सरन्यायाधीश शरद बोबडे - एक प्रज्ञावान विधिज्ञ

विवेक मराठी    02-Nov-2019
Total Views |

भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नेमणुकीनं एक प्रज्ञावान विधिज्ञ सरन्यायाधीश होत आहे. तब्बल 41 वर्षांनंतर बोबडे यांच्या नेमणुकीने मराठी पर्व सर्वोच्च न्यायालयात सुरू झाले आहे. न्या. बोबडे हे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीश होत आहेत. 23 एप्रिल 2021पर्यंत ते या पदावर राहणार आहेत. जवळजवळ 17 महिन्यांचा हा कालखंड आहे.


न्या. शरद बोबडे हे नागपुरातील एकायातनाम रसिक विधिज्ञ कुटुंबातील चवथ्या पिढीचे वकील आहेत. त्यांचे वडील अरविंद बोबडे हे मुंबई हायकोर्टातील एक बडे प्रस्थ होते. ते भाऊसाहेब म्हणूनही ओळखले जात. दोन वेळेला ते महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. त्यांचा न्यायालयातील युक्तिवाद ऐकणे ही एक मेजवानी राहत असे. अगदी मॅट्रिक झालेल्या मुलालाही डिक्शनरी बघता त्यांच्या युक्तिवादातील प्रत्येक शब्द माहीत असे, मात्र त्यांचा अर्थ जाणून घ्यायला भल्याभल्यांना डोके खाजवावे लागे. रसाळ, प्रवाही अचूक शब्दयोजना ही सामान्यांना भावणारी त्यांची युक्तिवादाची शैली होती. तर त्यांनी लावलेल्या तर्कांमुळे समोरच्या वकिलांचीही भंबेरी उडत असे. उंच, सडपातळ अशी त्यांची प्रतिमा न्यायलयात दबदबा निर्माण करीत असे. तसे ते पक्के विदर्भवादी होते. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे ते घनिष्ट मित्र होते. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे नेते होते तरी भाऊसाहेबांचे मित्र होते. त्यांचे वडील आजोबाही वकील होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर परदेशात जाऊन शरद बोबडे शिकत असत तर कुणालाही आश्चर्य वाटले नसते. पण ते नागपूरलाच शिकलेत- एस. एफ. एस. शाळेतून मॅट्रिक होऊन ते नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून एलएलबी झाले. त्यांनाही विदर्भाबद्दल विलक्षण ओढ आहे.

नागपूर बारमध्ये भाऊसाहेबांचा दबदबा होता, पण शरद बोबडे हे मृदू स्वभावाचे म्हणून नागपूरला ज्ञात आहेत. कायद्यासारया किचकट क्षेत्रात वावरत असतानाही त्यांनी आपली रसिकता जागती ठेवली होती. शास्त्रोक्त संगीत ऐकणे, संगीत मैफिलींना जाणे हा त्यांचा छंद होता. त्यांच्या आवडीत ट्रेकिंग हा विषयही येतो. नागपूरला लागून असलेल्या जुन्या मध्य प्रांतातील काही भागात जाऊन त्या परिसरातील गुंफा, ज्या दुर्लक्षित आहेत, त्यांचा शोध घेणे त्यांना मनापासून आवडते.

शरद बोबडे यांचे वैशिष्ट्य आहे की, इंगजी, मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. याशिवाय अनेक लिपी, भाषा, समजून घेण्यात त्यांना रुची आहे. फक्त भाषांमध्येच गुंतून पडता धर्मशास्त्रांचेही त्यांचे अतिशय उत्तम वाचन आहे. धर्मशास्त्रांचा इतिहास, भगवद् गीता, ऋग्वेद, सर्व वेद, उपनिषदे हे त्यांच्या वाचनातून दिसतात असे नाही तर, त्यांच्या भाषणांतूनही त्या ज्ञानाचे दर्शन होते. अशा रमणारा हा न्यायमूर्ती सामाजिक बांधिलकी जपणाराही आहे. मला आठवतं की, अशोक देसाई हे न्यायमूर्ती झाल्यावर त्यांच्या घरी हार घेऊन जाणारे पहिले विधिज्ञ शरद बोबडेच होते. अशोक देसाईंशी त्यांची मैत्री अखेर पावेतो कायम होती. शरद जोशी, श्रीकांत जिचकार शरद बोबडे यांच्या चर्चेतूनच बँकेचे कर्ज भरू शकणार्या शेतकर्यांना नादारीचे अर्ज भरायला लावण्याची शक्कल पुढे आली. त्यावेळी जवळजवळ 4 लाख शेतकर्यांनी असे अर्ज भरलेत. त्यांचा खटला न्यायालयात शरद बोबडे यांनीच लढविला होता. तेही एक पैसाही फी घेता. याच नादारी अर्जातून पुढे आज कर्जमुक्ती जन्म घेती झाली. त्यावेळी शरद बोबडे यांनी शेतकर्यांना न्याय मिळवून देत आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली.

