विदर्भातील अष्टविनायक

विवेक मराठी    19-Dec-2016
Total Views |

सामान्यत: पुणे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या गावातील या आद्यदैवतांना 'अष्टविनायक' या संज्ञेने संबोधिले जाते. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातही विनायकाची स्थाने असून त्यातील निवड आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. दंडक राजाची कर्तृत्वभूमी असलेल्या विदर्भाला 'दंडकारण्य' असे संबोधिले जाते. इतिहासाचा आणि प्राचीन श्ािलालेखांचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातही वाकाटक साम्राज्याच्या काळापासून श्रीगणेशाची उपासना होत असल्याचा दाखला मिळाला. विदर्भातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने या अष्टविनायक देवस्थानांचा विकास करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे.
ष्टविनायक म्हणताच काही विश्ािष्ट स्थळांचे माहात्म्य स्मरते. सामान्यत: पुणे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या गावांतील या आद्यदैवतांना 'अष्टविनायक' या संज्ञेने संबोधिले जाते. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातही विनायकाची स्थाने असून त्यातील निवडक आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. प्रवासासाठी पुरेशा संधी नसतानाच्या काळात, प्रत्येक भागात गणपतीची देवस्थाने निर्माण झाली आणि स्थलकालसापेक्ष त्यांचा विकास होत गेला. जे स्थान आपल्याला तुलनेने जवळ आणि सोयीचे असेल, तिथेच देर्वदशनाला जाण्याचा प्रघात असल्याने प्रत्येकच देवस्थानाला स्वत:चे स्वतंत्र असे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दंडक राजाची कर्तृत्वभूमी असलेल्या विदर्भाला 'दंडकारण्य' असे संबोधिले जाते. इतिहासाचा आणि प्राचीन श्ािलालेखांचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातही वाकाटक साम्राज्याच्या काळापासून श्रीगणेशाची उपासना होत असल्याचा दाखला मिळाला. विदर्भातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने या अष्टविनायक देवस्थानांचा विकास करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. या लेखाच्या माध्यमातून विदर्भातील बाप्पाच्या या आठ ठिकाणांची संक्षिप्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

वरद विनायक अर्थात टेकडीचा गणपती

वैदर्भीय अष्टविनायकांमध्ये नागपूरच्या वरद विनायकाचा अर्थात टेकडीच्या गणपतीचा समावेश होतो. शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर असलेल्या या देवस्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. रघुजी भोसले यांच्या कार्यकाळात नागपूरला राजधानीचा दर्जा मिळाला. भोसल्यांनी जुम्मा तलाव अर्थात आताच्या गांधीसागर तलावाजवळ राजवाडा बांधण्याचे काम सुरू केले. यासाठी लागणारा काळा बॅसॉल्ट दगड मिळविण्यासाठी सीताबर्डीतील टेकडीचे खोदकाम सुरू झाले. याचदरम्यान, प्राचीन हेमाडपंती मंदिराचे अवशेष आणि याच अवशेषात सध्या प्रतिष्ठापित गणेशमूर्तीही सापडल्याची मान्यता आहे. ही मूर्ती बाराव्या शतकात यादव राजांच्या कार्यकाळातील असून ती स्वयंभू आहे. गजाननाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे विशेष! क्रिकेट विक्रमादित्य आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिराच्या परिसरात आता मोठया प्रमाणावर विकास करण्यात आला असून सामाजिक कार्यांसाठीही देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग करण्यात येतो. वड-पिंपळाच्या महाकाय वृक्षांनी टेकडीचा परिसर समृध्द आहे. आजवरच्या कोणत्याही शासकीय गॅझेटियरमध्ये या मंदिराचा समावेश नाही.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर

स्वामी विघ्नेश गणेश - आदासा

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात विघ्नेश गणेशाचे स्थान आहे. आदासा गावानजीक असलेल्या या गणेशमंदिराचे बांधकाम पाषाणाचे आहे. या परिसरात महादेव, भैरव आणि हनुमंतासह इतर दैवतांचीही मंदिरे आहेत. त्यासोबतच, काही बांधकामांचे भग्नावशेषही परिसरात विखुरलेले आहेत. स्थानिक हस्तकलांची आणि इतर उत्पादनांची बाजारपेठ मंदिर परिसरात तयार झाली आहे. मंदिरातील भव्य मूर्ती 4 मीटर उंचीची असून त्यावर शेंदुराचा जाड थर आहे. मूर्ती नृत्याच्या मुद्रेतील असून संधारा प्रकारची आहे. परिसरात बारा ज्योतिर्लिंगही मांडण्यात आले आहेत. वामन पुराणात या गावाचे नाव अदोष क्षेत्र असे आढळते. गाणपत्य संप्रदायाच्या भाविकांसाठी या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. जवळच असलेले 'प्रति पंढरपूर' अर्थात धापेवाडा क्षेत्र आणि ताजुद्दीन बाबांचे वाकी क्षेत्रही पर्यटकांमध्ये विशेष प्रसिध्द आहे.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.


अष्टादशभुजा गणेश - रामटेक

नागपूरपासून 47 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक या तीर्थक्षेत्री अठरा हात असलेल्या श्रीगणेशाचे प्राचीन मंदिर आहे. साधारण दीड मीटर उंचीची गणेशमूर्ती पद्मासनात बसलेली आहे. सर्व अठरा हातांमध्ये विविध आयुधे असून सोंड उजवीकडे वळलेली आहे. या मंदिराच्या देवस्थानाअर्ंतगत 350 एकर जमीन आहे.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.

