कालिदास महोत्सवाचे भरगच्च आयोजन

विवेक मराठी    12-Dec-2016
Total Views |

संत्रानगरीच्या गुलाबी थंडीत रंगले सूर

गुरु-श्ािष्य परंपरेचा सार्थ वारसा मिळालेल्या आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून 'गुरुर्देवो महेश्वरा' ही श्ािकवण दिली जात आहे.  आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आणि विशेषत: कलेच्या क्षेत्रात अर्धनारीनटेश्वर अर्थात महेश्वराचे पूजन केले जाते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कालिदास समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कालिदास समारोहात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य आणि साहित्यातील सूर-ताल-लयीच्या लाटांवर ख्यातनाम कलाकारांनी नागपूरकरांना सफर घडवून आणली. 'गुरु-श्ािष्य परंपरा' ही यंदाच्या कालिदास समारोहाची संकल्पना, तर 'गुरुर्देवो महेश्वरा' हे उत्सवाचे ब्रीद होते.


गुरु-श्ािष्य परंपरेचा सार्थ वारसा मिळालेल्या आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून 'गुरुर्देवो महेश्वरा' ही श्ािकवण दिली जात आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आणि विशेषत: कलेच्या क्षेत्रात अर्धनारीनटेश्वर अर्थात महेश्वराचे पूजन केले जाते. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ' आणि 'कालिदास समारोह समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कालिदास समारोहात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य आणि साहित्यातील सूर-ताल-लयीच्या लाटांवर ख्यातनाम कलाकारांनी नागपूरकरांना सफर घडवून आणली. 'गुरु-श्ािष्य परंपरा' ही यंदाच्या कालिदास समारोहाची संकल्पना, तर 'गुरुर्देवो महेश्वरा' हे उत्सवाचे ब्रीद होते.

महाविदर्भाची रामटेकमधील वाकाटकांची राजधानी नंदीग्राम अर्थात आताच्या नगरधनमध्ये कालिदास समारोहाचे उद्घाटन झाले. प्रसिध्द पखवाजवादक गुरू  पं.भवानी शंकर आणि पुत्र व श्ािष्य उमाशंकर यांनी श्ािवावर आधारित पखवाजवादनाने आणि गायनाने या समारोहाची सुरुवात झाली. तत्पूर्वी, नागपूरचे चैतन्य बालपांडे यांच्या श्ािवस्तुती सुमन आणि र्'दशन देव शंकर महादेव' या यमन रागातील बंदिशीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सत्रात कुचिपुडी नृत्यांगना डॉ. राजा रेड्डी आणि राधा रेड्डी यांच्या कन्या यामिनी व भावना रेड्डी यांच्या गणेशस्तुतीने नृत्याविष्काराला सुरुवात झाली.


महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जगविख्यात संतूरवादक पं. श्ािवकुमार शर्मा यांचे पुत्र आणि श्ािष्य पं. राहुल शर्मा यांनी राग यमन वाजवून मैफिलीला सुरुवात केली. सभागृहातून केवळ 'वाहवा' आणि 'क्या बात है' असेच ध्वनी ऐकू येत होते. त्यांना पखवाजवर पं. भवानी शंकर यांनी, तर तबल्यावर पं. रामकुमार मिश्रा यांनी संगत केली. खच्चून भरलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रंगलेल्या या मैफलीच्या पहिल्या टप्प्यात पं. राहुल शर्मा यांनी रूपक तालात आणि खास नागपूरकरांच्या आग्रहास्तव प्रसिध्द पहाडी राग वाजवून कौतुकाची वाहवा मिळविली. संतूरवर, पखवाजवर आणि तबल्यावर कलाकारांची बोटे विद्युत्गतीने थिरकत होती आणि त्यांच्या मोहक सुरावटींनी रसिकांना पुरते मोहित केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील 'सिर्फ नाम ही काफी है' अशी ओळख असणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि श्ािष्या कलापिनी कोमकली यांनी शास्त्रीय गायनातील काही रचना सादर केल्या. स्वत: कुमार गंधर्वांनी विस्तृत केलेल्या केदार रागातील, विशेषत: श्ािवकेदार रागातील रचना गाऊन त्यांनी रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. ध्यानमग्न शंकराचे ध्यान भंग झाले, कारण गोकुळात कृष्णाचा जन्म झाला, अशा अर्थाची रचना सादर करून त्यांनी वातावरण भारावून टाकले. परस्परांना दाद देण्याच्या कलाकारांच्या शैलीचा नागपूरकरांनी आस्वाद घेतला.

