अंतरंग

महामारीवर महाआर्थिक उपचार

भारतालाच नव्हे, तर सर्व जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना रोगाने सर्व क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. भारत सरकारने योग्य वेळेत कठोर उपाय केले आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पराकाष्ठा केली, म्हणून हे संकट जरा कमी गतीने आणि कमी प्रमाणात अंगावर येत आहे. संपूर्ण देश बंद, संचारबंदी, वाहने बंद अशा उपायांनी संसर्ग कमी करण्याचा खटाटोप चालू आहे. त्यात यश मिळताना दिसत आहे. पण त्याच वेळी अनेकांचे हाल सुरू झालेलेही दिसत आहेत. सरकारला रोगाचा प्रसार कमी करण्याची जितकी प्राथमिकता दिसते, त्याहून जास्त माणसांचे ..

ग्लोबल मदर मनामनात... !

आपल्यासारख्याच चार सामान्य माता इतर देशांतील मातृशक्तीचा शोध घेत चक्क चारचाकी वाहनाने लंडनपर्यंत प्रवास करतात, हीच एक अलौकिक गोष्ट होती. त्यांना जगात काय अनुभव आले? तेथील मातांची, कुटुंबाची स्थिती कशी आहे? अशा अनेक गोष्टी महिलांना जाणून घ्यायच्या होत्या. विशेष म्हणजे माधुरीताई यांनी संवादी शैलीत अनुभवकथन केलं. आपल्या देशाची जगाला देणगी ठरावी अशी कुटुंबव्यवस्था, देशाची उच्च विचारसरणी सगळीकडे पोहोचवायला हवी. मातृत्वात मोठी शक्ती आहे. या धाग्याने आलेले अनुभव विणत त्यांनी संवाद साधला. ..

शिवाजी महाराजांचे आरमार

मराठयांची सांघिक कामगिरी जमिनीप्रमाणे ह्या समुद्रावरील (आरमार)'गनिमी काव्या'तही उत्कृष्टच होती. महाराजांच्या कारकिर्दीच्या अखेरीला पोर्तुगीजांनी मराठी आरमाराला सवलती देणे सुरू केले. ..

महिलांसाठी विमा

एलआयसीच्या जीवन शांती या पेन्शन योजनेत स्त्रियांना पुरुषांइतक्याच दराने पेन्शन मिळते..

इस्लामी जगताची नाराजी आणि भारत

अयातुल्ला खोमेनी यांनी भारताविरोधात ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे. यामागे अनेक कारणे असली, तरीही तुर्कस्तान, मलेशियात पसरलेले हे भारतविरोधी लोण अन्य देशांत पसरू द्यायचे नसेल व आपली तेलसुरक्षाही अबाधित राखायची असेल, तर इस्लामी जगताला नाराज करून, दुखावून चालणार नाही. यासाठी आगामी काळात भारताने सावधगिरीने पावले टाकण्याची गरज आहे. ..

थप्पड - आत्मभानाची जाणीव!

'थप्पड' चित्रपटाच्या निमित्ताने एका मार्मिक विषयाची नाजूकपणे केलेली हाताळणी प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालणारी आहे. महिलांच्या आत्मसन्मानावर भाष्य करणारा हा चित्रपट 'जगण्याचा' नवा दृष्टीकोन देतो. ..

गंगा आरती

एक मायक्रो भारत, एक मायक्रो जग गंगेकाठी अवतरले होते. शेवटी गंगारती सुरू झाली. देशी, परदेशी सगळे एका सुरात गात होते. ‘चंद्र सी ज्योत तुम्हारी जल निर्मल आता.. पुत्र सगर के तारे सब जग को ज्ञाता... यम कि त्रास मिटाकर परमगति पाता.... ओम गंगे माता...’ नंतर शेकडो ओंजळीतले दिवे तिच्या प्रवाहाबरोबर हसत हसत जाऊ लागले. दीपकळ्यांनी गंगेचे वस्त्र तेजोमय झाले. ..

रंगपंचमीमुळे धाराशीवच्या महिलांना मिळाला रोजगार

धाराशिव जिल्हा तसा आर्थिकदृष्टया मागास. ना इथे मोठे उद्योग आहेत, ना रोजगाराच्या संधी. पण छोटासा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्टया सक्षम होता येते, हे या जिल्ह्यातील महिलांनी दाखवून दिले आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर इथल्या महिलांना रंगनिर्मिती करण्याचे काम मिळाले आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास समितीचे मोठे पाठबळ लाभत आहे. ..