भ्रुशुंड गणेश - मेंढा, भंडारा

भंडारा शहरापासून 61 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महार्माग क्रमांक 6वर मेंढा हे उपनगर आहे. या भागाचे प्राचीन नाव शांडिल्यग्राम असल्याचा उल्लेख आढळतो. गणेशमूर्ती साधारण अडीच मीटर उंच आणि दीड मीटर रुंद असून तिला ॠषि-मुनींप्रमाणे दाढीमिशा असल्याचे दिसते. मूर्तीवर भरपूर शेंदूर असल्याने बारकावे दिसत नाहीत. उंदरावर गणेश वामललितासनात विराजमान असून सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचा इतिहास काही दुर्मीळ पुस्तकांमध्ये आढळतो.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडाऱ्याहून सतत बससेवा उपलब्ध.

पंचानन विघ्नराज गणपती - पवनी

भंडारा शहरापासून 50 आणि नागपूरहून 87 किलोमीटर अंतरावर, केवळ विदर्भाच्याच नव्हे, तर सर्ंपूण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन स्थळ असा लौकिक असलेले पवनी हे स्थळ आहे. घरगुती वाटावे असे गणेशाचे मंदिर असून एकाच पाषाणात पाच गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीवर शेंदुराची खोळ असल्याने बारकावे स्पष्ट दिसत नाहीत. या मंदिराश्ािवाय पवनी गावात विविध ठिकाणी इतर दैवतांची मंदिरेही असून पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे. सम्राट अशोकाच्या शासनकाळात बांधलेला आणि ह्युआन त्सँगच्या पुस्तकात उल्लेख असलेला स्तूपदेखील अभ्यासनीय आहे.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर आणि भंडारा येथून सतत बससेवा उपलब्ध.

वरद विनायक गौराळा - भद्रावती, चंद्रपूर

नागपूरपासून 130 किलोमीटर अंतरावर भांदक (प्रचलित नाव भद्रावती) असून टेकाडावर श्रीगणेशाचे मंदिर आहे. टेकडीवर उभे राहिल्यास डावीकडेर् विष्ण आणि अजवीकडे यक्षमूर्ती दिसते. मुख्य मंदिरात 16 स्तंभ असून उमामहेश्वराची मूर्ती आहे. काही वर्षांपूर्वी मंदिर कोसळले आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने पुन्हा त्याची उभारणी करण्यात आली. अडीच मीटर उंच आणि 1.10 मीटर रुंदीच्या या मूर्तीवरही शेंदुराचे थर असून मंदिर परिसरात मोठया संख्येने प्राचीन मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. त्यापैकी काही नागपूरच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मूर्तीच्या दोन्ही हातात मोदकपात्रे आहेत. ही मूर्ती वाकाटकांच्या काळातील असावी, असा अंदाज आहे.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, चंद्रपूर, बल्लारशा, नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, वरोरा आणि चंद्रपूरहून सतत बससेवा उपलब्ध.

चिंतामणी गणेश - कळंब

नागपूर-यवतमाळ राज्य महार्माग क्रमांक 3वर यवतमाळपासून 20 किलोमीटर अंतरावर कदंबपूर असे प्राचीन नाव असलेले हे देवस्थान आहे. सर्व चिंतांपासून मुक्ती करणारा गणेश असे या स्थानाचे माहात्म्य आहे. जमिनीच्या आत 10 मीटर अंतरावर असलेल्या या मंदिराभोवती गूढतेचे वलय आहे. मूर्तीवर शेंदुराची खोळ असून डोळे आणि इतर बारकावे दिसू शकतात. मंदिरात असलेल्या विहिरीच्या पाण्याचे औषधी गुणधर्म असून सर्व त्वचाविकारांवर ते औषध म्हणून वापरले जाते. दर बारा वर्षांनी पाण्याची पातळी वाढून श्रीगणेशाच्या मूर्तीच्या पायापर्यंत येते आणि मग पाणी उतरू लागते, अशी मान्यता आहे.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.

एकचक्र सिध्दिविनायक - केळझर, वर्धा

नागपूर-वर्धा राष्ट्रीय महार्माग क्रमांक 3वर वर्धा जिल्ह्यात केळझर देवस्थान असून मोगलांच्या काळात या गावाला विशेष महत्त्व आले. गोंड राजा कोकशाहकडून खंडणी वसूल करण्यासाठी मोगलांच्या सैन्याचे मुख्यालय केळझरमध्ये असल्याचे संदर्भ ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतात. महाभारतातील बकासुराच्या संदर्भात केळझरचा उल्लेख सापडतो. अलीकडच्या काळापर्यंत गणेशाच्या मंदिरात रेडयाचा बळी देण्याची प्रथा सुरू होती. मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. साधारण सव्वा मीटर उंचीची गणेशमूर्ती शेंदूरव्याप्त आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून इतर बारकावे शेंदुरामुळे दिसत नाहीत. ही मूर्ती नृत्याच्या मुद्रेत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

जवळचे विमानतळ : नागपूर

जवळचे रेल्वेस्थानक : वर्धा, बडनेरा, अमरावती, नागपूर

जवळचे बसस्थानक : नागपूर, वर्धा, यवतमाळहून सतत बससेवा उपलब्ध.

9850339240