समान नागरी कायदा व त्याचे दिशाहीन विरोधक

विवेक मराठी    21-Feb-2017
Total Views |

स्वत:ला इतिहासकार म्हणवून घेणारे डॉ. इरफान हबीब यांनी डिसेंबर 2016मध्ये समान नागरी कायद्याच्या विरोधात ट्वीट केले त्याचा मथितार्थ एवढाच की समान नागरी कायदा मुस्लीम समाजावर लादण्याची काहीच आवश्यकता नाही. एवढेच नव्हे, तर त्रिवार तलाकाला कायदेशीर स्वरूप देणे म्हणजे त्याचे मूळ रूप नाहीसे करणे. सुप्रसिध्द कायदेतज्ज्ञ डॉ. ए.जी. नुरानी यांनी आपल्या ज्ञानाचे कौशल्य वापरून आपल्या एका लेखात शरियाचा व त्याच्या उपयुक्ततेचा पुरस्कार केला आहे. ह्या विधानाला पुष्टी देण्याकरिताच डॉ. हबीब यांनी वरील ट्वीट केले असावे.

ह्यानंतर काही जणांनी हबीब यांच्या ट्वीटचा निषेध करून त्यांना 'ए.जी. नुरानी यांच्या विधानाशी सहमत आहात का?' अशी विचारणा केली. एक कलाकार पनमिंदर कौर यांनी टोमणा मारला की हबीबांसारख्या स्वतःला बुध्दिवादी म्हणवून घेणाऱ्यांनी आम्हाला निधर्मीपणाविषयी हे विचार ऐकवावेत, ह्याला काय म्हणावे? हबीबनी उत्तर दिले - ह्याचा निधर्मीपणाशी संबंध काय? विविधता असणाऱ्या समाजात एकमत असणे कठीणच असते!

 से आढळून आले आहे की काही भ्रष्टाचारी, अतिशहाणे (Charlatans) आणि छुपे जिहादी मुस्लीम समाजात स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेत आहेत. ट्वीट्सद्वारे ते समान नागरी कायद्याच्या संबंधात समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्या मागचा विचार म्हणजे 'शरिया'चे गोडवे गाणे. त्यांचे एकच तुणतुणे असते की समान नागरी कायदा म्हणजे हिंदू राष्ट्राचा agenda असून समाजाच्या स्वातंत्र्याला व समतेला बाधक आहे.

स्वत:ला इतिहासकार म्हणवून घेणारे डॉ. इरफान हबीब यांनी डिसेंबर 2016मध्ये समान नागरी कायद्याच्या विरोधात ट्वीट केले. त्याचा मथितार्थ एवढाच की समान नागरी कायदा मुस्लीम समाजावर लादण्याची काहीच आवश्यकता नाही. एवढेच नव्हे, तर त्रिवार तलाकाला कायदेशीर स्वरूप देणे म्हणजे त्याचे मूळ रूप नाहीसे करणे. सुप्रसिध्द कायदेतज्ज्ञ डॉ. ए.जी. नुरानी यांनी आपल्या ज्ञानाचे कौशल्य वापरून आपल्या एका लेखात शरियाचा व त्याच्या उपयुक्ततेचा पुरस्कार केला आहे. ह्या विधानाला पुष्टी देण्याकरिताच डॉ. हबीब यांनी वरील ट्वीट केले असावे.

ह्यानंतर काही जणांनी हबीब यांच्या ट्वीटचा निषेध करून त्यांना 'ए.जी. नुरानी यांच्या विधानाशी सहमत आहात का?' अशी विचारणा केली. एक कलाकार पनमिंदर कौर यांनी टोमणा मारला की हबीबांसारख्या स्वतःला बुध्दिवादी म्हणवून घेणाऱ्यांनी आम्हाला निधर्मीपणाविषयी हे विचार ऐकवावेत, ह्याला काय म्हणावे? हबीबनी उत्तर दिले - ह्याचा निधर्मीपणाशी संबंध काय? विविधता असणाऱ्या समाजात एकमत असणे कठीणच असते!

बुध्दिप्रामाण्याचा विचार केला, तर स्वत:ला इतिहासतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या हबीबना समान नागरी कायद्यात निधर्मीपणा आढळून येत नाही, असेच म्हणावे लागेल. मुकेश भारद्वाज ह्या गृहस्थांनी ट्वीट केले की हबीबना भारतातल्या विविधतेला शरिया लागू करावा असे वाटत आहे. हबीबनी ट्वीट केले की असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या बुध्दिमत्तेची कीव येते. (I have to blame your I.Q.) यावरून दिसून येते की, समान नागरी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांविषयी हबीब असे विधान करीत असतील, तर त्यांचाच I.Q. तपासावा लागेल.