आयुर्विमा महामंडळाच्या लोकप्रिय विमा योजना - 2

एकेकाळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या जीवन छाया, जीवन सुरभी, जीवन सुरक्षा, बीमा गोल्ड अशा अनेक विमा योजना एलआयसीने बंद केल्या, तर जीवन आनंद, जीवन लाभ, जीवन उमंग अशा वैशिष्ट्यपूर्ण योजना ग्राहकांसाठी खुल्या केल्या. त्यांपैकी जीवन आनंद आणि जीवन उमंग या योजनांविषयी. ..

बहुविधता आणि न्या. चंद्रचूड

भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे गुजरात हायकोर्टात 15 फेब्रुवारी रोजी भाषण झाले. त्यांच्या विचारांचा वेगळया प्रकारे अतिशय तीव्र प्रतिवाद करता येण्यासारखा आहे. परंतु धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती असल्यामुळे शुध्द न्यायाच्या भूमिकेतूनच पाहू या... ..

जॉर्ज इव्हानोविच गुर्जीएफ - चौथ्या गूढ रस्त्याचा प्रवासी

1866मध्ये अलेक्झांड्रोपॉल, अमेरिका येथे जन्माला आलेल्या जॉर्ज गुर्जीएफच्या साधनापध्दतीची आज खूप चर्चा होते. त्याच्या जुन्या झेन गुरूंसारख्या वाटणाऱ्या वर्तनावर चांगले-वाईट लिहिले, बोलले जाते. त्याच्या मार्गदर्शनाने पुलकित झालेले साधकदेखील आपण नेमके काय केले तेच शोधत असतात. काय आहे हा चौथा मार्ग? आणि मग आधीचे तीन मार्ग कोणते आहेत? ..

केंद्रीय अर्थसंकल्पातील विमाविषयक तरतुदी

केंद्रीय अर्थसंकल्पात एलआयसीच्या संदर्भात झालेल्या बदलांमुळे एलआयसी धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात विम्याविषयी झालेले संभाव्य बदल आणि त्याचे परिणाम याविषयी जाणून घेऊ या. ..

॥ शापित क्रांतिकारक ॥

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभर हिंदू भूमीसाठी, ज्या हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी लढले, तेच हिंदू सावरकरांबद्दल अपशब्द वापरतात हे सावरकरांचे व आपले दुर्दैव! ..

काफिरिस्तान

अरब, तुर्की, पारसी, अफघाणी, मुघल असे अनेको हल्ले भारतावर झाले, पण या वसाहती सुरक्षित राहिल्या. यांची भाषा काश्मिरी भाषेसारखी, प्राकृतमधून उद्भवलेली आणि यांचा धर्म प्राचीन हिंदू धर्माचा एक पंथ. या प्रांताचे अलीकडचे नाव - काफिरिस्तान...

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणाऱ्या, तसेच लोकमान्य टिळक, म. ज्योतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणाऱ्या क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची 17 फेब्रुवारी रोजी पुण्यातिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा लेख. ..

समृध्दीसोबत संस्कारांची रुजवण करणारे काकासाहेब चितळे

दूरदृष्टी, नव्याचा स्वीकार करण्याची वृत्ती या गुणांचा वारसा काकासाहेबांना आपल्या वडिलांकडून मिळाला. लहान लेकरांना दूध देतानाही भेसळीच्या शंकेनं मन काळवंडून जावं अशा या काळात चितळेंनी दिलेला दर्जाबद्दलचा, शुध्दतेबद्दलचा विश्वास फार मोलाचा आहे आणि म्हणूनच तो रुजवणाऱ्या, जपणाऱ्या काकासाहेबांसारख्या कर्मयोग्याचे योगदान अनमोल आहे! त्यांच्या स्मृतींना श्रध्दांजली अर्पण करणारा लेख. ..

पवारांच्या हत्येचा कथित कट आणि भुकेली माध्यमे

या माध्यमातून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जाते आणि हे चॅनेल चालवणारे लोक शरद पवार यांच्या हत्येचा कट रचत असल्याचेही या व्यक्तीने तक्रारीत म्हटले होते. ‘हत्येचा कट’ हा शब्द ऐकताक्षणीच माध्यमांनी त्याची ब्रेकिंग न्यूज केली हे वेगळे सांगायलाच नको. सनसनाटी हेडलाईनसाठी सदासर्वकाळ भुकेले असलेल्या पत्रकारांनी आणि वाहिन्यांनी हे प्रकरण लावून धरले. ..

