दक्षिण अमेरिकेला करायचे आहे ख्रिश्चन विश्वाचे नेतृत्व

विवेक मराठी    27-Dec-2016
Total Views |

श्वेर्तवणीय युरोपीयनांनंतर महासत्ता होण्याची स्वप्ने बघणाऱ्या या भूभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. जरी सध्या युरोप व अमेरिका यांचे महासत्तापण अजूनही गेले नसले, तरी त्यात विस्कळीतता आली आहे. ब्रिटन ब्रिक्समधून बाहेर पडला आहे. युरोपमधील अन्य देश आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. अमेरिकेने ट्रंपना निवडून देऊन पारंपरिक राजकारणच नाकारले आहे. औद्योग्ािक क्षेत्रातील या मंडळींची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. माहिती तंत्रज्ञान व संशोधन यात त्यांचा वरचश्मा राहिलेला नाही. याचबरोबर ख्रिश्चन धर्म सोडण्याची त्सुनामी याच प्रदेशात आहे. याचा अर्थ गेली दोन-तीन शतके महासत्ता असलेले हे देश संपले असे नाही, पण त्यात विस्कळीतता निश्चितच आली आहे.
ध्या जगभर ख्रिश्चन धर्मीयांत तो धर्मच सोडण्याचे जे वादळ आले आहे, त्याचे प्रत्येक खंडातील स्वरूप स्वतंत्र आहे. या वादळाचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. एक म्हणजे जगातील श्वेर्तवणीय म्हणून जेवढा हा समाज आहेत, त्यात हे वादळ आहे. अगदी दक्षिण अमेरिकेत जेवढा म्हणून श्वेर्तवणीय समाज आहे, त्यात ख्रिश्चन धर्म सोडण्याचे प्रमाण युरोप व अमेरिकेप्रमाणेच आहे. पण श्वेतेतर जो समाज आहे, त्यात हे धर्म सोडण्याचे वादळ नाही. तो समाज फारसा संघटित नाही, पण त्यांच्यात एक जाणीव विकसित होताना दिसते आहे, ती म्हणजे जगावर पाचशे वर्षे साम्राज्य केलेल्या या ख्रिश्चन समाजातील श्वेर्तवणीयात जर ते साम्राज्य टिकवण्याची व वाढवण्याची इच्छा राहिली नसल्यास त्यात आपण पुढाकार घ्यावा. सध्या या भागात जी ग्रंथनिर्मिती होत आहे व प्रसारमाध्यमातून जो दृष्टीकोन मांडला जात आहे, त्याच्या आधारे असे दिसू लागले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे युरोपमधील तीन-चार पारंपरिक देशांनंतर प्रथमच कॅथलिक पंथाचे प्रमुखपद म्हणजे पोपपद प्रथमच दुसऱ्या खंडाला - म्हणजे दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाला मिळाले आहे. तेथील जेसुईट मिशनरी असलेले पोप म्हणजे कार्डिनल जॉर्ज मारिओ र्बेगोलियो. सध्या ते पोप फ्रान्सिस या नावाने परिचित आहेत. श्वेर्तवणीयांनंतर ख्रिश्चन साम्राज्य संघटित करण्याचा अधिकार आपला आहे, असे तेथील लोकांना वाटू लागले आहे. त्या दृष्टीने पूरक बाब म्हणजे जगातील सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या या भागात आहे. जगातील चाळीस टक्के ख्रिश्चन लोकसंख्या या भागात राहतात.

