ब्रिटिशांच्या युरोसेंट्रिक इतिहासाला उत्तर देण्याची हीच वेळ

विवेक मराठी    27-Aug-2016
Total Views |

अलीकडे कोणत्या वंशाचे कोठे स्थलांतर झाले आहे हे दाखवण्यासाठी 'वाय क्रोमोसोम' पध्दत वापरली जाते. युरोपमध्ये रोमा म्हणून जो एक समाज आहे, तो मूळचा भारतीय आहे, हे त्यांच्यापैकी दहा हजार लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन स्पष्ट झाले आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर ऍंड मॉलेक्युलर बायलॉजी या संस्थेच्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच चार्ली चॅप्लीन, रॉजर मूर, सीन कॉनरी हे हॉलीवूडमधील तारे हे मूळ भारतीय वंशाचे असल्याचे स्पष्ट झाले. बायबलमधील नोहा कथा ही त्या कसोटीवर कधीही सिध्द झालेली नाही. जगातील त्या त्या शास्त्राच्या जाणकारांनी 'नोहा' कथा नाकारलेली आहे. त्यामुळे 'आर्य बाहेरून आले' ही थिअरीही कालबाह्य झाली आहे. ती कालबाह्य ठरवण्यासाठी प्रामुख्याने निश्चयाची गरज आहे.


ठराव्या शतकात युरोपातील देशांच्या हातात जगातील तीन चतुर्थांश जगाची सत्ता आल्यावर त्यांनी प्रथम काय केले असेल, तर त्यांनी साऱ्या जगाचा इतिहास लिहिण्यास घेतला. तो लिहिण्यास घेण्याची दोन मुख्य कारणे होती. एक म्हणजे साऱ्या जगाची लूट सुरू झाल्यावर तो लुटीचा आम्हाला नियतीने दिलेला अधिकारच आहे, असे त्यांना दाखवायचे होते आणि दुसरे असे की, आम्ही जगज्जेते आहोत, कारण या जगाचा इतिहासच आमच्यापासून सुरू झाला आहे, असे त्यांना दाखवायचे होते. जगाची संस्कृती प्रथम आमच्या पूर्वजनांनी केली व नंतर ती जगाला मिळाली, हे जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर बिंबेल असे त्यांना करायचे होते.  आफ्रिकेचे टोक, अमेरिकेचे दक्षिण टोक, आशियाचे आग्नेय टोक आणि संपूर्ण ऑॅस्ट्रेलिया खंड हे जगाचे भाग बायबलमधील एका गोष्टीपासून निर्माण झाले आहेत. त्यात त्यांनी असाही दावा केला की, सर्व भारतीय भाषा कुटुंबातील संस्कृतसह सर्व भाषा, मंगोलियन भाषा कुटुंबातील सर्व भाषा, त्याचप्रमाणे आफ्रिकेतील व दक्षिण अमेरिकेतीलही सर्व भाषा या त्यांच्यापासून निर्माण झाल्या आहेत. भारतातील वेद, उपनिषदे, महाकाव्ये हीसुध्दा आर्यांच्या बरोबर ज्ञानाची परंपरा सुरू झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत. युरोपचे सर्वत्र वर्चस्व असल्यामुळे हा इतिहास त्यांनी साऱ्या जगावर लादला आणि सर्व मांडलिक राष्ट्रांनी तो तोंडात मूग गिळून स्वीकारला. हाच इतिहास कसा खरा आहे, हे सांगण्यासाठी नंतर दोनशे वर्षे जगातील दोन हजारपेक्षा अधिक विद्यापीठे आजही झटत आहेत. इ.सन 1950 हे साल मध्यवर्ती धरले, तर त्याची आधी पाच वर्षें व नंतर पाच वर्षे जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर जे देश त्या त्या देशावर राज्य केलेल्या युरोपीय राज्यकर्त्यांच्या प्रभावाखाली राज्य करत राहिले, त्यांनी तोच इतिहास सुरू ठेवला. पण ज्यांना तो इतिहास बनावट असल्याचे मान्य होते, मनगटात रग आणि हृदयात इच्छाशक्ती होती, त्यांनी लगेचच तो इतिहास बदलायला घेतला. भारतात अजूनही ब्रिटिशांनी रचलेला इतिहास सुरू आहे. 'भारतात आर्य आले' हा इतिहास युरोपीयांनी ज्या बायबलमधील एका कथेच्या आधारे रचला, ती पाहिली तर त्या इतिहासातील फोलपणा स्पष्ट होतो. 'भारतात आर्य आले की आले नाहीत' या विषयावर येथे ब्रिटिशांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारेच खल घातला जातो. पण त्यामागचा युरोपीयांचा हेतू आणि त्या काळची परिस्थिती याचा आढावा घेतला, तर 'आर्य आले'चे जोखड बघता बघता फेकले जाणार आहे. 

