हिंदूंवर दहशतवाद थोपण्याच्या प्रयत्नांना चपराक!

विवेक मराठी    27-Aug-2016
Total Views |

दहशतवादाचाच कलंक हिंदूंवर लावायचा, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांना त्यात गोवता येईल आणि मग दहशतवादाच्या विरोधातील सर्वसामान्यांचे मत हिंदुत्ववादी राजकीय विचाराच्या विरोधात जाईल. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीला होईल. या कारस्थानाचा भाग म्हणून साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना मालेगावच्या स्फोटाच्या प्रकरणात गोवण्यात आले. नांदेड येथे एका संघस्वयंसेवकाच्या घरात फटाक्यांच्या साठयाचा स्फोट झाला असताना तो बाँबस्फोट दाखविण्यात आला. मग परभणी, जालना,र् पूणा येथे झालेले स्फोट आणि नांदेड येथे झालेला स्फोट यांचा मालेगावच्या स्फोटाशी संबंध जोडण्याचे कारस्थान शिजले. राकेश धावडे यांनीच या स्फोटांसाठी प्रशिक्षण  दिल्याचा कपोलकल्पित शोध लावण्यात आला. नांदेडचा स्फोट हा फटाक्याचा नव्हता, तर संघाचे कार्यकर्ते तेथे बाँब तयार करण्याच्या प्रयत्नात होते आणि त्या बाँबचाच स्फोट झाला असावा अशी कल्पना करून नांदेड, परभणी,र् पूणा, जालना आणि मालेगाव हे एकाच कारस्थानातून घडविलेले स्फोट होते, असे कुभांड रचण्यात आले. एटीएसला याच दिशेने पुरावे आणि तपास चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे संघाला दहशतवादी संघटना असे मुद्दाम संबोधू लागले.


तिशय कुटिल राजकारणाचा भाग म्हणून आणि तथाकथित ढोंगी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली मल्टीकम्युनल चाल खेळत हिंदू दहशतवाद नावाचा विषय पुढे आणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महाराष्ट्रात जे कारस्थान केले होते, ते आता एकामागून एक खोटे ठरत आहे. सगळया चौकशीअंती हा निव्वळ बेबनाव केलेला होता आणि त्याला कसलेही पुरावे नव्हते, हे न्यायालयात सिध्द होत चालले आहे. याच मालिकेतील एक निकाल लागला. परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने परभणी येथे मश्ािदीसमोर 2003 साली झालेल्या स्फोटात ज्यांना आरोपी केले होते, त्या चारही आरोपींच्या विरोधात कसलाच पुरावा नसल्याने त्यांना निर्दोष सोडण्याचा निकाल दिला आहे.