आयुर्विम्याचे प्रकार

आयुर्विमा घेताना आपल्यासमोर असलेल्या पर्यायांपैकी आपल्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे, हा संभ्रम असतो. विम्याचे प्रकार कोणते आणि प्रत्येकाचे काय काय फायदे असतात, हे लक्षात घेतले तर हा संभ्रम काही प्रमाणात दूर होईल. ..

इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडणारा इतिहासकार लिओपोल्ड रँके

आज संशोधनामध्ये पुरातत्त्व, अभिलेखागार, हस्तलिखिते, पुराभिलेख, अक्षरवटीकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास यासारख्या ज्ञानशाखा विकसित होत आहेत. या सर्व बाबींचे श्रेय लिओपोल्ड रँके याला जाते, ज्याने इतिहासाला तत्त्वज्ञान आणि शास्त्र या दोन्ही ही ज्ञानशाखांमध्ये स्थान मिळवून दिले...

आंतरराष्ट्रीय उचापतखोर सोरोस!

आपल्या सामाजिक संस्था आणि श्रीमंती यांच्यासाठी प्रसिध्द असलेले आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व जॉर्ज सोरोस यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतातील सीएए कायद्यावरून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अशा आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर सातत्याने आपल्या तिरकस प्रतिक्रिया देणाऱ्या सोरोस यांच्या या वक्तव्यामागे असलेल्या संभाव्य कारणांचा उहापोह करणारा लेख. ..

स्त्री-पुरुष समतेचा बुलंद आवाज - विद्या बाळ

मासिकाचे संपादन करताना विद्याताई स्वत:चे अनुभवविश्व व्यापक करत राहिल्या. वाचन, प्रवासदौरे, परिषदा, शिबिरे, परिसंवाद यामार्गाने त्यांनी स्वत: आपल्या जाणिवेचे क्षितिज उंचावत ठेवले आणि त्याच वेळी निदर्शने, मोर्चे इत्यादी माध्यमांतून स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही चालू ठेवले. त्यांच्यातला डोळस वाचक, सर्जनशील संपादक आणि कृतिशील कार्यकर्ता यांच्या त्रिवेणी संगमामुळे त्यांचा जीवनप्रवास अनेक पीडित स्त्रियांना संजीवन देत गेला. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा त्यांनी चालू ठेवली...

निरोगी त्वचेसाठी पोषक आहार

निरोगी त्वचेसाठी पोषक आहार ..

प्रदूषणापासून त्वचा सांभाळा

हवा प्रदूषित झाल्यावर तुम्ही-आम्ही लक्ष देतो ते श्वसनाच्या आजारांवर. त्याच वेळी वातावरण आपल्या त्वचेचीही वाट लावतेय हे आपल्या गावीही नसतं. आता असं करून चालणार नाही. औषधं घेऊनही कित्येकांच्या त्वचेचा कंड बरा होत नाही. येणारी खाज कमी होत नाही. आता फार उशीर करून चालणार नाही. आपल्या वातावरणाबाबत त्वरित जागरूक व्हायलाच हवं...

त्वचाविकारावर औषधाशिवाय उपचार

त्वचाविकारावर औषधाशिवाय उपचार ..

एकांगीपणाचा कळस

वेस्टर्न मीडिया हा त्या-त्या वेळी आपल्या गरजेनुसार, हितसंबंधांनुसार भूमिका बदलत आलेला आहे. दुर्दैव असे की सीएए-एनआरसीवरून ज्याप्रमाणे भारतातील काही जणांनी गैरसमज करून घेतले आहेत, त्याच गैरसमजांना 'इकॉनॉमिस्ट'सारखे प्रख्यात म्हणवले जाणारे मासिकही बळी पडले आहे. कदाचित म्हणूनच, तांत्रिक मुद्दयांना बगल देत पक्षपातीपणे लेख लिहून त्यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली आहे. ..

समृध्द बहुभाषक

प्रवास करीत असताना अनेक सहप्रवासी भेटतात. प्रवासातील 'वेळ' या सहप्रवाशांमुळे कंटाळवाणी वाटत नाही. कधी नवीन ऋणानुबंध तयार होतात, तर कधी अनुभवाची शिदोरी मिळते. प्रवास करीत असताना येणारे अनेक भावबंध आयुष्यातील वाटेवर नवीन काहीतरी शिकवीत असतात. ..

मुक्ताचे घडणे...

मुक्ता वेगळया वाटेवरून चालते म्हणजे ती काय करते? थोडा धांडोळा घेते आणि या वेगळया वाटेवरून चालण्यासाठी तिला बळ कुठून आले..

