मदतीच्या हाकेला पोलिसांचा 'प्रतिसाद'

विवेक मराठी    30-Jul-2016
Total Views |

 आज सगळयाच शहरांमध्ये मुलींना कामाच्या निमित्ताने किंवा इतर कामासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहावे लागते. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. महिला आज सुरक्षित नाही, पोलीस दल महिलांना सुरक्षा देण्यात अक्षम आहे, अशी बरीच ओरड होत असते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी हाय टेक होऊन अशा सगळयाच गोष्टींना उत्तर देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'प्रतिसाद' (partisaad(ASK)) नावाचे ऍप तयार केले आहे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला आता अभिनव तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. ऍपच्या माध्यमातून महिलांना तत्काळ शक्य तितकी मदत करता यावी याच उद्देशाने हे ऍप तयार करण्यात आले आहे.


फिसमधून निघायला मयुरीला नेहमीप्रमाणे उशीर झाला. अशा वेळी ती नेहमी खासगी कॅबचा किंवा रिक्षाचा आधार घेते. घरी जाईपर्यंत साधारणत: रात्रीचे अकरा वाजतात. सार्वजनिक वाहतुकीऐवजी खाजगी कंपन्यांच्या कॅबवर तिचा जास्त विश्वास होता. कारण गेल्याच आठवडयात ऑॅफिसमधून ट्रेनने येत असताना एका स्टेशनवर तिच्या कंपार्टमेंटमधल्या एका मुलीवर माथेफिरूने हल्ला केला व ती मुलगी या हल्ल्यात जखमी झाली. या प्रकाराने मयुरी हादरली होती. भारतातील सगळया शहरांमध्ये मुंबई हे सगळयात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. एरवी अपरात्रीदेखील सुरक्षित वाटणारे शहर आता तिला आज दिवसाढवळयाही असुरक्षित वाटू लागले आहे.

महाराष्ट्रातील या एकाच नव्हे, तर बऱ्याच शहरांची आज अशीच परिस्थिती आहे. शहर, मग ते कोणतेही असो - मुंबई, पुणे किंवा नाशिक - मुलींवर व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या आपण रोज वृत्तपत्रात वाचतो किंवा प्रसारमाध्यमांवर पाहतो. दररोज होणाऱ्या अशा काही ना काही घटनांनी मुलींना आता मोठया शहरांमध्येदेखील असुरक्षित वाटू लागले आहे. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाच्या जखमा महाराष्ट्रातील कोपर्डीच्या घटनेने जिवंत केल्या. मग अशा घटनांना एखाद्या सिनेमाशी जोडण्याचा किंवा राजकारण्यांना शिव्या घालण्याचा मार्ग लोक स्वीकारतात. मात्र, अशा घटनांना आळा कसा बसेल किंवा त्यांना कसे रोखता येईल, याचा सारासार विचार करताना फारसे कोणी दिसत नाही.

आज सगळयाच शहरांमध्ये मुलींना कामाच्या निमित्ताने किंवा इतर कामासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहावे लागते. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. महिला आज सुरक्षित नाही, पोलीस दल महिलांना सुरक्षा देण्यात अक्षम आहे, अशी बरीच ओरड होत असते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी हाय टेक होऊन अशा सगळयाच गोष्टींना उत्तर देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'प्रतिसाद' (partisaad(ASK)) नावाचे ऍप तयार केले आहे. (https://play.google.com/store/apps details?id=com.snt.uniqueguard&hl=en")

Embeded Object'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला आता अभिनव तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. ऍपच्या माध्यमातून महिलांना तत्काळ शक्य तितकी मदत करता यावी याच उद्देशाने हे ऍप तयार करण्यात आले आहे.

जानेवारी 2016मध्ये पुणे शहराचे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी या ऍपचे उद्धाटन केले होते. तंत्रज्ञानाच्या युगात शेवटी महाराष्ट्र पोलीस दलाने प्रवेश केला आहे. आज लोक स्मार्ट फोनच्या आहारी गेले आहेत, याच गोष्टीचा फायदा घेत, स्मार्ट फोनच्या माध्यमातून महिलांसाठी सुरक्षा कवच निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे.

