क्रॉसासाठी तलवार घेणाऱ्या कॅनडाची पडझड अधिक

विवेक मराठी    09-Oct-2016
Total Views |

कॅनडामध्ये गेल्या चार दशकात तेथील प्रोटेस्टंट आण्ाि कॅथलिक यांचे प्रमाण वेगाने कमी झाले होतेच. कॅथलिक 47 टक्क्यावरून 39 टक्क्यावर आण्ाि प्रोटेस्टंटांचे प्रमाण 41 टक्क्यावरून 27 टक्क्यांवर आले होते. त्या मानाने ख्रिश्चनेतर अन्य धर्मीयांचे प्रमाण मात्र कॅनडामध्ये वेगाने वाढत होते. इ.सन 1881मध्ये ते 4 टक्के होते, ते इ.सन 2011मध्ये 11 टक्के झाले. कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेल्या (अनऍफिलिएटेड) अशांच्या संख्येत जी वाढ झाली, ती मात्र महत्त्र्वपूण होती. ती इ.सन 1971 ते 2011 या काळात 4 टक्क्यावरून 24 टक्क्यांवर गेली होती. कॅनडा हा देश उत्तर अमेरिकेतील युनाडटेड स्टेट्सनंतरचा मोठा देश असल्याने त्या देशातील प्रत्येक गोष्टीचा कॅनडावर परिणाम होत असतो.


गे
ल्या काही दिवसांत कॅनडात घडलेल्या घटना या 'त्सुनामी टु लीव्ह ख्रिश्चॅनिटी'च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. टोरॅन्टो शहरात 'ख्रिश्चन म्युझिक फेस्टिव्हल'वर लोकांच्या दबावामुळे बंदी घालावी लागली. तेथील रयालसन विद्यापीठात ख्रिश्चन मुलांना झुकते माप देण्याच्या प्रकारावरून तेथील प्रो लाईफ क्लबने कोर्टात धाव घेऊन त्यांना अडविले. कॅनडातील ट्रिनिटी वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्हेन्टवर ओंटॅरिओ सुपिरियर न्यायालयाने आदेश देऊन बंधने घातली. 'ख्रिश्चन वीक' या साप्ताहिकात यावर लिहिताना श्रीमती टेरेसा मायर्क्रेनॉल्ड म्हणतात, ''वरील घटना या फक्त प्रातिनिधिक आहेत. अशा घटना पावलोपावली घडत आहेत.'' अजूनही येथील सरकार, मोठमोठया संस्था आण्ाि प्रसारमाध्यमे ही ख्रिश्चॅनिटीच्या बाजूने आहेत, पण त्यामुळे वस्तुस्थिती फार काळ अंधारात राहणारी नाही. कॅनडातील ख्रिश्चन चर्चचे एक पदाधिकारी डॅन रुदरफोर्ड म्हणतात, ''एखादा भूकंप व्हावा, अशा वेगाने या घटना घडत आहेत. या घटनांना आमची पिढी आश्चर्यकारक अनभिज्ञ आहे.'' यातील लक्षवेधी भाग म्हणजे रुदरफोर्ड हे गृहस्थ ब्रिटिश लोकंाची व श्वेर्तवणीयांची वस्ती असलेल्या व्हिक्टोरिया या ब्रिटिश कोलंबिया भागातील आहेत. आण्ाि ब्रिटिश कोलंबियातील व्हिक्टोरिया हे शहर महत्त्वाचे शहर समजले जाते. रुदरफोर्ड यांचे पुढील निरीक्षण असे की, इ.सन 1950मध्ये कॅनडात चर्च प्रार्थनांना नियमितपणे हजर राहणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के होते. ते आता 15 टक्के झाले आहे. पूर्वी ख्रिश्चन धर्मांची श्ािकवण जागोजागी जाणवत असे. पण सध्याचे एकूण चित्र असे आहे की, येथे ख्रिश्चॅनिटी ही अल्पसंख्य झाली आहे. 

