ग्रामीण भागात जि. प. निवडणुकीचे वारे

विवेक मराठी    16-Jan-2017
Total Views |

महाराष्ट्रात ज्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची यंदा निवडणूक होणार आहे, त्यात खान्देशातील जळगावचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष मतदान होणार हे निश्चित झाले असून 16 फेब्रुवारीला मतदान होईल. मात्र भाजपा-सेनेची निवडणुकीसाठीची तयारीर् पूणत्वास आल्याचे दिसते, तर दोन्ही काँग्रेसमध्ये ठरावीक तालुके वगळता अद्याप शांतता दिसून येत आहे.
हाराष्ट्रात ज्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची यंदा निवडणूक होणार आहे, त्यात खान्देशातील जळगावचा समावेश आहे. राज्यात सर्वदूर जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना जळगावात मात्र भाजपा-श्ािवसेना तब्बल तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून सत्तेवर विराजमान आहे. त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने हे दोन्ही पक्ष पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे नुकत्याच संपलेल्या नगरपालिका निवडणुकीवरून दिसून येते. नगरपालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक नगरपालिकांमध्ये यश मिळविले असून त्याखालोखाल श्ािवसेनेला यश मिळालेले आहे. जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस पक्षांमध्ये प्रचंड नैराश्य पसरलेले असल्याने भाजपा-सेनेत युती होवो अगर न होवो, हे दोन्ही पक्ष मिळूनच जि.प.ची सत्ता बळकावतील अशी चिन्हे दिसतात.

एक पंचवार्षिक वगळता जि.प. निवडणुकीत भाजपा-सेना निवडणूक स्वतंत्रपणे लढवितात व निवडून आल्यावर पुन्हा एकत्र येतात असा इतिहास आहे. मागच्या सगळया निवडणुकांमध्ये सेनेपेक्षा भाजपाने अधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र स्वबळावर आपला अध्यक्ष बसविण्यात अपयश येत असल्याने प्रत्येक वेळी निवडणुकीनंतर सेनेला सोबत घेतले आहे. या वेळीही त्यापेक्षा वेगळे घडेल असे वाटत नाही. 68 जि.प. सदस्य असलेल्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक 35 संख्याबळापर्यंत पोहोचता न आल्याने भाजपाला दर वेळी सेनेला सोबत घ्यावे लागते. या वेळी '40 प्लस' हा नारा घेऊन भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मागच्या वेळी भाजपाला 22, तर श्ािवसेनेला 17 जागांवर विजय मिळविता आला होता. त्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 10 व 19 जागांवर विजय मिळाला होता.

या वेळच्या जि.प. निवडणुका विधानसभेप्रमाणे चौरंगी होण्याची चिन्हे दिसतात. भाजपा-सेनात सत्तेत असूनही त्यांच्यात सख्य नाही हे काही लपून राहिलेले नाही. जसे राज्यात, तसेच जळगाव जि.प.तही दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकाविरोधात असतात. त्यामुळे या वेळी वेगळे चित्र असेल असे वाटत नाही. भाजपा-सेनेप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीतही सवतासुभा आहेच. त्यामुळे निवडणुकीआधी सगळेच पक्ष युतीसाठी प्रयत्न करून पाहात आहेत. परंतु युती होण्याची शक्यता कमीच दिसते.

जि.प.चेच प्रतिबिंब पंचायत समित्यांमध्ये असेल. चोपडा, पारोळा व भडगाव तालुक्यात काँग्रेससाठी आशादायक स्थिती असली, तरी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या वेगवेगळया निवडणुकांनंतर या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याचे धैर्य उरले नसल्याचे दिसते. डॉ. सतीश पाटील व ऍड. संदीप पाटील हे दोन्ही नेते अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वतीने लढण्यासाठी उसने अवसान आणत असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण करण्यात कमी पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकींत उतरण्यापूर्वीच ह्या पक्षांचा पराभव दिसू लागतो. बाजार समित्या, दूध संघ, जिल्हा बँक, विधान परिषद व नगरपालिका निवडणुकींनी ते सिध्दच केले आहे. त्यामुळे मागच्या पंचवार्षिकला या दोन्ही पक्षांनी चांगली टक्कर देऊन सत्तेच्या 29 जागा पटकाविल्या होत्या. मात्र त्या वेळी राज्यात या पक्षांचे सरकार सत्तेवर होते. या वेळी उलट आहे. सत्ता भाजपा-सेनेकडे आहे. त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकतो. त्यातल्या त्यात भाजपाला अधिक यशाची खात्री त्या पक्षाकडून व्यक्त होताना दिसते.

सध्या भाजपा नेते एकनाथराव खडसे मंत्री नसले, तरी त्यांचा जिल्ह्यावर दबदबा कायम आहे. जोडीला ग्ािरीश महाजनांचा करिश्मा आहेच. नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही पहिली निवडणूक असेल. श्ािवसेनेचे गुलाबराव पाटील हे मंत्री झाल्यामुळे श्ािवसेनेलाही आपली ताकद वाढल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनाही आपल्या मंत्रिपदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी जि.प.च्या मागील वेळेपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे.

नगरपालिका निवडणुकीतील पराभवाच्या मानसिकतेतून अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी बाहेर पडलेली नसल्याने निवडणुकीच्या दृष्टीने या पक्षांची फारशी तयारी दिसून येत नाही. दुसरीकडे भाजपा-सेना मात्र कामाला लागल्याचे दिसते. भाजपाने उमेदवार चाचपणीसाठी जिल्हास्तरावर तसेच तालुका पातळीवर मेळावे आटोपले आहेत. तोच र्माग सेनेनेही अवलंबिला आहे. भाजपाने तर सर्ंपूण जिल्ह्यात काय परिस्थिती असेल, त्या दृष्टीने मतदार सर्वेक्षणदेखील केले आहे. सेनेने काही जागांवर तर आपले उमेदवारदेखील घोषित करून टाकले आहेत. राज्य पातळीवर भाजपा-सेनेची युतीसाठी चर्चा सुरू असल्याचे दिसत असले, तरी जळगाव जिल्ह्यात युती होणार नाही असे संकेत दिसत असल्यानेच दोन्ही पक्ष सगळयाच जागांसाठी उमेदवार उभे करण्याच्या तयारीला लागले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष मतदान होणार हे निश्चित झाले असून 16 फेब्रुवारीला मतदान होईल. मात्र भाजपा-सेनेची निवडणुकीसाठीची तयारीर् पूणत्वास आल्याचे दिसते, तर दोन्ही काँग्रेसमध्ये ठरावीक तालुके वगळता अद्याप शांतता दिसून येत आहे.

8805221372