रवांडामधील दहा लाखाच्या नरसंहारावरचर्च संघटनांचा माफीनामा

विवेक मराठी    10-Dec-2016
Total Views |

पोप फ्रान्सिस यांनी दि. 8 डिसेंबर 2015 ते 20 नोहेंबर 2016 या दरम्यान 'ज्युबिली ऑफ मर्सी' असे वर्ष जाहीर केले होते. प्रत्येक मोठया चर्चमध्ये एक पवित्र दार असते. ते या निमित्ताने उघडण्यात येते. पोप यांच्या आदेशानुसार - पेपल बुलनुसार ते सुमारे एक वर्षपर्यंत उघडे ठेवण्यात आले होते. व्हॅटिकनमधील मुख्य मोठे चर्च म्हणजे सेंट पीटर्स बसालिका येथील हे मोठे दार एक वर्षपर्यंत उघडेच होते. त्यातून सुमारे एक कोटी भाविकांनी प्रवेश करून क्षमायाचनेच्या प्रार्थना केल्या. जगभराच्या सर्व कॅथलिक धर्मप्रांतांतील चर्चमध्ये हे क्षमायाचना महोत्सव झाले. कळत-नकळत घडलेल्या अपराधाबाबत परमेश्वराने क्षमा करावी, असे विधी बहुतेक धर्म आणि पंथ यामध्ये असतात. दहा लाखांच्या नरसंहाराला हा लागू होतो का?
बा
वीस वर्षांपूर्वी रवांडा या देशात अवघ्या तीन महिन्यांत दहा लाख लोकांचा जो नरसंहार झाला, त्याबाबत कॅथलिक संघटनांनी क्षमायाचना केली आहे. सध्या कॅथलिक पंथात 'क्षमायाचना' महोत्सव सुरू आहे, त्याचा भाग म्हणून त्यांनी ही क्षमायाचना केली आहे. दहा लाख हा फार मोठा आकडा आहे. विसाव्या शतकातील पहिले महायुध्द आणि दुसरे महायुध्द यातील नरसंहारानंतरचा हा मोठा आकडा असला पाहिजे. ती घटनाही अजून जुनी नाही. अजूनही या नरसंहाराशी संबंधित लोकांच्या मनावरच्या आणि शरीरावरच्या जखमा ओल्या आहेत. हा नरसंहार कोणी केला, यावर दरम्यानच्या काळात अनेक पुस्तके आली आहेत. त्यातील महत्त्वाचे पुस्तक म्हणजे केंब्रीज विद्यापीठ प्रेसने प्रकाश्ाित केलेले बोस्टन विद्यापीठाचे प्राध्यापक तिमोथी लाँगमन यांचे 'ख्रिश्चॅनिटी ऍंड जेनोसाईड ऑफ रवांडा' हे पुस्तक होय. त्यात प्रा. तिमोथी लाँगमन यांचे स्पष्ट मत आहे की, ख्रिश्चन चर्चने वसाहतीसाठी जे प्रचाराचे धोरण ठरविले, तेच या नरसंहाराला कारण आहे. ज्या पध्दतीने चर्चने समाजातील निरनिराळे संबंध हाताळले, त्याचा परिणाम नरसंहार होण्यात झाला. अजूनही रवांडामध्ये या नरसंहाराच्या अनेक जखमी खुणा आहेत. त्यात तेथील सरकारने राखून ठेवलेले एक उद्ध्वस्त चर्च महत्त्वाचे मानले जाते. त्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या तुत्सी समाजाच्या लोकांवर पहिला हल्ला झाला व बघता बघता तेथे प्रेतांचा सडा पडला, अशी माहिती पुढे आली आहे. या नरसंहाराच्या शेकडो नव्हे, तर हजारो खुणा अजूनही तेथे जिवंत आहेत. अनेकांवर तेथे खटले सुरू आहेत. त्यात मोठया प्रमाणावर चर्च पदाधिकारी आहेत.

