स्कँडिनेव्हियन देशी ख्रिश्चन धर्म सोडण्याचे मेळावे

विवेक मराठी    29-Nov-2016
Total Views |

नॉर्वे हा एकेकाळचा धार्मिक श्रध्दा मोठया प्रमाणावर असणारा देश होता. त्याचप्रमाणे त्या देशातील एक महिला श्रीमती सिग्रीड अन्सेट यांना इ.सन 1928 साली ख्रिश्चन लार्वेंसडाटर या विषयावर - म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनावर व श्ािकवणीवर लिहिलेल्या कादंबरीला नोबेल सन्मान मिळाला होता. 'मध्ययुगीत उत्तर युरोपमधील समृध्द सांस्कृतिक जीवन' या आशयावरील त्यांच्या कादंबरीचा नोबेल समितीने विशेष उल्लेख केला होता. अलीकडे मात्र जागतिक कीर्तीच्या 'सलोन' या नियतकालिकाने जगातील निरीश्वरवादी किंवा इहवादी देशांची जी क्रमवारी लावली आहे, त्यात नॉर्वेचा क्रमांक पहिल्या आठमध्ये होता.
यु
रोपातील स्कँडिनेव्हियन ब्लॉक ऑफ नेशन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांत ख्रिश्चन धर्म सोडण्याची त्सुनामी किती प्रभावी आहे, याचा केवळ हा मजकूर वाचून अंदाज येणार नाही. डेन्मार्क देशात अवघ्या तीन महिन्यांच्या काळात दहा हजार लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडला आण्ाि नॉर्वे या देशात अवघ्या तीन दिवसांत पंधरा हजार लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडला. स्कँडिनेव्हियन देशांत डेन्मार्क, नॉर्वे याखेरीज स्वीडन हा प्रमुख देश आहे, तर फिनलँड, आईसलँड, फारोई बेटे हे देशही स्कँडिनेव्हियन देशांचे भाग मानले जातात. तरीही डेन्मार्क, स्वीडन आण्ाि नॉर्वे हे मात्र मुख्य स्कँडिनेव्हियन देश मानले जातात. प्रत्यक्षात या सहाही देशांत वरील स्थिती थोडयाफार फरकाने तशीच आहे. हा सारा समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश आहे. 'समुद्रकिनाऱ्याचा देश' एवढयार् वणनाने त्याची कल्पना येणार नाही. येथील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आण्ाि प्रत्येक खेडयात समुद्र अगदी गल्लीबोळापासून पसरलेला आहे. डेन्मार्कला लागून असलेल्या उत्तर जर्मनी आण्ाि नेदरलँड भागातून याच वर्षांच्या एप्रिलमध्ये काही दिवस राहण्याचा योग आला, त्यामुळे त्या भागाचा परिचय झाला. घरातून बाहेर पडायचे म्हणजे रस्त्याच्याऐवजी कालव्यातच उतरायचे, अशी त्या भागातील अनेक ठिकाणची स्थिती आहे. शालेय मुलेमुलीही आपली सायकल घेऊन शाळेला जाण्याऐवजी आपली छोटी बोट घेऊनच ती वल्हवत वल्हवत शाळेला जायचे, असे दृश्य अनेक ठिकाणी दिसते. शहरातील मुख्य रस्त्याला लागूनच ऱ्हाइन नदीसारख्या नदीचे छोटे-मोठे नैसर्ग्ािक कालवे शहरभर पसरलेले असतात. त्याच बाजूला ट्राम, मोनो रेल आण्ाि मेट्रो यांचे लोहर्माग