यामध्ये श्वेर्तवणीय विश्वातील समान बाब म्हणजे म्हणजे युरोप, उत्तर अमेरिका आण्ाि ऑस्ट्रेलिया या भागामध्ये इ.सन 2011मध्ये सरासरीने 25 टक्क्यापेक्षा थोडे कमी अशा प्रमाणात खिश्चन समाजाने तो धर्म सोडून स्वत:ला 'नो रिलीजन' म्हणून जाहीर केले होते. नंतर मात्र त्सुनामी, झुंडीच्या झुंडी आण्ाि भूकंप आल्यासारखे वातावरण आहे व लोक बाहेर पडत आहेत. म्हणजे नंतरचे प्रमाण पंचवीस टक्के आहे. त्यामुळे काही ठिकाणी ते अल्पसंख्य आहेत, तर काही ठिकाणी त्याच्या आसपासची स्थिती आहे. यातील लक्षात राहण्याचा मुद्दा म्हणजे त्सुनामी, ड्रोव्ह म्हणजे झुंडी आण्ाि सेस्मिक श्ािफ्ट म्हणजे भूकंपीय बदल असे शब्द हे तिकडची ख्रिश्चन नियतकालिके आण्ाि महत्त्वाची दैनिके यांनी वापरलेले आहेत. कॅनडातील सर्व्हे हा नॅशनल हाउसहोल्ड सर्व्हे या संस्थेने केला होता. तेथील एक मिशनरी प्रचारक स्टिफन बेदर्ड यांचे मत मात्र निराळे आहे. त्याचे म्हणणे असे की, या साऱ्या प्रकाराला 9/11नंतर आरंभ झाला आहे. 9/11 म्हणजे दि. 11 सप्टेंबर रोजी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर्स पाडले, ती घटना. त्यानंतर धर्म हा धोकादायक असतो, अशीच लोकांची भावना झाली आहे, असे फादर स्टिफन बेदर्ड यांचे म्हणणे आहे. याबाबतच्या अनेक मुद्दयांना न्यायालयात आव्हान देण्याचे प्रकार फार वाढले आहेत. येथील सामान्य जीवनातही ख्रिश्चन धर्माबाबत टीकेने आण्ाि वैराच्या भावनेने बोलण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. कॅनडामधील ख्रिश्चॅनिटीला लागलेल्या उतरत्या कळेबाबत जगातील आघाडीची 'अभ्यास अहवाल संघटना' पीईडब्ल्यू - पियू यांचा जो अहवाल आहे, तो त्यातील निष्कर्षापेक्षाही बोलका आहे. पियूच्या अहवालाची दखल घेण्याचे कारण असे की, ती ग्लोबल सर्व्हे क्षेत्रातील आजची एक जगन्मान्य संस्था आहे. चीनसह अनेक देशांनी त्या संस्थेच्या अहवालाचा राष्ट्रीय पातळीवर उपयोग करून घेतला आहे. ती संस्था प्रामुख्याने सामाजिक विषय, लोकसंख्याविषयक बदल, श्रध्दा, अंधश्रध्दा, धर्म आण्ाि पंथ यांच्या अनुयायांचे स्वरूप यांचा अभ्यास करते. जागतिक स्तरावर एकाच वेळी एक एक लाख लोकांना भेटून त्यांत व्यक्त होणाऱ्या माहितीचा तौलनिक अभ्यास करून ते निष्कर्ष काढतात. त्यांची तेवढी यंत्रणा कायमच कार्यरत असते. त्यानुसार त्यांनी कॅनडाचाही याबाबतचा अहवाल तयार केला आहे. अर्थात तो इ.सन 2011पर्यंतचा आहे. त्यामुळे नंतरच्या त्सुनामीचा त्यात उल्लेख नसणे साहजिक आहे. त्यांची आकडेवारीही अन्य श्वेर्तवणीय देशांप्रमाणेच आहे. तरीही तो अहवाल अतिशय बोलका आहे. कारण त्या देशाच्या 'ओ कॅनडा' या राष्ट्रगीतातील अधिकृत फे्रंच व्हर्जनमधील उद्दिष्टाचा उल्लेख त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडण्याच्या भूकंपसदृश घटनेबाबतची माहिती देताना केला आहे. 


