युरोपीयांनी द्वेषवाङ्मयाच्या आधारे पोखरले निम्मे-अधिक जग

विवेक मराठी    09-Jan-2017
Total Views |


"
द्वेषवाङ्मय' या प्रकारचा एखादा स्वतंत्र वाङ्मय प्रकार जगात अस्तित्वात असू शकतो का, यावर कदाचित जगातील वाङ्मय तज्ज्ञांची निरनिराळी मते असू शकतील. पण वस्तुस्थिती अशी आहे की, युरोपीयांनी त्याच पध्दतीच्या वाङ्मयाच्या आधारे जगावर वर्चस्व निर्माण केले. जगातील महासत्ता असणाऱ्या देशापासून ते युरोपातील प्रत्येक देशाने जगातील 'तिसरे जग' म्हणून जी गरीब देशांची यादी आहे, त्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी या वाङ्मयाचा उपयोग केला. या वाङ्मयाची निर्मिती आण्ाि प्रचार यात चर्च संस्थांचा फार मोठा सहभाग होता. एखाद्या युध्दाच्या परिणामापेक्षाही त्याचा जादा परिणाम आहे. ते द्वेषवाङ्मय म्हणजे युरोपीय लेखकांनी, हॉलिवूड चित्रपटांच्या संहिता लेखकांनी आण्ाि कवी-नाटककारांनी त्यांच्या कलाकृती निर्माण करताना जगातील आफ्रिकी, रेड इंडियन आण्ाि फिलिपिनी, व्हिएतनामी हे लोक म्हणजे नरमांसभक्षक, प्राण्यांचे कच्चे मांस खाणारे, कपडयांची शुध्द नसणारे अशी प्रतिमा निर्माण केली आण्ाि युरोपीय लोक म्हणजे नीतिमत्तेचे पुतळे, प्रगल्भ, विज्ञानाचा वेध घेणारे असे चित्र रेखाटले. हा प्रकार एक-दोन कलाकृतींबाबत असता, तर त्याची गोष्ट निराळी. पण त्यांनी जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या वाङ्मयात एेंशी टक्के एवढा वरील प्रकार पसरवला आहे. अर्थात त्याचा प्रभाव अमेरिकेत जादा आहे. मूळचा इटलीचा रहिवासी असलेल्या ख्रिस्तोफर कोलंबसने सन 1492मध्ये अमेरिकेत पाय ठेवला. साहजिकच तेथील लोकांना पराभूत करत पश्चिमेकडे सरकवावे लागले. त्या लोकांना जसे जसे पराभूत केले गेले, त्यानुसार सुसंस्कृत लोक कोठे आण्ाि नरभक्षक लोक कोठे यांच्या सीमा बदलत राहिल्या. अमेरिकेत कोलंबसपाठोपाठ अनेक वसाहती झाल्या. त्या सगळयांनाच तेथे राहण्यासाठी समर्थ भूमिकेची गरज होती. हळूहळू साऱ्या जगावरच या वाङ्मयाचा ठसा निर्माण झाला. वाङ्मयावर हा ठसा सोडण्याचे कारण एवढेच होते की जगातील जवळजवळ पंचाहत्तर टक्के भूभागावर पारतंत्र्य लादणारे युरोपीय हेच जगातील इतिहास, संस्कृती, नीतिमत्ता, विद्वत्ता, धर्म यांचाही जगात आरंभ करून देणारे आहेत, असे त्यांना जाहीर करायचे होते. जगावर सत्ता गाजवण्याचा त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांनी जगाला नीती, धर्म, इतिहास, संस्कृती दिली आहे, हे त्यांना जगाच्या इतिहासात प्रस्थापित करायचे होते.

जगाचा इतिहास हा युरोपमधून सुरू होतो, हे दाखवण्यासाठी त्यांनी जगावर सेमेटिक व हेमेटिक यांचा इतिहास लादला. त्याचा पाया काय? ते बायबलमधील नोहाची एक पौराण्ािक गोष्ट. पण  इतिहासाचा कसलाही आधार नसलेल्या या कथेवर, तोच इतिहास आहे असे मानून जगातील शेकडो विद्यापीठांत त्या त्या देशांचे इतिहास रचले गेले. त्याच्याच आधारे भारताचाही आर्य-अनार्य हा इतिहास रचला गेला. जगातील अनेक देशांनी ते इतिहास नाकारले असले, तरी अनेक देशांतील श्ािक्षण, राजकारण हे त्या कसलाही पाया नसलेल्या इतिहासावर अवलंबून आहे. हे सारे कशासाठी? तर युरोपीय साम्राज्य जगभर दीर्घकाळ नांदले पाहिजे अशा या गरजेसाठी. सत्यासत्यतेचा निकष फारसा न पाळता इतिहासापाठोपाठ द्वेषवाङ्मयाचा प्रकारही जगावर लादला. अर्थात हे सारे केवळ कायदा करून होत नाही की फक्त एक पत्रकार परिषद घेऊन होत नाही. त्यासाठी त्या त्या ठिकाणचे सरकार, प्रशासन, श्ािक्षण यंत्रणा, पुराणवस्तू अभ्यासकेंद्रे, धर्मकेंद्रे आण्ाि त्याबरोबर मनोरंजन केंद्रे येथेही त्यांचा जम बसवावा लागतो. युरोपीयांनी त्याला जरी साडेचारशे वर्षांपूर्वी सुरुवात केली, तरी त्याला विद्यापीठे, धर्मपीठे, थिएटर मूव्हमेंट यावर अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळात मान्यता मिळाली.

