मातृहृदयी उषाताई चाटी

विवेक मराठी    24-Aug-2017
Total Views |


उषाताई या अहल्या मंदिरात देवघरात मंदपणे, शांत तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे होत्या. त्या तेवत होत्या, शांत प्रकाश पडत होता. नंदादीपातील तेल वा तूप सरल्यावर जशी ज्योत सहजतेने विझून जाते, त्या सहजतेने त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांचे समर्पकपणेर् वणन करायचे झाले, तर 'मातृहृदयी' हाच एकमेव शब्दप्रयोग त्यांचे समग्रर् दशन घडवून जातो. उषाताईंच्या निधनामुळे अनेक घरांतील आई हरपली आहे. फक्त अहल्या मंदिराची वा राष्ट्र सेविका समितीची आई निजधामाला गेली नाही, तर एका विशाल परिवाराची आई अखेरच्या प्रवासाला निघून गेली. समितीच्या माजी प्रमुख संचालिका उषाताई तसे एक परर्िपूण जीवन जगल्या. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आई कोणत्याही वर्षी गेली, तरी ती अनेकांना पोरके करून जाते, हा अनुभव या निमित्ताने पुन्हा आला. त्यामुळे मातृविरहात अनेक जण शोकाकुल अवस्थेत अहल्या मंदिर परिसरात वावरत होते.

एक लोकमाता, जनमाता अहल्या मंदिर परिसरात, पार्थिव थंड ठेवणाऱ्या शीतपेटिकेत पहुडली होती. समोर भारतमातेचे चित्र होते. बाजूला फुले ठेवली होती आण्ाि येणारा प्रत्येक जण आपली अश्रर्ुपूण पुष्पांजली अर्पण करून पुढे सरकत होता. बाजूला एका मोठया टेबलवर श्रध्दांजली पुस्तिका ठेवली होती. त्यावर आपल्या भावना व्यक्त करून बाहेर पडायचे. वास्तविक खूप मोठमोठी शब्दसंपदा वापरून उषाताईंना श्रध्दांजली अर्पण करता येऊ  शकत होती. पण बव्हंशी शोकसंवेदनांतील शब्द भिन्न असले, तरी भावना एकच होती - आई हरपली, आई गेली.

ही माताही कशी होती? तर तिने आपल्या आयुष्याचा राष्ट्रकार्याचा होम केला होता. एका राष्ट्रसमर्पित जीवनाची इतिश्री झाली होती. एका राष्ट्रव्यापीच नव्हे, तर विदेशातही व्यापलेल्या एका मोठया संस्थेच्या - राष्ट्र सेविका समितीच्या - त्या प्रमुख संचालिका होत्या आण्ाि वयोमानानुसार स्वेच्छेने त्यांनी ते पद त्यागले होते. रा.स्व. संघाप्रमाणे कार्य करणाऱ्या या संस्थेच्या पहिल्या मुख्य संचालिका वं. मावशी केळकर होत्या. त्यांच्या निधनानंतर ते दायित्व वं. ताई आपटे यांच्यावर आले. ताईंच्या निधनानंतर ती जबाबदारी उषाताईंवर आली. रा.स्व. संघाचे तृतीय प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आपल्या जीवनकाळातच ती जबाबदारी मा. रज्जूभय्यांवर सोपविली व त्यानंतर संघातील प्रथा आता रूढ झाली आहे. त्याच र्मागावर उषाताई चालल्या. उषाताईंनी 9 मार्च 1994ला प्रमुख संचालिकापदाची सूत्रे स्वीकारली होती आण्ाि 2006ला त्यांनी प्रकृतीच्या कारणावरून त्या पदावरून स्वत: बाजूला होण्याचा र्निणय घेतला. त्यांनी 23 जुलै 2006ला प्रमिलताईंवर ती जबाबदारी सोपविली आण्ाि आता समितीतदेखील ती परंपरा झाली आहे. प्रमिलताई दायित्वातून मुक्त झाल्या आण्ाि वं. शांताक्कांकडे ती जबाबदारी आली. दायित्वमुक्तीनंतर अशा व्यक्तिमत्त्वांचे जीवन कसे राहत असेल, हा मानसशास्त्राच्या व व्यवस्थापनशास्त्राच्या लोकांना प्रश्न पडतो. या दोन्ही संघटनांमध्ये अगदी सहजतेने दायित्वमुक्त होऊन सामान्य स्वयंसेवकांप्रमाणे वा सेविकांप्रमाणे जीवन जगले जाते. रा.स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक पदावरून दायित्वमुक्त झाले, तेव्हा दुसऱ्या दिवशी एक विदेशी पत्रकार संघकार्यालयात संध्याकाळी पोहोचला होता. त्या वेळी मोहिते शाखा लागली होती आण्ाि माजी सरसंघचालक एका बालगणाचे श्ािक्षक म्हणून लहान बालकांना विविध शारीरिक योग श्ािकवीत आहेत, हे त्याने बघितले आण्ाि तो अवाकच झाला. इतकी सहजता फक्त या दोन संघटनांतच आहे.

