रेशनकार्ड संस्कृतीच्या नावानं चांगभलं

विवेक मराठी    09-Aug-2016
Total Views |

अजिंठा-वेरूळपुरत्या मर्यादित - म्हणजे रेशनकार्ड संस्कृतीतून पर्यटन विभागाने स्वत:ला बाहेर काढलं पाहिजे. तरच खान्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील इतर भागांतदेखील पाहण्यासारखं बरंच काही आहे, हे उर्वरित महाराष्ट्राला समजू शकेल. श्ािवाय पर्यटन हे नुसतं पर्यटकांसाठी आनंद लुटण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते अनेकांसाठी रोजगार देणारंदेखील आहे. पर्यटनाच्या बाबतीत खोलवर विचार केला गेला व त्या दृष्टीने आखणी केली गेल्यास, दुर्लक्षित क्षेत्रांचा विकास केला गेल्यास त्याचे विविध फायदे होऊ शकतील.


प्तशृंगी देवीविषयीची माहिती मागच्या वर्षी विवेकमध्ये देण्यात आली होती, त्या वेळी मुंबईतील एका वाचकाचा फोन आला. ''देवीचं इतकं चांगलं मंदिर आण्ाि नर्िसगरम्य स्थळ आपल्या महाराष्ट्रातच आहे, हे उर्वरित महाराष्ट्राला माहीतच असू नये? आम्ही मुंबई-दिल्ली अगर मुंबई-नागपूर प्रवास करतो. परंतु कधी नाश्ािक, मनमाड या रेल्वे स्थानकावर 'येथून अमुक अमुक अंतरावर इतकं चांगलं क्षेत्र आहे' याचा साधा फलकदेखील नाही. आपल्या देखण्या क्षेत्रांबाबतची पर्यटन विभागाची अनास्था आण्ाि जास्त लोकांना ही क्षेत्रे माहीत होऊच नयेत, याबाबतची रेशनकार्ड संस्कृती कधी बदलणार?

रेशनकार्ड संस्कृती? म्हणजे सर्व काही मर्यादित. आपल्या महाराष्ट्राचं पर्यटन म्हणजे अजिंठा-वेरूळपर्यंत मर्यादित होऊन बसलं आहे. त्याच्याबाहेरही काही पाहण्यासारखं आहे, याचा परिचय ना महाराष्ट्रातल्या पर्यटकांना करून देण्यात येतो, ना महाराष्ट्राबाहेरच्यांना. मुंबईत धो धो पाऊस कोसळू लागला की मुंबईकर आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगांमधील माळशेज, कोकणातलं आंबोली, ताम्हणी घाटावर गर्दी करून पाण्यात भिजण्याचा नि नर्िसगाचं मुक्तर् दशन घेण्याचा आनंद लुटतो. म्हणजे लोकांना भटकायला आवडतं. दोन पैसे खर्च करायची त्यांची तयारी असते. परंतु या घाटांश्ािवाय, अजिंठा-वेरूळश्ािवायदेखील महाराष्ट्रात वेगळं काही आहे, हे त्यांना कोणी कधी सांग्ाितलंच नाही. शासकीय पातळीवर त्या दृष्टीने कधी विचार झालेला दिसत तरी नाही.

