पंचायत ते पार्लमेंट भाजपामय

विवेक मराठी    16-Mar-2017
Total Views |

 


67 सदस्य असलेल्या जळगाव जिल्हा परिषदेत नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत भाजपाचे 33 सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी 34 सदस्यांची गरज असली, तरी  अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध विभागांच्या सभापतीपदावर भाजपाच विराजमान होणार  आहे. तर जिल्ह्यातील 15 पैकी 9 पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवत भाजपा सगळयात मोठा पक्ष ठरला आहे. या यशाचे शिल्पकार खा. रक्षाताई खडसे तसेच जळगावचे नेतृत्व

खा. ए.टी. पाटील यांच्याकडे आहे ठरले आहेत. तसेच माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ग्ािरीश महाजन व नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे भक्कम नेतृत्व भाजपाकडे असल्याने चमकदार यश मिळविता आले आहे.

 श्ािवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे तगडे आवाहन समोर असताना जळगावात भाजपाने विरोध मोडून काढीत जिल्हा परिषदेची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. बहुमताच्या जादुई आकडा गाठण्यासाठी एक जागा कमी पडत असल्याचे दिसत असले, तरी जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता राहणार हे निश्चित.

67 सदस्य असलेल्या जळगाव जिल्हा परिषदेत नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत भाजपाचे 33 सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी 34 सदस्यांची गरज असली, तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध विभागांच्या सभापतिपदावर भाजपाच विराजमान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर जि.प. सभागृहात भाजपा 33, राष्ट्रवादी काँग्रेस 16, श्ािवसेना 14, तर काँग्रेसचे 4 सदस्य निवडून आले आहेत. 34 हा बहुमतासाठीचा जादुई आकडा आज जरी भाजपाकडे दिसत नसला, तरी आपलाच अध्यक्ष होईल असा पक्षाकडून दावा केला जात आहे. या निवडणुकीत भाजपाची सदस्यसंख्या 22वरून 33वर पोहोचल्याने विरोधातील सर्वच पक्षांचे संख्याबळ घसरले. सेनेची संख्या 17वरून 14, राष्ट्रवादीची 19वरून 16, तर काँग्रेसची 10वरून 4 जागांपर्यंत घसरण झाली. मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा व जामनेर या तालुक्यांत भाजपाची ताकद वाढली. चोपडा तालुक्यात भाजपाने 3 गटात पहिल्यांदाच विजय मिळविला, तर अमळनेर तालुक्यात पक्षाला एकही जागा जिंकता येणार नाही असे संकेत दिले जात असताना येथेदेखील चारपैकी दोन जागा जिंकण्यात भाजपाला यश आले. मुक्ताईनगर व रावेर या तालुक्यांतील सगळयाच गटात भाजपाने यश मिळविले, तर जामनेर तालुक्यातील 6पैकी 5 जागा जिंकल्या.

जळगाव लोकसभा मतदारसंघापेक्षा रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षाने दुप्पट यश पटकावले. जळगाव मतदारसंघात 11, तर रावेर मतदारसंघात 22 जागांवर विजय मिळविला. खा. रक्षाताई खडसे रावेर मतदारसंघाचे नेतृत्व करतात, तर जळगावचे नेतृत्व खा. ए.टी. पाटील यांच्याकडे आहे. माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ग्ािरीश महाजन व नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे भक्कम नेतृत्व भाजपाकडे असल्याने चमकदार यश मिळविता आले. त्यामानाने विरोधात लढणाऱ्या पक्षांकडे नेतृत्वासोबत कार्यकर्त्यांचीदेखील वाणवा होती. त्यातल्या त्यात श्ािवसेना व राष्ट्रवादी यांनी आपला प्रभाव दाखविला, मात्र काँग्रेस पहिल्यापेक्षा अधिकच निस्तेज झाली. विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी आघाडी करून निवडणूक लढविली होती. एकत्र आल्यानंतर त्यांच्या जागा वाढतील असे प्रथर्मदशनी वाटले, परंतु उलट जागा कमी झाल्या. यातूनच जळगावातील भाजपाचा वरचश्मा सिध्द झाला. मागील पाच वषर्े सेनेला सोबत घेऊन भाजपाने जि.प.चे कामकाज पाहिले. दोन सभापतिपदे व उपाध्यक्षपद सेनेकडे होते. परंतु विकासकामापेक्षा भाजपाचा पाणउतार करण्यात धन्यता मानणाऱ्या श्ािवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात भाजपाला यश आले आहे.

