अमेरिका दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र

विवेक मराठी    05-Jan-2017
Total Views |

युरोप-अमेरिकेत भलेही ख्रिश्चन धर्म अल्पसंख्य होवो, तरीही जगावर पुन्हा नियंत्रण निर्माण करण्यासाठी या महासत्ता सर्वशक्तीनिशी कामाला लागल्या आहेत. यातील गांभीर्याने घेण्याची बाब म्हणजे या महासत्तांनी त्या देशाची वाटणी करून तिन्ही दहशतवादी संघटनांना त्यातील एक एक वाटा देऊन टाकला आहे आणि त्याला त्याला तो तो वाटा मिळण्यासाठी आपण परस्परांना राजकारणातून, चळवळीतून आणि दहशतवादी कारवायांतून मदत करू या, असा आराखडा ठेवला आहे. जगावर साम्राज्य करण्याची चटक लागलेल्या महासत्ता एकमेकाविरोधात असणाऱ्या या दहशतवादी संघटनांना एकत्र कशा आणतात, त्यांचे एकत्र प्रश्ािक्षण कसे चालते, त्याना पैसा, शस्त्रे कशी पुरविली जातात, त्याहीपेक्षा परस्परांचे प्रभाव निर्माण करण्यासाठी जगभर त्यांच्या जागतिक संघटना कसा प्रयत्न करतात, याचे 'बे्रकिंग इंडिया' या पुस्तकाने शेकडो संदर्भ दिले आहेत. (अमेरिकी विद्यापीठेच चालवतात भारतातील दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कारवाया .'बे्रकिंग इंडिया' पुस्तकाने प्रकाशात आणलेली माहिती)
युरोपातील ज्या देशांनी ख्रिश्चन धर्माच्या आधारे जगावर वर्चस्व निर्माण करून जगाची काही शतके लूट केली, त्या देशांत ख्रिश्चन आता झुंडीच्या झुंडीने तो धर्म सोडत आहेत. पण दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठया कपटकारस्थानाच्या आधारे एकेका देशाचा बळी घेण्याचे कारस्थान सुरूच आहे, या विषयावर 'ब्रेकिंग इंडिया' या पुस्तकाने गेल्या पाच वर्षांत प्रकाशझोत टाकला आहे. या अनुषंगाने दररोज नवे संदर्भ पुढे येत आहेत. भारतातील जिहादी आणि माओवादी यांच्या दहशतवादी संघटना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या दहशतवादी संघटनांकडून संघटित होत आहेत. त्यामुळे या देशात चालणाऱ्या दहशतवाद्यांच्या पंचमस्तंभीय कारवाया अधिक आक्रमक होत आहेत. पण ही बाब फक्त दहशतवाद्यांच्या संघटनांना एकत्र आणण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. राजकीय पक्षांमध्ये व त्यांच्या विचाराच्या सामाजिक संघटनांमध्येही त्याची लागण झाली आहे. वास्तविक ही बाब सकृर्तदशनी खरी न वाटणारी आहे. याचे कारण असे की, माओवादी संघटना, जिहादी संघटना आणि चर्चसंघटना या परस्पर विरोधी तत्त्वज्ञान असलेल्या संघटना आहेत. त्यातील जिहादी संघटना आणि चर्च संघटना तर गेली एक हजार वर्षे एकमेकांविरोधात जीवघेण्या लढाया खेळत आहेत. गेल्या शंभर वर्षांत त्यात साम्यवादी दहशतवादी संघटनाही उतरल्या आहेत. तरीही भारतात ते परस्परांना समजून घेऊन त्यांच्या एकत्रित कोणत्या कारवाया करत असतात, परस्परांना मदत करून प्रत्येक संघटनांच्या कारवायात कशी वाढ झाली आहे, यावर 'ब्रेकिंग इंडिया' या पुस्तकाने अनेक पुराव्यानिशी प्रकाश पाडला आहे. वास्तविक याची प्रचितीही आपणास येतच असते. या देशातील डाव्या विचाराच्या संघटना, जिहादी संघटना आणि काँग्रेसही या देशात अधिक संघटितपणे व एकमेकांना मदत करताना दिसतात. त्यांच्या राजकीय आणि आंदोलनात्मक चळवळीही एकमेकाच्या सहकार्यानेच सुरू असतात. यातील लक्षणीय बाब अशी की, सत्तर वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा युरोपीय देशांकडून अन्य ज्या देशांना स्वातंत्र्य मिळाले, त्या बहुतेक देशांत या तिन्ही संघटना दहशतवादाच्या पातळीवर आणि राजकीय पातळीवरही एकत्रितच काम करत आहेत. 'ब्रेकिंग इंडिया' या पुस्तकाची सर्वात मोठी देणगी म्हणजे देशोदेशीच्या दहशतवादी संघटनांचे आणि राजकीय संघटनांचेही प्रश्ािक्षण आणि नियंत्रण युरोप-अमेरिकेतील विद्यापीठांकडून होते, हे प्रकार त्यांनी युरोप अमेरिकेतील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या संदर्भात प्रकाशात आणले. ज्या बाबी त्या त्या देशांची परराष्ट्र मंत्रालये करू  शकत नाहीत, ती कामे ही विद्यापीठे बेमालूमपणे करत असतात. युरोप-अमेरिकेत भलेही ख्रिश्चन धर्म अल्पसंख्य होवो, तरीही जगावर पुन्हा नियंत्रण निर्माण करण्यासाठी या महासत्ता सर्वशक्तीनिशी कामाला लागल्या आहेत. यातील गांभीर्याने घेण्याची बाब म्हणजे या महासत्तांनी त्या देशाची वाटणी करून तिन्ही दहशतवादी संघटनांना त्यातील एक एक वाटा देऊन टाकला आहे आणि त्याला त्याला तो तो वाटा मिळण्यासाठी आपण परस्परांना राजकारणातून, चळवळीतून आणि दहशतवादी कारवायांतून मदत करू या, असा आराखडा ठेवला आहे. जगावर साम्राज्य करण्याची चटक लागलेल्या महासत्ता एकमेकाविरोधात असणाऱ्या या दहशतवादी संघटनांना एकत्र कशा आणतात, त्यांचे एकत्र प्रश्ािक्षण कसे चालते, त्याना पैसा, शस्त्रे कशी पुरविली जातात, त्याहीपेक्षा परस्परांचे प्रभाव निर्माण करण्यासाठी जगभर त्यांच्या जागतिक संघटना कसा प्रयत्न करतात, याचे 'बे्रकिंग इंडिया' या पुस्तकाने शेकडो संदर्भ दिले आहेत.