मालेगाव येथे मश्ािदीसमोर बाँबस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी मुस्लीम आरोपींना अटक केली होती. मात्र त्या वेळी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांच्या मनात वेगळेच श्ािजत होते. देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी कारवाया चालू होत्या. बहुतेक सर्व घटनांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे तरुण आरोपी म्हणून सापडत होते. 'सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत, मात्र सगळे अतिरेकी मुसलमान आहेत' अशी वाक्ये लोकांच्या, विश्लेषण करणाऱ्यांच्या तोंडी सररास येऊ लागली होती. मुंबईतील बाँबस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जो असंतोष निर्माण झाला होता, त्याचा परिणाम म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधातील संघर्षयात्रेला प्रतिसाद मिळाला आणि 1995 साली महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले. मालेगावच्या स्फोटाच्या वेळीही राज्यात तसेच वातावरण होते. काँग्रेस आघाडी सरकार अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करत असून त्यामुळे दहशतवाद वाढत असल्याची भावना पसरत होती. अशा वेळी या विषयावर उतारा म्हणून काँग्रेसजनांच्या डोक्यातून एक कल्पना बाहेर पडली. दहशतवादाचाच कलंक हिंदूंवर लावायचा, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांना त्यात गोवता येईल आणि मग दहशतवादाच्या विरोधातील सर्वसामान्यांचे मत हिंदुत्ववादी राजकीय विचाराच्या विरोधात जाईल. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीला होईल. या कारस्थानाचा भाग म्हणून साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना मालेगावच्या स्फोटाच्या प्रकरणात गोवण्यात आले. नांदेड येथे एका संघस्वयंसेवकाच्या घरात फटाक्यांच्या साठयाचा स्फोट झाला असताना तो बाँबस्फोट दाखविण्यात आला. मग परभणी, जालना,र् पूणा येथे झालेले स्फोट आणि नांदेड येथे झालेला स्फोट यांचा मालेगावच्या स्फोटाशी संबंध जोडण्याचे कारस्थान श्ािजले. राकेश धावडे यांनीच या स्फोटांसाठी प्रश्ािक्षण दिल्याचा कपोलकल्पित शोध लावण्यात आला. नांदेडचा स्फोट हा फटाक्यांचा नव्हता, तर संघाचे कार्यकर्ते तेथे बाँब तयार करण्याच्या प्रयत्नात होते आणि त्या बाँबचाच स्फोट झाला असावा, अशी कल्पना करून नांदेड, परभणी,र् पूणा, जालना आणि मालेगाव हे एकाच कारस्थानातून घडविलेले स्फोट होते, असे कुभांड रचण्यात आले. एटीएसला याच दिशेने पुरावे आणि तपास चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे हे संघाला दहशतवादी संघटना असे मुद्दाम संबोधू लागले. या सगळया कारस्थानाला परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाने सणसणीत चपराकच लगावली आहे. परभणी येथील स्फोटात ज्यांच्यावर आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता, ते संजय चौधरी, मारुती वाघ, योगेश देशपांडे (सर्व रा. नांदेड) व राकेश धावडे (रा. पुणे) यांच्या विरोधात एकही पुरावा नसल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. हे सगळे कुभांड रचले होते आणि परभणी ते मालेगाव अशा प्रकारचे कुभांड रचले गेले होते, ते आता जवळजवळ सिध्द झाले आहे.

शहरातील रहेमतनगरातील मोहमदीया मश्ािदीत 21 नोव्हेंबर 2003 रोजी रमजान महिन्यात दोन स्फोट झाले होते. मश्ािदीत शुक्रवारची मोठी नमाज झाल्यानंतर पावणेदोनच्या सुमारास मोठया आवाजातील दोन स्फोट पाठोपाठ झाले होते. त्यामुळे मश्ािदीत मोठा धूर होऊन एकच गदारोळ उडाला. या स्फोटात 30 ते 35 जण जखमी झाले होते. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. त्यातील गंभीर जखमी असलेल्या अब्दुल समद अब्दुल जब्बार हा 27 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील रुग्णालयातील उपचार सुरू असताना मृत्यू पावला होता. स्फोटाच्या घटनेनंतर शहरात जाळपोळीचे, दगडफेकीचे प्रकार घडले. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तपास करून या स्फोट प्रकरणात आरोपी म्हणून संजय विठ्ठल चौधरी याला 12 जून 2006 रोजी अटक केली. मारुती केशव वाघ, योगेश देशपांडे यांना 12 सप्टेंबर 2006 रोजी अटक करण्यात आली. एप्रिल 2006मध्ये नांदेड येथे एका संघस्वयंसेवकाच्या घरी जो स्फोट झाला, त्यानंतर त्याच्याशी या परभणीच्या स्फोटाचा संबंध जोडून तब्बल तीन वर्षांनंतर या चार आरोपींना परभणी स्फोटाचे आरोपी असल्याचे दाखवून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड येथील घटनेत मरण पावलेले संघाचे पूर्व प्रचारक हिमांशू पानसे यांनाही या घटनेत काल्पनिकरित्या गोवण्यात आले. हिमांशू पानसे यांनी या स्फोटासाठी परभणी, पुणे येथे प्रवास केल्याची कपोलकल्पित कथा आणि त्याची पुष्टी करण्यासाठी काही तकलादू पुरावे तयार करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांच्या पतीने या स्फोट झालेल्या मश्ािदीसमोर लहान मुले खेळत असताना त्यांना तेथे काडतुसे सापडल्याची एक कथा रचली आणि ती काडतुसे पोलिसांना दिली. हे सगळे कपोलकल्पित पुरावे या खटल्यात काही टिकले नाहीत. मालेगावचा स्फोट झाला आणि नांदेड, परभणी स्फोटाबरोबरचर् पूणा, जालना येथील स्फोटही मालेगावशी निगडित स्फोट आहेत असेर् दशविण्याचा प्रचंड आटापिटा करण्यात आला.

