यंदाही धुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या 'दुष्कळा'

विवेक मराठी    19-Sep-2016
Total Views |

यंदाच्या पावसाळयाने 'गेले ते वर्ष बरे होते' असे म्हणायची पाळी धुळे जिल्ह्यातील धुळे, श्ािंदखेडा, साक्री या तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. साक्री तालुक्यात काही भागात तर यंदा पाऊस झाला का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. पाऊस पडू लागला म्हणून बंद झालेले टँकर पावसाळा संपत नाही, तोच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. जुलै महिन्यात चांगला पाऊस होत होता. त्यामुळे पिके बरी दिसत होती. परंतु 10 ऑगस्टनंतर पावसाने जो निरोप घेतला, तो परत आलाच नाही.


शे
जारच्या नाश्ािक जिल्ह्यात पाऊस धुवाधार बरसत असताना धुळे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात वीतभर वाढलेली ज्वारी, बाजरी नि गुडघ्यापर्यंत वाढलेला कापूस पाण्यावाचून करपून जात होता. आता पावसाने पाठ फिरविण्यास तब्बल महिना उलटला असून धुळे, साक्री, श्ािंदखेडा या तालुक्यांमध्ये 50 टक्केदेखील पाऊस झालेल्या नसून मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या दुष्कळा लोकांना पुन्हा सहन कराव्या लागतील काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

यंदाच्या पावसाळयाने 'गेले ते वर्ष बरे होते' असे म्हणायची पाळी धुळे जिल्ह्यातील धुळे, श्ािंदखेडा, साक्री या तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. साक्री तालुक्यात काही भागात तर यंदा पाऊस झाला का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. पाऊस पडू लागला म्हणून बंद झालेले टँकर पावसाळा संपत नाही, तोच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. जुलै महिन्यात चांगला पाऊस होत होता. त्यामुळे पिके बरी दिसत होती. परंतु 10 ऑगस्टनंतर पावसाने जो निरोप घेतला, तो परत आलाच नाही. नेमका शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या मुगाचा हंगाम भरडला गेला. भारी जमिनीत काही तरी उत्पादन आले, परंतु साक्री, श्ािंदखेडा व धुळे जिल्ह्यातील बराचसा भाग हलक्या जमिनीचा आहे. मुरमाड व पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसलेल्या या जमिनीतील पीक करपून गेले. त्यामुळे उडदाचे व मुगाचे फारसे उत्पादन आले नाही. बाजरी, ज्वारी व मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. कारण या पिकांच्या वाढीच्या कालखंडातच पाऊस गायब झाला. काही ठिकाणी तर ज्वारी पोटरीत असताना जमिनीत ओल असण्याची गरज होती. त्या वेळी पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीक हातचे गेले आहे. बाजरीचीही तशीच अवस्था. पावसाअभावी मक्याच्या व कापसाच्या पिकांवरही दुष्परिणाम झाला आहे.

फक्त 297 मि.मी. पाऊस

आतापर्यंत कुठे कमी, तर कुठे जास्त असा पाऊस पडूनही फक्त 297 मि.मी. इतक्याच पावसाची सरासरी जिल्ह्याभरात आहे. धुळे जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या र्मार्गदशनाखाली दर आठवडयाला पावसाबाबत व पीक परिस्थितीबद्दल सतत आढावा घेतला जातो. पाऊस लांबल्याला महिना उलटल्यानंतर विमा कंपनी रिलायन्स, जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक होऊन सद्यःस्थितीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. मागच्या वर्षाच्या दुष्काळाचे चटके ताजे असतानाच यंदाचा दुष्काळ पुन्हा डागण्या देत असल्याने पुन्हा पुढच्या पावसाळयापर्यंत पावसाची वाट पाहण्याचे दिवस जिल्ह्यावर आले आहेत.

कृषी विभागाची तत्परता

धुळे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबद्दल तेथील जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पुढील माहिती दिली - ''जिल्ह्यातील 39पैकी 12 महसूल मंडळात 50 टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. शुक्रवारी कृषी विभागामार्फत आणखी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने त्यात आणखी काही मंडळे जोडली जातील असे दिसते. अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पिक विम्याचा योग्य तो मोबदला मिळावा, म्हणून विमा कंपनी रिलायन्ससह जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. 5 जुलैच्या शासन र्निणयानुसार अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. आता पाऊस जाऊन 30 दिवस उलटले असल्याने पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आम्ही तसे विमा कंपनीच्या नर्िदशनास आणून देत आहोत.''

कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, त्या त्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष जाऊन पीक परिस्थिती पाहिली आहे. त्यावरून कापसासह सर्वच पिकांचे सध्या 50 टक्के नुकसान झालेच आहे. यापुढही पाऊस न झाल्यास नुकसानीची टक्केवारी पन्नासच्या वर जाऊ शकते. साक्री तालुक्यातील माळमाथ्याचा काही भाग, बरड जमीन असलेल्या राजबाई शेवाळे, इच्छापूर या भागात तर बाजरी फक्त एक फूटभरदेखील वाढली नसल्याचे दिसून आले. शेतात कमी पाण्यामुळे खुरटलेली पिके एका बाजूला, तर कोरडे नदी-नाले व आटलेल्या विहिरी अशी अवस्था या भागात दिसून येत आहे. जनावरांच्या चाऱ्याची आतापासूनच दैनावस्था दिसू लागली आहे.

पांझराकाठची स्थिती बरी

धुळे जिल्ह्यात 297 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस वाहून निघाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. विहिरी मागच्या वर्षीच कोरडया पडल्या आहेत. या वर्षी पाऊसमान चांगले राहिले असते, तर त्यांना पाणी वाढले असते. एकूण पावसाळयाच्या सुरुवातीला विहिरींची जी स्थिती होती, ती तशीच आहे.

डांग जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या रांगेत चांगला पाऊस झाल्यामुळे पांझरा नदीला भरपूर पाणी येत असल्याने लाटीपाडा धरण तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे साक्री तालुक्यातील काही भागात मात्र पीक परिस्थिती चांगली आहे. लाटीपाडा धरणाच्या कालव्यातून गेल्या अनेक दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याने भूगर्भात पुनर्भरणाची प्रक्रिया आपोआप सुरू आहे. लाटीपाडाप्रमाणेच अक्कलपाडा धरणातही चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे पांझरा काठावरील गावांसाठी आशादायक चित्र आहे. तथापि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतांमधील पिकांची चाळण झाली आहे.

मेंढपाळांचे हाल

धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री या तालुक्यांत बऱ्याच भागात शेतीसोबत मोठया प्रमाणात मेंढया पाळण्याचा परंपरागत व्यवसाय करणारे मेंढपाळ आहेत. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने मेंढयांना चरण्यासाठी चांगली स्थिती होती. परंतु महिनाभर झाला तरी न पाऊस आल्याने गवताची फारशी चांगली वाढ झालेली नाही. डोंगराळ भागात तर गवताचा कोंबही दिसत नाही. त्यामुळे पावसाळा संपत नाही तोच मेंढपाळांना आपले गाव सोडून मेंढया चारण्यासाठी जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात मेंढया घेऊन जावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दर वर्षी डिसेंबर महिन्यानंतर येणारी वेळ आताच आल्याने मेंढपाळांसमोर बिकट समस्या निर्माण झाली आहे.

आता सप्टेंबर समाप्तीला आला असून पावसाळयाचे दिवस संपल्यात जमा आहेत. त्यामुळे या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळाच्या दुष्चक्राचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

8805221372