उषाताईंच्या किंवा प्रमिलताईंच्या दायित्वमुक्तीनंतरही अहल्या मंदिरात त्या दोघीही तेवढयाच सहजतेने काल-परवापर्यंत वावरत होत्या. कुठेही माजी प्रमुख संचालिका हा आव नव्हता की कुठल्याही विषयावर जाहीर वक्तव्य देणे नाही. समितीची प्रतिक्रिया उषाताईंनी वा प्रमिलताईंनी दायित्वमुक्त झाल्यावर दिलेली नाही. ती प्रतिक्रिया नियमित व्यवस्थेतूनच येते. उषाताई या अहल्या मंदिरात देवघरात मंदपणे, शांत तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे होत्या. त्या तेवत होत्या, शांत प्रकाश पडत होता. नंदादीपातील तेल वा तूप सरल्यावर जशी ज्योत सहजतेने विझून जाते, त्या सहजतेने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या आजारी होत्या, तरी त्या आजारपणाचा त्रास इतरांना होणार नाही, याबाबत त्या दक्ष होत्या. उज्ज्वलादीदी उषाताईंच्या सेवा करणाऱ्या होत्या. उषाताई होत्या, तोपर्यंत अहल्या मंदिरात सर्वांना त्यांची उपस्थिती आश्वासक व उत्साहवर्धक वाटत असे. त्या अनेक वेळेला प्रकृती ठीक असली की बैठकींनाही येऊन बसत. पण त्या बैठकीतही त्यांचा सहभाग उत्साह वाढविणारा असाच राहत असे. उगाच सल्ला देणे, मत व्यक्त करणे हा भाग नव्हताच. ना आपल्या अडचणी, जीवनातील खाजगी वा संस्थात्मक त्यांनी कधी सांग्ाितल्या वा ना आमच्या काळी असे होते, ही भाषा त्यांच्या वाणीवर आली. जीवनातील मोठया गोष्टी, दीपस्तंभ ठरण्यात अशा घटनाही त्या सांगत नसत. प्रमुख संचालिकापदाच्या दायित्वातून मुक्त होण्यापूर्वी 2005मध्ये नागपूरच्या खापरी मैदानावर समितीचे दहा हजार सेविकांचे संमेलन हा तसा अभिनव प्रयोग होता. त्या संमेलनाचे यश सर्वांना अवाक करणारे होते. पण उषाताईंनी कधी मी ते घडवून आणले होते वा मी प्रमुख संचालिका असताना असे श्ािबिर झाले होते, हे नंतर कुणालाही सांग्ाितले नाही. एक भव्य इतिहास घडविणारे श्ािबिर झाले, याचे पुढे फक्त मौनच राहत असे. दायित्व असताना वा दायित्वमुक्त झाल्यावरही उषाताई कुणावर चिडल्या आहेत, रागवत आहेत, त्यांचा ओरडा कुणाला बसतो आहे, हा अनुभव कुणीही घेतला नाही. मात्र त्याच उषाताई र्निणय घेण्याबाबत प्रसंगविशेषी तेवढयाच कठोर होत. ही कृतीतील कठोरता त्यांनी वाणीत कधीही येऊ दिली नव्हती.

वैयक्तिक जीवनात पतिनिधन हा वज्राघात असतो. तो वज्राघातही त्यांनी शांतपणे व संयमाने दृढपणे सहन केला. आता घरची जबाबदारी संपली. आता देशाचा व समाजाचा संसार करायचा हा निर्धार त्यांनी केला. 1984पासून त्या हनुमान नगरातील घरातील वास्तव्य आवरते घेऊन अहल्या मंदिरात निवासाला आल्या. त्या काळात त्या देवी अहल्याबाई स्मारक समितीच्या कार्यवाहिका होत्या. याच काळात अहल्या मंदिरात सेवा प्रकल्प म्हणून वनवासी कन्या छात्रावास सुरू झाला. या छात्रावासात आज सात राज्यांतील 42 मुली श्ािक्षण घेत आहेत. त्यातील सर्वांच्या त्या दादी होत्या. नानी होत्या. त्या 42 जणींना घरापासून दूर राहत असतानाही घरपण मिळाले होते. उषाताई त्या मुलींना सोबत घेऊन बसत, गाणी श्ािकवीत, संस्कार करीत. त्या मुलींनाही उषाताईंचा एक आधार कायम वाटत असे. त्या 42 जणींचे तर सर्वस्व अहल्या मंदिर होते, उषाताई होत्या. अनेक जणी तर दोन-अडीच वर्षे वयाच्या असल्यापासून अहल्या मंदिर छात्रावासात राहत असत. उषाताई गेल्या, त्या वेळी त्यांच्या डोळयात अश्रू होते. पण जेव्हा उषाताईंचे पार्थिव अंत्र्यदशनाला ठेवले होते, त्या वेळी त्या सर्व मुली खूप शांत व संयमाने वागत होत्या. मोक्षधामवर उषाताईंचे पार्थिव अनंतात विलीन झाले आण्ाि अहल्या मंदिरात परतल्यावर त्या एकमेकींच्या आसऱ्याने रुदन करून मोकळया होऊ लागल्या होत्या. गंभीर वातावरणात आपल्यावरील जबाबदारी शांतपणाने ओळखणे वा पार पाडणे, हे त्यांना उषाताईंनीच तर आपल्या जीवनातून दाखवून दिले होते.