सगळयांच्या स्मार्ट फोनमध्ये बरेच सेफ्टी ऍप्स असतील. यापैकी बरेच ऍप वापरण्यास थोडे किचकट असतात किंवा ते सुरू होण्यास थोडा विलंब लागतो अथवा त्यांना इंटरनेट कनेक्शन लागते. युनिक गार्ड प्रा.लि.च्या मदतीने सगळया महिलांना, कॉलेज युवतींना वापरता येईल असे युजर फ्रेंडली ऍप महाराष्ट्र पोलिसांनी तयार केले आहे. प्रतिसाद या नावापासूनच या ऍपचे वेगळेपण आहे.

प्रतिसादची मदत

युनिक गार्डने या ऍपचे डिझाइन केले आहे. एएसके ही संस्था ऑॅनलाइन वेबसाइटमार्फत लोकांना प्राथमिक सुविधा पुरविते. सर्वसामान्य माणसाला, म्हणजे जो टेक्नोसॅव्ही नाहीये, अशा व्यक्तीलाही हे ऍप वापरता यावे, हा विचार करून हे ऍप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ऍपचे फीचर हे जेवढे युजर फें्रडली असतील तेवढे लोक ते वापरण्याची शक्यता वाढते. प्रतिसाद हे ऍप डाउनलोड करयाचे असल्यास आपल्या स्मार्ट फोनच्या गुगल प्ले स्टोअरमधून ते डाउनलोड करता येइल. PRATISAAD (ASK) असे टाईप केल्यावर महाराष्ट्र पोलीस यांचा लोगो असलेले ऍप दिसेल. ऍप डाउनलोड केल्यावर यामध्ये आपल्याला आपला मोबाइल क्रमांक नोंदवावा लागतो व त्यानंतर त्यांनी दिलेला संकेतांक (कोड) टाईप करावा लागतो. यानंतर आपला क्रमांक तपासला गेल्यावर आपल्या मोबाइलवर सहा अंकी संकेतांक असलेला एक संदेश येतो. त्यानंतर आपली सगळी माहिती या ऍपमध्ये रजिस्टर करायची. त्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाइकांची माहिती यामध्ये भरायची. नातेवाइकाचे नाव, मोबाइल क्रमांक, आपल्याशी असलेले नाते नोंदवावे लागते. त्याचबरोबर पुरावा म्हणून आपले ओळखपत्र असलेले आधार कार्ड, रेशन कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड यापैकी एकाचा फोटो नाव रजिस्टर करताना जोडावा लागतो. ही सगळी माहिती अपलोड झाल्यावर आपले प्रोफाइल तयार होते आणि मग महाराष्ट्र पोलीस सुरक्षा यंत्रणेच्या सर्व्हरवर आपले प्रोफाइल रजिस्टर होते.


या ऍपमध्ये सोशल इमर्जन्सी नावाने एक चिन्ह दिसते. जेव्हा तुम्ही धोक्यात असाल किंवा संकटात असाल, अशा अडचणीच्या वेळेस तुम्हाला पोलिसांच्या मदतीची आवश्यकता असते, अशा वेळेस या चिन्हावर क्लिक केल्यावर आपल्या फोनचा जीपीआरएस सुरू होतो. यामुळे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती जवळ असलेल्या पोलीस कंट्रोल रूमला मिळते. तेथे गस्तीवर असणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना हा संदेश पोहोचल्यावर ते तुमच्या मदतीसाठी येतात.

केवळ महिलांसाठीच नव्हे, तर सगळयांसाठी हे ऍप खूप उपयोगाचे आहे. कोणावरही कोणतेही संकट कधीही येऊ शकते. अशा प्रसंगी या ऍपमधील 'सोशल इमर्जन्सी'वर क्लिक केल्यावर आपल्याला तत्काळ मदत मिळू शकते व आपण संकटातून बाहेर पडू शकतो. आता तुम्ही विचार कराल की अशा प्रसंगी फोनकडे कसे लक्ष जाईल? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविकच आहे. त्यावरचा उपाय म्हणजे, आपल्या फोनच्या होम स्क्रीनवर या ऍपचा शॉर्टकट ठेवावा.

प्रतिसाद ऍप हे महिलांसाठीच नव्हे, तर प्रत्येकासाठी उपयोगी ऍप आहे. आपल्या कोणावरही कोणत्याही क्षणी एखादे संकट येऊ शकते. अशा वेळेस आपल्या संकटाच्या हाकेला पोलिसांच्या मदतीचा प्रतिसाद नक्कीच मिळेल, यात शंका नाही.

8286650578