गोनीदां आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विवेक मराठी    03-Nov-2016
Total Views |


***प्राचार्य श्याम अत्रे****

गोपाळ नीळकंठ उर्फ अप्पासाहेब दांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. गेल्या शतकातील एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणून अप्पा विख्यात होते. त्यांनी विविध वाङ्मय प्रकारांत सुमारे 100 ग्रंथांचे लेखन केले असले, तरी साहित्य जगतात ते   डेकर'म्हणूनच प्रसिध्द आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व समृध्द वाङ्मयाचा धांडोळा घेतला जाणे व त्याचे पुनर्मूल्यांकन होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या लौकिक व्यक्तिमत्त्वावर व वाङ्मयीन व्यक्तित्वावर ज्यांचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्त्वज्ञानाचा व कार्यपध्दतीचा समावेश होतो. या लेखात रा.स्व. संघ व गोनीदां यांच्या परस्पर संबंधांचा व त्यांच्या जीवनावर व वाङ्मयावर संघाच्या उमटलेल्या ठशाचा आपण मागोवा घेणार आहोत.


1989 साल म्हणजे रा.स्व. संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. वयोमान व प्रकृतीची साथ नसतानाही त्या वर्ष गोनीदांनी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर अतिशय सुरेख कादंबरी लिहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केजे. त्या पुस्तकाच्या निवेदनात अप्पासाहेब म्हणतात, ""लहानपणी नागपूरला असताना कधी एकदा डॉःटरांना पाहिजे होते. त्या काळात काँग्रेसचे आंदोलन सुरू होते. त्यानिमित्ताने सभा होत. त्या सभांतून डॉःटरांची ती भव्य व रुबाबदार मूर्त दिसे. एकदा पाहिजे की विस्मरण होऊ नये असे डॉःटरांचे व्यक्तिमÎव होते.'' ते पुढे म्हणतात, ""आठवते, की छोटी धनतोलीवर लागणाèया संघशाखेतही मी चुकूनमाकून जात असे. एका तलावाच्या काठी भरजेल्या संघशिबिरातही गेल्याचे स्मरते. तेथे डॉःटरांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर सुरू झाजे 1930 सालचे काँग्रेसचे आंदोलन. घरी असतो, तर या आंदोलनात भाग ¿यायला मिळाला नसता. म्हणून घरातून पiून मुंबईला गेलो. आंदोलन संपल्यावर जीवनात अनेक उलथापालथ झाली. अन् शेवटी वैयक्तिक मोक्षाच्या मागे लागून नर्मदा परिक्रमा सुरू केली. ती संपवून मंडजेश्वरी आलो, कारण तेथे गुरुदेव राहत होते आणि इतःया वर्षानंतर संघाची पुन्हा गाठ पडली. हे लक्षात आजे की, वैयक्तिक मोक्षापेक्षा सामूहिक मोक्ष अधिक महÎवाचा आहे. हे ध्यानी येताच मी संघाचा प्रचारक म्हणून काम करू लागलो. प.पू. डॉ. हेडगेवारांनी दाखविजेल्या वाटेने चालू लागलो.''

अप्पांच्या या निवेदनातील, "हे लक्षात आजे की, वैयक्तिक मोक्षापेक्षा सामूहिक मोक्ष अधिक महÎवाचा' हे वाःय व त्यातून ऐन तारुण्यात त्यांना झाजेल्या साक्षात्कार मला अतिशय महÎवाचा वाटतो. केवi जाणीव होणे पुरेसे नाही. त्याबरहुकूम कृती होणे महÎवाचे. म्हणून "हे ध्यानी येताच मी संघाचा प्रचारक म्हणून काम करू लागलो' ही त्यांची कृतिप्रवणता मोलाची आहे. स्वयंसेवकाची संघ कशा प्रकारची मानसकिता घडवतो याचे हे निदर्शक आहे. गोनीदांच्या जीवनावर रा.स्व. संघाचा अमीट ठसा उमटला आहे, तो असा वैयक्तिकतेकडून सामाजिकतेकडे सामूहिकरित्या जाणे हाच संघतÎवज्ञानाचा व समाज संघटनेचा गाभा आहे. अहंकार लोपून तो वयंकारांत विसर्जित करणे असा हा वैचारिक व व्यावहारिक प्रवास आहे.

याच संदर्भात तत्कालीन सरसंघचालक म.स. उर्फ बाळासाहेब देवरस यांनी गोनीदांना शुभकामना देणारे पत्र लिहिजे आहे. त्यात ते म्हणतात, ""आपला स्वत:चा आपल्या बालवयात प्रत्यक्ष डॉःटरांशी संबंध/संपर्क आला आहे व यौवनातील काही वर्षे आपण स्वत: प्रचारक म्हणून काम केजे आहे. त्यामुले डॉःटरांविषयी आपल्याला अत्यंत आपुलकी वाटणे स्वाभाविक आहे.''

या दोन उताèयांवरून गोनीदांचे संघाशी असणारे संबंध किती घट्ट, सेंद्रिय स्वरूपाचे व आत्मीयतेचे होते, याचे प्रत्यंतर येते.

रा.स्व. संघाशी असजेल्या आपल्या भावबंधाचे अतिशय हदय चित्रण त्यांनी आपल्या "स्मरणगाथा' या आत्मचरित्रपर ग्रंथांत केजे आहे. (पृð 524 ते 558).