पण गेल्या सहा महिन्यांत त्या भागात ज्या निवडणुका झाल्या, त्यात एक गोष्ट स्पष्ट झाली की तेथील सर्ंपूण समाजच विस्कळीत होण्याच्या टोकावर उभा आहे. दुसरे म्हणजे उत्तर अमेरिकेत आण्ाि दक्षिण अमेरिकेतही झाालेल्या निवडणुकीत ख्रिश्चन असल्याचा अभिनिवेश कोठेही दिसला नाही. सर्वसाधारणपणे तो मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरत असतो. या वेळी तर निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रंप यंानी जी सामाजिक भूमिका मांडली, त्यात अमेरिकेकडे असलेली ख्रिश्चन देशांचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी ते विसरले, अशीच टीका झाली. सध्याचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही तेच केले, अशी टीका तर आहेच. याचा दक्षिणेत दिसणारा एक परिणाम म्हणजे दक्षिण अमेरिकेला स्वत:चा असा काही परिचयच राहिलेला नाही. तेथे प्रथमपासूनच इटलीचे वर्चस्व होते, त्यांचीच लॅटीन भाषा तेथे मुख्य भाषा मानली जायची. अजूनही तो प्रभाव पुसला गेलेला नाही. त्यामुळे दक्षिण अमेरिकेला आजही जगभर लॅटिन अमेरिका म्हणण्याचा प्रघात आहे. जणू ती त्याची ओळखच आहे. गेल्या काही महिन्यांतील निवडणुकीच्या निमित्ताने जी बाब पुढे आली आहे, त्यानुसार कोणताही समाज बहुसंख्य नाही. युरोपीय, आफ्रिकी, उत्तर अमेरिकी, स्थानिक हे सारे समाज मोठे आहेत. पण कोणीही बहुसंख्य नाही. त्याचाच एक भाग असा आहे की, आपण 'युरोपीय श्वेर्तवणीय' वाटावे असा या प्रत्येक समाजाचा प्रयत्न आहे. आफ्रिकी समाजासह अनेक समाजांनी त्या दृष्टीने बरेच अंतर कापले आहे. या साऱ्याच समाजातील एक लक्षणीय भाग म्हणजे प्रत्येकाला युरोपीय जीवनशैली हवी आहे. त्यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे येथील प्रत्येक समाजाला पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सहा अपत्ये असत. सध्या शहरी भागात ही सरासरी खाली येऊन ती दोनपेक्षा कमी झाली आहे. क्षेत्रीय भाग किंवा ग्रामीण भाग येथेही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. येथील समाज युरोप-अमेरिकेएवढा शैक्षण्ािक प्रगत नाही. पण त्यांच्यानंतर या समाजाचा क्रमांक लागतो. भारताच्या दृष्टीने लक्षणीय भाग म्हणजे कोलंबसपूर्वी येथे राहणारा मूलनिवासी समाज हा कटाक्षाने स्वत:ला 'इंडियन' म्हणवतो. एकेकाळी श्ािक्षण नसणे, गरिबी, अर्धनग्नता, चेहऱ्यावर रंगीबेरंगी पट्टे आण्ाि डोक्यावर मोठमोठया पिसांची टोपी असे स्वरूप असे. आता थोडया भागाचा अपवाद सोडल्यास तशी स्थिती नाही. स्थानिक समाज हा 250हून अधिक 'इंडियन ट्राइब्ज'मध्ये विभागला गेला आहे. इंडियन हा शब्द तेथे राष्ट्राभिमान, मूळ ओळख या अर्थाने वापरला जातो. यातील लक्षणीय भाग म्हणजे ही त्यांची गेल्या पाचशे वर्षांची ओळख आहे. इ.सन 1492मध्ये जेव्हा येथे कोलंबस आला, तेव्हा युरोपीय आक्रमण सुरू झाले. त्या आक्रमणाचा एक भाग असा होता की, स्थानिक लोकांचे वर्चस्वाचे जे जे म्हणून घटक होते, ते संपवून टाकणे. सर्वसाधारणपणे असा समाज असतो की स्थानिक मंडळी म्हणजे निराळया रानटी गटात विभागलेल्या जमाती. पण वस्तुस्थिती अशी होती की, तेथे अतिशय प्रगत अशा संस्कृती होत्या. युरोपीय आक्रमणाला थोपवण्याच्या तयारीत त्या नसल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. त्याचाच परिणाम म्हणून नागरी भागात युरोपीय राहू लागले आण्ाि स्थानिक लोकंानी जंगलांचा आश्रय घेतला. शंभर वर्षांनंतर त्यांची स्थिती अधिक बिघडली. गेल्या शंभर वर्षांतील नागरीकरण, श्ािक्षणाचा प्रसार, बदलती अर्थव्यवस्था, औद्योग्ािकीकरण, गेल्या वीस वर्षांतील माहिती तंत्रज्ञानाच्या सोयी यामुळे तोही समाज बराच पुढे आला. हा सारा समाज मूळचा असल्याने त्यांचे स्वत:ला इंडियन म्हणणे ही त्या भागाची आजही ओळख आहे. या इंडियन ट्राइब्जना अतिशय दुय्यम वागणूक मिळण्याची समस्या आजही तेथे आहे. उत्तर अमेरिकेत त्यांना फक्त दारू, मटका किंवा हॉटेल व्यवसायाला प्राधान्य मिळते. दक्षिण अमेरिकेत तेवढी वाईट स्थिती नाही, तरीही त्यांचा फार विकास होणार नाही याबाबत कटाक्ष ठेवला जातो.

