कोण जिंकणार  2019  ची निवडणूक ? आमच्याकडे आहे उत्तर

विवेक मराठी    18-May-2019
Total Views |

कोणताही अचूक अंदाज वर्तविण्यापूर्वी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवेकी माध्यमांतील प्रत्यक्ष वार्तांकनातून सुचविण्यात येणारी मोदी लाट किंवा मजबूत सुप्त लाट एवढी सशक्त आहे काकी भाजपच्या मतांचा वाटा कायम राहील किंवा वाढेलकिंवा मध्य प्रदेशराजस्थानगुजरात आणि महाराष्ट्रातील भाजपच्या बालेकिल्ल्यात किरकोळ घट होईलबंगाल भाजपच्या दिशेने आणखी सरकत आहे काओडिशात बिजदची सद्दी संपणार काया घटकांच्या आधारेच मतदानाचे परिणाम भयंकर प्रमाणात बदलणार आहेत.

- मिलिंद ओक

90 कोटी मतदार, 545 मतदारसंघदहा लाख मतदान केंद्र, 10 कोटी निवडणूक अधिकारी, 464 पक्ष आणि एक महिन्याची प्रचार मोहीम... पृथ्वीवरील लोकशाहीचा एक विलक्षण उत्सव आता संपायच्या बेतात आहे.

राजकीय पक्षांनी घेतलेल्या 3000 हून अधिक सभा आणि रोड शोने भारताचा कोपरा न् कोपरा ढवळून काढला आहेदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः200 पेक्षा अधिक सभा घेतल्यापण अखेरच्या टप्प्यात सर्व लक्ष "मोदी पुन्हा सत्तेत परत येतील की नाही", याकडून "भाजपा लोकसभेत एकहाती बहुमत मिळविणार कायाकडे निर्णायकपणे वळले आहे.

शेवटच्या आणि व्या टप्प्याचे मतदान अद्याप व्हायचे असताना निवडणूक तज्ञ आणि सेफोलॉजिस्ट यांच्यातील संभ्रम एका नव्या उंचीवर पोचला आहेहे कोडे एकाच वेळेस सोपेही आणि गुंतागुंतीचेही - "मोदी लाट अस्तित्वात आहे किंवा नाही?" "भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल का आणि मोदी पंतप्रधान म्हणून परत येतील का?"

स्मार्ट इंडियन इलेक्टोरेट्सने अशा सर्व विश्लेषणांना खात्रीने गोंधळात टाकायचे ठरविले आहेगेल्या दशकात मतांच्या फिरवाफिरवीत प्रचंड प्रमाणात वैविध्य दिसून आली आहे खासकरून भाजपसाठीआपण 2009 आणि 2014 च्या निवडणुकांची तुलना केली तर देशभरात 209 मतदारसंघात भाजपच्या मतदानात 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहेभारतातील निवडणुकीच्या इतिहासात हा खरोखरच एक महत्त्वाचा कल आहे.

हा कल उत्तर प्रदेश [64/80जागा], महाराष्ट्र [20/48 जागा], राजस्थान [19/25 जागा], पश्चिम बंगाल [21/42] जागागुजरात [16/26 जागा], मध्य प्रदेश [18/28 जागाया राज्यांमध्येम्हणजे या राज्यांतील 209 पैकी 158 जागांवरजास्त एकवटलेला आहेया 158 जागांपैकी उत्तर प्रदेशमहाराष्ट्रराजस्थान आणि पबंगालमधील 95  जागांवर भाजपच्या बाजूने 15% पेक्षा जास्त कल आहे.

कोणताही अचूक अंदाज वर्तविण्यापूर्वी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवेकी माध्यमांतील प्रत्यक्ष वार्तांकनातून सुचविण्यात येणारी मोदी लाट किंवा मजबूत सुप्त लाट एवढी सशक्त आहे काकी भाजपच्या मतांचा वाटा कायम राहील किंवा वाढेलकिंवा मध्य प्रदेशराजस्थानगुजरात आणि महाराष्ट्रातील भाजपच्या बालेकिल्ल्यात किरकोळ घट होईलबंगाल भाजपच्या दिशेने आणखी सरकत आहे काओडिशात बिजदची सद्दी संपणार काया घटकांच्या आधारेच मतदानाचे परिणाम भयंकर प्रमाणात बदलणार आहेत.

मग वाट कशाची पहायची आहेचला पाहूया.

ही निवडणूक तज्ञांसाठी दुःस्वप्न बनत असताना वाचकांनी पाऊल उचलून स्वतः भविष्यवाणी करण्याची वेळ आली आहेवर तयार केलेल्या नकाशात केवळ राज्य निवडाआपल्या अंदाजानुसार स्विंग घटक निवडा आणि आपले स्वत:चे अंदाज सोशल मीडियावर मित्रांशी सामाईक करा.

अनुवाद : देविदास देशपांडे