नर्मदेची परिक्रमा संपवून अप्पा मंडजेश्वर येथे आजे. तिथे हरिकीर्तन पाठशालेत ते प्रधानाध्यापक म्हणून काम पाहू लागजे. अप्पांना वाटजे, आता आयुष्य असेच नर्मदातिरी मधुकरी मागत संपणार. पण त्याच वेळी खांडव्याहून गोखजे नावाचे संघाचे कार्यकर्ते तेथे आजे. तो होता तरतरीत, बुद्धिमान, देखणा तरुण. त्याने रात्री 5-50 माणसे जमविली. सर्वांचा परिचय करून घेतला. त्यानंतर तो बोलू लागला. या देशाविषयी, त्याच्या विस्तीर्णत्वाविषयी, निरनिराùया भाषा, वेगवेगले आचारविचार, नाना पंथ, कुणी श्रीमंत, कुणी गरीब.... तो बोलू लागला.

""अशी ही वरवर पाहता देशी सर्वत्र भिन्नता असली, तरी एकत्वाचे एक नाते, एक बiकट सूत्र, सर्वांची मातृभूमी एक. यांचा धर्म एक. संस्कारांची एकता, एका धर्माचे अनुयायी उत्तरेस बदरीबिसाल, दक्षिणेकडे कन्याकुमारी, पूर्वेस जगन्नाथपुरी, पश्चिमेस द्वारका. या तीर्थस्थानांविषयी या नाना भाषा बोलणाèया प्रचंड समाजाच्या मनी निरतिशय श्रद्धा. रामायण, महाभारत हे ग्रंथ या सर्वांच्या आदराचे विषय.

हे सूत्र सर्वत्र समान. तेव्हा या सर्वांना एकत्र आणायचं. इतकी वर्षे परकीय मुघलांनी राज्य केलं, ते हा समाज विस्कळीत होता म्हणून. इंग्रज इथं आजे आणि त्यांनी आपजे शासन स्थापित केलं. त्याचंही कारण परस्परांविषयी आपल्या मनातील कटूभावना.

इंग्रजांना घालविण्याचे प्रयत्न सुरू झाजे आहेत. त्यासाठी उग्र संघर्ष चालला आहे. पण त्या संघर्षापूर्व या समाजाचे जे संघटित रूप ताठपणे उभं असायला हवं, ते कुठं दिसत नाही. आपत्ती आली की तेवढçापुरती प्रतिकारशक्ती जागी होते. आपत्ती टiली की पुन्हा एकमेकांची डोकी फोडण्यात आम्ही एकमेकांशी स्पर्धा करतो.
ही वृत्ती नाहीशी झाली पाहिजे. आपण एकमेकांचे कुणीतरी आहोत ही जाणीव परिपुï झाली पाहिजे. या देशात मोगलांबरोबर पठाण आजे, इराणी आजे, तुराणी आजे. त्यांनी इथली प्रजा जुलमाने बाटवली. सध्या तो एक प्रश्न विकराi रूप धारण केल्यासारखा वाटतो.

पण त्या प्रश्नाचं उत्तरही हिंदूंनी संघटित होण्यातच आहे. ना भय देत काहुको, ना भय मानत आप।

आणि एकजुटीने उभे राहा. एकमुखाने बोला. एका जिवाने जगा. मग हे अन्य धर्मयही सामंजस्याने वागू लागतील. जगा हिमतीने, शूरपणे जगा आणि इतरांनाही जगू द्या.''

देशासमोरील समस्येचे आणि ती समस्या सोडविण्याचे मार्ग इतःया सोप्या, सहज व स्पï शब्दांत मांडजे गेजे की, त्यामुले अप्पा भारावून गेजे. त्यांना ते निर्मi आणि निकोप विश्जेषण भावजे. ती विचारसरणी निर्दोष वाटली. त्यासाठी सर्वांनी रोज तासभर एकत्र जमावे, यातही अप्पांना कुठे वावगे वाटजे नाही.

दुसèया दिवशी पाच-पंचवीस जण एका मैदानात एकत्र जमजे. कुणी खेiजे, कुणी गप्पा मारल्या, कुणी चर्चा केली. तासानंतर प्रार्थना झाली.

नमस्ते सदा वत्सजे मातृभूमे

त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोहम्

अप्पांना प्रार्थनाही आवडली. ते मातृभूमीचे क्षेत्र होते.

थोडयाच दिवसांनी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब आपटे मंडजेश्वरी आजे. बाबासाहेब म्हणजे या संघटनेच्या कामाला सर्व जीवन समर्पित केजेजे तÎवचिंतक, ब्र÷चारी. त्यांच्या सांगण्यावरून इंदूर येथे जो दिवाळी शिक्षण वर्ग भरणार होता, तेथे जाण्याचे अप्पांनी मान्य केजे. कारण तेथे संघया संघटनेचा अधिक तपशिलाने विचार होणार होता. इंदूरच्या त्या आठ दिवसांच्या वर्गाने अप्पांचे सारे जीवनच बदलून गेजे. त्या वर्गात शारीरिक विभागात व्यायाम, दंड, शूल, खड्ग, योग, छुरिका हे प्रकार शिकविजे जात. येथे भर असे तो संघिकावर, वैयक्तिक पटुत्वावर नव्हे. वर्गात बौद्धिक वर्ग होई. त्यात संघाची स्थापना, विचारांची मांडणी, कार्यपद्धती, सामाजिक समस्यांकडे पाहण्याचा दृïीकोन, देशातील निरनिराले स्वातंÍयसंघर्ष, त्यांच्या यशापयशाची मीमांसा असे अनेकविध प्रश्न त्या बौद्धिकांत चर्चिजे जात. अशा प्रकारे संघाचे विचारविश्व व कार्यपद्धती अप्पांना उलगडत गेली.