अखेर परभणी न्यायालयाने या प्रकरणातील या चारही आरोपींना निर्दोष
मुक्त करून या राजकीय कारस्थानाला धक्का दिला आहे. यापूर्वी जालना येथील स्फोटातील अशाच गोवलेल्या हिंदू आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. या सर्व स्फोट प्रकरणात राकेश धावडे यांना पोलिसंानी जाणीवपूर्वक आरोपी केले होते. राकेश धावडे यांनी या सर्वांना बाँब तयार करण्याचे प्रश्ािक्षण दिले असा आरोप होता. मात्र मराठवाडयात जालना, परभणी या खटल्यात धावडे यांच्याविरोधात कसलाही पुरावा उभा करता आलेला नाही. त्यामुळे धावडे निर्दोष सुटले आहेत. या चारही प्रकरणात धावडे यांना अडकवून त्यांना मोक्का लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. आता एकेका प्रकरणातून धावडे सुटले, तर ते मोक्कातून बाहेर येतील. हिंदूंना आणि हिंदुत्ववादी संघटनांना ओढून ताणून दहशतवादी ठरविण्याचा हा प्रयत्न सपशेल फसत चालला आहे. जे अस्तित्वात नव्हतेच, ते सिध्द कसे करणार? हा खरा प्रश्न आहे. पोलिस यंत्रणा, तपास यंत्रणा हाताशी आहेत म्हणून त्यांचा गैरफायदा घेत राजकीय विरोधकांना, देशातील सामाजिक संघटनांना बदनाम करण्याचे किती भयानक कारस्थान हे तथाकथित सेक्युलर लोक संभावित चेहऱ्याने कसे खेळत होते, याचे हे प्रकरण मोठे उदाहरण ठरणार आहे. आता न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे असे संभावितपणे मखलाशी करत हे नामानिराळे राहतील. मात्र काही निरपराध तरुणांना आयुष्यातून उठविण्याचा डावच यांनी यांच्या राजकीय फायद्याकरिता टाकला होता. काही सामाजिक संघटनांना पार बदनाम करून सार्वजनिक आयुष्यातून त्यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचेच हे कारस्थान होते.

केवळ न्यायालयात हे कारस्थान उधळले म्हणून आनंद साजरा करत बसण्यापेक्षा या विषयात ज्यांनी हे कारस्थान केले त्यांना झटका बसला पाहिजे. मुळापासून या कारस्थानाचा छडा लावून हे कारस्थान करणाऱ्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे. त्यांचे हे ढोंगी सेक्युलर कारस्थान समाजासमोर उघडे पाडले पाहिजे. अशा प्रकारचा जीवघेणा खेळ खेळण्याची भविष्यात कोणाची हिंमत होता कामा नये. रा.स्व. संघाला गांधींचे हत्यारे म्हटल्याबद्दल राहुल गांधींच्या विरोधात खटले चालू आहेत. रा.स्व. संघाला दहशतवादी ठरविण्यासाठी केलेल्या या भयंकर कारस्थानाच्या मुळापर्यंत जात या कारस्थानाचाही असाच पर्दाफाश केला पाहिजे.

vivekedit@gmail.com