भारतात या विषयावर शंभरपेक्षा अधिक ठिकाणी चर्चासत्रे झाली आहेत. तरीही काही प्रसारमाध्यमांचे अपवाद सोडता हा विषय कोणी दिलेला नाही. भारतात अनेक शहरांत यावर अभ्यासगटही स्थापन झाले आहेत. हे पुस्तक प्रकाश्ाित होऊन पाच वर्षे झाली आणि त्यानंतर त्या विषयाला पूरक ठरणारे असे अनेक मुद्दे पुढे आले. या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा हे यशस्वी उद्योगपती, व्यवसाय सल्लागार, माहिती तंत्रज्ञानातील निष्णात व प्रसारमाध्यमातील कर्तबगार व्यावसायिक आहेत. दीर्घकाळ अमेरिकेतील काही विद्यापीठात संशोधन प्रकल्पही केले आहेत. अरविंदन् नीलकंदन यांना तामिळनाडूमधील ग्रामीण भागात सेवा कार्यात काम करण्याचा दीर्घकालीन अनुभव आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे दिली जाणारी अर्थशास्त्राची संास्कृतिक बाजू अभ्यासण्यासाठीची श्ािष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. त्यानी इंग्लिश व तामिळी वृत्तपत्रांतही दीर्घकाळ लेखन केले आहे.