सध्या आफ्रिकेतील सर्व बिशप संघटनेने याबाबत जी क्षमायाचना केली आहे, ती प्रामाण्ािक आहे का? असा एक मुद्दा सध्या उपस्थित झाला आहे. त्याचे कारण म्हणजे, गेले वर्षभर कॅथलिक संघटनेने 'ज्युबिली ऑफ मर्सी' असे वर्ष जाहीर केले होते. त्याला 'दया महोत्सव' किंवा 'दयायाचना महोत्सव'ही म्हटले जाते. आपल्याकडून कळत-नकळत जर काही अपराध झाले असतील, तर परमेश्वराने कृपावंत होऊन दया दाखवावी आणि क्षमा करावी, असा त्या महोत्सवाचा हेतू असतो. पोप फ्रान्सिस यांनी दि. 8 डिसेंबर 2015 ते 20 नोहेंबर 2016 या दरम्यान 'ज्युबिली ऑफ मर्सी' असे वर्ष जाहीर केले होते. प्रत्येक मोठया चर्चमध्ये एक पवित्र दार असते. ते या निमित्ताने उघडण्यात येते. पोप यांच्या आदेशानुसार - पेपल बुलनुसार ते सुमारे एक वर्षपर्यंत उघडे ठेवण्यात आले होते. व्हॅटिकनमधील मुख्य मोठे चर्च म्हणजे सेंट पीटर्स बसालिका येथील हे मोठे दार एक वर्षपर्यंत उघडेच होते. त्यातून सुमारे एक कोटी भाविकांनी प्रवेश करून क्षमायाचनेच्या प्रार्थना केल्या. जगभराच्या सर्व कॅथलिक धर्मप्रांतांतील चर्चमध्ये हे क्षमायाचना महोत्सव झाले. कळत-नकळत घडलेल्या अपराधाबाबत परमेश्वराने क्षमा करावी, असे विधी बहुतेक धर्म आणि पंथ यामध्ये असतात. दहा लाखांच्या नरसंहाराला हा लागू होतो का? हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दहा लाखाचा नरसंहार हा एखाद्या छोटया-मोठया लढाईचाही परिणाम असतो. दुसरे असे की, एक नरसंहार हा दीर्घकालीन परिणाम असतो. एका गटास दुसऱ्या गटावर परिणाम करायचा असेल, तर अन्य कोठे तरी असे नरसंहार घडवूनही तो करता येतो. रवांडा येथे झालेल्या नरसंहाराचा परिणाम केवळ आफ्रिका खंडावर तर झालाच, तसाच तो साऱ्या जगावरही झाला. या लोकांच्या वाटेला गेलो, तर त्याचा असा व्यापक परिणाम होतो, हे एकदा कळले तरी बाकीचे मित्र आणि शत्रूही सावध होतात. अर्थात, रवांडामधील घटनेची साऱ्या जगाने त्याच पध्दतीने दखल घेतली. भारताच्या दृष्टीने ती घटना अधिक महत्त्वाची आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या वेळी आफ्रिकेमध्ये जेव्हा हे मोठे नरसंहाराचे कृत्य सुरू होते, तेव्हा भारतातही त्याच पध्दतीचा एक नरसंहार सुरू होता. त्याचे संघटनही त्याच लोकांकडे होते. दुसरे असे, की युरोपातील वसाहती हाताळणाऱ्या ज्या मोठया संघटना किंवा शक्ती आहेत, त्यात एक म्हणजे ब्रिटिश आणि दुसरे म्हणजे कॅथलिक चर्च. या दोन्ही शक्तींच्या संघटितपणे कारवाया झालेला मोठा प्रदेश म्हणजे भारत होय. दक्षिण भारतातील तामिळ प्रदेश हा स्वतंत्र म्हणून फुटून निघावा, असा या दोन शक्तींचा गेली तीनशे वर्षे सुरू असलेला प्रयत्न आहे आणि तो अजूनही सुरू आहे. तामिळ सिंहलीवाद हा त्याचाच भाग आहे. आणखी एक गोष्ट अशी की, आजपर्यंतचा या पाश्चात्त्य शक्तींचा अनुभव घेतला तर रवांडाचा नरसंहार हा पहिला नव्हे व कदाचित तो शेवटचाही नव्हे. भारत हे पाश्चात्त्य देशांचे पहिले व सर्वात मोठे लक्ष्य असल्याने जगात या लोकांनी केलेल्या प्रत्येक घटनेची दखल भारताला घ्यावीच लागणार आहे.