दिसत असतात. अतिशय समृध्द नर्िसग आण्ाि बेताची लोकसंख्या असल्याने तो सारा प्रदेश काहीशी स्वप्नभूमीच वाटते. आपल्याकडे एखाद्या स्टेशनच्या पार्किंगमध्ये काही आलिशान गाडया, काही साध्या मोटारी, मोठया प्रमाणावर स्कूटर्स, पलीकडे सायकल स्टँड अशी स्थिती दिसत असते, तशीच स्थिती शहराच्या मध्यवर्ती कालवा चौकात असते. त्या गर्दीतून मोठया बोटींच्या करडया श्ािस्तीला न जुमानता सारी श्वेर्तवणीय शालेय मुलेमुली आपापल्या बोटी वल्हवत वल्हवत त्यांची दंगामस्ती, वादावादी, भांडणे, लंबीचौडी गप्पाष्टके आण्ाि काही त्या वयोगटाला शोभणाऱ्या काही प्रमाणात मारामाऱ्याही साजऱ्या करत असतात. हे स्कँडिनेव्हियन देश ब्रिटन, पोर्तुगाल किंवा स्पेन यांच्याप्रमाणे जगातील अनेक देशांवर सत्ता असलेल्या देशांपैकी नाहीत. त्यांच्या देशातही सुबत्ता निर्माण व्हायला त्या देशांनी जगातून आणलेल्या प्रचंड लुटीचा अतिशय उपयोग झाला आहे. अशा या देशांत अनेक शतके धर्मसत्ता प्रबळ होती. त्या देशात अचानक धर्म सोडण्याची त्सुनामी कशी काय आली, याचे कोडे अजून तेथील समाजधुरीणंानाही सुटलेले नाही. सध्या या साऱ्या देशांत प्रसारमाध्यमात आण्ाि सभा-संमेलनातूनही हा विषय मोठया प्रमाणावर चर्चिला जात आहे. स्कँडिनेव्हियन देशांत दहा हजारांच्या आण्ाि पंधरा हजारांच्या संख्येने धर्म सोडण्याचे प्रकार हा निश्चितच सामान्य प्रकार नव्हे. डेन्मार्क देशात सध्या ख्रिश्चन धर्म सोडण्याची जोराची लाट आहेच, गेल्या एप्रिल ते जून या महिन्यांत ती अधिक तीव्र होती. सर्वसाधारणपणे दर तीन महिन्यांत ती संख्या पाच हजार असते, ती संख्या एप्रिल ते जून या काळात दहा हजार झाली होती. त्यामुळे तेथील डॅनिश ऍथेइस्ट - म्हणजे इहवादी संघटनांनी त्यांचा समारंभ साजरा केला. त्या काळात ज्यांनी 'ख्रिश्चन धर्म सोडा' अशी मोहीम हाती घेतली होती, त्यांच्या संघटनेने असा प्रश्न उपस्थित केला होता की 'येशू ख्रिस्त किंवा महंमद यांच्याशी परमेश्वर बोलला होता का?' वास्तविक ख्रिश्चन धर्माला तेथे शासकीय मान्यता आहे. पण अन्य युरोपीय देशांप्रमाणेच गेल्या दशकातच तेथे धर्म सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अलीकडे त्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही तेथील चर्चसंघटनांचे प्रवक्ते असे बोलून दाखवत आहेत की, असा काळ कधीकधी येत असतो. पण नंतर लोक परत येतात. एका बाजूला लोक जात असले तरी दुसऱ्या बाजूला लोक ख्रिश्चन होत आहेत. कोपेनहेगेन चर्च ऑफ आवर लेडी या चर्चचे डीन ऍंडर गेडकार्ड यांनी बोलून दाखवले की, सध्या कोणी तरी धर्म सोडण्याची मोहीमच सुरू ठेवली असल्याने हा परिणाम आहे.