महाराष्ट्रातील पर्यटक जवळच्या गुजरात राज्यातल्या पावागडला जातात, राजस्थानातल्या अबू पर्वतावर जातात, मध्य प्रदेशातल्या पचमढीला जातात, ते महाराष्ट्रात महाबळेश्वरलाही जातात; परंतु खान्देशातही तोरणमाळसारखं त्यासारखंच थंड हवेचं ठिकाण आहे, हे त्यांना कितपत माहीत आहे? नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात सातपुडयाच्या रांगेत हे ठिकाण आहे. नंदुरबारहून साठ-सत्तर किलोमीटरवरचं हे ठिकाण पाहायला नक्कीच आवडेल असं आहे. थेट तिथपर्यंत रस्ता असल्याने येथे पर्यटकांना कधीही जाता येऊ शकेल. परंतु भूगोलाच्या पुस्तकात खान्देशातलं थंड हवेचं ठिकाण 'तोरणमाळ' याउपर माहिती नाही. येथे देवीचं मंदिर आहे. नवनाथांपैकी गोरक्षनाथांचंदेखील मंदिर येथे आहे. काही चांगले पिकनिक स्पॉट्स आहेत. बघण्यासारखी सिताखाई, तर बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी यशवंत तलाव आहे. येथे येणाऱ्यांना मुक्काम करता येईल अशी व्यवस्था आहे. वर्षभरात कोणत्याही मोसमात येथे येता येतं. विशेषतः पावसाळयात तर हा परिसर नयनरम्य असतो. खरं म्हणजे पर्यटकांना जे हवं ते सगळं येथे आहे. परंतु ते सगळया महाराष्ट्राला माहीत व्हावं अशी योजनाच कधी झाली नाही. तेच ते पाहून लोक कंटाळतात. अशा वेळी पर्यटकांना खान्देशातील तोरणमाळचा परिचय झाला तर? त्यासाठी मोठे प्रयत्न होणं गरजेचं आहे.

ज्यांचं स्वत:चं रेस्ट हाउस येथे आहे, ते जयकुमार रावळच आता महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री झाल्याने आता तोरणमाळचा आणखी विकास होऊ शकेल. सगळया महाराष्ट्राला तोरणमाळचा परिचय व्हावा याचीदेखील योजना त्यांनी आखावी, असा जनमानस आहे.

अष्टविनायकाच्या ठिकाणी भाविक वर्षभर गर्दी करतात. महाराष्ट्रात गणपतीची इतरही देखणी मंदिरं आहेत. परंतु खान्देशातील पद्मालय हे देखण्या टेकडयांच्या मधोमध असलेलं मंदिर कोणाला माहीत आहे? येथे मंदिरासमोर भव्य तलाव आहे. आमोद-प्रमोद ही गणपतीची दोन रूपं असलेली मूर्ती या मंदिरात आहे. परंतु जळगाव जिल्ह्याच्या बाहेर कोणालाच या सुंदर मंदिराविषयी माहिती नाही. जळगावपासून 40-45 किलोमीटर अंतरावर व राष्ट्रीय महार्माग क्र. 6वरील एरंडोलपासून 10 किलोमीटर अंतरावर हे गणरायाचं ठिकाण आहे. येथे फारशा सोयी नाहीत. श्रावणातल्या चतुर्थीला येथे होणाऱ्या परिसरातील भाविकांच्या गर्दीलाच येथल्या प्रशासनाला आवरता येत नाही, तर उर्वरित महाराष्ट्राला हे स्थळ माहीत झालं, तर व्यवस्थेचे बाराच वाजतील. स्थळ चांगलं असूनही अव्यस्थेमुळे विकास झालेला नाही.

सातपुडयाच्या रांगेत 400 फुटांवरून कोसळणारा मनुदेवीचा धबधबा जळगाव जिल्ह्याबाहेर किती जणांना माहीत असणार? चोपडा-बऱ्हाणपूर महामार्गावर आडगावपासून काही अंतरावर सातपुडयाच्या कुशीत गर्द झाडीत हे क्षेत्र आहे. आडगावपासून डोंगररांगेतल्या या देवस्थानाकडे पायी जातानाचा आनंद काही औरच असतो. आता मात्र रस्त्याची सोय झाली आहे.

