मुघलांचे वंशज

विवेक मराठी    10-Dec-2019
Total Views |

 

आज मोंगोलिया हा बौध्दबहुल देश आहे आणि मुघलांचे वंशज आपल्या बौध्द वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आहेत. घराघरात बुध्दाचे मंदिर दिसते. बुध्दाची वचने गायली जातात. भारतातील शास्त्र, गणित शाळेत शिकवले जाते. राम, कृष्ण, बुध्द, विक्रमादित्य, भोजराजा, पंचतंत्र यांच्या गोष्टी इथली मुले ऐकतात.
 

family of the  mughal_1&n

 


तिबेटच्या पठाराच्या पलीकडे पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हिमालयाच्या या उंच पठरामुळे तिबेटच्या उत्तरेला ताकलामकान वाळवंट आणि ईशान्येला गोबीचे वाळवंट पसरले आहे. गोबी आणि गोबीच्या पलीकडचा गवताळ प्रदेश म्हणजे मोंगोलिया. कडाक्याची थंडी
, उष्ण उन्हाळे, थंडीत बर्फवर्षाव आणि उन्हाळयात थोडाफार पाऊस अशा हवामानाचा हा देश कृषीसाठी फारसा अनुकूल नाही. येथील लोक घोडे निर्यात करून चीनकडून कापड व कृषी उत्पादने आयात करत असत. इथले जीवन सुकर नव्हते. जगण्यासाठी सतत संघर्ष करायला लावणाऱ्या या प्रदेशाने चिवट व क्रूर योध्दयांना जन्म दिला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
 

या मोंगोल लोकांच्या सततच्या आक्रमणांना रोखण्यासाठी चिनी सम्राटांनी चीनची प्रसिध्द भिंत उभारली. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत अनेक टप्प्यात 21,000 कि.मी.पेक्षा अधिक लांबीची भिंत चिनी लोकांनी बांधली. या भिंतीने बरीच आक्रमणे थोपवली खरी. पण मंगोलियाच्या चेंगीझ खानने ही भिंत ओलांडून चीनवर आक्रमण केलेच.


बाराव्या शतकात चेंगीझ खानने केलेली आक्रमणे इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. चेंगीज खान मोंगोलियामधील तेन्ग्राी धर्माचे अनुयायी होता. या धर्मात निळे आकाश, सूर्य, चंद्र, अग्नी, पृथ्वी माता यांची पूजा करत असत. आज मोंगोलियाच्या ध्वजावर या सर्वांचे प्रतीक असलेले त्यांचे 'सोयोंबो' नावाचे चिन्ह दिसते. 'सोयोंबो' हा शब्द संस्कृत 'स्वयंभू'चे मोंगोली रूप आहे.

संस्कृत इथे कसे पोहोचले, ते जाणून घ्यायच्या आधी चेंगीझ खानची आक्रमणे पाहणे आवश्यक आहे. चेंगीझ खानने चीनवर आक्रमण केले, तसेच पश्चिमेला मध्य आशियापासून युरोपपर्यंतचाही भूभाग त्याने काबीज केला. त्याने जगातील सर्वात मोठे भूमीवरील साम्राज्य स्थापन केले. याच्या नावातील 'खान' म्हणजे मोंगोल भाषेत सरदार किंवा सेनापती. पुढे हा शब्द 'राजा' या अर्थाने वापरला गेला. चेंगीझ खानने मृत्यूनंतर आपले राज्य आपल्या चार मुलांमध्ये वाटून दिले.

चेंगीझ खानचा नातू कुब्लाई खान. याने आपल्या आजोबांचे चीन जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. तेराव्या शतकात त्याने राज्यविस्तार करत चीन, कोरिया आणि तिबेट काबीज केले. याने जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, खाली जावा यांच्यावर पण स्वारी केली होती. चीनमध्ये त्याने युआन (Yuan) हे राजघराणे स्थापन केले. कुब्लाई खानच्या तिबेटवरील हल्ल्याने मात्र एक वेगळेच वळण घेतले. त्याने तिबेट जिंकला खरा, पण येथील बौध्द गुरू - ड्रोगोन चोग्याल फाग्पा यांच्या शिकवणीने त्याचे मन जिंकले. कुब्लाई खानने त्यांना आपले राजगुरू म्हणून नेमले आणि तिबेटचा राज्यकारभार बौध्द संघावर सोपवून दिला. कुब्लई खानाने व त्याच्या कुटुंबाने बौध्द धर्म स्वीकारला. याच्या मृत्यूनंतर लवकरच चीन मोंगोलांपासून स्वतंत्र झाला, पण तिबेट मात्र बौध्द संघाच्या छत्राखालीच राहिले.