या वर्गात मोरेश्वर सखाराम गद्रे या सुशिक्षित तरुणाची भेट झाली. तो उत्तम नामवंत वकील झाला असता. खोèयाने पैसे मिiवजे असते. पण त्याने संघाच्या कामासाठी जीवन वाहिजे. लग्न केजे नाही. असे तर कितीक. त्यांनी आपली जीविते या एकाच कामासाठी खर्च केली. धन, प्रतिðा, सन्मान, लौकिक यांच्याकडे पाठ फिरविली. पराकोटीची बुद्धिमत्ता याच एका कार्यासाठी वाहिली. असे संघाचे अनेकानेक कार्यकर्ते अप्पांनी पाहिजे. उमेद, शारीरिक क्षमता उत्तम असजेजे, रूपही चांगजे, बुद्धिमत्ता तरल, सांपत्तिक स्थिती उत्तम, उच्च शिक्षणविभूषित, ध्येय, निष्ठ अजोड. या सर्वांनी लोकेषणा त्यागलीच. संसाराचे पाश झुगारून ते वातीसारखे जiत राहिजे. डॉ. हेडगेवार यांनी या कार्यकत्र्यांसमोर स्वत:च्या उदाहरणाने उत्कट आदर्श ठेवला. त्या डॉःटरांच्या पावलावर पावजे टाकीत ते जन्मभर जiत राहिजे. "अलौकिक नो हावे लोकांप्रती' हे ब्रीदही त्यांनी व्रतासारखे सांभाiजे.

अप्पा या अशा व्रती कार्यकत्र्यांच्या संथपणे जiण्याने मोहित होऊन गेजे आणि आता हाच पंथ, हीच गती, हीच मती असे त्यांनी ठरवून टाकजे. प्रचारक होण्याची मानसिकता अप्पांनी अशी विकसित केली आणि प्रचारक म्हणून ते बाहेर पडजे. इंदूर संस्थानातील कन्नोद जिल्øात जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. एका व्रती जीवनाला प्रारंभ झाला.

संपर्क, संवाद आणि सलगी या माध्यमांतून त्यांनी आपजे प्रचारकी जीवन सुरू केजे. शाखेवर ते स्वयंसेवकांना देशभक्तीची गाणी शिकवीत. अनेक पद्यरचना त्यांनी स्वत: केल्या आहेत. हिंदी भाषेत देशप्रेमाची उत्तमोत्तम गीते आहेत. किती एक तर फासाच्या तख्तावर चढण्यापूर्व क्रांतिकारकांनीच रचली आहेत. अप्पांची एक रचना अशी आहे -

दुखसे भरे दिनों को प्यारों न भूल जाना

लंबी कराल रातें जो दर्दसे भरी थी

कैसी बिती जहां पर सुखका न था निशाना

रजपूत रानियोंकी धधकी हुई चितासे

जलाना हुवा वतनका अबतक बुझा न सीना

राणा प्रतापके दिन वनवास में भरे थे।

उनके उजल रहा है, बिगडा हुआ जमाना

ःया वे प्रसंग सारे दिलसे निकाल गये हैं

या उनको भूलनेका करते है हम बहाना

अप्पा या गीताबद्दल म्हणतात, ""भाषेच्या, शब्दवैभवाच्या, रचनेच्या दृïीने हे काव्य फारसं उजवं नाही. पण आपला आशय व्यक्त करायला अगदी पुरेसं आहे.'' असा हा अप्पांचा विनम्र स्वभाव!

प्रचारकी जीवनात नाना तèहांचे, नाना स्वभावांचे लोक भेटजे. अप्पांचे ध्येय एकच - त्यांच्यात संघविचार, संघव्यवहार व स्वयंसेवकत्व रुजवायचे. संघटनशाóांचा एकेक पाठ ते स्वत: रचीत गेजे. गुल्लू या गुंड प्रवृत्तीच्या वांड मुलाचा उत्तम स्वयंसेवक कसा बनत गेला, हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. एका शिल्पकाराने ओबडधोबड दगडातून घडविजेजे ते सुंदर शिल्प आहे. मनुष्य निर्माण म्हणजे आणखी वेगले काय असते? इतरांना घडवत घडवत स्वत: घडत जाणे, असेच हे नव्हे काय?

अप्पांनी आणखी एक अनुभव नोंदवला आहे, तो अतिशय महÎवाचा आहे. इंदूरच्या अधिकारी शिक्षण वर्गात (जढउ) कामातील अडचणींसंबंधी बैठकीत विचार होई. अप्पा लिहितात, "मी सावध होतो. महात्माजींचा अनुयायी होतो. संघाचे तÎवज्ञान अगदी निराùया दिशेने समस्यांचा विचार करणारे आहे, हे माहीत झाजे होते. ती दिशा अधिक रोकडी, अधिक काटेकोर, संघटन सामथ्र्यावर अधिक भरवसा करणारी आहे, याची कल्पना होती. बैठकीमधून वा बौद्धिक वर्गातून या दोन्ही संप्रदायात शत्रुत्व निर्माण होईल, असे कुठेही आढiजे नाही. टीका होत. त्या होणं अपरिहार्य होतं. मार्गच वेगळाजे होते, पण त्या टीकेमुले आग भडकेल असा शब्द कधीही उƒारला गेला नाही. कधी अचावचा बोलण्याला प्रोत्साहनही दिजे गेजे नाही. उलट अहिंसेच्या तÎवज्ञानाविषयी मनातून सद्भावना असणारेच कित्येक स्वयंसेवक परिचयाचे झाजे.' आज संघस्थापनेला नव्वद वर्षे झाली आहेत, पण अप्पांनी अनुभवजेजे पथ्य आजही संघशाखेवर, तेथील बौद्धिकातून निðेने पाiजे जाते.