त्यातून पुढे आलेली गोष्ट म्हणजे दलितस्थान डॉट कॉम ही वेबसाइट. कोणत्याही दलित विषयाच्या वेबसाइटवर दलितावरील अत्याचार व त्यातून काढावयाचा र्माग यांची चर्चा करताना येथीलर् वणव्यवस्था व समाजव्यवस्था यावर राग व्यक्त होणे साहजिक असते. ते योग्यही असते. पण वरील वेबसाइटवर 'भारताचे विभाजन झाल्याखेरीज तेथे छळ झालेल्यांना न्याय मिळणार नाही' यावरच फक्त भर होता आणि भारताचे संकल्पित विभाजन दाखवणारा नकशा त्यात होता. त्यांच्या 'बे्रकिंग इंडिया' या योजनेचे वैश्ािष्टय म्हणजे त्यात माओवादी संघटना, जिहादी संघटना, द्रविड संघटना, दलित संघटना यांच्यात भारताची भूमी वाटून टाकलेला नकाशा अगदी मुख्यपृष्ठावरच दिला आहे. परस्परविरोधी मताचे लोक एकत्र आणायचे व त्यांच्याकडून विध्वंसक कामे करून घ्यायची, याची जगभर वापरात असलेली सूत्रेच त्यात दिली आहेत. त्याचे भारतापुरते उदाहरण द्यायचे झाले, तर पाकिस्तान व ब्रिटन यांच्या स्वभावात काहीही साधर्म्य नसताना ब्रिटनने पाकची निर्मिती केली. त्यातूनच निर्माण झालेल्या काही दहशतवाद्यांनी अमेरिकेचे टॉवर पाडले, तरी पाकिस्तानशी त्यांची मैत्री तुटत नाही. त्यामुळे महासत्तांची ही महाकूटकौशल्ये आज काही नवीन नाहीत. ज्या बाबी ब्रिटन गेली पाचशे वर्षे करत आहे, त्याच बाबी त्यांच्या महासत्ता असण्याचा वारसा मिळालेली अमेरिकाही करत आहे, एवढेच काय ते आपल्याला नवीन आहे. ब्रिटनने पाचशे वर्षेपर्यंत जगातील बहात्तर (आजचे कॉमनवेल्थ सदस्य देश) देशांची पाशवी लूट केली. आपण मात्र त्या दृष्टीने न बघता 'येथे रेल्वे, पोस्ट, आयपीसी आणले' म्हणून गोडवे गात बसलो. पाकिस्तानची निर्मिती जर विसाव्या शतकातील कूटनीती असेल, तर एकविसाव्या शतकात जिहादी, माओवादी व ख्रिश्चन मिशनरीज यांना एकत्र आणणे धक्कादायक असणार नाही, असे गृहीतक स्वीकारून अभ्यासाला लागण्याची गरज आहे. हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पाश्चात्त्य देशांच्या या कारवाया जगातील अनेक देशांनी पचविल्या आहेत. त्यामुळे त्याला उत्तर नाही, असे मुळीच नाही.