 

उझबेकिस्तानमधील मोंगोलांनी लवकरच इस्लाम धर्म स्वीकारला होता. चौदाव्या शतकात उझबेकिस्तानमध्ये तैमूरलंगचा जन्म झाला. असे म्हणतात की तो एकदा मेंढी चोरत असताना मेंढपाळाने त्याच्या पायाला बाण मारला. त्यामुळे तैमूर लंगडत चालत असे. त्याला 'Taimur the lame' असेच नाव पडले. तैमूर हा चेंगीझ खानच्या कुठल्याशा पूर्वजाचा वंशज होता. पण अतिमहात्त्वाकांक्षी तैमूरने चेंगीझ खानच्या घराण्यातील एका मुलीशी लग्न करून, चेंगीझ खान घराण्याशी आपला संबंध नीटच जोडला. मग त्याने चेंगीझ खानचे धडे गिरवत एक एक गाव जिंकण्यास सुरुवात केली आणि चेंगीझप्रमाणेच, गाव जिंकले की गावाच्या रक्षणार्थ जे उभे राहिले होते त्यांना ठार मारण्याची परंपरा कायम ठेवली. सर्वप्रथम त्याने पर्शियावर मोर्चा साधला. त्यानंतर पलीकडे इराक, सीरिया व तुर्कीवरही हल्ला केला. याने 1398मध्ये दिल्लीवर हल्ला चढवला, तो भारतातील संपत्ती लुटण्यासाठी. त्या वेळी दिल्लीवर तुघलकांचे राज्य होते. हिरत, दिल्ली, बगदाद, दमासकस, पर्शियामधील आणखी काही शहरे, तसेच अर्मेनिया, जॉर्जिया आदी प्रांतांवर त्याने स्वाऱ्या केल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी त्याने हजारो सैनिक तर मारलेच, तसेच नागरिकांनादेखील सोडले नाही. याच्या आधीचे चेंगीझ खान, कुब्लाई खान या मोंगोलांनीसुध्दा हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. तैमूरने हिरत व दिल्लीमध्ये मारलेल्या लोकांच्या कवटयांच्या मोठमोठाल्या ढिगांचे तत्कालीन वर्णन मिळते. याने मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, पर्शियन, असायरीयन सर्व धर्मांच्या लोकांना मारले. त्याने त्याच्या कार्यकाळात जगाची लोकसंख्या 5%नी कमी केली होती, असा अंदाज व्यक्त केला जातो.

 

या क्रूरकर्मा तैमूरच्या नातवाचा नातू म्हणजे बाबर. हा उझबेकिस्तानच्या लहानशा भागात राज्य करत होता. बाबरने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोधीला हरवले व मुघल घराण्याची स्थापना केली. याचा मुलगा हुमायून त्याच्यानंतर राज्यावर आला. शेरशहा सुरीने हरवल्यावर हुमायूनने पर्शियामध्ये आश्रय मिळवला. हुमायून पर्शियामध्ये 15 वषर्े राहिला. हुमायून नंतर परत भारतात आला आणि आग््रयाचे तख्त जिंकले. त्याच्या नंतर मुलगा अकबरने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हेमचंद्रला हरवल्यावर मुघल राज्य भारतात स्थिरावले.

 

पर्शियामध्ये अनेक वर्षे राहिलेल्या मुघलांवर पर्शियन संस्कार झाले होते. त्यामुळे मुघल राज्यात भारतात मोंगोलियाची संस्कृती न येता पर्शियाची संस्कृती आली आणि भारतात आल्यावर त्यांच्यावर सहजच भारतीय संस्कारदेखील झाले. यांच्या काळात पर्शियन व भारतीय कलांचा मिलाप होऊन 'मुघल' शैली तयार झाली.