ही इतिहासपूर्व काळातील गोष्ट आहे. जगामध्ये मोठा प्रलय आला. सारे जग वाहून गेले. फक्त एक व्यक्ती वाचली. त्याला वाचवण्यासाठी एक बोट आली. त्या व्यक्तीचे नाव नोहा. त्याने त्याच्याप्रमाणेच वाचलेल्या काही वस्तू व काही प्राणी यांच्यासह त्या बोटीत प्रवेश केला. काही काळाने पुराचे पाणी ओसरले. तो जेव्हा जमिनीवर आला, तेव्हा तो एकटाच मानव शिल्लक राहिला. काही काळ गेल्यानंतर त्याला एक स्त्री भेटली. त्यांना पुढे तीन मुले झाली. त्यांची नावे साम, हाम आणि जेफेथ. ती मुले मोठी झाल्यानंतरचा एक प्रसंग. एकदा नोहा घरात अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या अंगावर वस्त्र आहे की नाही याचेही त्याला भान नव्हते. त्याने दारू प्यायली असल्याने त्याची अवस्था अशी अस्ताव्यस्त होती. अशा वेळी हाम हा त्याचा मुलगा तेथे आला. आपली वडील दारू प्यायलेल्या अवस्थेत व कपडे नसलेल्या अवस्थेत पडलेले पाहून त्यांना हाम हसला. थोडया वेळाने साम नावाचा मुलगा तेथे आला व वडिलांची ती तशी स्थिती पाहून तो हसला नाही. त्याने आपल्या पाठीवर एक वस्त्र घेतले आणि वडिलांच्या जवळ तसाच पाठमोरा गेला. त्यांना ते वस्त्र दिले आणि तसाच तो परत बाहेर आला. सामचे हे शहाणपणाचे कृत्य पाहून नोहा त्याच्यावर प्रसन्न झाला. तरीही हामबाबतचा राग त्याच्या चेहऱ्यावरून मावळला नव्हता. त्याने हामला शाप दिला की, तू दक्षिणेकडे जाशील व तेथे काळा पडशील. तुला आणि तुझ्या पुढील पिढयांना साम आणि जेफेथ यांच्या पुढील पिढयांची सेवा करावी लागेल.

त्या कथेनुसारच पुढे असे झाले की, हाम दक्षिणेकडे आफ्रिकेत गेला. तो तेथे काळा पडला. आज जी सारी आफ्रिका आहे ती हामची वंशज आहे. त्यांच्या काळेपणाचे उत्तर नोहाच्या श्रापात आहे. तेव्हापासूनच आफ्रिकेतील काळे लोक सामच्या सेवेत लागले आहेत. त्यातच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. एवढयावरच ही कथा थांबत नाही, तर सोळाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत युरोपीयांनी त्यांनी मिळवलेल्या अन्य देशात सेवेसाठी गुलाम म्हणून आफ्रिकेतील काळे लोक नेले. ते लोक कोणी वृत्तपत्रात जाहिरात देऊन आलेले नाहीत, तर त्यांच्या त्यांच्या भागात जंगलात त्यांची त्यांची शेती करताना त्यांना वेढा टाकून त्यांच्यावर बंदुका उडवून त्यांना बंधक बनवले. महिलांना आणि पुरुषांना साखळयांनी बांधून बोटीवर आणले. काही ठिकाणी त्यांना विरोध झाला. एका गटाला असे गुलाम बनवत असताना अन्य गटातील लोकांनी बाहेरून हल्ला करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मोठया प्रमाणात प्रतिहल्ले केले. ही प्रक्रिया सव्वादोनशे वर्षे सुरू होती. त्यात एकूण किती लोकांना आफ्रिकेतून नेले गेले, याचे आकडे दोन कोटीपासून पंचवीस कोटीपर्यंत सांगितले जात आहेत. त्यांची जहाजे प्रामुख्याने अमेरिकेच्या दिशेने जात असताना आतील लोकांचा कडवा प्रतिकार होत असे. ती जहाजे तशीच बुडवली जात. त्या प्रक्रियेत निम्मे लोक जहाजे बुडवून मारण्यात आले.