तरीही कोणत्याही युध्दतंत्राचे वैश्ािष्टय असे असते की, जेथे प्रत्यक्ष काम किंवा कारवाई करायची, तेथे त्याचे नियोजन करत बसून शत्रूत वाढ करायची नाही. त्यानुसार नागालँड, ओरिसा, तामिळनाडू या भागातील जिहादी, माओवादी व चर्च मिशनरी यांच्या नियोजनाचे तत्कालीन मुख्यालय त्यांनी नेपाळमध्ये स्थापन केले. हा विषय स्पष्ट करून सांगायला उत्तर भारतातील एक चर्च प्रचारक डॉ. विशाल मंगलवाडी यांची हजारो भाषणे, काही प्रकाशने व त्यांच्या संबंधित संस्थांची कामे ही पुरेशी आहेत. त्यांच्या भाषणात नेहेमी येणारा मुद्दा असा की, 'फ्यू हंड्रेड ख्रिश्चन माओइस्ट गोरिलाज विल चेंज द पॉवर इक्वेशन ऑफ ओरिसा.' या वाक्याचा अर्थ असा आहे की, संख्येने कमी शेकडे असलेले भूमिगत ख्रिश्चन माओवादी ओडिशाची सत्तेची समीकरणे बदलतील. भारतातील कायद्याच्या चौकटीत राहूनही असा विभाजनवादी प्रचार करता येतो, याचे डॉ. विशाल मंगलवाडी हे मोठे उदाहरण आहे. ते अनेक पुस्तकाचे लेखक असून ते प्रामुख्याने ख्रिश्चन प्रचारावर लिहितात. संडे या इंग्लिश साप्ताहिकात त्यांचे अनेक लेख येऊन गेले आहेत. हे वाक्य हे त्यातील एक छोटेसे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने 2004 साली प्रकाश्ाित केलेल्या 'इव्हॅन्जेलिकल्स ऍंड पॉलिटिक्स इन एश्ािया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका' या पुस्तकात पान 88वर दिलेले अनेक संदर्भ या पुस्तकात दिले आहेत. त्यामध्ये 'वुई स्टँड फॉर सोशॅलिझम' आणि 'नागालँड फॉर ख्राईस्ट' या घोषणांचा संयुक्त समावेश आहे. त्यातून 'सोशॅलिस्ट नागालँड फॉर ख्राईस्ट' अशी मध्यवर्ती घोषणा तयार केली आहे. त्याच्या कारवाया केवळ अरुणाचल प्रदेशपर्यंत पोहोचल्या आहेत असे नव्हे, तर त्या आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचल्या आहेत. वरील पुस्तकात जी माहिती दिली आहे, त्यानुसार आसाममधील उल्फा गटाला या तिन्ही शक्तींकडून शस्त्रपुरवठा होत असतो.


श्रीलंकेतील एलटीटीईपासून ते पीपल्स वॉर ग्रूपलाही जिहाद्यांची मदत सुरू आहे. त्या पुस्तकात या विषयाच्या शेकडो आकृत्या व चित्रे दिली आहेत. ख्रिश्चन मिशनरीज व माओवादी यांनी त्यांच्या संयुक्त कारवायंाचे मुख्यालय नेपाळमध्ये स्थापन केले आहे. त्यांच्या मते माओवादी व मिशनरीज यांच्या संयुक्त कारवायांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नागालँड होय. या चळवळीचा जिहाद्यांशी कसा संबंध आला, हा विषय व्यापक आहे. त्याचे परिणाम अगदी तामिळनाडूतील मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरासाठी कोणाकोणाची मदत झाली यापर्यंत पोहोचतात. याचा परिणाम असा की, सन 2004पर्यंत दऱ्याखोऱ्यातून लपून छपून कारवाया करणारी नक्षल चळवळ या तीन शक्तींच्या एकत्रित सामर्थ्यामुळे प्रचंड आक्रमक झाली. दहा वर्षांपूर्वीही ती चळवळ होती, पण ते राष्ट्रीय आव्हान नव्हते. पण आज तशी वस्तुस्थिती आहे. सन 2007मध्ये इंडिया टुडे या इंग्लिश साप्ताहिकाने त्यांच्या त्यांच्या पध्दतीने दिलेली माहिती आज या परिप्रेक्ष्यात अधिक परिणामकारक वाटत आहे. इंडिया टुडे या साप्ताहिकात ते म्हणतात - हे दहशतवादी स्थानिक लोकांना त्यांच्या कह्यात आणण्यासाठी त्यांची अशी 'कांगारू कोर्ट' स्थापन करतात. त्यांच्या त्यांच्या पध्दतीनेच सुनावणी होऊन त्यांच्या नियंत्रणात न येणाऱ्यांवर अनन्वित छळ, देहांना छिन्नविच्छिन्न करणे व नरसंहार अशा श्ािक्षा दिल्या जातात. आज (2007च्या काळात) त्यांच्याकडे पंधरा हजार माओवादी सैनिक आहेत आणि दहा हजार शस्त्रे आहेत. देशातील सोळा राज्यांतील एकूण 602 जिल्ह्यांपैकी 170 जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव निर्माण झाला आहे. इंडिया टुडेमधील ही माहिती हे एक निरीक्षण आहे, पण त्या काळात जिहादी, माओवादी व इव्हँजेलिस्ट चर्च यांच्या कारवायांना आलेली प्रचंड गती हा आजचा परिणाम आहे. प्रामुख्याने छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या राज्यांत चर्च संघटना आणि माओवादी यांच्या कारवायंाचे स्वरूप फारच व्यापक आहे. त्यांच्या संयुक्त कार्यक्रम पत्रिकेचा पहिला टप्पा असा होता की आदिवासी मंडळींमध्ये त्यांच्या देवदेवतांवर व सण-महोत्सवावर जादूटोणा असल्याचे श्ािक्कामोर्तब करून त्या नाहीशा करणे. यावर डॉ. मंगलवाडी यांच्या वेबसाइटवर असलेली माहिती पुरेशी बोलकी आहे.