'हरी'श्ािष्या वाजविता पावा... अशी उक्ती रसिकांकडून वदवून घेणाऱ्या, 'फ्ल्यूट सिस्टर्स'ने कालिदास समारोहाच्या तिसऱ्या दिवशी, आपल्या बासरीवादनाने कानसेनांना तृप्त केले. देबप्रिया आणि सुचिस्मिता चॅटर्जी या दोघी सख्ख्या बहिणी असून 'फ्ल्यूट सिस्टर्स' म्हणून ओळखल्या जातात. बासरी श्ािकण्याचे वडिलांचे स्वप्नर् पूण करण्यासाठी दोघींनी आधी पं. भोलानाथ प्रसन्न आणि नंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून बासरीवादनाचे श्ािक्षण घेतले असून अलाहाबादच्या प्रयाग संगीत समितीतून पदवी घेतली आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या श्ािष्या देबप्रिया आणि सुचिस्मिता चॅटर्जी या'फ्ल्यूट सिस्टर्स' ने सायंकाळ गाजविली. त्यांच्या सुश्राव्य कलाविष्काराला युवा तबलावादक ओजस अडिया यांनी दमदार साथसंगत करीत रसिकांची वाहवा मिळविली. महाराष्ट्रातील चिखली इथे जन्मलेले ओजस अढिया हे दैवी वरदान असलेले तबलावादक म्हणून ओळखले जातात. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी उस्ताद मृदंगराजजी यांचे गंडाबंद शाग्ािर्द म्हणून लौकिक मिळविला. फ्ल्यूट सिस्टर्सनी बागेश्री रागाने सादरीकरणाला सुरुवात करून रसिकांना सूरमयी विश्वाची सैर घडवून आणली. त्यानंतर, दक्षिण भारतीय संगीतातील हंसध्वनी राग सादर केला. प्रथमच एकत्रित सादरीकरण करणाऱ्या देबप्रिया, सुचिस्मिता आणि ओजस या तिन्ही युवा कलाकारांना रसिकांची मनमोकळी दाद मिळाली. भारावलेल्या श्रोत्यांवरील मोहिनी कायम ठेवत या कलाकारांनी मिश्र पिलू रागातील धून सादर केली. दरम्यान, जगविख्यात कर्नाटकी शास्त्रीय संगीत गायक एम.बालमुरलीकृष्णन यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त येताच, सभागृहातील रसिकांनी मौन पाळून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.


कालिदास समारोहाच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या टप्प्यात थिरुवनंतपुरम्च्या नृत्यचुडामणी ही पदवी मिळालेल्या डॉ. नीना प्रसाद यांनी मोहिनीअट्टममधील 'चौल अट्ट' सादर केले. त्यांना मृदंगावर रमेशबाबू के.पी. यांनी, तर वीणेवर मुरलीकृष्णा आणि इडक्या वाद्यावर के. अरुण दास यांनी संगत केली. माधवन नंबीदुराई यांनी गायन केले. या दोन्ही सादरीकरणांना नागपूरकरांनी टाळयांच्या कडकडाटात जबरदस्त प्रतिसाद दिला. भरतनाटयम, कुचिपुडी, मोहिनीअट्टम आणि कथकली या शास्त्रीय नृत्यप्रकारांमध्ये प्रावीण मिळविलेल्या डॉ. नीना प्रसाद यांना कोलकात्याच्या रबींद्र भारती विद्यापीठाने 'दक्षिण भारतीय नृत्यप्रकारांमध्ये तांडव आणि लास्य संकल्पनांचे महत्त्व' या विषयावरील शोधनिबंधासाठी डॉक्टरेट प्रदान केली आहे.

कलेचे आराध्य दैवत असणाऱ्या श्ािवाच्या नृत्याचे प्रतीक म्हणजे कथ्थक. याच कलेतील नावाजलेल्या कलाकार शमा भाटे यांच्या श्ािष्यांनी कालिदास समारोहाच्या समारोपीय कार्यक्रमात कथ्थक नृत्य सादर केले. कालिदास महोत्सवात त्यांनी आपल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली.

समारोहाच्या चौथ्या आणि अंतिम दिवसाची सुरूवात ग्ािरीजा देवी यांचे श्ािष्य राहुल आणि रोहित मिश्रा याच्या गायनाने करण्यात आली. राग भूपालीतील 'सुधे बोलत...' या बंदिशीने त्यांनी आपले सादरीकरण सुरू  केले. त्यानंतर त्यांनी पं. शामदास मिश्र यांची ठुमरी, टप्पा, दादरा, चैती आणि भजन सादर केले. त्यांना तबल्यावर आश्ािष मिश्रा, संवादिनीवर संदीप गुरनुले आणि सारंगीवर सरवर हुसैन यांनी साथ केली. त्यांनी पं. बालमुरलीकृष्णन यांना हे सादरीकरण समर्पित केले.

समारोहाचा दुसरा टप्पा रंगला तो शमा भाटे यांच्या श्ािष्यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याने. 'तनो तुना: श्ािव श्ािवम' या संकल्पनेवर हे नृत्य सादर करण्यात आले. राग तोडीतील श्ािववंदनेने बहारदार नृत्यास प्रारंभ करण्यात आला. नृत्यांच्या माध्यमातून त्यांनी राग केदारमधील चतुरा, दाक्षपण आणि प्रतियोग्ािता सादर करण्यात आली. अमिशा पाटणकर, अवनी गद्रे, कृपा तेंडुलकर, श्ािवानी करमरकर, शांभवी कुर्ळकणी आणि आर्या श्ार्िपणा या श्ािष्यांनी नृत्य सादर केले. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके, आशय कुर्ळकणी, सतारीवर प्रसाद राहणे, संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर यांनी साथ केली. हृषीकेश बडवे, विनय रामदासन आणि स्वत: शमा भाटे यांनी गायन केले.

तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पद्मश्री पं. अजय चक्रवर्ती यांनी गायन केले. प्रारंभी झालेल्या दोन कार्यक्रमांना 'चार चाँद' लावणारे त्यांचे सादरीकरण होते. त्यांना तबल्यावर शौमिल सरकार, संवादिनीवर गौरव चॅटर्जी आणि तंबोऱ्यावर ब्रिजेश्वर मुखर्जी आणि सारंग भट यांनी साथसंगत केली.

हेरिटेज फोटोग्राफी प्र्रदशन

कालिदास समारोहानिमित्त पूर्व विदर्भाचे छायाचित्रात्मकर् दशन घडविणाऱ्या हेरिटेज फोटोग्राफी प्र्रदशनाचे आयोजन करण्यात आले. कालिदास समारोह आयोजन समितीच्या अर्ंतगत फोर्थ डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लब नागपूर आणि चिटणवीस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व विदर्भाच्या संपन्न ऐतिहासिक वारशाचेर् दशन घडविणाऱ्या हेरिटेज फोटोग्राफी प्र्रदशनाचे आयोजन कालिदास महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते चिटणवीस केंद्रातील रंगायन सभागृहातील या प्र्रदशनाचे उद्घाटन करण्यात आले. हेरिटेज छायाचित्र प्र्रदशनाच्या माध्यमातून जनतेला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांची माहिती व्हावी, 1700 वर्षांपूर्वीचा इतिहास आणि गोंड राजे ते भोसलेकालीन संस्कृतीचा ठेवा या माध्यमातून अभ्यासता यावी, तसेच पर्यटनालाही चालना मिळावी हा मुख्य उद्देश होता. विदर्भात बऱ्याच वास्तू रामायण व महाभारतकाळापासून असून अशा वास्तूंचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करताना पर्यटन विकास महामंडळ पुढाकार घेणार आहे.

या प्र्रदशनात विदर्भातील पांडवगुहा, मोहाडी, नागभीड, विजासन गुहा, भद्रावती, भटाळा नृसिंह, श्ािल्प, अर्पित लेणी, भटाळा माण्ािकगड व्हिला, भोंडा श्ािवमंदिर, भटाळा सिध्देश्वर मंदिर, राममंदिर रामटेक, कपूरबाहुली, चोरबाहुली, पांडेवाडा भंडारा, पवनी घाट, तटबंदी पवनी, कचारगड गुहा, जुनी विहिर भंडारा, श्ािलालेख, मार्कंडेश्वर श्ािवमंदिर, अंचलेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, जलमहल, वीरशहाची समाधी, मोठा भोसले वाडा, कालीकर मंदिर, तुलसीबाग महल असे अनेक ऐतिहासिक ठेव्यांची छायाचित्रे आहेत. या प्र्रदशनात फोर्थ डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लबच्या संगीता महाजन यांच्यासह 22 हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या 190 छायाचित्रांचा समावेश होता. त्यात विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली येथील निवडक 40 स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून विदर्भाच्या वैभवसंपन्न वास्तुकलेचेर् दशन या प्र्रदशनातून घडले.

 ''श्ािक्षण व्यवस्था भारतीय संस्कृतीला पूरक नाही'' -

युवा लेखक अमिश त्रिपाठी

''भारतीय ज्ञानाचा उत्सव साजरा करायला हवा. संस्कृती हीच आपली ओळख आणि अभिमान आहे. पण, सध्याची श्ािक्षण व्यवस्था भारतीय संस्कृतीच्या मूळ ज्ञानापासून दुरावलेली आहे. म्हणूनच आपल्या परंपरा आणि संस्कृतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये अनास्था दिसून येते. आपला देश एकमेवाद्वितीय असून स्वत:तील देवत्वाला ओळखण्याची गरज आहे,'' असे प्रखर मत ख्यातनाम युवा लेखक अमिश त्रिपाठी यांनी व्यक्त केले. कालिदास समारोहाची यंदाची संकल्पना गुरू-श्ािष्य परंपरेवर आधारित असल्याने 'नवी पिढी आणि श्ािव संकल्पना : मी श्ािवा ट्रायोलॉजी का लिहिली?' या विषयावर अमिश यांनी साहित्य रसिक नागपूरकरांशी संवाद साधला. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात 'मेलुहा','नागाज' आणि 'वायुपुत्राज' या तिन्ही गाजलेल्या पुस्तकांचे लिखाण करणाऱ्या अमिश यांनी ''क्रांतिकारक विचार हीच आपली संस्कृती आणि सांस्कृतिक लोक हीच आपली शक्ती आहे'' असे प्रतिपादन केले.

9850339240