त्या राष्ट्रगीतात त्यांनी असे म्हटले आहे की, आमचा देश वैभवी ठेवण्यासाठी आम्ही एका हातात कू्रस आण्ाि एका हातात तलवार घेऊन उभे आहोत. हे राष्ट्रगीत त्या देशात अनेक दशके म्हटले जात असले, तरी आज मात्र स्थिती उलटी आहे. तो धार्मिक पंथ आज तेथे अल्पसंख्य झाला आहे, असे त्यांनी त्या विषयावर लिहिताना म्हटले आहे. हे वाक्य कॅनडाच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते भारताच्या दृष्टीने व काही शतकांचे युरोपीय देशांचे वर्चस्व असलेल्या दीडशे देशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गेल्या पाचशे वर्षांचा जगाचा इतिहास असे सांगतो की, एका हातात ख्रिश्चन धर्मांच्या प्रसाराचा कू्रस आण्ाि दुसऱ्या हातात तलवार घेऊन ही युरोपीय मंडळी फक्त कॅनडातच गेली, असा हा मर्यादित इतिहास नाही. एका हातातील तलवारीमुळे त्यांनी जगाच्या त्या त्या कोपऱ्यात जाऊन काय केले असेल, ते स्पष्ट आहे. गोव्यात धर्मांतरासाठी इन्क्विझिशन्स करण्यात आली. इन्क्विझिशन्स म्हणजे जे लोक त्यांचा धर्म स्वीकारणार नाहीत, त्यांना जाहीररित्या क्रूरपणे मारणे. आपण लाकूड कापण्याची सॉ मिल बघतो. त्यात लाकडाचा ओंडका ढकलत त्या वेगाने फिरणाऱ्या करवतीकडे नेला जातो व लाकडाचे तुकडे केले जातात. त्याप्रमाणे माणसांचे तुकडे केले जात आण्ाि एकदा का त्याची दहशत पसरली की बाटवाबाटवीचे अन्य प्रकार सहज होत असत. ब्रिटनच्या कॉमनवेल्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या बहात्तर देशांचा समावेश आहे. त्यात भारतीय उपखंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या मोठया देशांचा समावेश आहे. त्यात ब्राझिल, आफ्रिकेतील पाच-सहा मध्यम आकाराचे देश यांचा समावेश होता. त्यातही दीर्घकाळ वर्चस्व असलेले देश याबरोबरच काही काळ प्रभाव असलेले देश यांची यादीही मोठी आहे. स्पेनच्या साम्राज्यात प्रामुख्याने दोन तृतीयांश अमेरिका होती. फ्रेंचांच्या साम्राज्यात प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकी देश, उत्तर अमेरिकेतील काही देश, मादागास्कर आण्ाि आग्नेय आश्ाियातील काही देश यांचा समावेश होता. इटालियन साम्राज्यामध्ये आफ्रिकी देश अधिक होते. हातात तलवार घेऊन तीनशे ते पाचशे वर्षे तेथील साऱ्या अर्थव्यवस्थेची लूट ही किती भयंकर असणार, यांचा अंदाज करता येऊ शकतो. जगात ख्रिश्चन धर्म सोडण्याची त्सुनामी आल्याच्या संदर्भात ही यादी देण्याचे कारण असे की, तलवारीच्या आधारे जगावर वर्चस्व निर्माण करण्याची त्यांनी मानवकृत त्सुनामी भारताला समोर ठेवून सुरू झाली होती.