उषाताई या मूळच्या भंडारा येथील. बालवयापासून त्या समितीच्या सेविका होत्या. बी.ए., बी.टी.पर्यंतचे श्ािक्षण त्यांनी प्राप्त केले. घरात पती व त्या स्वत:ही समाजसेवा करणारे दांपत्य होते. त्यांचे सर्व जीवन राष्ट्रसमर्पित होते. घर नीट चालावे म्हणून त्यांनी हिंदू मुलींच्या शाळेत श्ािक्षिकेची नोकरी स्वीकारली. दीर्घकाळ त्या शाळेत श्ािक्षिका होत्या. याच शाळेत वं. मावशी केळकरही श्ािकल्या होत्या. मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना वक्तृत्वाचे धडे देणे, गाणे श्ािकविणे हे उषाताई करीत. उषाताईंचा आवाजही दैवी देणगी मिळालेला सुमधुर होता. वं. मावशीही त्यांच्याकडून अनेकदा गीत गाऊन घेत. त्या जी गीते गात ती भार्वपूण होती. अनेक गीतांना तर त्या स्वत:च चाली लावीत होत्या. एक गायिका वा संगीतकार म्हणून त्यांनी जगण्याचे ठरविले नाही, हे त्यांच्या अभावी उत्तम गायिका वा संगीतकार झालेल्यांचे भाग्य म्हणावे लागेल. त्या जर या व्यवसायात आल्या असत्या, तर अनेकांना निवृत्त व्हावे लागले असते.

सौम्य व्यक्तिमत्त्व हे उषाताईंच्या अनेक वैश्ािष्टयांपैकी एक वैश्ािष्टय. वैमनस्य, वाद मिटवून परिवार वा समाजात सुसंवाद निर्माण करण्याची विलक्षण हातोटी उषाताईंजवळ होती. ती सुसंवाद निर्मिती प्रक्रिया त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवली. निवृत्त होऊन 20-25 वर्षे झाली, तरी शाळेतील अनेक श्ािक्षिका वा कर्मचारी त्यांच्याकडे हक्काने येत आण्ाि आपले मन मोकळे करून जात. मन मोकळे करण्याचे एक हक्काचे स्थान म्हणून उषाताईंकडे बघितले जात असे.

समितीच्या कामात प्रवास करणे, महिलांत मिसळणे, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करणे, आत्मभान निर्माण करणे, हे काम त्या सहजतेने करून जात. समितीचे काम करताना प्रथा, परंपरा यांच्या अडचणी त्यांच्यासमोरही पहाडासारख्या उभ्या ठाकल्या असतील. उत्तर प्रदेशसारख्या भागात महिलांना सन्मान मिळणे दुरापास्त. अशा वेळी त्यांनी समितीचे काम वाढविले. स्त्री ही पुरुषाची स्पर्धक नाही, तर ती दोघेही एका संसाररथाची दोन चाके आहेत, हे त्यांनी कायम सर्वांच्या लक्षात आणून देत, महिलांमध्ये आत्मभान आणीत, त्यांना मुख्य प्रवाहात आणले. समितीचे काम वाढविणे, हे काम करताना संघर्ष नव्हे तर समन्वयावर त्यांचा भर राहिला. त्यामुळेच त्या यशस्वी संघटक होऊ शकल्या.

त्यांच्या या जीवनयशाचे रहस्य रा.स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात अचूकपणाने टिपले होते. ते म्हणाले, ''समाजातील अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जे महापुरुष र्मागक्रमण करीत असतात, त्यात उषाताईंचे स्थान वरचे आहे. समाजजागृती करून राष्ट्रोत्थान करायचे व आपल्या देशाला जगात सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचे, हेच त्यांचे स्वप्न होते. त्यांनी दाखवून दिलेल्या र्मागावर र्मागक्रमण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

देशातील सर्व राज्यांत अखंड प्रवास करीत उषाताईंनी फार मोठे काम उभे केले. त्यांच्या र्मार्गदशनाचा व सहवासाचा आपण अनुभव घेतला आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेले र्मार्गदशन ही आपली संपत्ती आहे. अलीकडच्या काळातही त्या आपल्या वेदना लपवून सुहास्यवदनाने आल्या-गेल्याचे स्वागत करीत असत. आपल्या वेदना दाखवून इतरांना वेदना होऊ नये, ही त्या मागील भावना होती'' हे त्यांनी आवर्जून सांग्ाितले.

अंत्यसंस्कारापूर्वी देवी अहल्या मंदिरात सकाळी साडेदहा वाजता शाखा लावण्यात आली. उषाताईंना अखेरचा पूर्व प्रमुख संचालिका प्रणाम करण्यात आला व मग अंत्ययात्रा सुरू झाली. एक मातृशक्ती काळाच्या पडद्याआड गेली.

8888397727