अकबरपासून मुघालांवर भारतीय तत्त्वज्ञानाचे संस्कार होऊ लागले. अकबराने हिंदू, जैन, इस्लाम आदी धर्मांच्या शिकवणीतून दिन-ए-इलाही नावाच्या नवीन धर्माची स्थापना केली. या नवीन धर्मावरून त्याने प्रयाग क्षेत्राचे नाव बदलून 'इलाहबाद' असे ठेवले. त्याच्यानंतर जहांगीर व पुढे त्याचा मुलगा शहाजहान यांनी राज्य केले. शहाजहानचा मोठा मुलगा दारासुखो हा तर पूर्ण भारतीय झाला होता. याने हिंदू धर्माचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून 52 उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. खरे तर हा थोरला मुलगा असल्याने मुघल सम्राट व्हायचा, पण धाकटया औरंगझेबने सर्व भावांची हत्या करून, वडिलांना तुरुंगात टाकून सिंहासन हडपले. औरंगझेबने अनेक वषर्े राज्य केले, पण त्याच्या मृत्यनंतर मुघल साम्राज्य पार कोसळले.

भारतात मुघलांचे राज्य येऊन फुलून नामशेष झाले. या दरम्यान मूळ मुघलांच्या देशात काय चालू होते ते पाहू. कुब्लाई खानने बौध्द धर्म स्वीकारला होता तिथपर्यंत आपण पहिले. तिबेटच्या बौध्द भिक्षूला आपला राजगुरूही केले होते. हळूहळू तिबेटमधून मोंगोलियामध्ये बौध्दधर्माचा प्रसार झाला आणि मोंगोलियामध्ये बौध्द धर्म स्थिरावला. मोंगोलियामधील तेन्ग्राी धर्म बौध्द धर्मात विलीन झाला.

 

तिबेटमध्ये यापूर्वी भारतातून शेकडो बौध्द ग्रांथ पोहोचले होते. ते सर्व संस्कृत भाषेतील होते. तसेच काही संस्कृत ग्रांथांची चिनी भाषांतरे तिबेटमध्ये उपलब्ध होती. या सर्व संस्कृत व चिनी ग्रांथांची तिबेटी भाषांतरे केली गेली होती. या ग्रांथाच्या संचांना कांजूर व तांजूर असे म्हणतात. कांजूरच्या 108 ग्रांथांमध्ये बुध्दाची वचने आहेत, तर तांजूरच्या 226 शास्त्रीय ग्रांथात तत्त्वज्ञान, व्याकरण, वैद्यकी, गणित, संस्कृत शब्दकोश असे अनेक विषय हाताळले आहेत. यापैकी 14 ग्रांथ गणपतीवर आहेत!

 

अठराव्या शतकात या ग्रांथाच्या संचाचा मोंगोलियन भाषेत अनुवाद केला गेला. बौध्द भिक्षू, शास्त्रज्ञ, शिक्षक, गणितज्ञ अशांनी हा अनुवाद केला. अनुवादाचे हे काम 25 वषर्े चालू होते. या भाषांतराने मोंगोलियाची भाषा आणि लिपी दोन्हीमध्ये सुधारणा झाल्या. तेथील शास्त्रीय शिक्षणावर तांजूरचा प्रभाव पडला. तांजूरचा प्रत्येक ग्रांथ चिनी जाड कागदावर, उभ्या ओळींमध्ये, सुंदर लाल अक्षरात लिहिला आहे. पानापानावर सुरेख चित्रे काढली असून चंदनाच्या लाकडी पट्टयांमध्ये बांधला आहे. 2011मध्ये मोंगोल तांजूरला UNESCOने 'जागतिक दस्तऐवज' (UNESCO's World Documentary Heritage) म्हणून मान्यता दिली.

