मोदींचा स्ट्रेट ड्राईव्ह

विवेक मराठी    25-Feb-2019
Total Views |

जिथे लोक आपला मोठेपणा सिद्ध करायला आपल्या चपला दुसऱ्याला उचलायला लावतात, अशा देशात आपण अगदी सामान्य आणि कोणीतरी छोटी व्यक्ती आहोत, असं स्वतःचं 'मार्केटिंग' करायलाही मोठी हिंमत लागते. मोदी ही साधी-भोळी व्यक्ती आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. Rather ते तसे नाहीत, हे त्यांचं समर्थन करण्याचं मुख्य कारण आहे. मोदी मार्केटिंग करताना – मग ते स्वतःचं असो, पक्षाचं असो किंवा परदेशात भारताचं असो, ते ज्या conviction ने करतात, त्यात आपल्या productबद्दल जबरी आत्मविश्वास असतो. म्हणजे आजच्या surf excelच्या जमान्यात समजा मोदी 555चे किंवा सनलाईटचे जरी sales executive झाले असते, तरी त्यांनी तोही विक्रमी विकून दाखवला असता. कुठलीही गोष्ट विकायची – मग ती एखादी कल्पना असेल, तुमचा विचार, तुमची बाजू असेल किंवा शासकीय योजना, त्या गोष्टीबद्दल तुम्ही स्वतः convince असलात, तर त्याबद्दल लोकांना विश्वास वाटतो. विरोधकांमध्ये नेमकी याची कमतरता आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातला आत्मविश्वास उसना आणलेला असतो आणि ते बघितल्यावर त्यांच्याप्रती एक प्रकारची अविश्वासाची भावनाच निर्माण होते. उदाहरणार्थ, राहुल गांधींचं परीटघडीचं धोतर घालून गबाळ्यागत चालणं आणि विनोदी म्हणता येतील असे ईशान्य भारतातील पगड्या/मुकुट घालून मोदींनी आत्मविश्वासाने भाषण करणं यातला फरक बघावा. एखादी गोष्ट करताना – मग ती भलेही राजकीय फायद्यासाठी का असेना, ती मनापासून आणि आत्मविश्वासपूर्वक करणं, हा तो फरक आहे. अशा उच्च दर्जाच्या मार्केटिंगला 'भावनेला हात घालणं' वगैरे म्हणायची पद्धत आहे आणि कोणताही राजकारणी हेच करण्याचा प्रयत्न करत असतो. निवडणूक प्रचार म्हणजे तुमचं मार्केटिंगच असतं आणि ते करणं ही एक व्यावहारिक अपरिहार्यता आहे. मोदी त्यात अधिक कल्पक आहेत आणि राहुल गांधी 'दिव्य' आहेत. आम्ही आमच्या राज्यात समाजातल्या कनिष्ठ वर्गातल्या लोकांनाही सन्मानाची वागणूक देतो, या साध्या तरीही impact करणाऱ्या संदेशाचं मार्केटिंग करण्याची संधी सर्व विरोधकांना होती. आपलं हिंदुत्व सिद्ध करायला विरोधकांनी कुंभमेळ्यात मोदींच्या आधीच हजेरी लावली होती. पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांना सुचलंच नाही. वेळ साधता आली नाही. आणि मोदी तर timingच्या बाबतीत सचिनच्या straight driveला हरवतील इतके माहीर आहेत. त्यांनी मौके पे चौका लगावला. तसं करताना convictionही दाखवलं. लोकांना ते भावलं  आणि आवडलं. त्यांनी मार्केटिंग केलं म्हणा किंवा मनापासून केलं म्हणा, त्याने मोदींचा किंवा भाजपाचा काय फायदा होईल, तो भाग अलाहिदा; पण ज्यांचं पादप्रक्षालन केलं, त्यांना आयुष्यभर लक्षात राहील असा आनंद त्यांनी दिला. आज मी जे काम करतो, ज्याला समाजच काय, मीही आजवर 'हलकं' काम समजत होतो, त्याच कामासाठी माझ्या पंतप्रधानाने माझे पाय धुतले, या त्यांच्या निर्व्याज आनंदाची दखल आपल्यापैकी कोणी घेतली का???

(तळटीप : स्वतःला फॉरवर्ड आणि लिबरल म्हणवून घेणाऱ्या काही विवक्षित मंडळींनी, निवडणुका आल्याने नेता लहान मुलांचे पार्श्वभाग धुतानाचं व्यंगचित्र शेअर केल्याचं बघितलं. मोदी राजनेता आहेत, त्यांची खिल्ली उडवण्याचा पूर्ण हक्क आपल्याला आहेच. पण ते करताना तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुणे याची तुलना मुलांचे पार्श्वभाग धुण्याशी करून, निम्नस्तरीय लोकांच्या कष्टांबद्दल आपली मतं किती 'लिबरल' आहेत याचं ओंगळ दर्शन घडवलं आहे, याची नोंद घ्यावी.)

#सव्यसाची#