खान्देशात मंत्र्योत्सव

विवेक मराठी    18-Jul-2016   
Total Views |

डॉ. सुभाष भामरेंच्या रूपाने प्रथमच भाजपाने धुळयात केंद्रीय मंत्रिपद दिले. त्याचबरोबर वर्षानुर्वे काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळणाऱ्या दोंडाइचाच्या रावळांच्या गढीलादेखील भाजपाने लाल दिव्याची गाडी दिल्याने धुळे जिल्ह्याला एकाच आठवडयात दोन मंत्रिपदे बहाल झाली. सोबतच्या जळगाव जिल्ह्यालाही श्ािवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्या रूपाने आणखी एक मंत्री मिळाला. ह्या तीन मंत्रिपदांसोबतच ग्ािरीश महाजन यांना त्यांचे आवडीचे वैद्यकीय खाते मिळाल्याने खान्देशात मागच्या आठवडयात एक प्रकारे मंत्र्योत्सव साजरा झाला.




धुळे जिल्ह्यात डॉ. सुभाष भामरेंना मिळालेले मंत्रिपद म्हणजे काँग्रेसच्या ऍंकर व जवाहर गटाच्या स्वार्थासाठीच्या राजकारणाला दिलेला शह मानला जात आहे. रोहिदास पाटलांचा जवाहर गट व अमरिशभाई पटेल, सुरूपसिंग नाईक यांचा ऍंकर गट यांनी धुळे-नंदुरबार जिल्हा वाटून घेतला होता. एकमेकावर कुरघोडीचे राजकारण करणे हाच या गटांचा एकमेव धंदा होता. त्यातून अमरिशभाई पटेलांनी तरी श्ािरपूर परिसर बऱ्यापैकी विकसित केला, पण सुरूपसिंग व रोहिदास दाजींना तर तेही जमले नाही. इंग्रजी राजवटीपासून सर्वेक्षण झालेले अक्कलपाडा धरणर् पूण व्हायला तब्बल अर्धशतकर् पूण व्हावे लागले. माण्ािकराव गावित, सुरूपसिंग नाईक, रोहिदास दाजी पाटील, अमरिशभाई पटेल यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेसजनांच्या मजबूत बुरुजावर आज डॉ. भामरेंच्या रूपाने भाजपाने मंत्रिपदाचा झेंडा फडकवला आहे. काश्मिरात सुरू असलेल्या हिंसक कारवायांदरम्यान अडकलेल्या व महाराष्ट्रातून गेलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी पार पाडून, आपण कार्यक्षम आहोत याची पहिली चुणूक त्यांनी दाखवून दिली. डॉ. भामरेंच्या रूपाने एका शांत व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला मिळालेल्या मंत्रिपदामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यात आनंद व्यक्त केला गेला. दुसरे मंत्री दोंडाइचाचे जयकुमार रावळ. खान्देशात जळगाव जिल्हा भाजपाचा गड मानला जातो. परंतु त्याखालोखाल धुळे जिल्ह्यात भाजपाचा विस्तार झाला आहे. असे असले, तरी राज्याच्या मंत्रीमंडळात धुळे जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. आताच्या विस्तारात जयकुमार रावळांच्या रूपाने ती उणीव भरून काढण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याच्या राजकारणात ऍंकर व जवाहर हे काँग्रेसअर्ंतगत गट जसे सक्षमपणे राजकारण चालवीत, तसाच रावळांचाही दबदबा होता. अलीकडे मात्र जयकुमार रावळ भाजपाचे नेतृत्व करीत असल्याने येथेही काँग्रेसचे राजकारण संपल्यात जमा आहे. सुरुवातीला डॉ. भामरे व नंतर जयकुमार रावळ अशी केंद्रातल्या व राज्यातल्या मंत्रीमंडळात धुळे जिल्ह्याला मिळालेली संधी चर्चेचा विषय ठरली आहे.