त्या शेकडो विद्यापीठांच्या, धर्मपीठांच्या आण्ाि साहित्य चळवळींचा आज आढावा घेतला तर असे लक्षात येते की, युरोपीय लोक म्हणजे सद्गुणाचे पुतळे आण्ाि अन्य चार खंडांतील माणसे म्हणजे पशूप्रमाणे जगणारे, अशा वाङ्मयाला गती आली. पण युरोपीयांनी केलेले नरसंहार आण्ाि देशोदेशीची लूट यावर मात्र त्यांनी काही काम केले नाही. आजही हा विषय कोणी अभ्यासाला घेतला की, त्याला बाजूला टाकले जाते. चित्रपटसृष्टीमध्ये रस असणाऱ्यांना माहीत आहे की, एखाद्या चित्रपटात जर भारतीय दारिद्रय, सामाजिक विस्कळीतता दाखवली असेल तर त्याला युरोपातील कोणती ना कोणती संस्था चांगली मदत करते. पण भारतीय वेदवाङ्मयाचा युरोपातील भाषांवर संस्कार आढळतो अशासारखा विषय असेल, तर त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

आजही अमेरिकेतील जुन्या स्थानिकांबाबत 'डेंजरसली सॅवेज' म्हणजे धोकादायक पशुवत माणसे असे मानले जाते. पण अमेरिका हे फक्त उदाहरण आहे. युरोपीयांचा साऱ्या जगाशी परिचय झाला तो फक्त लूट करण्याचे देश अशा स्वरूपात झाला. पण नंतर तेथे कायम लूट करता येते, येथील राज्यही ताब्यात घेता येते, येथील इतिहासही बदलता येऊ शकतो, त्याचप्रमाणे येथील कथा, कादंबऱ्या, चित्रपट या साऱ्यांच्या आधारे येथे वर्चस्वाच्या नव्या नव्या भिंती तयार करता येतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला गती दिली. ब्रिटिशांचे साम्राज्य जगातील त्या वेळच्या पंचावन्न देशात असल्याने इंग्लिश साहित्यात याचा मोठया प्रमाणावर वापर झाला. धर्मोपदेशकांनी त्यांच्या बायबल कथांतून या द्वेषवाङ्मयाचाच पाठपुरावा केला. या संदर्भात भारतातील जातिव्यवस्थेवर हल्ले होणे तर साहजिकच होते. पण भारतीय देवदैवतांना मृतप्राय दैवते म्हणणे, मानवी हक्काचे हनन करणारे असे सरसकटर् वणन केले गेले. त्यातही भारतीय लोक अनेक देव मानतात असे आरोप ठेवण्यात आले. त्यातूनच मिशनऱ्यांनी लक्षावधीची धमर्ांतरे केली. किंबहुना अन्य धर्माचा द्वेष हाच मिशनऱ्यांच्या प्रचार वाङ्मयाचा पायाच आहे असे वाटू लागले. मिशनऱ्यांनी अशा द्वेषप्रचाराचा पाया घातला आण्ाि युरोपातील अनेक सरकारांनी तो उचलून धरला. भारतात दोन पातळयांवर त्याचा प्रचार होताना दिसत आहे. एक म्हणज{ दलितांसाठी म्हणून ज्या संस्था स्थापन झाल्या, तेथे या द्वेषवाङ्मयाला भारतीय पार्श्वभूमी जोडण्यात आली आण्ाि अप्रत्यक्षपणे भारतविरोधी प्रचार सुरू झाला. दुसऱ्या बाजूला भारतातील काही लाख चर्चमधून त्यांच्या साप्ताहिक कार्यक्रमांतून बायबलची पार्श्वभूमी म्हणून हे वाङ्मय वापरणे सुरू झाले. नव्या धर्मागताची मानसिक तयारी या द्वेषवाङ्मयाने होऊ लागली. हा विषय भारतीय लोकांपुढे कसा मांडायचा याचे काही लाख मिशनऱ्यांना प्रश्ािक्षण देण्यात आले. आजही भारतात लक्षावधी खेडयांत व शहरांच्या उपनगरांच्या गरीब वस्त्यांतून त्याचा प्रचार होतो आहे. अमेरिकेत दक्षिण आश्ाियावर अभ्यास करणारी जी विद्यापीठे आहेत, त्यांनी हे अभ्यासक्रम तयार केले. भारतातील अल्पसंख्य, दलित व महिला यांना आकृष्ट करण्यासाठी शेकडो प्रकाशन पुस्तके काढण्यात आली. यातील एका बाबीवर स्वतंत्रपणे मोठा व्यापक अभ्यास होण्याची गरज आहे की, भारतातील निरनिराळया राज्यांतील स्थानिक वाङ्मयावर या द्वेषवाङ्मयांचा काय परिणाम झाला. एक गोष्ट निश्चित आहे की, सामान्य वाचकांच्या मनात युरोपीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशा वाङ्मयाने प्रत्येक राज्यात स्वतंत्र भूमिका बजावली आहे. भारताचे विभाजन करण्याचे मिशनऱ्यांचे जे जे प्रयत्न झाले, त्यात या वाङ्मयाची महत्त्वाची भूमिका आहे, विसरता येणार नाही. प्रामुख्याने तामिळी वाङ्मयात उत्तर भारतीयांविरोधात व श्रीलंकेविरोधात जे वातावरण झाले आहे, ते या वाङ्मयातून झाले आहे.

