ख्रिश्चन विश्वातील बेरीज - वजाबाकीची गणिते

विवेक मराठी    03-Oct-2016
Total Views |

भारतापासून हजारो मैल दूर असलेल्यांच्या धार्मिक बेरीज-वजाबाकीची आपण उठाठेव करण्याचे कारण असे की, ज्यांनी पाचशे वर्षांपर्यंत जगाची लूट केली आहे, अशांचे प्रत्येक पवित्रे वारंवार बघणे आवश्यक आहे. भारताच्या दृष्टीने त्याचा विचार करायचा झाल्यास त्या दोन्हीही पध्दतीच्या संघटना तिकडे पराभूत असल्या, तरी भारतात आक्रमक आहेत. त्यांच्याबाबतचा जगाचा तीनशे ते पाचशे वर्षांचा अनुभव अनन्वित अत्याचारांचा व लुटीचा आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात त्या कसा आकार घेतात, याकडे तरुण पिढीने अधिक काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे.


पश्चात्त्य जगातील ख्रिश्चन धर्माला नाकारण्याचा वेग दिवसेन्दिवस वाढतोच आहे. जोपर्यंत ख्रिश्चन धर्मांच्या विस्ताराच्या प्रक्रियेतून पाश्चात्त्य जगाला साम्राज्यवाढीचा आणि साम्राज्य टिकवण्याचा उपयोग होत होता, तोपर्यंत पाश्चात्त्य जगाने 'हा देवच रिटायर होण्याच्या योग्यतेचा आहे' अशा शंका कधी काढल्या नव्हत्या. आता त्यांच्या वाढीचा काळ संपलेला आहे व त्याचा उपयोग करून घेण्याचाही काळ संपला आहे. त्यामुळे त्या धर्माला तर्काचे निकष लावून तपासणी सुरू झाली आहे. हा धर्म प्रवचनात जीवनसर््पशी वाटला, तरी प्रत्यक्ष जीवन जगताना तसा तो नाही, याचे भान आता होऊ लागले आहे. दुसरे असे की, या एकविसाव्या शतकात जीवनाची आर्थिक संपन्नता नवी क्षितिजे गाठत असली, तरी जीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिमेकडे कुटुंब नावाची संस्था लयाला गेली आहे. दोन माणसे एकत्र येण्याने सद्भाव विकसित होण्याबरोबर समलिंगी मैत्रीच्या शक्यता वाढल्या आहेत. अशा विकृत समस्या या काही कालपरवाच्या नाहीत. त्यांचे प्रमाण एक-दोन टक्क्याचे असायचे. पण आता त्यांची संख्या एवढी वाढली आहे की त्यांची संघटना पाठीशी उभी राहिली नाही, तर सरकारे पडतील अशी भीती पाश्चात्त्य जगातील राजकारण्यांना जाणवायला लागली आहे. एका बाजूला अशी विस्कळीतता वाढत असली, तरी दुसऱ्या बाजूला मात्र प्रत्येक व्यक्तीतील आध्यात्मिकता कमी झालेली नाही. जीवनातील शाश्वत मूल्ये शोधण्याची प्रक्रिया वाढत आहे. त्यासाठी योग, प्राणायाम, विपश्यना केंद्रे, श्ािंटो, ताओ, झेन तत्त्वज्ञान, रेकी, ताई ची यांच्या केंद्रांवर गजबजाट वाढू लागला आहे. या सगळयात योगाभ्यास केंद्रांनी बाजी मारली आहे. योग, प्राणायाम यांच्या जोडीला भारतीय संगीत आणि भारतीय आयुवर्ेद यांच्याकडे अधिक लक्ष जाताना दिसत आहे. याचा अर्थ असा नव्हे की तेथील जुनी धर्मसंस्थार् पूणपणे कालबाह्य झाली आहे आणि आता फक्त पूर्वेकडील विचाराचे दिसेल तर स्वीकारण्यास आरंभ झाला आहे. सध्या एवढेच म्हणता येईल की, सर्वसाधारणपणे उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सर्ंपूण युरोप येथे कोठे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक, तर कोठे पन्नास टक्क्यापेक्षा थोडे कमी यांनी ख्रिश्चन धर्माला मोठया प्रमाणावर नाकारायला आरंभ केला आहे. त्यातही पाश्चात्त्य विश्वाला सावरता न येण्यासारखी बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांत वीस ते पंचवीस टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्मांला 'नको' म्हणण्याचा र्निणय घेतला आहे. प्रत्येक देशात अशांचे मूळचे प्रमाण वीस-पंचवीस टक्क्यापर्यंत होतेच, पण ते आता ते त्सुनामी वेगाने वाढत आहे. ते प्रमाण कमी व्हावे, म्हणून केलेल्या कोणत्याही उपायाचा परिणाम होताना दिसत नाही आहे. अशा त्सुनामीच्या लाटा अशाच पाच-दहा वर्षे टिकल्या, तर स्थिती त्यांच्या अस्तित्वाला आव्हान देणारी ठरण्याची शक्यता आहे.