धुळयातील एक नावाजलेले कर्करोग तज्ज्ञ म्हणून डॉ. सुभाष भामरेंचा लौकिक आहे. ते कमी बोलणारे असले तरी अभ्यासू व काम करणारे असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांची निवड होऊ शकली. ''पंतप्रधान मोंदींनी आपल्या कार्यक्षमतेवर दाखविलेला विश्वास आपण प्रत्यक्ष काम करून सिध्द करून दाखवू'' अशी प्रतिक्रिया डॉ. भामरेंनी मंत्रिपद मिळाल्यानंतर दिली होती. त्यांना मिळालेले संरक्षण राज्यमंत्र्याचे खाते अतिशय महत्त्वाचे मानले जाते. श्ािवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर या कार्यक्षम मंत्र्यासोबत त्यांना काम करावयाचे असल्याने त्यांना बरेच कष्ट उपसावे लागतील, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे जयकुमार रावळ व गुलाबराव पाटील हे दोघे स्थानिक राजकारणात बलाढय असले, तरी मंत्री म्हणून काम करताना राजकारणातली ताकद कामी येत नाही. तिथे कामांचा निपटारा करण्याचे कसबही लागते. श्ािवाय विकास कामे करवून घेण्याबाबतचा अनुभवही लागतो. तो या दोघांकडे कमीच आहे. रावळांच्या बाबतीत म्हणायचे, तर ते रोजगार हमी व पर्यटन कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्र्याचे अधिकार त्यांना मिळणार असल्याने त्यांना अधिक कामे करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे रोजगार हमीसोबत पर्यटनासारखे दमदार खाते आले आहे. केंद्रातील मोदी सरकार स्वच्छतेचा आग्रह धरते. रावळांनी महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेचा आग्रह धरावा. महाराष्ट्राचा पर्यटन विकास व्हावा, हे रावळांना मनोमनी नक्कीच वाटत असणार. कारण दोंडाइचातील त्यांची रावळांची गढी अतिशय सुबक बांधकामाचा नमुना आहे. त्यांच्या अंगी असलेली सौंदर्यदृष्टी ते महाराष्ट्राच्या पर्यटनस्थळांसाठी वापरतील, अशी अपेक्षा जनतेतून होऊ लागली तर नवल वाटू नये.

गुलाबराव पाटील हे सहकार खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांचे अधिकार मर्यादित असले, तरी पहिल्यांदाच मंत्रिपद मिळत असल्याने आपल्या ऍग्रेसिव्ह भूमिकेमुळे ते प्रभाव पाडू शकतात. मंत्र्यानी लोकांना न्याय मिळवून द्यावा, त्यांची कामे करून द्यावी, ही मंत्र्यांची भूमिका असते. त्यांनी सगळयांशी झगडू नये ह्याची समज गुलाबराव पाटलांना दिली गेली असेल, तरच ते लोकांची कामे करू शकतील. अन्यथा ते आपल्या नेहमीच्या झगडण्याच्या मूडमध्ये राहिले, तर कामे बाजूला राहतील व ते भानगडींमध्येच गुंतून बसतील. त्यांना, 'तुम्ही आता राज्याचे मंत्री आहात, मंत्री हा फक्त ठरावीक पक्षाचा नसतो. ते पक्षाचे नेते असतील पण मंत्री जनतेचे आहेत,' हे सांगण्याची गरज आहे. त्यामुळे कामे घेऊन येणाऱ्यांमध्ये कोण भाजपाचा, कोण सेनेचा व कोण राष्ट्रवादीचा असा भेद त्यांना करता येणार नाही. श्ािवाय सर्ंपूण महाराष्ट्र हे आता त्यांच्या कामाचे क्षेत्र झाले असल्याने त्यांना धरणगाव तालुक्यातील आव्हाणे, निंभोरा, रेल-लाडलीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना कर्ज पुरविण्याच्या बाबतीत केलेल्या दिरंगाईबद्दल गुलाबराव पाटील मागच्या महिन्यापर्यंत मोर्चा काढीत होते. शेतकऱ्यांचे सर्ंपूण कर्ज बँकेने माफ करावे अशी त्यांची भूमिका होती. बँक कर्ज माफ करेलही, पण तो पैसा बँकेला कोण पुरवेल? हा बँकेपुढे सवाल होता. सरकारचे घटक असूनही त्या मुद्दयाला पध्दतशीर बगल देऊन गुलाबराव पाटील कर्जमाफीचे घोडे दामटीत होते. आता सहकार मंत्री म्हणून त्यांना तोच सवाल पुन्हा विचारल्यास त्यांचे उत्तर कोणते असेल? ही उत्सुकता जिल्हा बँकेला व शेतकऱ्यांना असणार आहे. आपल्या वक्तृत्वाने ते सभेला जिंकतात. खोटे असोत की खरे, आपले मुद्दे लोकांच्या गळी उतरवण्यात ते यशस्वी होतात. म्हणून तर ते सतत निवडून येतात. आता मंत्री झाल्यावर त्यांनी तेच कसब वापरावे. ते सहकार खात्याचेच मंत्री असल्याने त्यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या वरिष्ठांना आपली भूमिका पटवून दिल्यास जळगाव जिल्ह्यातील थकित टिश्यू केळी कर्जदार, पर्ुनगठन हे मुद्दे र्मागी लागतील. स्वत: गुलाबराव पाटील स्वत:ला थकित कर्जदार संबोधून घेण्यात धन्यता मानतात. तशी धन्यता मानणे एखाद्या सहकार मंत्र्यासाठी योग्य ठरते का? याचाही विचार केला जाऊ शकतो. एकूण खान्देशात आपापल्या कौशल्यामुळे जनतेच्या गळयातील ताईत झालेल्या नेत्यांना मंत्रिपदे मिळाल्याने आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांनी वेगवेगळया र्मागांनी हा आनंद व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणाल तर आनंद व्यक्त करून त्यांचे भागते, परंतु जनतेचे तसे होत नाही. जनतेला कामे करणारा माणूस आवडतो. डॉ. भामरे एक कर्करोग तज्ज्ञ म्हणून आजपर्यंत लोकांना परिचित आहेत. आपल्या पेशाच्या माध्यमातून त्यांनी केलेली सेवा व पक्षाचे मतदारसंघातील स्थान यामुळे ते खासदार म्हणून निवडून आले. परंतु मंत्री झाले ते त्यांचे संसदेतील कामकाजातील योगदान व कार्यक्षमता यामुळे. आता त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून देशाचे काम करता करता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठीही प्रयत्न करावे लागतील. ते करण्यात ते यशस्वी ठरले, तर उद्या तेच खान्देशचे नेते ठरतील.