शहीद सिद्दिकी हे 'नई दुनिया' ह्या उर्दू साप्ताहिकाचे संपादक आहेत. त्यांनी हबीब ह्यांच्या ट्वीरवर सांगितले, विविधता (Diversity) असलेल्या भारतासारख्या राष्ट्राला समान नागरी कायदा हानिकारक असून त्यामुळे देश दुभंगला जाईल. शहीद सिद्दिकी जेव्हा टीव्हीवर वक्तव्य करतात, तेव्हा ते आपण उदारमतवादी असल्यासारखी मते व्यक्त करतात. पण ते हे विसरतात की ते आपल्या साप्ताहिकातून जिहादींचे समर्थन करतात. त्यांचे हे साप्ताहिक मुस्लीम समाजांत मुस्लीम रूढींचे महत्त्व बिंबवण्याचे कार्य करते. टि्वटरवर हे शहीद सिद्दिकी समाजात एकता असल्याचे धडे लिहितात, परंतु त्यांच्या नई दुनियामधून ते मुस्लीम समाजाला भारतापासून अलग ठेवण्याचा प्रयत्न करतात.

हबीब आणि सिद्दिकी हे जमीयत उलेमा-ई-हिंद या मुस्लीम संघटनेप्रमाणेच समान नागरिक कायद्याविरुध्द लिहून दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतात. चुकीचे मार्गदर्शन करून शरियाचा प्रचार हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. मौलवी, धर्मगुरू मुस्लीम धर्मातील मूलतत्त्ववादाचा, स्त्रियांवरील वर्चस्वाचा आणि धार्मिक भेदभावाचा प्रसार करतात. त्याचे समर्थक म्हणून हबीब आणि सिद्दिकी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या हे लक्षात येत नाही की समान नागरी कायदा हा कुठल्याही धर्मात ढवळाढवळ करणारा नसून घटनेमध्ये सामान्य मनुष्याच्या हक्कांचा व जागतिक नीतिमूल्यांचा स्वीकार करणारा आहे.

ए.जी. नुरानी ह्यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये जो लेख लिहिला आहे, तो तर बौध्दिक अप्रामाणिकपणाचा द्योतक आहे. त्यांनी लिहिले आहे - 'समान नागरी कायद्याचे कुठल्याही तऱ्हेने समर्थन करता येत नाही.' हे असत्य विधान आहे. नुरानी ह्यांनी लक्षात घ्यावे की भारताच्या घटनेत अजून 44 कलम (article) आहे, त्यांत स्पष्ट लिहिलेले आहे की हे राष्ट्र (nation) भारतात सर्व राज्यांतून (Territories of Indiaमधून) समान नागरिक कायदा लागू करण्याचे प्रयत्न करील. नुरानींतील दुसऱ्या वाक्यांत भारताचे पंतप्रधान यांनी ऑक्टोबर 24 रोजी उत्तर प्रदेशातील महोबा येथे भारतातल्या मुस्लीम भगिनींविषयी जी सहानुभूती व्यक्ती केली, त्याचा प्रभाव कोणावर पडला नाही. परंतु हेच नुरानी विसरतात की, आम्हाला आमचे घटनात्मक हक्क द्या म्हणून ह्या मुस्लीम भगिनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. नुरानी असे कसे म्हणू शकतात की त्यांचे विधान पोकळ होते?

दुसऱ्या परिच्छेदात नुरानींनी भाजपाने घटनेतील 371 अ ह्या कलमाला विरोध केल्यामुळे त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पण ते हे विसरतात की समान नागरिक कायदा अस्तित्वात आल्यानंतर नागालँडच्या लोकांकरिता केलेला हा कायदा आपोआप नष्ट होणार आहे. कारण अशी सवलत भारताच्या राज्यघटनेच्या मूलभूत हक्कविरोधी आहे. नुरानी पुढे लिहितात की पं. नेहरू व म. गांधी ह्यांनी मुस्लिमांच्या शरियाला मान देऊ असे वचन दिले होते. व त्याचप्रमाणे त्यांना ह्या बाबतीत घटनेत उल्लेख केला जाईल असे म्हटले होते. पण त्याचबरोबर हे विसरतात की ज्या खिलाफत चळवळीकरिता गांधी लढले, त्या खिलफतना 'शरिया कायदा'सुध्दा मान्य होता.