कोपेनहेगेन ही डेन्मार्कची राजधानी आहे. चर्च पदाधिकाऱ्यांनी धर्म सोडणाऱ्यांशीही सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. आज चर्च सोडणारेच उद्या परत येणार आहेत, असे ते बोलून दाखवत आहेत. सध्या सर्वच ठिकाणी धर्म सोडण्याचा वेग वाढत आहे. तीन हजार लोकंानी तर वेबसाइटवरील तशा प्रकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यावर धर्म सोडल्याच्या निवेदनावर सही केली. चर्च काउन्सिलचे एक सदस्य आण्ाि तेथील ख्रिश्चन नेते क्रिस्तीन राऊन यांनी मात्र असे बोलून दाखविले की, ''हा प्रवाह एवढा मोठा आहे की आम्हीही त्याला अटकाव न करण्याचा र्निणय घेतला आहे. कोणला धर्म सोडायचा असेल तर त्याला किमान अडचणी येतील, अशीच भूमिका आम्ही घेतली आहे. या लोकंानी धर्म सोडला, तरी चर्चच्या अन्य सामाजिक कामाच्या निमित्ताने त्यांना चर्च संघटनांशी जोडून ठेवायचे, असा आमचा प्रयत्न सुरू आहे.'' तेथील जाणकारांच्या माहितीनुसार इ.सन 2007पासून ही बाहेर पडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. ती कधी कमी असते, तर कधी गती घेते. सहा महिन्यांपूर्वी त्याला प्रचंड गती आली होती. या साऱ्या प्रकाराने तेथे एक निराळीच समस्या उभी राहिली आहे, ती म्हणजे तेथील महापालिका किंवा सरकारे यांच्या करसंकलनातील काही हिस्सा कोठे अर्था टक्का ते कोठे दीड टक्का चर्चला मिळतो. आता जर चर्चचे सदस्य बाहेर पडणार असतील, तर तो पैसा तेथे दिला जाऊ नये, अशा मागणीने जोर धरला आहे.

अन्य देशांपेक्षा नॉर्वेमध्ये निराळी स्थिती आहे. एक म्हणजे येथे चर्चच्या कामाचे संगणकीकरण झाले आहे. तेथे संगणकावर चर्चची सदस्यता घेता येते व सोडताही येते. एकेका दिवसात काही हजार लोक सदस्यता काढून घेत आहेत, हे चित्र धक्कादायक होते. पहिल्या तीन दिवसांत दहा हजार जणांनी सदस्यता सोडली. ती संख्या वाढत वाढत पंधरा हजार लोकांनी चर्चला निरोप दिला, अशी माहिती तेथील व्हीजी न्यूज नावाच्या वृत्तपत्राने दिली आहे. व्हीजी न्यूजचे असे म्हणणे आहे की, गेल्या नजीकच्या काळात चर्चकडे राजीनाम्याचे एकूण 24278 अर्ज आले, तर 1369 नव्या प्रवेशाचे अर्ज आले. यातील लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे त्या देशातील ल्युथेरियन चर्चच्या बिशप या महिला आहेत. हेल्गा हौगलँड बायफुग्लेन असे त्यांचे नाव आहे. त्यांची प्रतिक्रिया एकदम निराळीच होती. त्या म्हणाल्या, ''आमच्या चर्चचे एकूण अडतीस लाख सदस्य आहेत. त्यातील काही जणांनी सदस्यता सोडली, ही काही अस्वस्थ होण्याची बाब नाही. जे लोक गेले ते जाणार असल्याची आम्हाला कल्पना होती आण्ाि आम्ही त्याची तयारीही केली होती. नॉर्वेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याला अतिशय महत्त्व दिले जाते, याचेच ते द्योतक आहे. आम्हाला खात्री आहे की गेलेले सारे जण परत येणार आहेत. सध्या होत असलेल्या घटनांची आम्ही गांभीर्याने दखल घेत आहोत. चर्चचा संदेश पसरवणे हे आमचे कर्तव्य आहे, आम्ही ते करत राहू.'' प्रत्येक चर्चचे जे भक्तमंडळ असते, त्यांच्या सदस्यांचे म्हणणे असे की, कोणीही कोणत्या चर्चचे सदस्य नाही तरीही सोडून जाणाऱ्यांना चर्चने सुरू गेलेल्या सामाजिक उपक्रमाचे सदस्य करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नॉर्वेमध्ये या संदर्भात काही महिन्यापूर्वी अपसास मोरी या संस्थेने एक पाहणी अहवाल तयार केला होता. त्याचेही आकडे यावर प्रकाश टाकणारे आहेत. त्या पाहणी अहवालात चार हजार लोकांनी भाग घेतला होता. त्यात 39 टक्के लोकांनी धर्मावर विश्वास नाही, असे सांग्ाितले होते, तर 37 टक्के लोकांनी धर्मावर विश्वास असल्याचे सांग्ाितले होते. 23 टक्के लोकांनी 'काही सांगू शकत नसल्याचे' म्हटले होते. या अहवालाचा उल्लेख करण्याचे कारण इ.सन 1985मध्ये झालेल्या अशाच एका पाहणीत पन्नास टक्के लोकांनी आस्तिक असल्याचे व वीस टक्के लोकांनी नास्तिक असल्याचे म्हटले होते.