भारत हा देशच एक खंडप्राय देश असल्याने येथील युरोपीयांच्या आक्रमणाचा विचार हा श्रीलंकेपासून ते श्रीनगरपर्यंत आण्ाि कराचीपासून कामाक्षीपर्यंतच्या प्रत्येक भाषासमूहाच्या आण्ाि भौगोलिक संदर्भात करावा लागत आहे. पण फक्त भारत हा युरोपीयांचा उद्देश नव्हता. आफ्रिका, अमेरिका आण्ाि आश्ािया या तिन्ही खंडांतही हाच प्रकार होता. आफ्रिकेमधील माणसे जर झेब्रा-घोडयाचे कच्चे मास खाताना दाखवत असतील, तर भारतातील लोक सापाचे कच्चे मास खाताना दाखवत असतील. पण गेल्या चाळीस वर्षांत व्हिएतनाम व अलीकडे इराकबाबतचेही असेच द्वेषवाङ्मय पुढे आले आहे. यातील मौजेची गोष्ट म्हणजे असे तयार झालेले वाङ्मय युरोपातच टीकेचे लक्ष बनते. कारण सत्याची मर्यादा फारच सोडलेली असते. पण असा जेव्हा पर्दाफाश होतो, तेव्हा अशा एकूण द्वेषवाङ्मयाला दोष देण्याऐवजी फक्त त्या त्या लेखकावर संकुचित बुध्दीचा, वाङ्मयाचा उद्देशच न कळलेला, अशा प्रवृत्तीमुळेच जगात दोन महायुध्दे झाली, अशी टीका करून वेळ भागवली जाते. पण त्या त्या देशात जे हे वाङ्मय वाटून झालेले असते, तेथे मात्र ते वाङ्मय काढून घेतले जात नाही. याचे आणखी महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भारतात मोठया प्रमाणावर धर्मांतरे केलेले झेविअर आण्ाि डिनोबिली यांनी ज्या पध्दतीने धर्मांतरे केली, त्याबद्दल व्हॅटिकनमध्ये टीका झाली, पण त्यांनी केलेली धर्मांतरे बदलली नाहीत. बऱ्याच वेळा असेही आढळून आले आहे की, त्या त्या वाङ्मयात आलेले संदर्भ हे अर्धसत्य असतात व अतिशयोक्तही असतात.

भारतावर ब्रिटिशांचे जवळजवळ दीडशे वर्षे राज्य होते. त्यापूर्वीही दीडशे वर्षे हळूहळू प्रभाव वाढतच होता. या काळात त्याचा प्रभाव वाढत होता. पण जगाला आपल्या नियंत्रणात ठेवणाऱ्या वाङ्मयावर नंतरही प्रतिवाद झाला नाही, याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या साठ-पासष्ट वर्षांच्या काळात ब्रिटिशांचे अप्रत्यक्ष वर्चस्व मानणाऱ्यांनीच अधिक राज्य केले, तेव्हाही याचा प्रतिवाद झाला नाही. पण 'ब्रेकिंग इंडिया' या पुस्तकाने उजेडात आणलेल्या या विषयावर आता तरी उजेड पडणे व त्याचा प्रतिवाद होणे आवश्यक आहे. आक्रमणांच्या निरनिराळया प्रकारातच हा प्रकार मोडतो, हे विसरता येणार नाही. आर्थिक आक्रमण, प्रत्यक्ष युध्द, चुकीच्या इतिहासाच्या आधारे केलेले आक्रमण, श्ािक्षणाच्या क्षेत्रातील आक्रमण ही जशी आक्रमणे आहेत, त्याचप्रमाणे हे 'प्रोपागंडा' पध्दतीचे आक्रमण आहे.

अनेक शतके जगातील अनेक देशांची लूट करून मस्तवाल झालेल्या या युरोपीयांना असे वाटू लागले आहे की, जगाला न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. त्या जबाबदारीविषयीही चर्चा करण्याची वेळ आली आहे. यातील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, भारतीय प्रसारमाध्यमे, प्रकाशनसंस्था व मनोरंजन संस्था अजून या विषयाला हात घालण्यास तयार नाहीत. अजूनही त्यांचे डोळे पाश्चात्त्य देशाकडे लागून राहिलेले असतात. पण या आक्रमक वाङ्मयाचा प्रतिकार झाल्याखेरीज या देशाला मिळालेले स्वातंत्र्य परर्िपूण मानता येणार नाही.

9881717855