नुरानी शरिया कायद्याचे समर्थन करतात ते बेकायदेशीर आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की शिवसेनेचे पुढारी उध्दव ठाकरे यांनी भारत हे हिंदू राष्ट्र आहे व समान नागरी कायदा लागू करावा असा भाजपाला सल्ला दिला आहे. शरिया भारतात लागू करावा याचे समर्थन करताना त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या ह्या विधानाचा उपयोग करून घेतला आहे. त्यांनी शरियाचे समर्थन करून समानता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व व स्त्रियांचा आधार ह्या घटनेतील तत्त्वांना सुरुंग लावला आहे. मुस्लीम तत्त्वज्ञान समान नागरी कायद्यामुळे धोक्यात आले आहे असा नुरानींचा विश्वास आहे. मुस्लिमांच्या सांस्कृतिक विचारसरणीला धक्का लागेल असे नुरानींचे म्हणणे म्हणजे त्यांच्या बुध्दिमत्तेच्या अप्रमाणिकपणाचा दाखला आहे. खरे म्हणजे, लोकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त करणे हा समान नागरिक कायद्याचा उद्देश नसून, घटनेने दिलेले अधिकार समाजात दैनंदिन जीवनात आणणे असा आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या Personal Lawला बाधा येत नाही. समान नागरी कायदा म्हणजे सामाजिक जीवनातील समानतेचा अतिरेक असून त्यामुळे समाजात फाटाफूट पडेल असे नुरानी आग्रहाने सांगतात. ते असे म्हणतात तेव्हा शरिया कायदा भारतात असावा हादेखील एक वैचारिक अतिरेक (lust) असे म्हणावे लागेल. ते एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, ती म्हणजे मुस्लीम समाजाची प्रथमपासूनच फुटीरतावादी (separatism) वृत्ती होती. 1857च्या स्वातंत्र्यलढयांत हिंदू-मुस्लीम एकत्र लढले, पण मुस्लिमांना पूर्वीसारखाच मुसलमानी अंमल हवा होता. ह्या लढयांत मुस्लीम समाज दोन उद्देश विसरला - एक म्हणजे हमीद दलवाई म्हणतात त्याप्रमाणे भारतीय विचारपध्दतीशी (National mainstreamer) समरस होणे. सर सईद अहमद खान ह्यांनी मुसलमानांना हिंदूंपेक्षा वेगळी शिक्षणपध्दती असावी असा विचार मांडला. आणि दुसरे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सामील न होता पाकिस्तानचा आग्रह धरला.

म. गांधींनी सुरुवातीलाच खिलाफत चळवळ चालू करून मुसलमान समाजात अलगतेची भावना निर्माण केली होती व त्यानंतर भारतात अल्पसंख्य असे मुसलमानांना संबोधून राजकीय पक्षांत हा विचार मांडला. त्यामुळे हिंदू-मुसलमान दंगे झाले. नुरानींनी आपल्या लेखांत बऱ्याच हिंदू पुढाऱ्यांच्या उल्लेख केला आहे, ज्यांनी शरियाचे समर्थन केले आहे. त्यांच्या लिखाणात ब्रिटनसारख्या राष्ट्रांतदेखील तेथील कायद्यांबरोबर शरियत कायदासुध्दा अस्तित्वात आहे.

नुरानी ह्यांनी समर्थनार्थ भारतातील एकेकाळचे मुख्य न्यायाधीश व्ही.आर. कृष्ण अय्यर आणि बहरूल यांनी भारतातील घटनेचा उल्लेख न करता कुराणातील वचने उद्धृत केली आहेत. जेव्हा स्त्रियांच्या हक्काचा आणि समानतेचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा दुर्दैवाने भारतातील काही न्यायाधीश भारतीय घटनेचा उल्लेख न करता कुराणाचा आधार घेतात. नुरानींनी याचा फायदा घेऊन ह्या न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात जणू काही लिहिले म्हणजे ती देववाणीच (word of god) आहे. नुरानींच्या ह्या विचारांशी बहुतेक मुस्लीम बुध्दिवादी सहमत आहेत. भारतीय मुस्लीम महिला आंदोलन ही संघटना शरियाचे कोर्ट चालू ठेवतात व नुरानींचे एक प्रकारे समर्थन करतात.