याच वर्गात भय्याजी दाणींशी अप्पांचा परिचय झाला. ते खूप मोकùया स्वभावाचे होते. त्यांचे वःतृत्वही उत्तम होेते. स्वयंसेवकातील अंत:शःती ओiखून तिला प्रोत्साहन देणे यात त्यांचा हातखंडा होता. अप्पांचे एक गीत त्यांना फार आवडायचे. त्या गीताचा शेवटचा चरण असा -

जे नमस्ते ओ उपेक्षित

मान्यवर हे वंद्य नरवर, शुक्रके तारे महात्मन्

हे तपस्वी, हे गुरो, हे मानधन, हे पुण्यपावन

स्मरण कर तेरा, निराशा हो गई है खंडखंडित

धवल यश का गान तेरे ःया करे वाणी बिचारी

शत शत¿नी नाद तेरा उग्रसा रोमांचकारी

विश्व यश तेरा सुनेगा शांत नभ होगा निनादित

याच वर्गात अप्पांना श्रीगुरुजींचे दर्शन झाजे. अप्पा तो अनुभव सांगताना लिहितात, "त्यांचं अमोघ, गंगाप्रवाहासारखं वःतृत्व ऐकायला मिळालं. सुस्पï विचारसरणी, निर्भय मांडणी, दूरवरचा विचार करण्याचं सामथ्र्य, कार्याला वाहून घेण्याची समर्पितता असा तो पुण्यपुरुष अगदी जवळून पाहायला मिळाला.' कवी म्हणून भæयाजींनी श्रीगुरुजींना अप्पांचा परिचय करून दिला. गुरुजींनी अप्पांकडून दोन गीते म्हणवून घेतली. अप्पांना अगदी धन्य धन्य झाजे.

संघटनेत काही संकेत कसे रुजतात, याचा अनुभव अप्पांनी नोंदविला आहे. "हिंदू-मुस्लीम तणावाच्या संदर्भात संघाची भूमिका' असा तो विषय होता. कन्नोदला एका प्रसंगी असाच धार्मिक तणाव उत्पन्न झाला. मुसलमानांची धमकावणी कार्यकत्र्यांनी बैठकीत सांगितली व प्रश्न केला, ""आता संघाने काय करायला हवे?'' प्रचारक असजेजे अप्पा म्हणाजे, ""संघ, संघ म्हणून काहीही करणार नाही. संघ अशा विषयांत लक्ष घालत नाही!'' त्यांच्या म्हणण्याचा रोख न कiल्यामुले स्वयंसेवक चिडजे. इतके की एकाने "उद्यापासून संघ बंद केला पाहिजे' असे धमकावजे. अप्पा म्हणाजे, ""संघाचे काम बंद करण्याची ताकद आपल्यात नाही. ते तर चालूच राहणार आहे. तुम्ही विचारजे संघ काय करणार? मी सांगितजे संघ काहीही करणार नाही.'' ""मग आम्हालाच आता काही तरी करायला हवं!'' तो स्वयंसेवक तावातावाने म्हणाला. तेव्हा अप्पा म्हणाजे, ""मग ही बाब तुम्ही पहिल्यांदाच का नाही सांगितली?'' संघ काही करणार नाही. जे करायचे ते स्वयंसेवक करतील हा त्यांचा प्रतिपादनाचा आशय होता. संघटन म्हणून त्यांची भूमिका योग्यच होती. असे अनेक प्रसंग अप्पांनी अनुभवजे.


संघटन करण्याचे सूत्र कोणते? ते तर प्रत्यक्ष कामातूनच विकसित झाजे. अप्पा सांगतात, ""घरोघरी जायचं. नमस्कार करायचा. आपला परिचय द्यायचा. संघाच्या कामासाठी इथे आलो आहोत असं सांगायचं. संघकार्याचं महÎव पटवून द्यायचं. आपण स्वत: शाखेवर यावं आणि मुलांना पाठवावं असा आग्रह धरायचा. एकाच्या ओiखीने दुसरं घर. दुसèयाच्या ओळखीने तिसरं. "प्रज्वलितो दीप इत प्रदीपात।' प्रत्यक्ष कार्यानुभवातून विकसित होत गेजेजे हे संघटनशास्त्र .''

