मा. सुरेशराव केतकर - संघशरण, कर्मठ, कर्मयोगी

विवेक मराठी    25-Jul-2016
Total Views |

 शनिवार दि. 16 जुलै सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सुरेश रामचंद्र केतकर या कर्मयोगी,र् पूण समर्पित संघप्रचारकाची 82 वर्षांची जीवनयात्रा परर्िपूण झाली. गेली सुमारे पाच वर्षे व्याधींशी चाललेला झगडा संपुष्टात आला. त्यांच्या जीवनयात्रेचा, या लेखाच्या माध्यमातून आढावा घेत आहे.


पुण्याच्या सदाश्ािव पेठेतील श्ािवाजी मंदिरात चालणाऱ्या संघशाखेचे सुरेशराव केतकर बालपणापासूनचे स्वयंसेवक. त्यामुळे संघकामाची तळागाळापासून व मुळापासून समज. परिणामी सर्ंपूण व्यक्तिमत्त्व संघविचारातच घडले. त्यांच्याशी माझा प्रथम संपर्क आला तो 1953-54 या वर्षात. ते शहराचे बाल विभाग प्रमुख असताना, माझ्यावर एका शाखेची 'बाल श्ािक्षक' म्हणून जबाबदारी होती. तेव्हापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत 60 वर्षांच्यावर आमचा घनिष्ठ संपर्क राहिला. ही जवळीक वरचेवर सर्वच पातळयंावर वाढत गेली. संघातील शारीरिक हा विषय त्यांच्या आवडीचा. अत्यंत नियमित आण्ाि भरपूर व्यायामांनी त्यांचे शरीर गोटीबंद झाले होते. घोष विभागातही आनकवादक म्हणून त्यांचा सहभाग असे. 1956-57च्या सुमारास पू. गुरुजींनी सूर्यनमस्काराची सचित्र, सजीव पुस्तिका करण्यासाठी तीन उत्तम स्वयंसेवकांची निवड केली, त्यामध्ये बापू घाटपांडे, जयंता कवठेकर यांच्यासोबत सुरेशराव केतकरांचा समावेश होता. बी.एस्सी., बी.एड. हे श्ािक्षण पुरे केल्यावर त्यांनी खडकी येथील आलेगावकर प्रशालेमध्ये श्ािक्षकाची नोकरी सुरू केली. संघकामातल्या विविध जबाबदाऱ्या सांभाळणे चालूच होते. संघकामात अर्जित केलेल्या गुणांमुळे थोडयाच काळात आलेगावकर प्रशालेत विद्यार्थी व संचालक दोन्हींमध्ये त्यांनी विशेष स्थान प्राप्त केले. म्हणूनच 1958मध्ये चांगली नोकरी सोडून संघकामासाठीर् पूणवेळ (प्रचारक) म्हणून निघण्याच्या त्यांच्या र्निणयाला विद्यार्थी व संस्थाचालक दोघांनीही मोठया दु:खाने संमती दिली. सुमारे 60 वर्षांच्या या प्रचारक जीवनात सांगली जिल्हा प्रचारक, सोलापूर, धाराश्ािव व बीड या जिल्ह्यांचा मिळून होणाऱ्या विभागाचे प्रचारक असे सुमारे 15 वर्षे त्यांनी तळागाळात व मुळापासून काम केले. या चारही जिल्ह्यांत आज असणारे प्रमुख कार्यकर्ते हे सुरेशरावांच्या तालमीत तयार झालेले आहेत. माझा पुण्यापासून असलेला व्यक्तिगत संपर्क, 1966मध्ये लातूरला आल्यानंतर अधिकच घनिष्ठ होत गेला. किंबहुना आम्ही मित्रांनी लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालय सुरू करण्यात प्रत्यक्ष पहिल्या फेरीत व पहिल्या दिवसापासून त्यांचा सहभाग होता. म्हणून विवेकानंद रुग्णालय परिवार व आमचा कौटुंबिक परिवार दोहोंचेही ते अविभाज्य घटक होऊन गेले.


1972-73नंतर झपाटयाने महाराष्ट्र प्रांत व पुढे अखिल भारतीय स्तरावर त्यांची वाटचाल झाली. महाराष्ट्राचे शारीरिक श्ािक्षण प्रमुख, अखिल भारतीय शारीरिक श्ािक्षण प्रमुख व नंतर अखिल भारतीय स्तरावर 'सहसरकार्यवाह' ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. एकूण सुमारे 30 वर्षे या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले. काटेकोर श्ािस्तीचे, परिश्रमांचे, अखंड भ्रमंतीचे प्रचारक जीवन व्यतीत करताना, संघकामाला आवश्यक अशी व्यक्तिगत हार्दिकता त्यांनी जोपासली होती.