पाचशे वर्षांपूर्वी कोलंबस जेव्हा अमेरिकेत आला, तेव्हा इंडिया जिंकणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे अमेरिकेत आल्यानंतरही स्थानिक लोकांना इंडियन म्हणणे हा तेथे प्रघात पडला. गेल्या शतकात जी संशोधने झाली, त्यातून असे वाटू लागते की, दक्षिण अमेरिकेतील प्रगत नागरी संस्कृती ही भारतीय संस्कृतीला जवळची आहे. तेथील भाषा व भारतीय भाषा यांच्यातील दोन हजार शब्द समान आहेत. त्याचाच दुसरा भाग म्हणजे अलीकडे त्यावर एक ज्ञानकोशही निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीचा नेपाळ, तिबेट, मंगोलिया, रश्ािया, जपान, अलास्का र्मागे अमेरिका प्रवास कसा झाला, याचे शेकडो पुरावे त्यात दिले आहेत. त्याच्या आधारे पुण्यातील गेल्या पिढीतील एक संघकार्यकर्ते वसंतराव काणे यांनी 'हिंदू पश्चिमिस्थान' ही एक पुस्तिकाही लिहिली आहे. उत्तर अमेरिका आण्ाि दक्षिण अमेरिका येथे आजही स्वत:ला अभिमानाने 'इंडियन' म्हणवून घेणाऱ्या अडीचशे ट्राइब्ज असल्या, तरी जगातील इतिहासशास्त्रज्ञ त्या विषयाला अधिकृत इतिहास मानत नाहीत. त्यांच्या मते हा विषय इतिहासशास्त्राच्या साऱ्या कसोटयांना उतरलेला नाही.

या भागात सध्या जो विषय ऐरणीवर आला आहे, तो एका बाजूला ख्रिश्चन धर्म सोडण्याची त्सुनामी लाट व दुसऱ्या बाजूला जगाच्या दक्षिण गोलार्धात पुन्हा ख्रिश्चन साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न हा विषय आहे. लॅटिन अमेरिकेतील या विषयाला मध्यवर्ती धरून अमेरिकेतील बायलर विद्यापीठातील प्रा. फिलिप जेनकिन यांनी जे लेखन केलेले आहे, ते या साऱ्या विषयावर प्रकाश पाडणारे आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे जगातील जेवढा म्हणून श्वेर्तवणीय समाज आहे, तो सध्या एका बाजूला ख्रिश्चन धर्म सोडणे आण्ाि दुसऱ्या बाजूला जगातील श्वेतेतर ख्रिश्चन समाज आहे तो 'आपणच जगातील सारे ख्रिश्चन मिळून पुन्हा ख्रिश्चन साम्राज्य उभे करू' अशा विचारात आहे. या संदर्भात प्रा. फिलिप जेनकिन यांनी जे पुस्तक लिहिले आहे, ते त्याची दखल घ्यावी असे आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'दि नेक्स्ट ख्रिश्चनडम'. त्यांचे म्हणणे असे की, जगातील श्वेर्तवणीय समाज ख्रिश्चन धर्माची काळजी घेण्यास समर्थ ठरलेला नाही. तोच मैदान सोडून पळत सुटला आहे. सध्या तो फक्त अल्पसंख्य होण्याच्या उंबरठयावर आहे. पण येणाऱ्या काही वर्षांत ही स्थिती आणखी दयनीय होऊ शकते. हे सारे श्वेर्तवणीय प्रामुख्याने पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहेत. दुसऱ्या बाजूला दक्षिण गोलार्धात परिस्थिती अतिशय उत्साहवर्धक आहे. सध्या जगात सव्वादोन अब्ज ख्रिश्चन आहेत. ते पुढील तीस-पस्तीस वर्षांतच तीन अब्ज होण्याच्या शक्यतेत आहेत. सध्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका आण्ाि दक्षिण आश्ािया या क्षेत्रांत ख्रिश्चनांची फार मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. प्रा. जेनकिन यांनी या संदर्भात जो शब्द वापरला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे 'मिलिटंट ख्रिश्चॅनिटी'. या विषयाची दखल घेण्याचे कारण म्हणजे गेल्या पाचशे वर्षांत ख्रिश्चॅनिटी जगभर जशी वागली, त्याचेच हे पुढचे पाऊल आहे. प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती घडते हा स्वतंत्र विषय आहे, पण त्या दिशेने कोणी विचार करत असेल तर त्याची दखल घेण्याची गरज आहे. प्रा. जेनकिन यांच्या विचाराची दखल घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांची या विषयावरील चोवीस पुस्तके युरोपात, अमेरिकेत आण्ाि अन्य ख्रिस्ती जगतात गाजली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांची जगातील दहा भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांची नावे जरी पाहिली, तरी या विषयाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. त्यांची काही पुस्तके - एंड ऑफ व्हाईट ख्रिश्चन्स इन यूएसए, जीझस वॉर्स, लॉस्ट हिस्ट्री ऑफ ख्रिश्चॅनिटी, लॉस्ट हिस्ट्री ऑफ चर्च, न्यू फेसेस ऑफ ख्रिश्चॅनिटी, लेइंग डाउन द स्वॉर्ड, मेकिंग ऑफ रूलिंग क्लास, न्यू ऍंटी कॅथलिसिझम, मॉरल पॅनिक, इमेजेस ऑफ टेरर, हिडन गॉस्पेल, यूजिंग मर्डर अशा पुस्तकांचा समावेश आहे. ते स्वत: या विद्यापीठाचे प्राध्यापक आाहेत. गेली तीस वषर्े ते या विषयावर लिहीत आहेत. जगातील निम्म्या भागातील - म्हणजे श्वेर्तवणीय विश्वातील ख्रिश्चॅनिटी संपत चालली आहे, याचे सूतोवाच त्यानी दहा वर्षांपूर्वीच केले होते, त्याचप्रमाणे पुढील तीस-चाळीस वर्षांतील आणखी काही धक्कादायक वाटणाऱ्या शक्यतांचा वेध त्यांनी घेतला आहे.