प्यार से फिर क्यों डरता है दिल

प्रेम हे चिरंजीवी असते, म्हणून वैश्विक असते. प्रेमी संपतात, त्यांची जागा घेणारे दुसरे येतात. गाणी एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. ते शब्द, ते सूर दुसऱ्या गळयातून गायले जातात. प्रेमाबरोबर ही गीतेही अमर होतात. ..

चिरंतन उत्साहाचा झरा महेंद्र बुवा

अंतापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील रहिवासी व हल्ली सोलापूर निवासी असलेले संघकार्यकर्ते महेंद्र बुवा यांचे सोलापूर येथे नुकतेच अपघाती निधन झाले. तीन वर्षे संघ प्रचारक, दोन वर्षे वनवासी कल्याण आश्रम पूर्णकालीन कार्यकर्ता व गेले एक वर्ष जनकल्याण समितीचे सोलापूर जिल्ह्यात अंशकालीन कार्यकर्ते तसेच मालेगाव जिल्हा संघ कार्यकारिणीत काही वर्षे काम केलेल्या महेंद्र बुवा यांच्याविषयीचा श्रध्दांजली लेख. ..

रोजच्या जगण्यातलं संविधान

नागरिकांना उत्तम जगण्याची हमी ज्याद्वारे मिळणार तो कायदा म्हणजे संविधान. तसं पाहिलं तर आपल्या रोजच्या जगण्यातंही आपण संविधानाची मूल्ये जगत असतो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राज्य घडवणं हा आपल्या संविधानाचा उद्देश आहे. ..

स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्त होताना

केरळमध्ये राज्यपालांच्या भाषणाला झालेली आडकाठी, साहित्य संमेलनात हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांची चौकशी व सावरकर विचारांच्या प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे विद्यापीठाने दिलेले आदेश, असे प्रकार का घडतात? या प्रश्नाचे उत्तर संविधानात शोधून सापडणार नाही. ..

संविधानाची ही मूल्ये कुणी जगायची?

संविधान म्हणजे केवळ कायदा नाही, तसेच केवळ तत्त्वज्ञान नाही, तर संविधान म्हणजे मूल्यविचार असतो. मूल्याचा संबंध समाजाच्या संस्कृतीशी येतो. ही मूल्ये कोणताही तत्त्वज्ञानी शोधून काढत नाही. ती परंपरेने विकसित होत जातात. वारसा हक्काने येणाऱ्या पिढीला ती प्राप्त होतात. ..

माळशिरसचा संघर्षशील 'राम'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला व त्याचे जीवन बदलून गेले. संघाच्या मुशीत राष्ट्रप्रेमाचे व व्यक्तिगत चारित्र्याचे संस्कार झाले. दैनंदिन संघाच्या शाखेत काम करत असताना शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत स्वतः काम करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं...

उत्तुंग पार्थ

पार्थ बावस्कर हा अवघ्या वीस वर्षांचा तरुण औरंगाबादेला राहतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात वीर सावरकर, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, पसायदान अशा अनेक विषयांवर व्याख्यान देत भ्रमंती करतोय. शब्दामृत प्रकाशन या नावाने पार्थची आता स्वतःची पुस्तक प्रकाशन संस्था आहे. आजवर त्याने फक्त सावरकरांवर 100पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. आम्ही मोफत मराठी शिकवतो. दर रविवारी आम्ही 'फन स्कूल' भरवतो, कलारंग नावाची संस्था स्थापन केली. यात पाच वर्षांच्या बालकापासून 60 वर्षांच्या पुढील ..

लोगोथेरपी : व्हीक्टर फ्रँकल

युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे डॉक्टर फ्रँकल आणि त्यांचे कुटुंबीय छळछावणी मध्ये पाठवले गेले। हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये आलेल्या अनुभवांनी आणि त्या काळामध्ये स्वतःच्या मानसिक क्षमतांचा नव्याने शोध लागल्याने, डॉक्टर फ्रँकल यांनी लोगोथेरपी या नावाची तत्त्वज्ञानावर आधारित अशी मानसशास्त्रीय उपचार पद्धती शोधून काढली..

'अटल भूजल'चा अमृतकुंभ

दि. 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाने स्व. पंतप्रधान अटलजी यांच्या 95व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर सहा राज्याच्या भूजलामध्ये 78 जिल्ह्यांमधील कायम दुर्भिक्ष असणाऱ्या 8350 ग्राामपंचायतीसाठी 'अटल भूजल योजने'चा शुभारंभ केला आहे. या योजनेमागे एकमेव उद्देश आहे- तो म्हणजे भूजलाची पातळी वाढविणे होय. ..