सुरेशरावांची दोन रूपे दिसत. संघश्ािक्षर्ावगातला संघस्थानावरचा उत्तम गणवेशातील कठोर शारीरिक प्रमुख व अन्य वेळात कोणतीही सेवा करण्यात तत्पर असलेला कार्यकर्ता स्वयंसेवक! त्यामुळेच त्यांच्यापासून असंख्यांनी प्रेरणा घेतली. प्रचंड विद्वत्ता नसली, तरी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास व श्ािस्तशीर मांडणी, यामुळे त्यांचे भाषण वा बौध्दिकर् वग बी.एड्.च्या एखाद्या र्आदश पाठासारखा होत असे. सहसरकार्यवाहपदानंतर काही वर्षे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख अशी त्यांची जबाबदारी होती. त्या काळात सर्ंपूण देशभर कानाकोपऱ्यात प्रवास करून संघरचनेतल्या सुमारे चार हजार प्रचारकांशी त्यांनी व्यक्तिगत संपर्क केला. छोटया गटांच्या बैठकीतून प्रचारकांना कामाची मूलभूत संकल्पना व व्यवहार याविषयी धडे दिले. या उपक्रमांचा प्रभाव देशभर जाणवला. नित्य संघकामाबरोबरच पालक अधिकारी किंवा अभिभावक म्हणून संस्कार भारती, अखिल भारतीय मजदूर संघ, किसान संघ या संघटनांना त्यांनी र्मार्गदशन केले. त्या-त्या संस्थांमध्ये त्यांचा सहभाग अभ्यार्सपूण 'विचारयुक्त' तरीही व्यवहारोपयोगी असा असे.

विवेकानंद रुग्णालय लातूर व देवग्ािरी प्रांतातील भारतीय श्ािक्षण प्रसारक संस्था यांच्याबरोबर सुरेशरावांचे विशेष संबंध होते. या दोन्ही संस्थांच्या जडणघडणीत व विस्तारात त्यांचा मोठा सहभाग होता. अखिल भारतीय कोणतीही मोठी जबाबदारी असतानाही या संस्थांशी त्यांचे संबंध अक्षुण्ण राहिले. 1990नंतर सुमारे दहा वर्षे त्यांचे मुख्यालय लखनऊ व वाराणसी या ठिकाणी राहिले. तेथील संघकामाच्या सर्व आयामांमध्ये त्यांचा परर्िपूण सहभाग राहिला. तरीही विवेकानंद रुग्णालय व भा.श्ाि.प्र.संस्था यांच्याशी संवाद व सहवास यात अंतराय पडला नाही. त्यांची व्यक्तिगत आरोग्य चिकित्सा विवेकानंद रुग्णालयात नियमितपणे होत असे. पण त्याचबरोबर परतफेडीत ते रुग्णालयाच्या कामाची व उपलब्धींची हार्दिक चिकित्सा करत असत. म्हणूनच शेवटची सुमारे पाच वर्षे ते विवेकानंद रुग्णालय परिवारात व परिसरातच राहिले व त्यांनी अंतिम श्वासही येथेच घेतला.

सुमारे 55-60 वर्षांच्या त्यांच्या सहवासातल्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालत असतात. त्यातून सुरेशरावांच्या व्यक्तिमत्त्वात संघकार्यकर्त्यांचेर् दशन होते. ज्या काळात सुरेशराव लातूर क्षेत्रात प्रचारक होते, त्या वेळी प्रवासाच्या सुविधा फार कमी होत्या, रस्ते खराब होते. र्बाशी लाईट रेल्वे या नावाची ताशी 15 मैल या गतीने चालणारी रेल्वे उपलब्ध होती. ईप्सित स्थळी ती केव्हा पोहोचेल याचा भरवसा नसे. मी धाराश्ािव जिल्ह्यात तेर या गावी गुरुपूजन उत्सवासाठी गेलो होतो. उत्सव आटोपून मध्यरात्री तेर या रेल्वे स्थानकात गाडीत चढलो. सकाळी 6च्या सुमारास रेल्वे रुळांचा कडकडाट होऊन गाडी थांबली. माहिती मिळाली की, रुळावरून घसरलेली रेल्वे आता लवकर हलणार नाही. सकाळी रुग्णालयात हजर होणे गरजेचे होते. लातूर सुमारे वीस कि.मी. लांब होते. दोन-तीन कि.मी. चालून चारचाकीचा रस्ता गाठला. नश्ािबाने एक ट्रक अडवल्यावर टेकण्यापुरती जागा ड्रायव्हरच्या कृपेने मिळाली. लातूरच्या दिशेने दोन-तीन कि.मी. आल्यावर, रस्त्यात दुटांगी धोतर नेसलेले, ताठपणाने कापडी बॅग हातात घेऊन पुढे चालणारे सुरेशराव केतकर चटकन ओळखू आले. ते कुर्डूवाडीला या गाडीत बसले होते. आमच्या ट्रकचालकाने ट्रक थांबवण्यास नकार दिला. मला मोठे संकोचल्यासारखे झाले. लातूरला पोहोचल्याबरोबर मी स्कूटर काढून उलट पुन्हा त्या रस्त्यावर गेलो. पण तोपर्यंत सुरेशरावांच्या गतिमान संचलनाने सुमारे आठ कि.मी. अंतर पायी कापले होते. पू. डॉ. हेडगेवारांच्या जीवनात असाच, कार्यक्रमानंतर संचलनाचा प्रसंग आहे त्याची आठवण झाली.