छगन भुजबळ यांनी नागपूरला विधानसभा अधिवेशन सुरू असताना घाऊक प्रमाणात (तेरा आमदारांसह) पक्षांतर केले होते. ते शिवसेनेतून काँगेस पक्षात गेले. हे पक्षांतर बेकायदेशीर ठरविण्यासाठी शिवसेनेतर्फे ॅड. शरद बोबडेच विधिज्ञ म्हणून उभे ठाकले होते. नंतरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात नागपूरला अवमान याचिका दाखल झाली होती. तेव्हा त्यांची बाजूही शरद बोबडे यांनीच मांडली होती. नव्याने वकिली पेशात येणार्या तरुणांबाबत त्यांच्या मनात आगळीवेगळी कणव होती. नव्याने वकील होणार्याला काय-काय अडचणींना तोंड द्यावे लागते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच ते नेहमी सांगत की, फार काळ कुणाचे ज्युनियर राहू नका. वर्षभरातच स्वतचिी वेगळी प्रॅक्टिस सुरू करा. त्यातूनच नागपूरला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यानंतर ते त्या विद्यापीठाचे कुलपती झाले. मुंबईला राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या. बी. एन. श्रीकृष्ण होते. नागपूर विद्यापीठातून शिकलेला विद्यार्थी नागपूरातच राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीचा कुलपती झाला ही नागपूरकरांसाठी अतिशय मानाची बाब होती.

शरद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956चा नागपूरमधलाच. नागपुरातून एलएलबी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली. 1998साली ते याच न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता झाले होते. 19 वर्षांपूर्वी 2000 साली ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. 2012ला ते मध्य प्रदेशचे मु न्यायाधीश झाले. 12 एप्रिल 2013ला सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यापूर्वी नागपूरात वकिली केलेले न्या. हिदायतुल्ला हे सरन्यायाधीश झाले होते. ते मध्य प्रदेशचे मुख्य न्यायाधीश होते. न्या. हिदायतुल्ला यांचे वैशिष्ट्य असे की, सरन्यायाधीश असताना त्यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळावी लागली होती. भारताचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर तत्कालिन उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपतीपद सांभाळावे लागले. त्यांना काँगेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे ते उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरले तेव्हा हिदायतुल्ला हे कार्यकारी राष्ट्रपती होते. नंतर त्यांनाही उपराष्ट्रपती होण्याची संधी मिळाली. त्याच मध्य प्रदेश हायकोर्टचे शरद बोबडे मु न्यायाधीश होते. याशिवाय सरन्यायाधीश झालेले जे. सी. वर्मा हेदेखील . प्र. उच्च न्यायालयाचे मु न्यायाधीश होते.

मुंबई उच्च न्यायालयातून सरन्यायाधीश होण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. पण त्यात मराठी भाषिक फक्त न्या. पी. बी. गजेंद्रगडकर (सातारा) न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड (पुणे) होते. आता तिसर्यांदा हे पद बोबडे यांच्या रूपाने मराठी भाषिकाकडे येत आहे. चंद्रचूड हे 1978 ते 1985 असे प्रदीर्घ काळ सरन्यायाधीश होते.

18 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2025 हा सहा वर्षांचा काळ मराठी भाषिक सरन्यायाधीश राहणार आहेत. मधली 2 वर्षे फक्त न्या. रामण्णा हे सरन्यायाधीश राहणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 24 एप्रिल 2021 ते 26 ऑगस्ट 2022 हा राहणार आहे. त्यानंतर न्या. उमेश लळित हे 27 ऑगस्ट 2022 ला सरन्यायाधीश होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 4 महिन्यांचा राहणार आहे. न्या. लळीत हे एकमेव असे सरन्यायाधीश असणार आहेत, जे कुठल्याही उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नव्हते. ते सरळ विधिज्ञांमधून सर्वोच्च न्यायालयावर नेमले गेले आहेत.

न्या. लळीत यांच्यानंतर न्या. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होतील. 9 नोव्हेंबर 2022 पासून 10 नोव्हेंबर 2024पावेतो सरन्यायाधीश राहतील. त्यानंतर 7 महिन्यांसाठी न्या. संजीव खन्ना सरन्यायाधीश होतील. 14 मे 2015 ला न्या. भूषण रामकृष्ण गवई हे सरन्यायाधीशपदी नियुक्त होणार आहेत.

न्यायमूर्ती म्हणजे रूक्ष, गंभीर या समीकरणात न्या. शरद बोबडे नाहीत. ते चांगले कानसेन आहेत. तसेच छायाचित्रकार म्हणूनही नागपुरात ज्ञात आहेत.

असे हे भावी सरन्यायाधीश 17 नोव्हेंबरपूर्वी निर्णय दिला जाणार्या अयोध्या खटल्याचाही निकाल देणार आहेत. अयोध्या प्रकरणी निकाल देणार्या खंडपीठाचे आपण सदस्य आहोत याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे मत न्या. बोबडे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते. एकूण काय सरन्यायाधीशपदाच्या मराठी पर्वाचा आता प्रारंभ होत आहे.

8888397727