स्नेहवन - दुष्काळग्रस्तांचे मायबाप

सामाजिक काम हे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखंच. अशोक देशमानेने ऐन तारुण्यात आयटी क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. 'स्नेहवन' नावाची संस्था उभारून या मुलांना आधार दिला, त्यांच्यासाठी शिक्षणाची वाट खुली केली. आज त्याचे आई-वडील, पत्नी त्याच्या या कामात त्याला खंबीरपणे साथ देत आहेत. मात्र ही वाटचाल सुरू करताना अशोकच्या आई-वडिलांच्या काय भावना होत्या? जाणून घेऊ या या लेखात. ..

पुत्र व्हावे ऐसे...

सगळीच मुले घरच्यांना पाहतच लहानाची मोठी होतात. सहसा त्याच पठडीत जातात, सगळेच पालक आपल्या मुलांच्या भल्यासाठी झटत असतात. आम्ही काही फार वेगळे केले असे अजिबात नाही. फक्त त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. रुळलेली वाट मोडायची ठरवली तेव्हा आडता घातला नाही. वेगवेगळया गोष्टी करून पाहाव्याशा वाटल्या तेव्हा शक्य झाल्या तेवढया संधी घेऊ दिल्या. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे होई, तेव्हा ती माहिती नसेल, तर त्याबद्दल आम्हीही माहिती काढली. ..

अभाविप जगातील सर्वोत्तम विद्यापीठ -धर्मेंद्र प्रधान

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जगातील सर्वोत्तम विद्यापीठ आहे ज्याने आम्हाला जगाच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत, आत्मविश्वास दिला, असे उद्गार केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले. पुणे येथे आयोजित अभाविपच्या ५४ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात प्रधान बोलत होते...

महाराष्ट्राचे हिंदूपण

हिंदुहित याचा अर्थ हिंदू संप्रदायाचे हित नव्हे. कारण हिंदू कधी सांप्रदायिक असू शकत नाही. हिंदू म्हणजे भारत, भारत म्हणजे भारतातील सर्व नागरिक. त्यांचे उपासना पंथ कोणते असेनात का, ते सर्व हिंदुस्थानातील हिंदू आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण म्हणजे हिंदुहित. 'हिंदुहित' या शब्दाचा आहे. ज्यांना हा अर्थ समजत नाही, त्यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणतात. ते काळाच्या पुढे असतात. त्यामुळे ते वेगाने काळाच्या पडद्यामागे जात असतात. नरेंद्र मोदी, आज देशातील यच्ययावत हिंदौूंंना आपले नेते वाटतात. आपल्या हितासाठी राज्यसत्ता ..

सफर हिमालयाची

हिमालयाचं वैशिष्टय असं आहे की एका शिखराजवळ तुम्ही पोहोचलात की आपण क्षितिजाच्या जवळ आलोय, क्षितिजाला स्पर्श करू शकतोय असं वाटू लागतं. मात्र वर गेल्यानंतर काही हजार शिखरांचा समूह सामोरा येतो आणि लक्षात येतं की आपण जे केलंय ते, जे आहे त्याच्या मानाने काहीच नाही. आणखी खूप काही करायचं बाकी आहे, हीच भावना मनात बाकी राहते. तुम्ही एक दरी पार केली तर आणखी पुढची दुसरी दरी तयार असते. हा एका आयुष्यात संपणारा खेळ नाही. माझी अशी इच्छा आहे की, पुढच्याही आयुष्यात तो चालू राहिला तर कदाचित काही तरी बघितलं असं मला ..

एका दुर्गभ्रमंतीकाराची थरारक कहाणी

एका दुर्गभ्रमंतीकाराची थरारक कहाणी ..

कोकण पर्यटनातलं नवं आकर्षण पितांबरी ऍग्रोटूरिझम!

पितांबरीने ऍग्रोटूरिझम डिव्हिजनच्या रूपाने पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. या अंतर्गत कोकणातलं महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या दापोलीजवळच्या साखळोली इथे 55 एकराहून अधिक विस्तीर्ण जागेवर पितांबरीने 500हून अधिक दुर्मीळ औषधी वनस्पतींची, अन्य 10 हजार झाडांची आणि सुगंधी फुलांची अत्यंत सुनियोजित लागवड केली आहे...