अप्पांनी प्रचारकांना मिiणाèया तुटपुंज्या निधीचेही अनुभव सांगितजे आहेत. "आम्हा प्रचारकांना जेमतेम दहा रुपये महिना मिळायचा. त्यात प्रवास, जेवणखाण सर्व भागवावे लागे. अनेकदा भिजजेजे मूग खाऊन क्षुधाशांती करावी लागे. प्रत्येक प्रचारकाची हीच कथा, पण सर्वांनी काi निभावून नेला. तक्रार कुणीही केली नाही. कारण प्रत्येकाला माहीत होतं की, हे समाजाचं कार्य, देशाधर्माचं. म्हणजे माझं स्वत:चं कुणीतरी हे करायला हवं. ते मी करतोय. हा कुणावर उपकार नव्हे. मी हे स्वधर्म म्हणून केलं पाहिजे.' प्रचारकांची ही अदम्य निष्ठ व समर्पण भाव हे संघाचे बलस्थान आहे. दिजेला शब्द पाiण्यासाठी अप्पा चाळीस चाळीस मैल पायी चालत जात. अनेकदा उपासमारही होत असे, पण आपजे दैन्य बाहेर दिसता कामा नये, हा बाणा मिशांना तूप लावून जनलोकांत हिंडजे पाहिजे, अशी सगळी तंत्रे प्रचारकांना सांभाळावी लागत. त्याचेही अनुभव अप्पांनी हसतहसत सोसजे आहेत. मनाच्या दृढ धारणेशिवाय इतके कर्तव्य कठोर जीवन जगता येणे शःय नाही.

असे कïप्रद अनुभव घेतल्याने शरीराने बंड करणे स्वाभाविक होते. अप्पांना ज्या आजाराने गाठजे, तो काiजी करण्यासारखा होता. डॉःटरी तपासणीनंतर लक्षात आजे की आपण आता कामासाठी उपयोगी राहिलो नाही. प्रचारक म्हणून सुमारे चार वर्षे कणश: क्षणश: झिजल्यानंतर अप्पांना थांबावे लागजे. स्वत: गोiवलकर गुरुजींनीही अप्पांना तपासजे. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली. ते अप्पांना म्हणाजे, ""कुठंही असलास, तरी कार्यावर निष्ठा असली की झालं.''

संघतÎवज्ञानावरील व कार्यावरील अप्पांची निðा जन्मभर अगदी तसूभरही ढiली नाही, हे त्यांचे मोठेपण. पुढे साहित्याच्या क्षेत्रात संघाला अभिप्रेत असजेल्या निðेनेच अप्पांनी आपली कालक्रमणा केली, हे विशेष! सतरा वर्षे धावपi केजेल्या अप्पांनी वयाच्या तिसाव्या वर्ष नव्या आयुष्याला सुरुवात केली.

संघात असंख्य गीते गायली जातात. पण त्याचे गीतकार फारसे प्रकाशात येत नाहीत. अप्पा संघात सक्रिय असताना त्यांनी अनेक हिंदी-मराठी संघगीते लिहिली आहेत, पण काही अपवाद वगiता ती गीते नेमकी कोणती हे ज्ञात नाही. पुढे नाना पालकर, नाना ढोबले, शिवराम तेलंग, कवी योगेश या प्रचारक व स्वयंसेवकांनी अशी गीतरचना केली. अगदी अलीकडे निवर्तजेल्या मधुकर जोशी या प्रचारकानेही अनेक गीते लिहिली, पण कोणी नेमकी कोणती गीते लिहिली हे ज्ञात नाही. ही आत्मविलोपी वृत्ती संघसंस्कारांची खासियत आहे. अप्पांचा आवाज अतिशय मधुर व श्रवणीय होता. ते मोकùया गùयाने गात. त्यांचे वागणे अतिशय शिस्तीचे, टापटिपीचे, प्रसन्न आणि मनमोकले होते. ज्या कन्नोद शहरात जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केजे, तेथील वाचनालयातील सुप्रसिद्ध बंगाली जेखक शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचे हिंदीत रूपांतरित झाजेजे विपुल वाडमय होते. ते अप्पांनी वाचून काढजे. अप्पांच्या वाडमयनिर्मितीवर त्याचा प्रभाव जाणवतो. "शितू' ही त्यांची सर्वांगसुंदर कादंबरी त्यांनी शरचंद्रबाबूंनाच अर्पण केली आहे. आपण प्रचारक असतानाचे दिवस अतिशय मंतरजेजे होते, असे त्यांनी लिहून ठेवजे आहे. देशासाठी फकिरी करणे म्हणजे काय, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अप्पांचे जीवन. संघातील आणि संघाबाहेरील ही फकिरी वृत्ती आणि उत्कट देशभक्ती यांचा समसमा संयोग म्हणजे अप्पा दांडेकर!