एखाद्या धर्मांत असे काही कमी-अधिक बदल होण्याचा हा काही पहिला प्रकार नव्हे. जगातील प्रत्येक देशाने व प्रत्येक धर्माने त्याचा अनेक वेळा अनुभव घेतला आहे. तरीही पाश्चात्त्य जगात त्याचा वेग अतिप्रचंड आहे. पंधराव्या, सोळाव्या आणि सतराव्या शतकात जगातील छोटया छोटया देशांत सेंट झेविअरसारख्यांनी अशीच लाखालाखांच्या संख्येने धर्मांतरे केली होती. तशाच स्वरूपाची ही विरुध्द लाट आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. युरोप-अमेरिकेतील या धर्म सोडण्याची साऱ्या जगाने गंभीर दखल घेण्याची अशासाठी आवश्यकता आहे की झेविअरसारख्या धर्मांतराने जगातील दीडशे देशांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. त्यातून फक्त पारतंत्र्य आले असे नव्हे, तर कोठे दोनशे तर कोठे पाचशे वर्षे त्या त्या देशाची लूट होत राहिली. दोनशे ते पाचशे वर्षांची लूट म्हणजे काय, याचा आज विचारही करता येणार नाही. कॅल्क्युलेटरमधीलच नव्हे, तर संगणकातील आकडेही कमी पडावेत, अशी ही लूट होती. आज जगभरातील वातावरण बदलेले असले, तरी म्हणजे गुलामांच्या बोटी बुडवणे आणि इन्क्विझिशनमधून धर्मांतर न करणाऱ्यांना उभे चिरणे किंवा जाळणे असे प्रकार होत नसेल, तर त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा फायदा घेऊन धर्मांतरे सुरूच आहेत. आजही धर्मांतरे ही पुढच्या अनेक पिढयांची लुटीची तयारी असाच जगाचा अनुभव असल्याने सध्या पाश्चात्त्य जगातील घटनांच्या पार्श्वभूमीवर त्या त्या ठिकाणची धर्मांतरे रोखणे अतिशय आवश्यक आहे. भारतात आज चाळीसपेक्षा अधिक संघटना या धर्मांतरात कार्यरत असून त्या प्रत्येक संघटनेने मोठी मोठी उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. सर्वसाधारणपणे राजकारणातील व्यक्ती याकडे लक्ष देत नाहीत, पण जगाची लुटीची सारी माहिती लोकांनाच सांग्ाितली की राजकारणीही त्याकडे लक्ष देतात, अशा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्या दृष्टीने युरोप-अमेरिकेतील घटनेकडे बघणे आवश्यक आहे.