नीलम आणि राजीवप्रताप रुडी - खानदानी रुबाब आणि संवेदनशीलता यांचा संयोग

इंडियन एअरलाइमध्ये पायलट म्हणून नोकरी करणाऱ्या राजीव प्रताप रुडी यांनी नीलमला मागणी घातली. नीलमने त्यांना सांगितलं की, हे सर्व माझे आईवडील ठरवतील. त्यांनी मग रीतसर नीलमच्या वडिलांकडे मागणी घातली. आईवडिलांचा पाठिंबा होता, पण नीलम तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या प्रभावाखाली असल्याने, 'कुंडली जुळली तरच लग्न करेन' असं तिने सांगितलं. दोघांची कुंडली जुळली आणि नीलम बिहारमधील राजघराण्याची सून झाली. ..

महाराष्ट्राच्या सिंचनाची दशा आणि दिशा

महाराष्ट्रातील शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनाची अपुरी सुविधा आणि बदलत्या हवामानामुळे शेतीचा विकासदर कमी होत आहे. कृषी विकासदर वाढण्यासाठी सिंचनात आणखी मार्ग शोधण्याची गरज आहे. सिंचन या अत्यंत व्यापक विषयाशी संबंधित अनेक मुद्दे, दृष्टिकोन, विचार या लेखातून मांडले आहेत. ..

कलाकारातला माणूस आणि माणसातला कलाकार मिलिंद रामचंद्र ढेरे

नेहरू सेंटरमध्ये 3 डिसेंबर ते 8 डिसेंबर असे चार दिवस मिलिंद रामचंद्र ढेरे यांचे Eternal Scapes या विषयाचे फोटोग्रााफी प्रदर्शन होते. निर्मितीत बुध्दी फार मदत करीत नाही, जसे फोटोसाठी कॅमेरा कुठला हे महत्वाचं नसतं, तुमच्या डोळयात काय आहे हे महत्वाचं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे हे महत्वाचं आहे. मिलिंदे ढेरे यांचे फोटोग्राफी प्रदर्शन पाहताना हाच अनुभव येतो. ..

लक्ष्मीकांत बेर्डे एक चतुरस्र अभिनेता

मराठी चित्रपटाच्या भवितव्याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा वेळी तो एखाद्या राजासारखा दमदार पावलं टाकत आला. नुसता आलाच नाही, तर तब्बल दीड दशक त्याने स्वतःच्या मजबूत खांद्यावर मराठी चित्रपटसृष्टी पेलली व मराठी चित्रपटाला गतवैभव प्राप्त करून दिलं. तोच तो लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ रसिकांचा लाडका लक्ष्या! ..

कांद्याचा वांधा!

काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याने शेतकऱ्यापासून ग्रााहकांपर्यंत सगळयांच्याच डोळयात पाणी आणले. कांद्याचा प्रश् कशामुळे निर्माण झाला? तसेच कांद्याच्या आणि एकूणच शेतमालाच्या समस्येवर काय उपाययोजना करता येतील? याबाबतचा उहापोह करणारा लेख. ..

मुघलांचे वंशज

आज मोंगोलिया हा बौध्दबहुल देश आहे आणि मुघलांचे वंशज आपल्या बौध्द वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आहेत. घराघरात बुध्दाचे मंदिर दिसते. बुध्दाची वचने गायली जातात. भारतातील शास्त्र, गणित शाळेत शिकवले जाते. राम, कृष्ण, बुध्द, विक्रमादित्य, भोजराजा, पंचतंत्र यांच्या गोष्टी इथली मुले ऐकतात. ..

सिनेविश्वातील वीर मराठे

आपण अजूनही जर डाव्यांच्या या 'बुध्दिवाद' नावाच्या जाळयात अडकून, आपल्याच सुवर्ण इतिहासावर हसत राहिलो, तर पुढे कुठला निर्माता-दिग्दर्शक अशा कलाकृती बनविण्यास धजणार नाही. म्हणून काही लहानसहान 'सिनेमॅटिक लिबर्टी' आपण या निर्मात्यांना दिली पाहिजे. कारण तेही पो..

संघर्षमय विकसशील प्रवास - रुषाताई रामसिंग वळवी

रुषाताई रामसिंग वळवी यांना /ावर्षीचा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा 'बाया कर्वे पुरस्कार' देण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत एका महिलेला दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सातपुडयाच्या दुर्गम पहाडी भागात गेली 20 वर्षे रुषाताई आणि रामसिंग वळवी हे दांपत्य गावातच राहून आपल्या भागासाठी कार्यरत आहे. ..