हामचे वंशज मोठया प्रमाणावर आफ्रिकेच्या दक्षिणेला जाऊ लागले. तेथून ते जगभर पसरण्यास एक मोठे कारण झाले, ते म्हणजे त्या काळी हिंदी सागरात लेमुरिया नावाचा असाच एक खंडप्राय बेटवजा प्रदेश होता. अनेक शतकानंतर हामचा वंश वाढत गेला व हळूहळू लेमुरिया खंडावर त्यांची वस्ती पसरली आणि तेथून ते श्रीलंका, दक्षिण भारत, ऑॅस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका अशा भागात पसरले. या मार्गातून साऱ्या जगात नोहाचा वंश पसरला.

ब्रिटिशांनी व जर्मन इतिहासकारांनी भारतात जो आर्य-अनार्य हा इतिहास दिला, त्याची त्यांनी केलेली विभागणी अशी की, नोहाचा जो मुलगा हाम त्यांचे वंशज काळे पडून दक्षिणेकडे गेले, त्याचप्रमाणे सामचे वंशज मोठया प्रमाणावर पूर्वेकडे सरकले. मध्यपूर्व, भारत, आग्नेय आशिया आणि चीन-जपान अशा मार्गाने ते गेले. प्रामुख्याने पश्चिम आशियात त्यांचा प्रभाव अधिक राहिला. तेथेच पुढे ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांची निर्मिती झाली. त्या दोन्ही धर्मीयांचा त्यापूर्वीचा धर्म हा यहुदी किंवा ज्यू होता. नोहाच्या आज चालत आलेल्या परंपरानुसार हे सारे सामचे वंशज आहेत. साम या नावावरूनच पुढे 'सेमेटिक' हे नाव पडले. नंतर हे सेमेटिक गट आपापल्या अभिनिवेशानुसार जगभर जिंकायला बाहेर पडले, त्यांना साऱ्यांना सेमेटिक म्हटले जाते. सेमेटिक नावाची परंपरा आज जगभर एक फार मोठी परंपरा मानली जाते. त्या नावाची व्युत्पत्ती त्या बायबलमधील कथेत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते भारतात आले व त्यांनी उत्तर भारतात अनेक टोळयांमधून आपली संस्कृती वसवली. ते तेथे 'आर्य' म्हणून वसले. दक्षिण भारतात आफ्रिका व लेमुरिया मार्गे जे लोक आले, ते सारे आर्यांपेक्षा वेगळे म्हणून अनार्य म्हटले जाऊ लागले. पुढे ते द्रवीड म्हणूनही ओळखले जाऊ लागले. द्रवीड हे दक्षिण भारतात विंध्य पर्वतापर्यंत किंवा नर्मदा नदीपर्यंत वाढले. नोहाच्या कथेच्या आधारे त्यांना एवढेच दाखवायचे होते की, युरोपीय वर्चस्व साऱ्या जगभर आहे, त्याच्यामागे ही कथा आहे.


भारतात हाच इतिहास रुजला जावा, म्हणून ब्रिटिशांनी सारे प्रशासन हाताशी धरले, त्याचप्रमाणे अनेक विद्यापीठांतून वरील गृहीतक मध्यवर्ती धरून संशोधनाला आरंभ झाला. अनेक विद्वानांनी ते गृहीतकच खरे मानून त्यांचे लेखन सुरू केले. पण त्याला विरोध करणाऱ्या सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. युरोपीय लोकंानी ज्या ज्या पध्दतीने तो सेमेटिक हेमेटिक सिध्दान्त मंाडला, त्या प्रत्येक पातळीवर त्यांनी तो खोडून काढला. भारतात आर्यांनी अनार्यांना किंवा द्रविडंाना खालच्या जातीत ढकलले असा जो सिध्दान्त मांडला जायचा, त्याला डॉ. आंबेडकर चपखल उत्तर दिले. त्यांचे उत्तर असे होते की, द्रविडांमध्येही उत्तरेप्रमाणेच उच्च जाती आहेत आणि अस्पृश्यताही आहेत. आर्य बाहेरून आले या सिध्दान्ताला कसलाही आधार नाही. पण युरोपीयांना तो सिध्दान्त 'जगाचा आरंभ त्यांच्यापासून होतो' यासाठी मांडायचा होता. हा सिध्दान्त पुढे आल्यावर दीडशे वर्षांच्या काळात येथे ब्रिटिशांचे राज्य होते, त्यामुळे त्यांनी प्रत्येक राज्यात हा सिध्दान्त खोलवर रुजवण्यासाठी शासकीय पातळीवर मोठे प्रयत्न केले. त्याला मिशनरी संस्थांनी मोठया प्रमाणावर साहाय्य केले. या विषयाचे भारतात अनेक पैलू आहेत. यातील एक पैलू असा की जेव्हा भारतात इतिहास आणि ग्रंथ या संदर्भात नवा मुद्दा पुढे येत असे, त्या वेळी कोणीतरी विचारवंत, प्राध्यापक येथे येऊन येथे आर्य बाहेरून आले, याची पुस्ती जोडून जात असत. भारताच्या गेल्या दीडशे वर्षांच्या त्यांच्या पध्दतीच्या इतिहासलेखनात प्रत्येक टप्प्यावर हा प्रकार झाला आहे. भारताप्रमाणे साऱ्या जगातही त्यांनी तीच खबरदारी घेतली आहे.