'जुबिली ऑफ मर्सी' या संदर्भात जगात घडलेल्या घटना आणि रवांडामध्ये घडलेल्या घटना यांचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे. रवांडामधील कॅथलिक बिशप संघटनेने गेल्या आठवडयात एक पत्र जारी केले आहे. त्यात त्यांनी क्षमायाचनेबाबत चौदा कलमे दिली आहेत. त्यांचे म्हणणे असे की, जरी त्या नरसंहारात चर्चचा कोणीही पदाधिकारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी नसला, तरी आम्ही याबाबत क्षमायाचना करीत आहोत. आज प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती आहे की, अजूनही त्यांच्यावरील याबाबतचे खटले संपलेले नाहीत आणि त्यात मोठया प्रमाणावर चर्च पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते यांचा समावेश आहे. रवांडा येथील बिशप परिषदेच्या वतीने बिशप फिलिप रुकांबा यांनी म्हटले आहे की, येथील जनतेने आम्हाला दया दाखविल्याखेरीज आम्ही क्षमायाचनाही करणे बरोबर ठरणार नाही. याबाबत रवांडामधील त्या वेळची स्थिती अशी होती की, तेथे हुतू आणि तुत्सी असे दोन प्रमुख समाज आहेत. त्यातील तुत्सी समाज प्रभावी होता. त्यामुळे चर्चच्या वर्चस्वाला आव्हान मिळाले होते. त्यामुळे चार-पाच वर्षे प्रयत्न करून दोन्ही समाज बाजूला केले गेले व हळूहळू तुत्सी समाजावर नियंत्रित हल्ले झाले. यात प्रत्यक्ष किती नरसंहार झाला, हाही दोन मते असलेला विषय आहे. त्यात तुत्सी समाजाचे आठ लाख व हुतू समाजाचे दोन लाख लोक असावेत, असा सर्वसाधारणपणे मतैक्य झालेला आकडा आहे. इ.सन 1994मध्ये झालेल्या घटनेनंतर सहाजिकच हुतू समाजाच्या नेत्यांचे शासन आले, तरीही ही सारी कृष्णकृत्ये चर्च संघटनांनीच घडविली, अशीच चर्चा पुढे आली. यात टिप्पणी करण्याचा सर्वात अधिक अधिकार हा त्यावर व्यापक संशोधन केलेले तेथील समाजशास्त्रज्ञ बेनोइत गुल्लो यांचा मानला जातो. त्यांनीही बहुतेक निर्देश चर्च संघटनांकडेच केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने - म्हणजे युनोने या संदर्भात जी माहिती दिली आहे, त्यात हा नरसंहार हा आठ लाखाचा असल्याचे म्हटले आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवाडाही झाला आहे. त्यात चर्च पदाधिकाऱ्यांना श्ािक्षाही झाल्या आहेत. श्ािक्षा झालेल्यांची दयायाचना प्रकरणे निलंबित आहेत. पुन्हा या आठवडयात प्रसारमाध्यमांचा हा विषय होण्याचे कारण म्हणजे दि. 20 नोव्हेंबर रोजी - म्हणजे पोपने जाहीर केलेल्या 'जुबिली ऑफ मर्सी'च्या वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी रवांडा येथील बिशप परिषदेने जाहीर दयायाचना केली. याबाबत बिशप परिषदेचे म्हणणे असे की, यापूर्वी इ.सन 2001मध्येही त्या वेळचे पोप जॉन पॉल दुसरे यांनीही असेच 'जुबिली ऑफ मर्सी'चे वर्ष जाहीर केले होते. त्या वेळी 'त्या वेळेपर्यंतच्या सर्व अपराधांबद्दल' अशीच क्षमायाचना केली होती. त्यात रवांडा येथील किगालीच्या अमहोरो स्टेडियमवर वीस हजारांच्या उपस्थितीत नऊ बिशपांनी ही जाहीर क्षमायाचना केली होती. याबाबत बिशप रुकांबा यांनी केलेली टिप्पणी अशी की, आम्ही या वर्षी 'जुबिली ऑफ मर्सी' जाहीर झाल्याने या वर्षी क्षमायाचना केली अण्ाि इ.सन 2019मध्ये त्या घटनेला 25 वर्षेर् पूण होणार असल्याबद्दल पुन्हा क्षमायाचना करणार आहोत. व्हॅटिकन यंत्रणेचा क्षमायाचनेचा हा प्रकार बघितला, तर तो फक्त उपचार आहे हे स्पष्ट होते. त्यामागे पश्चात्ताप नाही, हे तर स्पष्टच आहे. जर तो पश्चात्ताप खराच असता, तर त्या नरसंहाराच्या भरपाईचा मुद्दा पुढे आला असता. नरसंहारात गेले ते गेले असे मानले, तरी ज्यांचे संसार विस्कटले, त्यांच्यापुढे तर उर्वरित ख्रिश्चन विश्वाने भरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवला असता.