राष्ट्रीय एकात्मतेला (National integrationbm) नुरानींचा विरोध आहे. आणि ते एक प्रकारे समाजात मुस्लीम-हिंदू तेढ (separatism) निर्माण करतात. अशाच विचारांमुळे भारताची फाळणी झाली. नुरानींच्या लक्षात येत नाही की समान नागरी कायदा म्हणजे समाजातील अलग पोषाख, विचारसरणी असे नसून लोकांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक मूल्यांसाठी आहे. सुधारलेल्या राष्ट्रांतदेखील समानता, वैचारिक स्वातंत्र्य आणि समाजातील भेदाभेद नाहीसे करणे असा विचारप्रवाह आहे.

शरियाच्या प्रेमाखातर समान नागरी कायद्यातील uniform हा शब्द त्यांना खटकतो व त्याकरिता ते शरियाचा पुरस्कार करतात. युनिफॉर्म ह्याचा अर्थ म्हणजे सामाजिक हक्क व वैयक्तिक स्वातंत्र्य याचा मिलाफ असा आहे, हे ते लक्षात घेत नाहीत. समान नागरिक कायद्यापाठीमागे धर्मातीत विचारसरणी (secular spirit) आहे, हे विसरता कामा नये. समान नागरिक कायदा आला तरी मुसलमान मशिदीत नमाज पठण करू शकतात, 'हाज' यात्रेला जाऊ शकतात, तसेच रमझानच्या काळात आपला उपवास चालू ठेवू शकतात. ह्या त्यांच्या हक्कांना वाध येत नाही. समान नागरी कायदा म्हणजे भारतीय घटनेत लिहिलेले समानता, स्वातंत्र्य व बंधुत्व ह्या तत्त्वांचे संरक्षणच आहे.

नोव्हेंबरमध्ये लेखक गोवा राज्यात जमीयत उलेमा-ई-हिंदच्या महम्मद मदानी यांना भेटले असता त्यांची या विषयावर चर्चा झाली. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर गमतीदार होते. त्यांनी सांगितले की समान नागरी कायद्यांत इतर धर्मांचेदेखील लोक असल्यामुळे तसा कायदा झाला, तर त्यासंबंधी विचार करता येईल. तेव्हा लेखकाने विचारले, ''असे असेल, तर जमीयत उलेमा-ई-हिंद ही संघटना सर्वदूर निषेध मोर्चे का काढतात?'' ह्याला मौलाना मदानींनी उत्तर दिले नाही.

मदानींप्रमाणेच नुरानी, हबीब किंवा सिद्दिकी यांच्यासारखे इतर मौलवी समान नागरिक कायद्याबद्दल आक्रमक भूमिका घेत आहेत याचे आश्चर्य वाटते. समान नागरी कायद्याची सध्या नुसती चर्चाच चालू आहे. त्यावरून त्यांची बौध्दिक अप्रामाणिकता सिध्द होते. त्यांनी फार तर समान नागरी कायदा अस्तित्वात आल्यानंतर आपले विचार किंवा विरोधाचा प्रचार करावा.

समान नागरिक कायदा अस्तित्वात येण्याकरिता स्वत: लेखक (तुफेल अहमद) व त्यांचे मित्र सत्यप्रकाश आणि सिध्दार्थ सिंग यांनी Universal Bill of Rights for the Indian Citizens (UBRIC) ह्या संबंधी एक पुस्तिका (draft) तयार केली आहे व तिचा प्रसार करण्याचा त्यांचा विचार आहे.

ह्यामध्ये बारा मुद्दे असून भारतीय नागरिकांच्या हक्कांचा विचार आहे. (ह्यामध्ये कुठल्याही धर्माचा विचार नाही.) नुरानी स्वत:ला प्रामाणिक समजत असतील, तर त्यांनीदेखील ह्यासंबंधी विचार करावा व स्वत:चे समान नागरिक कायदे बनवावेत.

हा लेख वाचल्यानंतर लक्षात येते की मुस्लीम समाजातदेखील काही 'बिभीषण' आहेत, जे भारतीय विचाराशी नुसते सहमत नसून त्याकरिता काही करण्याची त्यांची इच्छा आहे.

(Hindu Voiceच्या जानेवारी 2017च्या अंकातील Fraudsters, Charlatans and Hidden Jihadis Masquerading as Liberal Muslims या तुफेल अहमद यांनी लिहिलेल्या लेखाचे रूपांतर.)

022-28728226