विवेकानंद रुग्णालयाच्या औपचारिक, अनौपचारिक, वैचारिक बैठकीत सुरेशराव नियमित उपस्थित असत. प्रमुख डॉक्टरांच्या एका बैठकीत त्यांनी आमच्यासाठी विवेकानंद या शब्दाची फोड करून सांग्ाितली. आम्हाला कोणते गुण हवेत त्याची ती मार्मिक चिकित्सा होती.

वि - विवेक - चांगला मूलभूत विचार

वे - अपेक्षित गती - वेग

का - कार्यमग्नता

नं  - नंदनवनता - स्वस्थ - शांत संघटनात्मक वातावरण

द - दमनशीलता - स्वत:च्या आवेगांना आवर घालण्याची क्षमता.

ते त्यांचे भाषण आजही शब्दश: स्मरणात आहे.

रुग्णालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी संघकार्यातील अत्यंत ज्येष्ठ व्यक्तींना आग्रहपूर्वक आमंत्रित करून घेऊन येण्याचे महत्त्वाचे काम सुरेशरावांनी अनेकदा केले. मध्य भारताचे ज्येष्ठ संघचालक आयुर्वेद चक्रवर्ती पंडित रामनारायण शास्त्री यांना वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी सुरेशरावांनी आणले. वैद्यकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेसाठी तत्कालीन सरकार्यवाह प्रो. राजेंद्रसिंहजी (रज्जूभैय्या) यांचाही दोन दिवसांचा अत्यंत र्मार्गदशक सहवास आम्हा सर्वांना मिळाला.

विविध कामांमध्ये संघटनात्मक समस्या उभ्या राहिल्या, त्यांचा निपटारा करण्यासाठी सुरेशराव केव्हाही उपलब्ध असत. केवळ त्यासाठी अगदी लखनऊ, वाराणसीहून ते लातूरपर्यंत प्रवास करीत. उत्तर प्रदेशाच्या वास्तव्यात तेथेही त्यांच्या कामाची छाप पडली होती. लखनऊमध्ये किंवा वाराणसीमध्ये केंद्रीय बैठकीला मी गेलो असताना, कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर बोलताना सुरेशरावांचा संदर्भ आला की तत्काळ आत्यंतिक आदराची व सन्मानाची भावना व्यक्त होत असे. हा अनुभव मी आत्ता सुरेशरावांच्या निर्वाणानंतरही घेतला. लखनऊ येथून राज्यपाल रामभाऊ नाईक यांचा दूरध्वनी आला. तेथे लखनऊच्या कार्यकर्त्यांनी मोठी श्रध्दांजली सभा आयोजित केली होती. त्यात सहभागासाठी रामभाऊ निघाले होते. या प्रसंगातून लखनऊमधील सुरेशरावांच्या आत्मीय संबंधांचेर् दशन झाले.


संघविचार व व्यवहार सुरेशरावांच्या रोमारोमात, पेशीपेशीत व रक्ताच्या थेंबाथेंबात रुजला होता. आजारपणातील मागील तीन वर्षे ते जवळपास बिछान्याला खिळून होते. एके दिवशी रात्रपाळीच्या त्यांच्या प्रबंधकाने सांग्ाितले की, अनेकदा सुरेशराव मध्यरात्रीसुध्दा संघकामातील एखाद्या विषयावर पंधरा-वीस मिनिटे सुसंगत मांडणी गुंगीत असतानासुध्दा करतात. आम्ही त्याला या बोलण्याचे ध्वनिमुद्रण करण्यास सांगितले. ते ऐकल्यावर आश्चर्यच वाटले. त्यानंतरच्या रुग्णालयाच्या वार्षिक बैठकीसाठी त्यांनी त्या शय्येवरूनच सुमारे पंधरा मिनिटाचे सुसंगत बौध्दिक प्रस्तुत केले. अधूनमधून स्मृती दगा देत असतानासुध्दा, अगदी जुन्या कार्यकर्त्यांना त्या वेळेचे नेमके संदर्भ व छोटेमोठे तपशील ते विचारत असत किंवा सांगत असत.

सुरेशराव यांच्यासारखे कार्यकर्ते हे संघसामर्थ्याचे स्रोत आहेत. नि:स्वार्थी, निस्संग, नि:शंक, निर्द्वंद्व, अखंड परिश्रमी व 100 टक्के समर्पित अशा या कार्यकर्त्यांच्या बळावर संघविचारांनी व व्यवहारांनी, समाजजीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली आहेत.

'मंदिर उभविणे हेच आमुचे शील

असू आम्ही सुखाने पत्थर पायातील'

या पंक्तीचे प्रत्यक्षर् दशन मा. सुरेशराव केतकर यांच्या प्रस्तुत स्मृतिलेखातून होईल.

शल्यचिकित्सक,

विवेकानंद रुग्णालय, लातूर

----------------------------------

नमस्कार,
सा. विवेकमधील विविध लेखांना फेसबुक अकाउंटवर आपला प्रतिसाद मिळत होता. मात्र फेसबुक वर मित्र बनविण्याची मर्यादा संपत येत असल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी सा. विवेकच्या या नवीन फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद

Embeded Object