रावळ आतापर्यंत मतदारसंघापर्यंत मर्यादित होते. आता राज्याच्या मंत्रीमंडळात ते अतिशय महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या कामाचा परीघ आता विस्तारत जाणार आहे. गुलाबराव पाटलांप्रमाणेच तेसुध्दा काहीसे आक्रमक आहेत. त्यांनाही यापुढे ती आक्रमक भूमिका टाळून जनतेच्या दृष्टीने कामे करावी लागतील. खान्देशचे म्हणाल तर सप्तशृंगीदेवी, मांगी-तुंगी, तोरणमाळ, पद्मालय, पाल अभयारण्य, उनपदेव, पाटणादेवी, मनुदेवी ह्या क्षेत्रांचा पर्यटनस्थळ म्हणून आजपर्यंत न झालेला विकास ते करू शकतात. पाहण्यासारखी अशी क्षेत्रे खान्देशात आहेत याची माहिती सगळया महाराष्ट्राला करून दिल्यास पर्यटकांचा ओघ वाढून या क्षेत्रांचा विकास होऊ शकेल. एक मंत्री म्हणून रावळांनी आधी किमान या क्षेत्रांना एकदा भेटी देऊन आपल्या कामाला सुरुवात करावी. तसे झाल्यास खान्देशाला मिळालेल्या पर्यटन मंत्रिपदांचे सार्थक होऊ शकेल.

गुलाबराव पाटलांनी राज्यातील सहकाराकडे लक्ष देता देता खान्देशातील-विशेषत्वाने जळगाव जिल्ह्यातील सहकाराकडे लक्ष द्यावे. तसे झाल्यास आज कठीण दिवस काढीत असलेला चोपडा साखर कारखाना, बेलगंगा साखर कारखाना व बंद पडलेला वसाकाचे दिवस पालटतील. धुळे जिल्ह्यातील पांझराकान, श्ािरपूर साखर कारखानादेखील संकटात आहेत. त्यांच्या बाबतीतही चांगले र्निणय घेता येऊ शकतात. याश्ािवाय सहकारातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी ते नष्ट करतील, तर आम जनतेला त्याचा फायदा होऊ शकेल. यापुढे गुलाबराव पाटलांनी श्ािवसैनिकांच्या बाहेरही समाज असतो ह्याचे भान ठेवून कामे करावीत. तसे झाल्यास भाजपाच्या वा काँग्रेसच्या लहानातल्या लहान कार्यकर्त्याशी उडणारे त्यांचे खटके यापुढे थांबतील. त्यामुळे त्यांचेही नेतृत्व विस्तारेल व महाराष्ट्रातील सहकाराबरोबर जळगाव जिल्ह्यातील सहकार वृध्दिंगत होऊ शकेल.

एकाच आठवडयात तीन मंत्रिपदे खान्देशात चालून आल्याने ही बाब बरेच दिवस चर्चेची ठरली. खान्देशच्या विकासात या मंत्र्यांनी हातभार लावावा अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. येत्या काळात ते प्रत्यक्ष पाहायला मिळेल, असे वाटते.

& 8805221372