नॉर्वे हा एकेकाळचा धार्मिक श्रध्दा मोठया प्रमाणावर असणारा देश होता. त्याचप्रमाणे त्या देशातील एक महिला श्रीमती सिग्रीड अन्सेट यांना इ.सन 1928 साली ख्रिश्चन लार्वेंसडाटर या विषयावर - म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनावर व श्ािकवणीवर लिहिलेल्या कादंबरीला नोबेल सन्मान मिळाला होता. 'मध्ययुगीन उत्तर युरोपमधील समृध्द सांस्कृतिक जीवन' या आशयावरील त्यांच्या कादंबरीचा नोबेल समितीने विशेष उल्लेख केला होता. अलीकडे मात्र जागतिक कीर्तीच्या 'सलोन' या नियतकालिकाने जगातील निरीश्वरवादी किंवा इहवादी देशांची जी क्रमवारी लावली आहे, त्यात नॉर्वेचा क्रमांक पहिल्या आठमध्ये होता. त्या देशात स्वीडन, डेन्मार्क (म्हणजे स्कँडेनेव्हियन देशच), त्याचबरोबर जपान, चेक रिपब्लिक यांचा समावेश होता. इ.सन 2012मध्ये ल्युथेरियन चर्चला सरकारची असलेली 'अधिकृत चर्च' म्हणूनची मान्यताही रद्द करण्यात आली. गेल्या वर्षाचे त्या दृष्टीने महत्त्व म्हणजे धर्म मानणारे आण्ाि न मानणारे यांचे प्रमाण समसमान होते. या वर्षी धर्म न मानणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे ख्रिश्चन धर्म सोडलेल्यांचे बहुमत आहे आण्ाि धर्म मानणारे 29 टक्के म्हणजे अल्पमतात आहेत. गेल्या दहा वर्षांतील आणखी एक बाब स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे घरात नवे मूल जन्माला आल्यानंतर त्याचे चर्चमध्ये जाऊन नामकरण करण्याचा जो विधी - ज्याला बाप्तिस्मा म्हणतात - असतो, त्यात मोठया प्रमाणावर घसरण झाली आहे. अर्थात ज्यांनी यापूर्वीच चर्चशी संबंध तोडला आहे, त्यांचा यात समावेश नाही. जे विद्यमान सदस्य आहेत, अशा इ.सन 2005मध्ये जन्मलेल्या 76 टक्के बालकांचा बाप्तिस्मा चर्चमध्ये झाला आहे. पण इ.सन 2015मध्ये हे प्रमाण 58 टक्के आहे. इ.सन 2014-15 यातील एका वर्षात एक लाख बावीस हजार लोकांनी चर्चचा निरोप घेतला, जी संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या दोन टक्के आहे. युरोपमध्ये अशी प्रथा आहे की, जो चर्चचा सदस्य आहे, त्याने आठवडयातून एकदा तरी चर्चला हजेरी दिली पाहिजे. त्या देशातील चर्चमध्ये न चुकता हजेरी लावणाऱ्या सदुसष्ट लाख सदस्यांपैकी दहा लाख सदस्यांनी चर्चमध्ये जाणे बंद केले आहे. ही सगळी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने जाहीर केली आहे.

9881717855