त्यात ते म्हणतात, 'दगडांना शेंदूर फासून त्यांना देव मानणाऱ्या आदिम 'पगन' परंपरांच्या जोखडातून त्यांना बाहेर काढण्याच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कामाचे महत्त्व आता माओवाद्यांनाही समजले आहे आणि ते त्यात सहभागी होत आहेत. जेथे पोलीसही जाऊ शकत नाहीत, तेथे मिशनऱ्यांना पोहोचण्यास माओवादी मदत करतात. डोंगरांचे अडथळे पार करून जेथे सामान्यांना पोहोचण्यास काही दिवस लागतात, तेथे मिशनरी व माओवादी एकत्र प्रचाराची मोहीम हाती घेतात. तेथे प्रथम निम्मा वेळ येशू ख्रिस्ताच्या संदेशाची फिल्म दाखवली जाते व नंतर माओवादी पध्दतीच्या कामाचा प्रचार होतो. त्या भागातील तीन-चार राज्यांत अशी काही दिवसांची फिरती श्ािबिरे सुरू आहेत.'

या साऱ्यांनी ओडिशा हे राज्य प्राधान्याने काम करण्याचे राज्य म्हणून जे प्राधान्य दिले आहे, याचे मुख्य कारण असे आहे की, त्या राज्यात देशातील क्रोमाईट, निकेल, कोबाल्ट, बॉक्साईट आणि कच्चे लोखंड यांचे अपरिमित खनिजसाठे आहेत. देशाच्या भूगर्भात असलेल्या त्या खनिजांच्या एकूण साठयापैकी ओडिशातील साठे अनुक्रमे साडेअठ्ठयाण्णव टक्के, पंचाण्णव टक्के, साडेसत्त्याहत्तर टक्के, साडेबावन्न टक्के व साडेतेहेतीस टक्के असे आहेत. आज ही मंडळी जरी केवळ या देशाचे विभाजन करून आपापला 'पाउंड ऑफ फ्लेश' घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत असली, तरी येथेच त्यांना अनेक शतके महासत्ता करणारे आर्थिक सामर्थ्य मिळणार आहे, याची खात्री पटल्याने ही मंडळी नेटाने कामाला लागली आहेत. गेल्या अडीच वर्षांत भारतात झालेल्या राजकीय बदलाचा त्यांच्यावरही परिणाम झाला आहे, तरीही त्यांचा बिमोड झालेला नाही. त्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी मोठया प्रमाणावर संघटित प्रयत्नाने पुढे येण्याची गरज आहे.

9881717855