नर्िसगरम्य ठिकाणी जशी नर्िसगाने लयलूट केली आहे, तशीच मन:शांती लाभावी अशी तीर्थक्षेत्रंदेखील खान्देशात आहेत. त्याचीदेखील माहिती सगळया महाराष्ट्राला करून दिली पाहिजे. वणीच्या गडावरची सप्तशृंगी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्याही हिलस्टेशनाच्या तोडीस तोड आहे. ते देवीचं क्षेत्र असल्याने भाविक तर येतातच, त्याशिवाय पावसाळयातलं या भागातलं नर्िसगसौंदर्य डोळयांचं पारणं फेडणारं असतं. तिकडे गुजरातच्या सापुताऱ्याला भेट देता देता पर्यटकांना वणी गडावरचा नर्िसग खुणावतो. सप्तशृंगी गडापासून जवळच मांगी-तुंगी हे तीर्थक्षेत्र आहे. मांगी-तुंगी ह्या जुळया सुळक्यांवरून या डोंगराला हे नाव पडलं आहे. येथे अखंड काळा पाषाण कोरून त्यात भगवान वृषभदेवांची 108 फुटी भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे. मागच्या वर्षी या मूर्तीच्या अनावरणानिमित्त पंचकल्याणक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिकडे कर्नाटकात श्रवणबेळगोळला बाहुबलीच्या र्_दशनाला जाणाऱ्यांना भगवान वृषभदेव पाहायला आवडणार नाही का? मांगी-तुंगीसारखं पर्यटनस्थळ आण्ाि त्यात वृषभदेवांच्या 108 फुटी भव्य मूर्तीच्यार् दशनाची ओढ कोणालाही रोखू शकत नाही. या ठिकाणी पोहोचायला पाषाणात कोरलेल्या अडीच हजार पायऱ्या हेदेखील औत्युक्यच आहे.

याच भागात पण मालेगाव तालुक्यात ग्ािरणा नदीच्या काठावर ग्रामीण महाराष्ट्राचं श्रध्दास्थान खंडेरायाचं एक अपरिचित देवस्थान चंदनपुरी. हे खंडोबाची पत्नी बाणाईचं माहेर. त्यामुळे खंडोबाच्या जेजुरीला जसे भाविक जातात, तसे ते चंदनपुरीलाही येतात. परंतु महाराष्ट्राला चंदनपुरीचा जेजुरीइतका परिचय नाही. मालेगाव-नाश्ािक रस्त्यावर हे ठिकाण आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पितळखोरे लेणी, पाटणादेवीचं मंदिर, चोपडा तालुक्यातील गरम पाण्याचे झरे ही ठिकाणंदेखील महाराष्ट्राला माहीत झाली पाहिजेत. त्यासाठी पर्यटन विभागाने विशेष योजना आखली पाहिजे. किमान मुख्य बस स्थानकांवर, रेल्वे स्टेशनांवर त्या-त्या भागातील तीर्थक्षेत्रांची व पर्यटन स्थळांची माहिती असलेले फलक लावण्यात यावेत. सध्या डिजिटल युग असल्याने त्या स्वरूपात माहिती पुरवली गेल्यास पर्यटकांसाठी उपयोगी ठरेल.

लोकांकडे साधनांची रेलचेल आहे. त्यांना वेगवेगळया ठिकाणी फिरायलादेखील आवडतं. परंतु अशी ठिकाणं कुठे आहेत आण्ाि तिथे कसं पोहोचता येईल, याची त्यांना माहिती नसते. माहिती क्रांतीच्या काळातदेखील इंटरनेटवर वरील क्षेत्रांची फारशी माहिती उपलब्ध होत नाही. श्ािवाय अशी माहिती करून घेण्यासाठी त्याबाबत काही ना काही माहिती तर आधी लोकांकडे हवी ना? ती माहिती प्रशासनाने करून दिली पाहिजे.

अजिंठा-वेरूळपुरत्या मर्यादित - म्हणजे रेशनकार्ड संस्कृतीतून पर्यटन विभागाने स्वत:ला बाहेर काढलं पाहिजे. तरच खान्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील इतर भागांतदेखील पाहण्यासारखं बरंच काही आहे, हे उर्वरित महाराष्ट्राला समजू शकेल. श्ािवाय पर्यटन हे नुसतं पर्यटकांसाठी आनंद लुटण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते अनेकांसाठी रोजगार देणारंदेखील आहे. पर्यटनाच्या बाबतीत खोलवर विचार केला गेला व त्या दृष्टीने आखणी केली गेल्यास, दुर्लक्षित क्षेत्रांचा विकास केला गेल्यास त्याचे विविध फायदे होऊ शकतील. तसं झाल्यास आज आपण जे रेशनकार्ड संस्कृतीच्या नावांन चांगभलं चाललंय, ते उद्या पर्यटन विभागाच्या जागरूकतेबद्दल चांगभलं म्हणता येईल.

8805221372