रवांडा व बुरुंडी हे देश तसे छोटे देश आहेत. आपल्याकडील दोन-तीन जिल्ह्यांच्या आकाराचे. या भागातील ख्रिश्चन साम्राज्याच्या दृष्टीकोनातून या भागाचे महत्त्व फारच वाढले आहे, ते म्हणजे हा भाग हा सबसहारा प्रदेशात येतो. तेथे ख्रिश्चन संघटनांनी लोकसंख्यावाढीचा एक व्यापक कार्यक्रम राबवला आहे. गेल्या शंभर वर्षांत तेथे ख्रिश्चन संघटनांनी एेंशी ते नव्वद पट लोकसंख्या वाढविली आहे. इ.सन 1901 ते 2001 या काळात साऱ्या जगातील लोकसंख्या पाचपट वाढली. पण जगातील हा असा प्रदेश आहे की, तेथील लोकसंख्या 65 लाखावरून 55 कोटी झाली. गेल्या पंधरा वर्षांतील आकडे आणखी धक्कादायक आहेत. तेथील लोकसंख्यावाढीचा दर प्रत्येक कुटुंबामागे पाच ते सहा अपत्ये असा आहे. युरोपातून आणि अमेरिकेतून येणाऱ्या धान्याचे आणि तेलाचे डबे याच्या वितरणावरच हा समाज अवलंबून असतो. दहा लाखाचा नरसंहार हा जगातील मोठया नरसंहारात मोडणारा नरसंहार आहे. अमेरिकेत, आश्ाियात आणि ऑस्ट्रेलियात गेल्या पाचशे वर्षांत असे जेवढे म्हणून नरसंहार झाले, त्यांची अजून पुरेशी नोंदही झालेली नाही. अमेरिका व ऑस्ट्रेलिया हे दोन खंड असे आहेत की, जेथे पाचशे वर्षांपूर्वी एकही श्वेर्तवणीय नव्हता. तेथे आज त्यांचे वर्चस्व आहे. हे सारे वर्चस्व नरसंहाराने झाले आहे हे विसरता येणार नाही.  आफ्रिकेतूनही किती गुलाम नेले व त्यासाठी काय काय केले, हेही जगाने पाहिले आहे.

गेल्या तीस-चाळीस वर्षांत पाकिस्तानच्या पुढाकाराने जगात पुन्हा जेहादी दहशतवादाचे एक पर्व सुरू झाले आहे. त्यातूनच अफगाण्ािस्तानातील ओसामा बिन लादेन आणि आता इराकमधील अल बगदादी किंवा इसिस यांच्या कारवाया जगासमोर दिसत आहेत. त्यातून जगात एक भास निर्माण होत आहे की, जगातील जीवघेणा दहशतवाद फक्त मध्य आश्ाियातूनच येतो. त्यापूर्वीच्या पाचशे वर्षांच्या युरोपीय दहशतवादाकडे त्यामुळे दुर्लक्ष होते. या पुढील काळात स्वाभिमानाने उभे राहू इच्छिणाऱ्या देशांनी या दोन्ही दहशतवादांची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे.

9881717855