संघ आणि राममंदिर

त्या-त्या काळात सरसंघचालकांनी या भूमिका मांडण्याचे काम केले. बाळासाहेबांनी स्वच्छ शब्दात सांगितले की, परकीय इस्लामी आक्रमकांनी हजारो मंदिरे पाडली. पण आमची मागणी फक्त तीन मंदिरासंबंधी आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान, काशी विश्वेश्वर, रामजन्मभूमी, त्याबाबतीत तडजोड नाही. हीच भूमिका नंतर रज्जू भय्यांनी मांडली आणि सुदर्शनजींनी मांडली. ..

दत्तोपंतांचा परीसस्पर्श

दत्तोपंतांनी मात्र त्यांच्या सहवासात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनात जे परिवर्तन घडवून आणले, माझ्यासारख्या अगदी सामान्य कार्यकर्त्याला त्या महापुरुषाचा सहवास लाभला, हे मी माझे पूर्वजन्मीचे संचित फळास आले असेच समजतो. त्या सहवासातील काही प्रसंग त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाचकांबरोबर वाटून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच !..

चराई - बंदी की व्यवस्थापन?

इकॉलॉजिकल सोसायटीच्या कोर्सअंतर्गत दोन दिवसीय 'गवताळ प्रदेश अभ्यासदौरा' आयोजित करण्यात आला होता. विदर्भ हे नावच 'विपुल दर्भ (गवत) असलेला प्रदेश' या अर्थाने या प्रदेशाला बहाल केलं गेलं आहे...

समरसतेचा वाटसरू : एक विचारयात्रा!

हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे लिखित 'समरसतेचा वाटसरू' या पुस्तकात 'समरसता' हा केवळ शाब्दिक वेगळेपणा नाही, तर ही संकल्पना कशी अधिक व्यवहार्य, अधिक भारतीय आहे, हे पंतगे यांनी एखादा शास्त्रीय प्रयोग सिध्द करावा तसे प्रचंड अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांतून सिध्द केले आहे. ..

वसा सामूहिकतेतून समृध्दीकडे

सामूहिकतेतून समृध्दीकडे' हा वसाच्या कामाचा मंत्र आहे आणि त्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास आहे. त्यासाठी रात्रंदिवस झोकून देऊन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटनात्मक रचनासुध्दा वसाने निर्माण केली आहे. सिध्दता झाल्यावर प्रारंभासाठी वाट बघायची नसते, त्यानुसार दि. 10, 11 व 12 नोव्हेंबर 2019 रोजी नाशिक येथे वसाचा औपचारिक उद्धाटन सोहळा साजरा झाला. ..

कृतार्थ सेवाव्रती गंगाराम जानू आवारी

वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांताचे माजी अध्यक्ष (सन 2001 ते 2004) दिवंगत गंगाराम जानू आवारी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त वनबांधवांसाठी त्यांनी केलेल्या सेवा कार्याचा वेध घेणारा लेख. ..

'Scientist - Field Marshal-Activist' सर!

आपल्या व्यक्तिमत्त्वातून आणि भाषणांतून तरुण वर्गामध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव जागवणारे, माजी संघप्रचारक प्रा. मोहन आपटे यांचे मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा लेख. ..

आर्थिक संस्कृती बदलण्याची गरज - प्रल्हाद राठी

आर्थिक संस्कृती बदलण्याची गरज - प्रल्हाद राठी..

प्रामाणिक व्यापाऱ्यांना नोटबंदीचा फायदाच! - शैलेंद्र तेलंग

दुकानात कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केली होती. नोटबंदीनंतर लोकांकडून त्याचा सररास वापर सुरू झाला. नोटबंदीच्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर असे जाणवते की दुकानातील विक्रीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दुकानाचे व्यवहारही अधिकाधिक चेकने करणे व कॅश कमीतकमी ठेवणे असा बदल आपोआपच झाला. सरकारला अपेक्षित कॅशलेस व्यवहाराला गती मिळाली...

नोकरशाहीला बदल नकोय ! - भूपाल पटवर्धन

नरेंद्र मोदी यांनी दि. 8 नोव्हेंबर 2016रोजी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केला. 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या या निर्णयाला 'नोटबंदी' असंही म्हटलं जातं. नुकतीच या ऐतिहासिक निर्णयाला तीन वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त सा. विवेकने या सर्व आर्थिक बदलांचं राजकीय मत-मतांतरं, विरोध-समर्थन आदींच्या पलीकडे जाऊन व्यापक पातळीवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही समाजातील विविध आर्थिक स्तरांतील मंडळींशी संवाद साधला. ..