गोनीदां हे जीवनावर अपरंपार प्रेम करणारे. जीवनातील चांगुलपणावर नितांत श्रद्धा ठेवणारे जेखक होते. पूर्वायुष्यात जीवघेणे भोग भोगूनही त्यांची ही श्रद्धा किंचितही कमी झाली नाही. भारतीय संस्कृतीचा अस्सलपणा त्यांच्या रक्तातच भिनला होता. त्यामुले नकiत त्यांच्या कादंबèयातून व अन्य साहित्यातून एक संस्कार साखळी तयार झाजेली दिसते. मानवी जीवनात जे जे उन्नत, उदात्त, सुंदर यांचे अप्पांना भारी आकर्षण. त्यामुले त्यांच्या बहुप्रसवा जेखणीने एका निष्ठेने, अदम्य अशा निष्ठेने जेखन केजे. अनिष्ठ असे त्यांनी काहीच लिहिजे नाही. जे लिहिजे ते सामाजिक पथ्ये पाळून. एका अर्थाने संघविचाराने त्यांच्या व्यक्तित्वाची जी जडणघडण झाली, त्याचा हा परिणाम आहे. प्रचारक म्हणून आजारपणामुले त्यांना थांबावे लागजे, तेव्हा गुरुजी गोळवलकर त्यांना म्हणाजे होते, ""कुठंही असलास तरी कार्यावर निष्ठा  असली की झालं.'' श्रीगुरुजींनी व्यक्त केजेला विश्वास अप्पांनी जन्मभर सार्थ ठरविला. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर त्यांनी जेखन ही वृत्ती निश्चित केली. त्या वृत्तीचे पालन करताना निष्ठा  कधी पातi होऊ दिली नाही. याच भूमिकेतून त्यांनी बालांसाठी, उमलत्या युवकांसाठी गोष्ठी व चरित्रमाला लिहिल्या. संस्कारक्षम वयाला आकार देणार्या धर्मप्रवण माणसांसाठी धार्मिक ग्रंथ लिहिजे. रामायण, महाभारत, श्रीराम, श्रीकृष्ण, कर्ण, गीता हे त्यांच्या जेखाचे विषय होते. ज्ञानेश्वरीपासून गाडगेबाबांपर्यंतची संतांची मांदियाळी त्यांच्या चिंतनाचे विषय होते. छत्रपती शिवराय त्यांचे आराध्य होते. ज्ञानेश्वरी, गाथा व दासबोध त्यांचे श्रद्धास्थान होते. ज्या कादंबर्या  लिहिल्या, त्यातूनसुद्धा त्यांनी जीवनाचा भावात्मक, सकारात्मक संदेश दिला. त्याग आणि राï­भक्ती हा त्यांच्या जीवनाच्या पूर्वार्धाचा सारांश आहे, तर उत्तरार्धातील अपार साहित्यनिर्मिती व प्रचंड लोकप्रियता हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता. मातृभूमीची सेवा करण्याची उत्कट इच्छा त्या काळातील असंख्य तरुणांत होती. अप्पा अशा तरुणांपैकी एक होते. रा.स्व. संघाच्या विचारविश्वात येऊन त्यांनी मिळाजेल्या संधीचे सोने केजे.

वयाच्या तिशीनंतर अप्पा साहित्यनिर्मितीत व संसारिक जीवनात रममाण झाजे. तथापि संघाविषयीची त्यांची आस्था यत्किंचितही कमी झाली नाही. खरे तर गोनीदांच्या संपूर्ण वाL्मयीन कारकिर्दत त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संघविचार व संघाने दिजेली जीवनदृïी, मूल्यसंकल्पना याच त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा राहिल्या. भारतीय संस्कृतीचे संचित अधिकाधिक समृद्ध करणारे संस्कारक्षम साहित्य ते लिहीत राहिजे. त्यांच्या जेखनकार्यावर त्यांची अपार निðा होती. काय योगायोग असतो पाहा! अप्पांचे लग्नही संघपरिवारातील एका कार्यकत्र्यानेच जुiवजे. अप्पांची पत्नी ही चिपiूणच्या श्रीराम Íयंबक सहòबुद्धे यांची मुलगी. तेथील भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते प्रेमजीभाई आशर हे नीरेला आपली बहीण मानत. त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या या मानजेल्या बहिणीचे लग्न फकिरी वृत्तीने राहणाèया आपल्या संघबंधूशी - अप्पा दांडेकरांशी लावून दिजे आणि त्यांना संसाराच्या बेडीत अडकविजे.

रा.स्व. संघाशी जोडजेली त्यांच्या जीवनाची नाi कधीच तुटली नाही, हे दर्शविणारे काही लक्षणीय प्रसंग पाहणे उद्बोधक ठरेल. 1940 साली डॉ. हेडगेवार यांचे निधन झाजे. ते ऐकून अप्पा अतिशय व्यथित झाजे. पुढे त्यांनी डॉःटरांना वाL्मयीन श्रद्धांजली वाहणारे अप्रतिम गीत लिहिजे - "धन्य तुम्हारा जीवनदान' हे ते बोलके गीत आहे. पुढे 1948 साली गांधी वधानंतर संघावर बंदी आली. त्या बंदीविरोधात सत्याग्रह करण्याची तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजींनी सर्व स्वयंसेवकांना हाक दिली. पुणे येथील अलका टॉकीज चौकात जो सत्याग्रह स्वयंसेवकांनी केला, त्याचे नेतृत्व अप्पा दांडेकरांनी केजे होते, ही बाब लक्षणीय आहे. त्याबद्दल त्यांना काही काi कारावासही भोगावा लागला.

1980चा सुमार असावा. दुर्गप्रेमी अप्पांनी दहा दिवसांत दहा किल्जे असा कार्यक्रम आखला आणि त्यासंबंधात जाहीर आवाहन केजे. निवडजेजे सर्व किल्जे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने वा वास्तव्याने पुनित झाजेजे होते. अप्पांना खूप छान प्रतिसाद मिळाला. जवiजवi 75 ते 80 दुर्गप्रेमींनी नावे नोंदविली. त्या सर्वांचे एकत्रीकरण अप्पांनी आयोजित केजे. प्रत्येक किल्ल्यात जेथे जेथे शिवस्मृती आहे, तेथे आपण सामूहिक प्रार्थना करू या असे अप्पांनी सुचवजे आणि "नमस्ते सदा वत्सजे मातृभूमे' ही संघाची प्रार्थना आपण म्हणावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. या दुर्गप्रेमीत जसे स्वयंसेवक होते, तसे संघाशी संबंधित नसजेजे लोकही होते. त्यांनी "संघात म्हटली जाणारी प्रार्थनाच का?' असा प्रश्न अप्पांना केला. त्यावर अप्पांनी प्रश्नकत्र्यावर न रागवता शांतपणे त्या प्रार्थनेचा अर्थ सोप्या भाषेत उलगडून दाखविला. "परमवैभवम् नेतुमेतत् स्वराï­म्' ही भूमिका त्यात व्यक्त झाजेली आहे, हे स्पï केजे. "वयम हिंदु राï­ांग भूता' - आपण सारे या हिंदुराï­ाचे घटक आहोत, हे त्या प्रार्थनेचे सूत्र आहे. त्यात कुठेही "स्वयंसेवक' वा "रा.स्व. संघ' यांचा उल्जेखही नाही. त्या प्रार्थनेवर कुठेही संघाचा शिक्का नाही. त्यात केवi मातृभूमीविषयीचा समर्पण भाव आजेला आहे. शिवरायांनी स्वराज्य कशासाठी स्थापिजे, त्याला हिंदवी स्वराज्य का म्हटजे, हे स्पï केजे. त्यांच्या या विवेचनानंतर सारा विरोध मावiला आणि सर्व दुर्गभ्रमणांत त्याच प्रार्थनेचा उद्घोष झाला. अशी डोiस व जागृत संघनिðा हा अप्पांच्या जीवनाचा विशेष होता.


