याचे आणि तिच्या सर्वांग उपयुक्ततेचे वर्णन वेदकाळापासून अनेक धार्मिक ग्रंथात आढळते. गायीचे दूध, गोमूत्र, गोमय यांचे आयुर्वेदातील महत्त्वही वादातीत आहे. गोभक्तीला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन भारतीय गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे सेवाकार्य अनेक संस्थांनी हाती घेतले आहे. "विवेक व्यासपीठ'तर्फे महाराष्ट्रातील अशा संस्थांच्या कार्याचे दर्शन घडविणारी अनोखी "गो-तीर्थयात्रा'

    " या तीर्थयात्रेत गो- आधारित शेती लोकप्रिय करण्यात अग्रभागी असलेला अकोला येथील प्रकल्प आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी असलेली जळगाव येथील गोशाळा याशिवाय या गो -प्रकल्पाबरोबरच शेगावचे श्री गजानन महाराजांचे दर्शन, आनंद सागर, जळगाव येथील जैन उद्योगसमूहाच्या कृषी प्रकल्पांना भेटी, पद्‌मालय देवस्थान, अजिंठा/वेरुळ लेण्यांना भेटी आदींचा समावेश

    पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा

  • कालावधी -१४ ते १८ जानेवारी २०१०

    १४ जानेवारी २०१० रोजी पानिपतच्या रण संग्रामाला अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. पानिपत येथे या संग्रामाचे स्मरण म्ह्णून स्मारक उभारले जाणार आहे. जागतिकिकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या उज्वल इतिहासाचे स्मरण करून त्यातून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा प्राप्त करुन देणे ही आजच्या काळाची गरज आहे.याच भूमिकेतून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

    या पार्श्वभूमीवर पानिपत रणसंग्राम - मराठ्यांची शौर्यगाथा हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला . या अंकातून मराठ्याच्या शौर्याचा आणि राष्ट्रभक्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • हा अंक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

    http://www.evivek.com/12dec2010/index.html

  • यात्रेमध्ये पानिपतची युद्धभूमी कुरुक्षेत्र दिल्ली आग्रा वृंदावन व मथुरा येथील ऐतिहासिक स्थळांना ज्येष्ठ इतिहास तज्ञांसोबत भेठी देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता.
  • चित्रकुट यात्रा -

    कालावधी -१४ नोहेंबर ते १८ नोव्हेंबर २०१०

    ठळक वैशिष्ट्ये

    • नानाजींच्या प्रेरणेने कार्यरत असलेले आरोग्यधाम, उद्यमिता केंद्र,गोशाळा,कृषी संशोधन केंद्र, जलसंधारण योजना इ. प्रकल्प पाहणे.
    • नानाजींच्या कार्याने परिवर्तन झालेल्या गावांना  भेटी देणे तसेच त्यांच्या प्रेरेणेने कार्यरत असलेल्या समाज शिल्पी दांपत्यांच्या  भेटी व त्यांनी केलेले समाज परिवर्तनाचे विवेध प्रयोग पाहणे.
    • पं.वसंत आजगांवकर यांचा सुश्राव्य गीत रामायणाचा कार्यक्रम
    • चित्रकूट येथील आध्यात्मिक स्थळांना भेट.( गुप्त गोदावरी,रामघाट,कामदगिरी पर्वत, चित्रकूट गुंफा,सती अनुसूया आश्रम , स्फटीकशीला )
    • सा.विवेक, त्रैमासिक ज्येष्ठपर्व आणि त्रैमासिक वैद्यराज हे तीनही अंक  आपल्याला किंवा आपण सुचवलेल्या व्यक्तीला /संस्थेला सप्रेम भेट म्हणून वर्षभर मोफत .