 
family of the  mughal_1&n

मोंगोल तांजूर

विसाव्या शतकात मोंगोलियावर काही काळ चीनने व नंतर रशियाने राज्य केले. कम्युनिस्ट अमलाखाली लाखो मोंगोलियन नागरिकांची कत्तल केली गेली. बौध्द ग्रांथ जाळले गेले आणि मंदिरे तोडली गेली. 1950च्या दशकात चीनने मोंगोलियाचा दक्षिणेकडचा 'इन्नर मोंगोलिया' हा भाग गिळंकृत केला. 1990मध्ये कम्युनिस्ट राजवट उलथवून मोंगोलियामध्ये लोकशाहीची स्थापना झाली. ही क्रांती शांततेच्या मार्गाने घडवून आणण्यात कुशोक बकुल रिंपोचे 19वे यांचा मोठा हात होता. रिंपोचे हे मोंगोलियामध्ये नेमलेले भारताचे राजदूत होते. ते लडाखमधील एक बौध्द मठाधिपती होते, आमदार व खासदार म्हणून निवडून आले होते. मोंगोलियाचे राजदूत म्हणून 1989मध्ये त्यांची नेमणूक केली होती. मोंगोलियामध्ये त्यांनी अनेक प्राचीन बौध्द मठ पुन्हा सुरू केले आणि राजकीय घडामोडी होतांना हिंसाचार होऊ नये यासाठी जनजागृती केली. मोंगोलियामध्ये आजही त्यांना 'Elchin Bagsh' (राजदूत गुरू) म्हटले जाते.

 

चीनचा आणि रशियाचा मंगोलियाप्रती व्यवहार पाहता व मोंगोलियाने तैमूर, बाबर, औरंगझेब यासारखे क्रूर राजे भारताला दिलेले पाहता, भारताने मोंगोलियाला फक्त प्रेम, शांती, जीवनशास्त्र व संस्कृतीचे धडे पाठवले हे अद्भुत आहे! खरोखर केवळ विश्वगुरूच असा व्यवहार करू शकतो.

 

आज मोंगोलिया हा बौध्दबहुल देश आहे आणि मुघलांचे वंशज आपल्या बौध्द वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आहेत. घराघरात बुध्दाचे मंदिर दिसते. बुध्दाची वचने गायली जातात. भारतातील शास्त्र, गणित शाळेत शिकवले जाते. राम, कृष्ण, बुध्द, विक्रमादित्य, भोजराजा, पंचतंत्र यांच्या गोष्टी इथली मुले ऐकतात.

 

भारतातील जे लोक स्वत:ला 'मुघलांचे वंशज' समजतात, ते मात्र भारतीय गोष्टींना कडाडून विरोध करण्यात आपले 'मुघलत्व' सिध्द करायचा प्रयत्न करतात. स्वत:च्या हिंदू प्रजेवर जिझिया लादणाऱ्या, स्वत:च्या राज्यातील हिंदू-जैन मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगाझेबचे नाव दिल्लीमधील एका महत्त्वाच्या रस्त्याला होते. 2015मध्ये या रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव दिले, त्याला विरोध केला. तसेच 2018मध्ये इलाहाबादचे नाव पुन्हा होते तसे प्रयागराज केले, यालादेखील विरोध केला. बाबरने पाडलेल्या रामजन्मभूमी मंदिर व औरंगझेबाने पाडलेल्या काशी-मथुरेच्या मंदिरांसाठीसुध्दा हे 'तथाकथित' मुघल हिंदूंशी संघर्ष करत आहेत.

 

मुघलांचे स्वयंघोषित, बनावट वंशज स्वत:ला दारा सुखोचे वंशज न मानता औरंगझेब, बाबर व तैमूरचे वंशज समजतात हे त्या थोर मुघल पुत्राचे दुर्भाग्य आहे. भारतीय धर्माला विरोध करणे हा फक्त भारताच्या नाही तर मोंगोलियाच्या आणि पर्शियाच्या संस्कृतींचासुध्दा पराभव आहे. स्वत:ला मुघलांचे वंशज समजणाऱ्यांचे हे दुर्दैव आहे की ते पूर्वजांच्या दुष्कृत्याचे ते समर्थन करत आहेत. त्यांना त्यांच्या so called पूर्वजांचे चांगले गुण कळलेच नाहीत. भारतातील कम्युनिस्ट इतिहासकारांनीदेखील हीच शिकवण देऊन या दुर्गुणगानाला खतपाणी घातले. यांच्या इतिहासाने हेदेखील सांगितले नाही की त्यांच्या बांधवांनी बुध्दाची अहिंसा अंगीकारून स्वत:चे कल्याण करून घेतले असून ते वाळवंटातसुध्दा सुखाने नांदत आहेत.

 

संदर्भ -

1. The Mongols: From Genghis Khan to Tamerlane By W. B. Bartlett

2. Archives of the Memory of the World Program

3. Mongolia-India Relations By Oidov Nyamdavaa