1983च्या जानेवारीत पुण्याजवiच्या तiजाई डोंगरावर रा.स्व. संघाचे महाशिबिर झाजे. विदर्भ वगiता उर्वरित महाराï­ातून 35000 स्वयंसेवक त्या तीन दिवसीय हिवाळी शिबिरासाठी उपस्थित होते. त्यात विविध क्षेत्रांत लक्षणीय कार्य करणाèया जुन्या जाणत्या स्वयंसेवकांचा सहभाग होता. इतकेच नव्हे, तर त्या शिबिराच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते. सुधीर फडके यांनी गीत विभाग सांभाiला होता. शिबिर यशस्वी होण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराï­ातील शहरी विभागात प्रवास केला होता. ठिकठिकाणी झाजेल्या एकत्रीकरणात प्रेरणादायी भाषणे केली होती. दि.वि. गोखजे, वि.ना. देवधर यांनी प्रसिद्धी व पत्रकार कक्ष सांभाiला होता. तर अप्पा दांडेकरांवर शिबिराला आजेल्या विशेष व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचे काम सोपविण्यात आजे होते. त्यात अपंग, सायकलवरून प्रवास करून आजेजे, विदेशातून आजेजे, राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, कला व साहित्य क्षेत्रातील सेजेब्रिटीज अशा स्वयंसेवकांचा वा संघप्रेमींचा समावेश होता. या सर्व मुलाखती वैशिïçपूर्ण होत्या. त्याची ध्वनिचित्रफीत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी पूर्ण गणवेशात उपस्थित होती. मैलाचा दगड ठरजेल्या त्या शिबिरात अप्पांचे योगदान महÎवपूर्ण होते.

पुढे संघाचे ज्येð अधिकारी भाऊराव देवरस यांनी अप्पांना आद्य सरसंघचालकांच्या जीवनावर कादंबरी लिहावी असे सुचविजे. अतिशय परिश्रमपूर्वक सर्व सामग्री जमवून अप्पांनी "वादळातील दीपस्तंभ' ही चरित्रात्मक कादंबरीचा मानदंड ठरेल अशी उत्कृï कादंबरी लिहिली. डॉःटरजींच्या जन्मशताब्दीच्या काळात ती प्रसिद्ध झाली. ही कादंबरी लिहिली, तेव्हा अप्पांनी सत्तरी ओलांडली होती, हे लक्षात ¿यायला हवे. पुढे अप्पांचे जामात डॉ. विजय देव यांनी या कादंबरीचे हिंदी रूपांतर करून प्रसिद्ध केजे.

महाराï­ातील सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. वि.रा. करंदीकर व अप्पा दांडेकर हे 1942पासूनचे मित्र. ते गोनीदांबद्दलच्या आपल्या आठवणी लिहिताना म्हणतात, "देशासाठी फकिरी पत्करणे म्हणजे काय? हे अप्पांच्या रूपाने आपल्या डोùयासमोर उभे राहते. ही फकिरी वृत्ती आणि उत्कट देशभक्ती म्हणजे ध्येयवादी वृत्तीचे अप्पा दांडेकर. दारिद्रçाशी घरोबा केजेला, देशप्रेमापोटी घराचे पाश तोडणारा आणि उद्याची फिकीर न करणारा हा माणूस. निदान आयुष्याच्या पूर्वार्धात तरी त्याचे जीवन असे संघर्षमय होते. "कुणा एकाची भ्रमणगाथा'मध्ये अस्फुटपणे, तर "स्मरणगाथेत' लख्खपणे.  दांडेकरांचे हे रूप प्रत्यक्ष आपल्या डोùयांसमोर उभे राहते. शिवप्रभूंवरील कादंबèयांद्वारा अवघा शिवकाल अप्पांनी आपल्यासमोर जिवंत केला. त्यासाठी त्यांनी किती व्यासंग केला, किती कï घेतजे हे त्यांचे त्यांनाच ठावे! जनसामान्यांचे मानस, त्यांची नाडी अचूक ओiखणारा हा जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा जेखक होता. भारतीय तÎवज्ञान, संस्कृती व जीवनमूल्ये त्यांच्या साहित्यातून सतत झिरपत राहताना दिसते. म्हणून ते वाL्मय या मातीतून उगवजेजे अस्सल भारतीय साहित्य ठरते.'