पाच पांडव आणि द्रौपदीचं मंदिर

संपूर्ण भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचं एकत्र अशी दोनच मंदिरं आहेत. एक दिल्लीला आणि दुसरं पुण्याजवळील तळेगाव येथे आहे. आजवर द्रोपदीच्या बाबतीत खूप उलटसुलट चर्चा, वाद, हे अनेक कथांतून ऐकून-वाचून आहोत. परंतु हे मंदीर पाहताना पुराणातल्या दुःखात एखादा सुखाचा क्षण सापडावा असे वाटले. ..

भारत - आसियान संबंधांतील पुढचे पान

नुकत्याच झालेल्या आसियान परिषदेच्या निमित्ताने थायलंडला भेट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर आरसेप कराराचे सावट होते. आरसेपमधून माघार घेतल्यामुळे भारत-आसियान संबंध दोन पावले मागे जाणार आहेत. ते पूर्ववत होण्यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. ..

नवमाध्यम आणि रोजगारनिर्मिती

काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आवडीचं काम मिळविण्याकडे नव्या पिढीचा कल वाढत चालला आहे. तो अगदी रास्त आणि योग्यच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवतंत्रज्ञानाच्या या वर्तमान प्रवाहात आपले छंद, आपली आवड आणि नवतंत्रज्ञान या सर्वांची सुंदरशी गुंफण करून ऑनलाइन, डिजिटल माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग कसे शोधायचे, वापरायचे यासाठी साध्या-सोप्या-सुलभ भाषेतील लेखनप्रपंच. ..

सर्वसमावेशी व्यासपीठ

जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या पुरुष-महिलेपासून ते गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, अर्धशिक्षित, शहरी, ग्राामीण अशा वेगवेगळया थरांतील लोकांना ह्या सोशल मीडियाने ओळख दिली, त्यांना व्यासपीठ दिले. एक असे व्यासपीठ, जिथे ओळखी, वशिले, पैसा यांच्यापेक्षा तुमच्यातील गुणवत्ता महत्त्वाची होती. ..

संपर्क क्रांतीचा राजकीय प्रवास

सोशल मीडिया हे पहिल्यांदा फॉर प्रॉफिट असणाऱ्या संस्थांच्या मालकीचं प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आलं आणि हळूहळू इंटरनेटला पर्याय बनून उभं राहिलं. 2010 ते 2020 या कालखंडात एवढया मोठया प्रमाणावर जनसंख्या इंटरनेटशी जोडली गेलेली आहे, जेवढी याआधी कधीच जोडली गेली नव्हती. त्यातला एक मोठा वर्ग इंटरनेट म्हणजे फक्त आणि फक्त सोशल मीडियापुरता - उदाहरणार्थ, फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यासारख्या प्लॅटफर्ॉम्सपुरता सीमित आहे. फ्री आणि ओपन फॉर ऑल या इंटरनेटच्या संकल्पनेला पडलेली ही मोठी भेग आहे. यातून संपर्क क्रांतीच्या पुढच्या ..

चिरंजीवी गिरिजा कीर

चिरंजीवी गिरिजा कीर ..

शिवरायांच्या जयघोषात निनादली दिवाळी पहाट!

५५ लहान मुलांनी ‘शिवकल्याणराजा’ हा कार्यक्रम सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले. तब्बल दोन महिन्यांपासून मेहनत घेऊन बालगोपाळांनी सादर केलेल्या या कार्यक्रमास या भागातील लहान मुले, पालक व प्रमुख पाहुणे यांचा उदंड प्रतिसाद व वाहवा मिळाली...

पुन्हा भाजपा - सेनेचीच सरशी

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीच्या तुलनेत भाजपा-सेनेने चांगले यश मिळविले आहे. या भागात सर्वाधिक 13 जागा जिंकून भाजपा क्रमांक 1वर राहिला असून दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेने या विभागातील सगळ्या जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला, पण विधानसभेत राष्ट्रवादी व काँग्रेसने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. ..

वातावरण बदलाचे नियंत्रण आवश्यक

कोल्हापूर-सांगली आणि नुकताच पुणे येथे झालेल्या महापूरासंदर्भात आधीच्या लेखात पुराची कारणमीमांसा व उपायोजना यांचा आढावा घेतला. परंतु या केलेल्या योजना केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. याचे खरे कारण म्हणजे वातावरण बदल होय. आणि या लेखात आपण वातावरण बदलाचे परिणाम, त्याची कारणे आणि वातावरण बदलावर नियंत्रण कसे आवश्यक आहे यावर प्रकाशझोत टाकूयात...