कॅनडामध्ये गेल्या चार दशकात तेथील प्रोटेस्टंट आण्ाि कॅथलिक यांचे प्रमाण वेगाने कमी झाले होतेच. कॅथलिक 47 टक्क्यावरून 39 टक्क्यावर आण्ाि प्रोटेस्टंटांचे प्रमाण 41 टक्क्यावरून 27 टक्क्यांवर आले होते. त्या मानाने ख्रिश्चनेतर अन्य धर्मीयांचे प्रमाण मात्र कॅनडामध्ये वेगाने वाढत होते. इ.सन 1881मध्ये ते 4 टक्के होते, ते इ.सन 2011मध्ये 11 टक्के झाले. कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेल्या (अनऍफिलिएटेड) अशांच्या संख्येत जी वाढ झाली, ती मात्र महत्त्र्वपूण होती. ती इ.सन 1971 ते 2011 या काळात 4 टक्क्यावरून 24 टक्क्यांवर गेली होती. कॅनडा हा देश उत्तर अमेरिकेतील युनाडटेड स्टेट्सनंतरचा मोठा देश असल्याने त्या देशातील प्रत्येक गोष्टीचा कॅनडावर परिणाम होत असतो. अनऍफिलिएटेड संख्या अमेरिकेत पाच टक्क्यांवर होती, ती वीसवर पोहोचली आण्ाि कॅनडामध्ये तीच चार टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर गेली. अमेरिका म्हणजे यू.एस.ए. हा देश महासत्ता आहे. सर्वच श्वेर्तवणीय देशांचे नेतृत्व त्या देशाकडे आहे. यूएसएमध्ये कॅथलिकांपेक्षा प्रोटेस्टंट लोकांची संख्या अधिक होती. प्रोटेस्टंटांची संख्या कमी होण्याचे प्रमाण अधिक झाले. वरील दोन्हीही पंथ कॅनडामध्ये अधिक गतीने वाढले, पण कॅनडामध्ये त्यांचा ऱ्हासही लवकर झाला. दीर्घकाळ धर्मांशी संबंधित असणारा माणूस जेव्हा तो धर्म सोडणारा होतो, तेव्हा ती प्रक्रिया काही एक दिवसाची नसते. त्यातूनही तरुण वयोगटाची दखल अधिक तीव्रतेने घ्यावी लागते. त्या दृष्टीने पाहिले असता यूएसएमध्ये इ.सन 2010मध्ये तरुणांमध्ये महिन्यातून एक वेळच चर्चला जाणाऱ्यंाचे प्रमाण फक्त 27 टक्के झाले होते, तर कॅनडामध्ये ते 46 टक्के होते. यातील अनेक बारकाव्यांना आता महत्त्व आले आहे. कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये - म्हणजे पश्चिम कॅनडामध्ये जो मोठा भाग आहे, तेथे अनऍफिलिएडेट यांचे प्रमाण 44 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर ऍटलांटिक कॅनडा भागात हे प्रणाम 16 टक्के आहे. अमेरिकेत ते प्रमाण तुलनेने कमी आहे. यातील सर्वच श्वेर्तवणीयांत जाणवणारी एक बाब येथेही आहे, ती म्हणजे एेंशी वर्षांपासून ते चाळीस वर्षांपर्यंत चर्चशी निगडित असणाऱ्यांचे प्रमाण खाली उतरत आहे. तरुणांमध्ये तर ते प्रमाण वेगाने नगण्य होऊ लागले आहे.

या देशात काय स्थिती आहे, यावर तर लक्ष देणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर या देशातील ख्रिश्चन मिशन जगातील अन्य देशांत काय करत असतात, त्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया याखेरीजच्या प्रदेशात या साऱ्या मिशन्स अधिक आक्रमक आहेत. तेथे ते धर्मांतरे तर करत आहेतच, त्याचबरोबर तेथील दहशतवादी कारवायांना नियंत्रित करणे, राजकारण्यांत प्रभावगट व दबावगट निर्माण करणे यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचे काम काय सुरू आहे, त्यावर पुढील शतकांतील अनेक घटना संबंधित असणार आहेत.

9881717855