आणखी एका वेगùया अंगाने डॉ. करंदीकरांनी या विषयाची मांडणी केली आहे. ते म्हणतात, ""स्वातंÍयपूर्व काळातील ते मंतरजेजे दिवस होते. लोकमानस जागे करून स्वातंÍयासाठी आंदोलन करणारा राजकीय पक्ष काँग्रेस होता. इतरही पक्ष आपापल्या परीने धडपड करीत होते. गुप्तपणे काम करणारे क्रांतिकारकांचे गटही काही प्रांतांतून कार्यरत होते. या साèयापासून संघटन म्हणून दूर राहून आपल्या वेगùया मार्गाने जाणारा आणि प्रत्यक्ष चiवळीत न पडता या साèयापासून दूर राहून आपजे काम करीत राहिजेला रा.स्व. संघ होता. एवढे तेजस्वी, शिस्तबद्ध व देशभक्तीच्या भावनेने रसरसजेजे तरुण एवढçा मोठçा संख्येने एकत्र आजेजे आहेत, हे पाहताना विचारी माणसांना एकीकडे आनंद वाटत असे, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यांना ही संघटना निष्क्रिय आहे आणि तरुणांची शःती वाया चालली आहे, असे वाटत होते. पण संघाचे तरुण मायभूमीवरील भक्तीने भारावजेजे होते आणि भविष्यात दूर नसजेल्या कोणत्या तरी क्षणी आपल्या देशाचे भाग्य बदलून टाकणार आहोत अशा आत्मविश्वासांच्या बळावर आपल्याच धुंद आनंदात संघस्थानावरील आपजे शाखेतील दैनंदिन काम करीत होते. संघाचे निðावंत स्वयंसेवक असजेजे अप्पा हे या तरुणांचे प्रतिनिधी होते.' संघाच्या जीवितकार्याविषयीचे डॉ. करंदीकरांचे आकलन अतिशय अर्थपूर्ण आहे. संघाला अभिप्रेत असणाèया मार्गावरून निðेने, सातत्याने व समर्पण वृत्तीने अप्पा वाटचाल करीत राहिजे आणि करंदीकरांनी जी भविष्यवाणी केली होती, "भविष्यात दूर नसजेला' आणि "आपल्या देशाचे भाग्य बदलून टाकणारा' तो क्षण आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. अप्पांसारख्या लक्षावधी स्वयंसेवकांनी जे पेरजे, ते आज उगवजेजे व फळाफुलांनी सजजेजे आपण पाहत, अनुभवत आहोत.

या अत्यंत उ‚वल व लखलखीत पाश्र्वभूमीवर आज असहिष्णुतेच्या नावाने नक्राश्रू ढाiणारे व पुरस्कार वापसीचे ढोंग करणाèया तथाकथित पुरोगाम्यांच्या पूर्वसूरींचे वर्तन त्या काळात कसे होते, हे पाहणे उद्बोधक ठरेल. अप्पांनी आपल्या उ‚वल वाL्मयीन कर्तृत्वाने मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिiवजे, पण ते केवi संघविचारांचे आहेत म्हणून तत्कालीन कथित पुरोगाम्यांच्या कंपूने अप्पांना हे पद मिiू नये म्हणून जंग जंग पछाडजे, हा इतिहास तसा फार जुना नाही. अकोला येथे भरजेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मोठçा मतांतराने अप्पा निवडून आजे. परंतु एरवी प्रत्येक नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षाचा सत्कार करणाèया मुंबई मराठी साहित्य संघाने, संघद्वेषाची कावीi झाली असल्यामुले आपला रिवाज मोडून अप्पांचा सत्कार करण्याचे नाकारजे. ही गोï अप्पांच्या मनाला फार बोचली. वाL्मय क्षेत्रातील नागर, अभिजात साहित्य संस्थांतील सत्ताधाèयांनी एका स्वयंसिद्ध श्रेð साहित्यकाराला दिजेली ही वागणूक हा सहिष्णुतेचा मानदंड समजायचा काय? आणि आश्चर्य म्हणजे ही वैचारिक अस्पृश्यता जपणाèयांची पुढची पिढी आज असहिष्णुतेच्या नावाने शंख करीत आहेत. अर्थात केवi साहित्यक्षेत्रच नव्हे, तर जीवनाच्या विविध क्षेत्रात डोंगराएवढे कार्य करणाèया संघाच्या अनेक कार्यकत्र्यांनाही असे अनुभव नवीन नाहीत. अशी कंपूशाही प्रत्येक्ष क्षेत्रात आहे आणि हे तथाकथित पुरोगामी नवी अस्पृश्यता जोपासत आहेत. अर्थात वाL्मयक्षेत्रातील या कंपूशाहीमुले अभिजात साहित्यनिर्मिती करणाèया गोनीदांचे काडीचेही नुकसान झाजेजे नाही व होणार नाही, ही गोï वेगळी. त्यांनी निर्माण केजेजे साहित्य विश्व लखलखीत आहे. त्यांचे तेज स्वयंभू असल्यामुले ते कमी होणार नाही.

या सर्व विवेचनाच्या माध्यमातून अप्पांचे रा.स्व. संघाशी असणारे भावबंध किती उत्कट व अतूट आहेत, हे लक्षात यावे. भविष्यकाळातही हे भावबंध व गोनीदांनी लिहिजेजे रसरशीत साहित्य प्रत्येक नव्या पिढीला प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त करतो आणि अप्पांच्या पुण्यपावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो.

9324365910