पंचायत समित्यांमध्येही भाजपाचे वर्चस्व

जिल्ह्यातील 15पैकी 9 पंचायत समित्यांमध्ये भाजपा सगळयात मोठा पक्ष ठरला आहे. 9 पंचायत समित्यांमध्ये सभापतिपद या पक्षाकडे असेल. एरंडोल, धरणगाव व जळगाव येथे श्ािवसेनेचे सभापती होतील. उर्वरीत ठिकाणी एकमेकांच्या सहकार्याने भाजपा, राष्ट्रवादी व श्ािवसेना यांना सभापतिपद मिळविता येईल. यावलमध्ये 4 सदस्य वगळता काँग्रेसची अवस्था पंचायत समित्यांमध्ये नगण्य आहे. चाळीसगाव, पारोळा आण्ाि चोपडा येथे राष्ट्रवादी चमत्कार करून सभापतिपद पटकावू शकते. कारण चाळीसगावात भाजपा नि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांना समान म्हणजे 7 जागा आहेत. चोपडयातही भाजपाला 5, तर राष्ट्रवादीला 5 जागा आहेत. येथे भाजप बाजी मारेल असेही संकेत आहेत.


जि.प. सभागृहात 67पैकी 61 नवे चेहरे

सर्वच पक्षांनी नव्या दमाचे उमेदवार दिल्याने बहुतेक जण पहिल्यांदाच जि.प.त प्रतिनिधित्व करीत आहेत. बहुतांश तरुण सदस्य सभागारात दिसतील. आरक्षणामुळे महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. अंमळनेर तालुक्यातून तर चारही गटांतून महिलाच विजयी झाल्या आहेत, हे विशेष.

अध्यक्षपदी महिला ओबीसी - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला ओबीसी प्र्रवगासाठी राखीव आहे. त्यामुळे संभाव्य अध्यक्षपद लक्षात घेऊन मातबर पुरुष उमेदवारांनी आपण स्वत: उमेदवारी न करता आपल्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी करायला लावून अध्यक्षपद पटकावण्याचा मनसुबा केलेला दिसतो. त्यातील काहींचे मनसुबे पराभवामुळे उद्ध्वस्त झाले.

काँग्रेस गटस्थापनेत घोळ - कधीकाळी जिल्हा परिषदेत निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत फक्त चार सदस्य निवडून आणता आले आहेत. हे चार सदस्यदेखील एकत्र नांदण्याची चिन्हे दिसत नाहीत. सभागृहात या सदस्यांनी मिळून आपला गट स्थापन करावा व आपला नेता निवडावा, असे अपेक्षित असताना हे चार सदस्य मात्र एकत्र येत नाहीत असे चित्र आहे. आर.जी. पाटील हे एक सदस्य गट स्थापनेसाठी येत नाहीत असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. तसेच भाजपाला सत्ता स्थापनेसाठी एका मताची गरज भासणार असल्याने काँग्रेसचा हा सदस्य गायब झाल्याचे काँग्रेसच्याच गोटातून सांगण्यात येते. मात्र माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पक्षाने निवडून येण्यासाठी सहकार्य न केल्याने आर.जी. पाटील नाराज होते. आता त्यांची नाराजी दूर झाली असून ते काँग्रेसच्या सदस्यांसोबत राहतील असा दावा केला आहे.

जळगाव जिल्ह्यातून काँग्रेस संपत चालली असल्याचे दृश्य दिसू लागल्याचे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिध्द केले. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आता सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंचायत ते पार्लमेंट हा पक्षाचा नारा या जिल्ह्यात खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे दिसते.

8805221372