हा मुद्दा दिसतो इतका साधा नाही. आजही येथील इतिहास हा 'आर्य आले' असे गृहीत धरूनच लिहिला आहे. शासकीय पातळीवरही तोच इतिहास अधिकृत मानला जातो. अर्थात यापूर्वीचे येथील शासनही त्याच विचाराचे असल्याने ते साहजिकच आहे. पण येथील सारे ज्ञानकोश, विश्वकोश, निरनिराळया विषयांना वाहिलेले ज्ञानकोश आणि शब्दकोशही ते गृहीत धरूनच झाले आहेत. ज्ञानकोश किंवा विश्वकोश यांतील एखादा जरी संदर्भ घेतला तर त्यात 'आर्य बाहेरून आले' असे गृहीत धरूनच लेखन केलेले असतेच. एवढयापुरती ही बाब मर्यादित नाही. एकेका शब्दाच्या विवरणासाठी जे संदर्भ घेतलेले असतात, तेही 'आर्य आले' या गृहीतकावर बेतलेले आहेत.

'सेमेटिक हेमेटिक' कथेच्या पुष्टयर्थ तयार करण्यात आलेले 'आर्य आले' हे जे उपकथानक तयार केले गेले, त्याचा भारताच्या इतिहासावर, येथील शिक्षणपध्दतीवर व शासकीय प्रक्रियेवरही किती खोल परिणाम झाला, हे आपण बघत आहोत. पण युरोपीयांही त्यांच्या साम्राज्याच्या जोरावर त्यांनी साऱ्या जगाचा इतिहास त्या कथेचा भाग केल्याने जगाच्या प्रत्येक देशाच्या इतिहासाची अशीच समस्या झाली आहे. काही वर्षांपूर्वी प्राचीन इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिटयूट फॉर इव्होल्युशनरी ऍंथ्रॉपॉलॉजी ऑॅस्ट्रेलियात उत्खनन करताना, त्यांना दोन इंच लांबीचे हाड सापडले. सत्कृतदर्शनी ते माणसाचे नव्हते. म्हणून ते तपासायला पाठवले, तर ते चार हजार वर्षांपूर्वीच्या एका कुत्र्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्या संस्थेने त्यावर अजून खोलवर अभ्यास केला, तेव्हा ते 'डिंगो' जातीच्या भारतीय कुत्र्याचे हाड असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जर्मन संस्थेच्या ऑॅस्ट्रेलियातील मूळच्या संशोधन संस्थेने अधिक उत्खनने केली. त्यातून तेथे भारतीय माणूस त्या वेळच्या साधनसामग्रीसह व संस्कृतीसह पोहोचला होता, हे स्पष्ट झाले. जगात फक्त सेमेटिक व हेमेटिकच पोहोचले, असे सांगण्यासाठी त्यांनी ऑॅस्ट्रेलियामधून चाळीस हजार वर्षांपूर्वी इजिप्तमधून निघालेला माणूस पोहोचला, असे लिहून ठेवले आहे, तोच तेथील इतिहास मानला जातो. अजूनही युरोपची जगावरील आर्थिक पकड गेलेली नाही. तेथे अनेक कारणांसाठी अजून युरोप-अमेरिकेवरील अवलंबित्व आहे. त्यामुळे अजून कोणी त्यांच्या इतिहासाला आव्हान देत बसत नाही. तरीही प्रत्येक देशात आता खरा इतिहास लिहिणारे अभ्यासक निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी तो तेथील शासनाने स्वीकारलाही आहे. पण सारा युरोपीय इतिहास हा नोहा कथेचा भाग आहे, हेही माहीत नसते.

