होणार... पुरुषोत्तम तरी?

विवेक मराठी    09-Oct-2016
Total Views |

''आव्वाज कुणाचा......करंडक कुणाचा..!'' हा घोषणांचा जल्लोश म्हणजे महाविद्यालयीन तरुणाईची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा. पुण्यात अर्धशतक साजरे करणाऱ्या या स्पर्धेने जळगावकरांना वेड लावले असतानाचा प्रायोजक आण्ाि नाटयगृहाचा अभाव या दोन कारणांसाठी यंदा स्पर्धा होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात पुण्यातली महाराष्ट्र कलोपासक व जळगावातील परिवर्तन संस्था, स्पर्धा व्हावी यासाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे सलग सहा वर्षे आयोजनाचे अवघड श्ािवधनुष्य पेलणाऱ्या परिवर्तनने ठरल्याप्रमाणे यंदा आयोजन न करण्याचा र्निणय जाहीर केल्याने यंदा ही स्पर्धा होणार का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.


महाराष्ट्र कलोपासक संस्था, पुण्यात पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे वर्षानुवर्षे आयोजन करत होती. स्पर्धेचे एक परीक्षक या नात्याने जळगाव येथील नाटयचळवळीत कार्य करणारे शंभू पाटील तेथे असताना त्यांनी ह्या स्पर्धेने पुण्याच्याही बाहेर पडावे असा विचार मांडला. मराठवाडा व खान्देशातील स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांनी परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून स्वीकारली. त्यानुसार 2011पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या अर्ंतगत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा जळगावात भरविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. पुरुषोत्तम करंडकाचे पुण्याबाहेर आयोजन करणारे जळगाव हे पहिले केंद्र.

राज्य नाटयस्पर्धेचे बंद पडलेलं केंद्र सुरू करण्यासाठी परिवर्तनने महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तयार केले. त्याला महाविद्यालये उत्तम प्रतिसाद देऊ लागली. पहिल्याच वर्षी 35 प्रवेश्ािका आल्या. स्पर्धा दणक्यात सुरू झाली. जळगाव केंद्रामुळे पुण्यात मेगा फायनल सुरू झाली. तेथे जळगाव केंद्रातील चार एकांकिकांचा सहभाग होऊ लागला. महाविद्यालयांना बक्षिसे मिळू लागल्याने उत्साह वाढला. आर्थिकदृष्टया मागे राहिलेल्या  खान्देश-मराठवाडयातील सांस्कृतिक मागासलेपण हटविण्यासाठी व या भागात नव्याने नाटयसंस्कृती रुजण्यासाठी पुरुषोत्तम करंडक कारणीभूत ठरला. नव्या प्रवाहातील नाटकाची विद्यार्थ्यांना ओळख झाली. या आयोजनामुळे आणखीही तीन करंडकांचे आयोजन या भागात होऊ लागले. कालिदास करंडक, जिभाऊ करंडक, सूर्या करंडक यासारख्या स्पर्धा भुसावळ, जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये सुरू झाल्या.

या स्पर्धेच्या निमित्ताने नंदू माधव, परेश मोकाशी, प्रशांत दामले, सयाजी श्ािंदे, सोनाली कुर्ळकणी, संदीप मेहता, मिलिंद श्ािंदे, उपेंद्र लिमये, सचिन खेडेकर, मीना कर्ण्ािक, वीणा जामकर, लीना भागवत, दिलीप घारे, विजय पटर्धन, अंजली धारू, हिमांशू स्मार्त यांचे र्मार्गदशन सहभागी विद्यार्थ्यांना मिळाले. परिवर्तनचे शंभू पाटील, पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, हर्षल पाटील, वसंत गायकवाड, हौरिलसिंग राजपूत, मंगेश कुर्ळकणी, संदीप केदार, राजेंद्र पाटील, उदय येशे, मोना तडवी, प्रतीक्षा कल्पराज, राहुल निंबाळकर, स्वप्निल महाजन, उदय सपकाळे, पवन शर्मा, विजय जैन, राजू बाविस्कर ह्यांचे परिश्रम स्पर्धेच्या यशाला कारणीभूत ठरत.

 परिवर्तनने सुरुवातीच्या पाच वर्षांच्या आयोजनाची जबाबदारी घेतली होती, त्यांना खंबीर साथ मिळाली ती जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या रूपाने. कांताई-भवरलालजी मल्टिपर्पज फाउंडेशनचे त्यासाठी सहकार्य मिळाले. त्यानुसार 2014च्या आयोजनानंतर दुसऱ्या कोणीतरी ती जबाबदारी उचलणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. तरीही परिवर्तननेच सहाव्या वर्षी जळगावचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, आर्यन पार्कच्या रेखा महाजन, देवकर इंजीनियरिंगचे विशाल देवकर यांच्या सहकार्याने नेटाने स्पर्धा आयोजित केली.

प्रायोजकांचा अभाव या संकटाला यंदा जोड मिळाली ती नाटयगृह नसण्याची. ज्या जिल्हा बँकेंच्या सभागृहात ही स्पर्धा व्हायची, ते सभागृह प्रेक्षकांना बसण्यालायक नसल्याने व दुसरी कोणतीच सोय उपलब्ध नसल्याने स्पर्धा होणार का? हा प्रश् गडद होऊ लागला आहे. दुसरीकडे बालगंधर्व खुले नाटयगृह म्हणजे आनंदीआनंद आहे. कांताई हॉलमध्ये नाटकासाठी आवश्यक रंगमंच नाही. तिथे स्टेज आहे व बसायला चांगली जागा आहे, पण कलाकारांसाठी आवश्यक असा रंगमंच नाही. तीच अवस्था गंधे सभागृहाची. तिथे आहे व्याख्यानापुरते व्यासपीठ व बसायला मोकळी जागा. त्यामुळे एकवेळ प्रायोजक जरी मिळाले, तरी स्पर्धा घ्यावी कुठे? हा गहन प्रश् आहेच. परिवर्तनने मागच्या सहा वर्षांत स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचा प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. 'आम्ही पुरुषोत्तम स्पर्धा घेणार नाही, पण जे कोणी आयोजन करतील त्यांना सहकार्य करू' अशी त्यांची भूमिका आहे. निधीअभावी ही स्पर्धा बंद पडेल अशी चर्चा जेव्हा जळगावात होऊ लागली, तेव्हा 'कान्हदेश' या व्हॉट्स ऍप ग्रूपच्या माध्यमातून एकाच दिवसात अडीच लाख रुपये गोळा झाले. हा जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद होता.

गुलाबराव देवकर मंत्री असताना जळगावात भव्य नाटयगृह उभारण्यास मंजुरी मिळाली. लगेच त्याच्या बांधकामाला प्रारंभही झाला. शहरातील महाबळ रोडवर अद्ययावत वातानुकूलित नाटयगृहाचे सुरुवातीचे अंदाजपत्रक 29 कोटीचे होते. पहिल्या टप्प्याचे काम आटोपले असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होत आहे. मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा, अर्ंतगत सजावट, खर्ुच्या आदी कामांना दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होईल. मात्र पहिल्या टप्प्याच्या कामाला झालेला उशीर अंदाजपत्रकातल्या आकडेमोडीस कारणीभूत ठरला आहे. आता नाटयगृह 40 कोटीतर् पूण होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. नाटयगृहर् पूण होण्यास आणखी किती काळ लागतो, ते येणारा काळच सांगेल.

8805221372