त्या त्या देशाच्या राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात विरोधक असणाऱ्यांची थोडी पीछेहाट झाली की त्याचा उपयोग होणाऱ्यांचा आपणच बाजी मारली असा आविर्भाव असतो. असे वाटण्याच्या शक्यतेपासून दूर राहता आले पाहिजे, कारण ख्रिश्चन धर्मावर आलेले हे पहिले संकट नव्हे. यापूर्वी अशा अनेक संकटांतून त्यांनी बाजी मारली आहे. गेल्याच शतकातील एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख या दृष्टीने आवश्यक आहे. सुमारे साठ-पासष्ट वर्षांपूर्वीची अशी घटना आहे की, आता पुढील पन्नास-साठ वर्षांत जगातील ख्रिश्चन धर्मच संपणार असे वाटू लागले होते. त्याचे कारण असे की, जगातील दीडशे देशांनी तो धर्म हाकलून देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचे कारण असे की, जगातील शंभरपेक्षा अधिक देशात ख्रिश्चन धर्म हा सोळाव्या शतकानंतरच्या काळात युरोपीय साम्राज्य वाढवण्यासाठी गेला होता. त्यातील बहुतेक देशांना विसाव्या शतकाच्या मध्यंतराला स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणजे इ.सन 1950 हे साल मध्यवर्ती धरले, तर त्याच्या आधीची पाच वर्षे आणि नंतरची पाच वर्षे जगातील निम्मे-अधिक जग युरोपीय जोखडातून मोकळे झाले होते. प्रत्येक देशात अशी भावना अशी होती की, ज्या युरोपीयांनी आपल्या देशात दोन, तीन, चार शतके लूट केली, त्यात जेवढे युरोपीय देश आरोपी आहेत, तेवढेच ख्रिश्चन चर्चही आरोपी आहे. त्यामुळे तेथील ख्रिश्चन चर्चला आधी बाहेर काढा, अशी प्रक्रिया सुरू झाली होती. पण त्या त्या देशात आधीच्या लुटीच्या वसुलीसाठी लोकभावना सुरू होऊ नये, म्हणून प्रत्येक देशात 'नेहरू' पध्दतीचे सरकार सत्तेवर यावे, म्हणून तयारी करून ठेवली होती. भारतात आपल्या नेहरूंनी ज्याप्रमाणे मिशनऱ्यांना अधिक सन्मान दिला आणि पाकिस्तानला उपयोगी पडेल अशा पध्दतीने काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला, त्याचप्रमाणे नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशोदेशीच्या नेहरूंनी तेथील मिशनऱ्यंाचे प्रश्न आणि त्या त्या ठिकाणचे काश्मीरचे प्रश्न युरोपीयांना उपयोगी पडतील, अशा पध्दतीनेच 'भिजत घोंगडे' पध्दतीने अवघड करून ठेवले. पण त्या त्या देशात नेहरू संस्कृतीची सरकारे जाऊन त्या त्या देशाच्या राष्ट्रवादासाठी आयुष्य देणाारी मोदी संस्कृतीची सरकारे फार लवकर आली. त्यांनी अंतरही लवकर कापले. भारतात ती स्थिती यायला पासष्ट-सत्तर वर्षे लागली.