नोहा कथेचे एक उपकथानक आहे. ते आहे भाषेसंबंधी. जगातील साऱ्या भाषा या लॅटीन भाषेतून निर्माण झाल्या, अशी त्या उपकथानकाची मध्यवर्ती कल्पना आहे. त्याला टॉवर ऑॅफ बेबल असे नाव आहे. इंटरनेटवर त्याचे चित्रही बघायला मिळते. सेमेटिक, हेमेटिक आणि जेफेथेटिक यांची वंशावळ जशी जगभर पसरली, त्याप्रमाणे त्यांच्या बरोबर तेथील भाषा गेल्या व त्यातूनच जगातील भाषा निर्माण झाल्या, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यात साऱ्या भारतीय भाषांचा समावेश मानला जातो. भारतातील महत्त्वाची संस्कृत भाषा आणि सगळया बोलीभाषाही त्याचाच भाग मानला जातो. दक्षिण भारतातील कन्नड, तेलगू, मल्याळम, तामिळी याही नोहाच्या वंशावळीमुळेच पसरल्या असे मानले जाते. जगातील चिनी, जपानी, कोरियन, त्याचप्रमाणे ऑॅस्ट्रेलिया खंडातील मावरी वगैरे भाषा,  आफ्रिकी भाषा आणि लॅटिन अमेरिकन भाषा या साऱ्या नोहावंशाच्या भाषा आहेत, असेच मानले गेले आहे. गेल्या पाचशे वर्षांतील युरोपीय वर्चस्वाखालील देशांनी ज्याप्रमाणे सेमेटिक, हेमेटिकवर फारसा आक्षेप न घेता स्वीकार केला, त्याचप्रमाणे साऱ्या जगातील चिनी, जपानी, कोरियन, त्याचप्रमाणे ऑॅस्ट्रेलिया खंडातील मावरी वगैरे भाषा, आफ्रिकी भाषा आणि लॅटिन अमेरिकन भाषा या साऱ्या नोहावंशाच्या भाषा आहेत, असेच मानले गेले आहे. गेल्या पाचशे वर्षांतील युरोपीय वर्चस्वाखालील देशांनी ज्याप्रमाणे सेमेटिक, हेमेटिकवर फारसा आक्षेप न घेता स्वीकार केला, त्याचप्रमाणे साऱ्या भाषाही तिकडूनच आल्या, अशा सिध्दान्तावर मान डोलावून संमती दिली. गेल्या दीडशे वर्षांत अनेक देशात या बनावट इतिहासाबाबत बंडाचा झेंडा उभारला. काही देशांत तो यशस्वी झाला, पण अजूनही जगावर युरोपीय वर्चस्वाचा पगडा आहे.

यातील एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, इ.स. 1870-75च्या दरम्यान हा मुद्दा जगापुढे मांडला गेला, त्यापूर्वीच्या जगाच्या इतिहासात हा मुद्दा कोठेही नव्हता. केवळ सामर्थ्याच्या जोरावर कोणी हा मुद्दा मांडत असेल आणि त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार तो मुद्दा स्वीकारला गेला असेल, तरी त्याची ही पार्श्वभूमी लक्षात घेता ते जोखड लवकरात लवकर फेकून देता आले पाहिजे. अलीकडे कोणत्या वंशाचे कोठे स्थलांतर झाले आहे हे दाखवण्यासाठी 'वाय क्रोमोसोम' पध्दत वापरली जाते. युरोपमध्ये रोमा म्हणून जो एक समाज आहे, तो मूळचा भारतीय आहे, हे त्यांच्यापैकी दहा हजार लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन स्पष्ट झाले आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर ऍंड मॉलेक्युलर बायलॉजी या संस्थेच्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच चार्ली चॅप्लीन, रॉजर मूर, सीन कॉनरी हे हॉलीवूडमधील तारे हे मूळ भारतीय वंशाचे असल्याचे स्पष्ट झाले. बायबलमधील नोहा कथा ही त्या कसोटीवर कधीही सिध्द झालेली नाही. जगातील त्या त्या शास्त्राच्या जाणकारांनी 'नोहा' कथा नाकारलेली आहे. त्यामुळे 'आर्य बाहेरून आले' ही थिअरीही कालबाह्य झाली आहे. ती कालबाह्य ठरवण्यासाठी प्रामुख्याने निश्चयाची गरज आहे.

 9881717855