त्यांचे म्हणणे असे की, गेल्या पंधरा वर्षांत दक्षिण अमेरिकेने आपली कोणतीही ओळख टिकवलेली नाही. त्यामुळे हा सारा समाज बिनचेहऱ्याचा झाला आहे. येथे स्थानिक समाज मोठया प्रमाणावर आहे. पण आश्ाियाई, आफ्रिकी, युरोपीय आण्ाि मंगोलियन या समाजापैकी येथे कोणीही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नाही. त्यांच्यातील लग्नसंबंधांचे व्यवहार वाढू लागले आहेत. पूर्वीही अशी लग्ने होत असत, पण अशी लग्ने वेगळी म्हणून उल्लेखिली जायची. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येकाने स्वत:ला श्वेर्तवणीय करून घेतले आहे. प्रत्येकाचा रंग त्या दिशेने जाऊ लागला आहे. मूळ आफ्रिकेचे लोक येथे ज्याप्रमाणे दिसतात, त्यापेक्षा मंगोलियन काही निराळे दिसत नाहीत. लोकांची श्ािक्षणाची पातळी, आर्थिक जीवनशैली या एवढया समान आहेत की, कोणापेक्षाही कोणी निराळे राहिलेले नाही. येथे स्थानिकर् वग जेवढे भक्कम आहेत, तेवढाच दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी येथे आलेला आफ्रिकी समाजही भक्कम आहे.

श्वेर्तवणीय युरोपीयनांनंतर महासत्ता होण्याची स्वप्ने बघणाऱ्या या भूभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. जरी सध्या युरोप व अमेरिका यांचे महासत्तापण अजूनही गेले नसले, तरी त्यात विस्कळीतता आली आहे. ब्रिटन ब्रिक्समधून बाहेर पडला आहे. युरोपमधील अन्य देश आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. अमेरिकेने ट्रंपना निवडून देऊन पारंपरिक राजकारणच नाकारले आहे. औद्योग्ािक क्षेत्रातील या मंडळींची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. माहिती तंत्रज्ञान व संशोधन यात त्यांचा वरचश्मा राहिलेला नाही. याचबरोबर ख्रिश्चन धर्म सोडण्याची त्सुनामी याच प्रदेशात आहे. याचा अर्थ गेली दोन-तीन शतके महासत्ता असलेले हे देश संपले असे नाही, पण त्यात विस्कळीतता निश्चितच आली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचेच लागेबांधे असणारे कोणी तयारी करत असतील, तर गेली तीन-चारशे वर्षे या युरोपीयांची ज्यांच्यावर गुलामग्ािरी होती, त्यांनी त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

 9881717855