ही जशी त्या त्या देशांची स्थिती झाली, त्याप्रमाणे युरोपीय साम्राज्याचे जगातील दिवस संपलेले आहेत, असे लक्षात आल्यावर मिशनरी संघटनांनी परत वाढीची तयारी सुरू केली. अर्थात मिशनरी संघटनांनाही ती तयारी करायला फार वेळ लागला. त्यांनाही ते मोठे आव्हान होते. प्रत्यक्षात जरी सोळाव्या शतकात छळाबळाने झालेले धर्मांतर ही सारी धार्मिक वाढ असे जरी स्वरूप दिसत असले, तरी त्यांचे स्वरूप कधीच फक्त धार्मिक नव्हते. साम्राज्यवाढीचा तो महत्त्वाचा घटक होता व नव्या वाढीमागे तोच दृष्टीकोन होता व त्याची रचनाही तशीच होती. यावर चर्चा करण्याचे कारण असे की जगभर कशी वाढ करायची याचा विचार करताना त्या जुन्या अनुभवाचा उपयोग झाला. या सगळयाचे दृश्य स्वरूप म्हणजे 'सेकंड व्हॅटिकन परिषद' प्रत्यक्षात दुसरे व्हॅटिकन याची रचना कशी झाली, हा इतिहास लक्षवेधी आहे. सहा दशकांपूर्वी एका पोपचे निधन झाल्यावर दुसऱ्या पोपच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणे सहाजिक होते. त्या काळी जगात सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या जगातील दोन महासत्ता होत्या व पोपच्या निवडीतही त्यांना स्वारस्य असायचे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तीन वेळा समसमान मते पडली. अशा वेळी जुन्या कार्डिनलनी एकत्र येऊन असा विचार केला की, या वेळी निवडणूक न करताच पोप निवडावा. म्हणजे मतदानाऐवजी सर्वात वृध्द व्यक्ती तो पोप असा निकष ठेवावा. त्या वेळी कार्डिनल रोंकाली नावाचे एक वृध्द अनुभवी गृहस्थ होते. त्यांची उमेदवारी नसतानाही पोप म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली जी सेकंड व्हेटिकन परिषद चालली, ती पाच वर्षे चालली. तीर् पूण होईपर्यंत स्वत: पोप रोंकाली - म्हणजे त्यांचे नवे नाव 'पोप जॉन तेविसावे' यांचेच निधन झाले. पाच वर्षे चाललेल्या त्या परिषदेचा विषय होता - चर्च संघटनांनी पुन्हा नव्या शक्तीने कसे उभे राहावे. त्यात असा र्निणय घेण्यात आला की, त्या वेळेपर्यंत सारे ख्रिश्चन विश्व युरोपच्या संस्कृतीत चालायचे. म्हणजे त्यांची संस्कृती 'युरोसेंट्रिक' होती, ती त्यांनी जगातील प्रत्येक देशाच्या संस्कृतीनुसार चालवायची असे ठरविले. त्यावरील साम्राज्य उभारणीला आवश्यक वर्चस्व कायम ठेवून प्रत्येक ठिकाणची स्थानिक संस्कृती स्वीकारण्याचे ठरविण्यात आले. भारताच्या संदर्भात बोलायचे झाले, तर अनेक मिशनऱ्यांनी भगव्या कफन्या घालायला आरंभ केला. चर्च प्रार्थनेच्या ठिकाणी मेणबत्तीबरोबरच निरांजन, समई, लामणदिवा या बाबी आल्या. त्यांच्या भजनात पियानोऐवजी वीणा, सारंगी, तबला, झांजा, टाळ, मृदंग यांचा वापर सुरू झाला. धोतर, बंडी, बाराबंडी, सदरा यांचा वापर सुरू झाला. हा मुद्दा आणखी स्पष्ट करायचा झाल्यास भारतात सर्वात मोठे कुंकू र्मागारेट अल्वा लावू लागल्या. पण धर्मांतरासाठी प्रचाराची, त्यातील दबाव गट तयार करण्याची आणि आक्रमक बांधणी करण्याची भूमिका तीच राहिली. प्रोटेस्टंट मंडळींची धर्मांतराची पध्दत तर अगदी 'चे गेव्हिरा' गनिमी काव्याची असायची. नागालँडमध्ये शंभर टक्के ख्रिश्चनीकरण करण्याचा दावा झाल्यावर अरुणाचलमध्ये अतिशय कमी वेळात त्यांनी बऱ्याच अंशी तसेच काम करून दाखवले होते. कॅथलिक मंडळींची संघटना तरी मोठी दिसते, पण प्रोटेस्टंट मंडळींची संघटना पन्नास-साठ गटांत विभागलेली असते. ते परिणामकारकतेत अधिक प्रभावी वाटतात, पण त्यांचे स्वरूप तसे लगेच लक्षात येत नाही. प्रोटेस्टंट लोकांची त्यांच्या त्यांच्या देशातील बांधणी कायमच कच्ची असायची. ते धार्मिक कमी आणि राजकीय आक्रमक अधिक, असेच स्वरूप होते.

भारतापासून हजारो मैल दूर असलेल्यांच्या धार्मिक बेरीज-वजाबाकीची आपण उठाठेव करण्याचे कारण असे की, ज्यांनी पाचशे वर्षांपर्यंत जगाची लूट केली आहे, अशांचे प्रत्येक पवित्रे वारंवार बघणे आवश्यक आहे. भारताच्या दृष्टीने त्याचा विचार करायचा झाल्यास त्या दोन्हीही पध्दतीच्या संघटना तिकडे पराभूत असल्या, तरी भारतात आक्रमक आहेत. त्यांच्याबाबतचा जगाचा तीनशे ते पाचशे वर्षांचा अनुभव अनन्वित अत्याचारांचा व लुटीचा आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात त्या कसा आकार घेतात, याकडे तरुण पिढीने अधिक काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे.

 9881717855